वर्‍हाडी शब्दकोश

Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42

नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्‍हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्‍हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!

१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं, बाफाचं नावं सुचवा.
१) माडिया शिकुया
२) माडिया बोलूया
की आजुन काही घेऊ
सुचवा आत्ताच श्रीगणेशा करुयात.

बरं

दाट माडियांग काईयकाळ.
दाट= चला
काईयकाळ=शिकुया (काईयना=शिकणे)

काडी=काठी
अंग टाकणे=वामकुक्षी
मांडणे=तयार करणे (जसं चहा मांडते, स्वयपाक मांडते)
आमटी=चवळी किंवा हरभरे अथवा तुरीच्या शेंगाची आमटी
आंबट गोड वरण्=आमटी
चिमटे=शेंगोळे
भयताड=बावळट
आलु=बटाटा
कोनाडा=कप्पा

त्या ऐवजी माडिया भाषेचा 'बिसमिल्ला' करू या असेही चालले असते Lol सलाम वालेकुम रॉबीनहुड

बी , नक्की खात्री नाही पण खालचे शब्दार्थ खालीवर झाले का ?
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर

त्या ऐवजी माडिया भाषेचा 'बिसमिल्ला' करू या असेही चालले असते >> बिस्मिला पेक्षा श्रीगणेशा केंव्हाही बरा.

खालील नागपुरी/वैदर्भीय शब्दांचे अर्थ सांगा पाहू :

  1. झामल झामल करणे
  2. बुहारीपणा करणे किंवा बुहारी फैलावणे
  3. बावन बावन करणे
  4. भिन होणे/करणे
  5. पिलांटू
  6. फिट्याल
  7. रमसोट
  8. अंटवणे
  9. पनौती लावणे
  10. कलटणे
  11. बंबाड
  12. सैती सैती
  13. रिकामडेंगणा
  14. फलफल करणे
  15. येल पाडणे
  16. गेलपाड्या
  17. लल्लाऱ्या
  18. भाद्या
  19. बसंतपंचमी

1.झामल झामल करणे= वेंधळेपणा
2.बुहारीपणा करणे किंवा बुहारी फैलावणे
3.बावन बावन करणे=कुरकुर करने
4.भिन होणे/करणे
5.पिलांटू
6.फिट्याल
7.रमसोट
8.अंटवणे
9.पनौती लावणे=
10.कलटणे=दिलेला शब्द मोडणे
11.बंबाड =तोंड्/चेहरा
12.सैती सैती
13.रिकामडेंगणा=खालीपिली
14.फलफल करणे
15.येल पाडणे=मटकने
16.गेलपाड्या
17.लल्लाऱ्या
18.भाद्या
19.बसंतपंचमी

1.झामल झामल करणे= एखादे काम निट न करता फक्त ते काम केल्यासारखे करणे.
2.बुहारी=बुहारा=अपशकुनी किंवा तत्सम अर्थाने.
...बुहारी आदत = वाईट सवय
3.बावन बावन करणे=एकसष्ट बासष्ट करणे = झामल झामल करणे
4.पिलांटू = पित्तु = हस्तक
५.कलटणे=दिलेला शब्द मोडणे
६.बंबाड = भरपुर= चिक्कार
७.रिकामडेंगणा= रिकामटेकडा = खालीपिली
८.फलफल करणे = आगाऊ / अव्वाच्या सव्वा बोलणे
९.येल पाडणे = वेल्हाळा = मटकने
१०.गेलपाड्या = गेलठ्या = गाडव माणुस या अर्थाने.
११.लल्लाऱ्या = डंगर्‍या = ढीलाढाला माणुस या अर्थाने.

आता हे शब्द बघा.
१) माहुरा
२) बोथर
३) टालगी
४) जित्रुब
५) पहार
६) बाज
७) जुप्न.
८) सुदा
९) नावकुल
१०) नावनाव
११) बंदा
१२) सप्पा
१३) सिद्दा
१४) अध्धर
१५) दाल्ला

बाज = झोपायची खाट
बंदा = अख्खा, संपूर्ण
सप्पा = स्वच्छ
सिद्दा = सरळ
अध्धर = अलगद, वरवर
अंटवणे = पळवणे, चोरून नेणे

सप्पाचे दोन अर्थ आहेत.
सप्पा = स्वच्छ = सगळे
बोथर = वाकळ = देशमुखी
बोथर=बोथट हे बहुदा चुक असावे. बोचर = बोचरा = तिक्ष्ण विरुद्ध बोथट हे बरोबर

आता हे शब्द बघा.
१) ऐनक
२) बेकुब
३) मेकुड
४) आव
५) कवटा
६) खाती
७) माली
८) कंदोरी
९) शायवान
१०) तुत्या
११) इरित
१२) वार्त
१३) वार्ती

अरे वर्हाडी भाषेचा बीबी बन्द पडला की काय?

दांगडो = दंगा .. हा शब्द चक्क वृत्तपत्रातही प्रमाण्शब्द म्हणून वापरतात

अभय आर्वीकर | 12 January, 2010 - 00:07
आता हे शब्द बघा.
१) माहुरा
२) बोथर = बोथट
३) टालगी = तालगी असावं ते.. छोट्या बाळाच्या खाली जी चादर कम गोधडी घेतात
४) जित्रुब
५) पहार = कुर्‍हाड
६) बाज = खाट
७) जुप्न = गाठोड
८) सुदा = सरळ उदा. सुदा राह्य = सरळ राहा
९) नावकुल
१०) नावनाव = सगळा उदा. जेवाले नावनाव लोक आहे.
११) बंदा = अख्खा
१२) सप्पा = साफ
१३) सिद्दा = सरळ राहा याच अर्थाने वापरतात
१४) अध्धर = अद्दर, अलगद
१५) दाल्ला = नवरा

अभय आर्वीकर | 13 January, 2010 - 00:26
आता हे शब्द बघा.
१) ऐनक
२) बेकुब
३) मेकुड = शेंबुड
४) आव = मिजास उदा. जास्त आव नको आणु.
५) कवटा
६) खाती
७) माली
८) कंदोरी
९) शायवान
१०) तुत्या
११) इरित = विहरीत
१२) वार्त
१३) वार्ती

बरेच शब्द वर आणि प्रतिसादात दिलेले आहे.. अजुन काही माझ्याकडून..

नेहमीच्या वापरातले शब्द :

वज्जेर / बेज्जा = खुप
छिलुन = साल काढून
सरका राह्य = सरळ राहा ( थोड्क्यात औकातीत राहा )
ढेबरा = पोट सुटलेला
ढेपशी / चपटी = चपट नाक असणारी ( च चमच्याचा )
बेस = छान ( बेस्ट चा अपभ्रंश असावा )
पल्ला = पडला
हाडूकपाद्या = :प हि शिवी आहे खुप बारीक अंगयष्टी असलेल्या व्यक्तिसाठी
काऊन = का बरे
लगोरी = इकडे बरच काहीतरी नाव आहे त्याला बहुतेक बिल्लोरी कि गिल्लोरी
रेशटिप = लपनाछपनी = लपंडाव
खेळभांडूले = इकडली भातुकली..घर घर
सप्पाट्यान = खुप जोरात .. उदा. मी लय सप्पाट्यान पळत गेलो.
मोटीमाय= मोठी आई
उलिशीक = जराशी .. उदा. उलिसा चा टाक. = जरासा चहा कर.
थाडी = कच्ची
शेंबडे/ शेंबडा = जिचं / ज्याचं नाक सतत वाहत राहत तिला / त्याला.. थोडक्यात लहान पोरांना वापरण्यात येणारा शब्द.. म्हणुन ज्याला काही समजत नाही त्या कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तिला त्या शेंबड्याले का समजते अस म्हटल्या जातं ..
म्याड = mad
टोंगळा / घुटना = गुडघा
ढोपर = हाताचं कोपर
ढुकणे = दुसर्‍याच्या ताटात डोकावुन पाहणे..
फोत्तरं / फोतरं / सालटं = साल
भांग कर = केसांना कंगवा कर
वावर = शेत
लय / भल्ला = खुप
बोहनी = दिवसातली पहिली कमाई.. इकडे बहुधा त्याला भवानी म्हणतात..
बुहारिण = कपड्यांचा बदल्यात भांडे विकणारी स्त्री
लावडीनं = चेटकिन
कोनटा / कोपच्या = कोनाडा
तीर मारणे = शान दाखवणे / खुप्पच मोठ काम करुन आला या अर्थानं ..
सुदिक = पन / अजुन / आणखी या अर्थानं .. उदा. हे सुदिक घे = हे पन घे
भुलाबाई = इकडचा भोंडला
थुत्तर / थोबाड = तोंड
गोर्‍हं = गायीचं वासरु
डेंबुर = टेंगुळ
झोकानं = हळू
छाकटा / छाकटी = मतलबी / स्वार्थी
मटकी = नट्टा पट्टा करणारी
साजरी = सुंदर
भाद्र्या = गरजेपेक्षा जास्त तोंड चालवणारा
गाली = शिवी
पौटा = गाईनं / म्हशीनं टाकलेल शेणं
भेक्कड / भेकाड = भित्रा
नसानकोंबडी / घिनघिनी = नसनस / कटकट करणारी
किर्र करणे = स्वतःचच ऐकवुन एखाद्याचं डोक चढवणे
भिन करणे = पागल करणे
दातरी = दात समोर असणारी
मयला / मैला = मळ
मेंदाटली = मंद
लकलक करणे = पदार्थ दिसताच खावखाव करणे
हातलावणी = पकडापकडी
गिल्लीदंडा = विटीदांडू
गुल्लेर = गोफण
कंचा = काचेची गोल गोटी .. खुप सुंदर दिसत आहे = कंचा दिसताय असे पन म्हणतात Wink
लिचोंडी = चिमटा
कुचिन = खोडकर
चाप्टर = अग्गाऊ हुशार Lol
काड्या करणे = खोड्या काढणे
बुक्की = ठोसा
टक्कुर = मेंदु
डोकस = डोक
फकाल्या = इकडल्या तिकडल्या वायफळ गप्पा
चोपडा = गुळगुळीत
गच्ची = माडी / टेरेस

हिंदीतुन जसेच्या तसे उचललेले शब्द :

आफत = संकट
पैदल = चालत
साली = वर्षी (उदा. या साली बेज्जा पाऊस पल्ला )
दिवाल = दिवार = भिंत
वापस = परत
अंदर = आत
झगडा = भांडण
वात्तड = लवकर न तुटणारे
खत्रा = जबरदस्त
बेक्कार = वाईट .. पण हा शब्द जबरदस्त या अर्थानेही वापरण्यात येतो.

वस्तुंची नावे

बंडी = बैलगाडी
बंगला = घर
बंगई = लाकडाचा झोपाळा
डोगर / भगुनं = खोलगट भांड
शिशी = काचेची बरणी
कवाड = दरवाजा
सुपली = धान्य निवडायच सुप..
सुपडी = ज्यात आपण केर जमा करतो
गडवा = पाण्याचा तांब्या
तोरडी = चाळ / पायल Wink
पावशी = भाजी चिरणी

फळ भाजी इत्यादि :

घुयटी = आंब्याची कोय
डांगर = खरबुज
अंगुर = द्राक्ष
कटुले = रानातली एक भाजी आहे.. फणसाचं बोटभर लांब असलेल रुप Happy
तरोटा = हि सुद्धा एक रानभाजी आहे.. पहिल्या दुसर्‍या पावसानंतर शेतात , रस्त्याच्या कडेने उगवते .
कपास / कपाशी = कापुस
गोडलिंब = कढिपत्ता
टेंबर = हे एक फळ आहे. रानमेवा
चिचुके = चिंचोका
दाठ्यान = देठापासुन
अद्रक= आलं
भेदरं = टमाटर
फल्ली = भुईमुंगाची शेंग

उरलेले ब्रेक के बाद ..

झाकट= संध्याकाळ
सामट/सामटी = बोळ (उदा. बापा म्या नाई जाइन त्या सामटीतनी बॉल आन्याले बम अंधेरा रायते तटीसा)
बेबटी = गल्ली (अबे आज कॉलेज नंतर सरायनं घरी बलावलं रे बा, त्याहीचं मकान त्या जगदेवरावच्या बेबटीतनी हाय, ४ नंबर च मकान)
पिलमपोया = मेंढपाळ लोकांकडे असते ती वेळु ची ओबड़धोबड़ बासरी/ समांतर अर्थात सतत किरकिर करणाऱ्याला बहाल करायचे एक विशेषण
प्याऊ, पाणेरी = पाणपोई
बावल्या खदान चा = बावळटपणाच्या खाणीतला हीरा (खदान, बावला हिंदी)
भोसईच्या = भोसड़ीच्या ह्या शिवी चे वरहाडी रूप Lol
गेंगल्या = मतिमंद + बावळट
चिलमतोंडया = पाचाट असावे तसल्या तोंडाचा
चुन = झुणक्या ला असलेला मराठी शब्द (हा बहुतेक दासगणु महाराजांनी शेगावच्या महाराजांच्या पोथित सुद्धा वापरला आहे शब्द)
बाबा जी = फ़क्त फ़क्त अन फ़क्त शेगाव निवासी गजानन माऊली _/\_ कोणी काही टेंशन मधे असल्यास " भेतं कायले बे, बाबाजी सारे ठीक करतेत शेगाव ले बसुन" असे म्हणतात
वान्नेर = माकड़ (काहाले वान्नेरा सारखे कुदु राहले हे लेकर)
कूदी = उडी
मायबाई = आई साठी योजिलेला शब्द (चाला न बे घरी मह्या मायबाई च्या हातची चाय पेजा, आमच्याकडे चाय बनवली जाते बनवला जात नाही)
ठु = ठेव (तो मोबाइल ठु न बापा आता साइड ले)

अजुन आठवले की देतो Happy

सोन्याबापु ,
आत्ता मी वान्नेर लिहणारच होती ..
बंगल्याले मकान मनते थे बी रायलचं ..
कुटी न सामटी बी लिहाची राह्यली .. बर झाल तुमीबी आले इतं . Happy

Pages