
माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणात, अभ्यास करताना सततचा मित्र म्हणजे आकाशवाणी पुणे वरचे विविध भारती !
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी , विविध विषयांवरचे विविध मनोवृत्तीला साद घालणारे , विविध गाणी घेऊन सतत गुंजत राहणारी विविध भारती! तुमच्या जीवनात चैतन्य देत राहणारी, अभ्यास करताना चित्त एकाग्र करण्यास मदत करणारी विविध भारती आणि त्यावरील प्रसारित होणारी गाणी.
वा काय छान दिवस होते !
आणखीन एक गोष्ट आठवते ती म्हणजे एक कार्यक्रम संपून दुसरा कार्यक्रम सुरू होण्याच्या मध्ये जो काही सेकंदांचा वेळ असतो त्या वेळात अगदी खास आकाशवाणीसाठीच बनलेली काही धुन, वाद्य संगीतात ऐकू यायच्या! काही व्हायोलिन वरच्या होत्या, काही मेंडोलींवरच्या होत्या, काही बासरीच्या होत्या. मला त्यातल्या तीन चार धुन स्वरावटीं सकट अजूनही लक्षात आहेत; पण त्या आता कुठे ऐकायला मिळतील ,त्या कशा शोधायच्या हे मात्र कळत नाहीये ! कोणाला आठवतायेत का या धुन आणि त्या आता कुठे सापडतील यासाठी कोणी काही मदत करू शकेल का ?
आकाशवाणीhttps://youtube.com
आकाशवाणी
https://youtube.com/shorts/Lqqgn-0jpfQ?si=VfG9g-WI2gGYk20g
हे एक... हे प्रत्येकाच्या कानात कसे वाजेल?
टुंगडुंग टुंगडुंग टुंगडुंग
टुडुंगडुंग
मंगलध्वनि -https://youtu.be/
मंगलध्वनि -
https://youtu.be/-1BnrjyIoMs?si=NX3UKueG0J_5-VuW
इथे दोन तीन वेगवेगळ्या धून
इथे दोन तीन वेगवेगळ्या धून आहेत.
https://youtu.be/OFxLJ8fM7Jg?si=XiIaTh97-RIAUwwk
राज , धन्यवाद प्रतिसाद
राज , धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल!
तुमच्या पहिल्या आणि तिसऱ्या प्रतिसादातल्या दोन ही धून या आकाशवाणी चे रोजचे प्रसारण सुरू होण्याआधी काही काळ वाजणारी धून आहे
मी म्हणतोय त्या म्हणजे दोन कार्यक्रमांच्या मध्ये जो काळ असतो त्यात दहा सेकंदाची वगैरे अशी धुवून वाजायची किंवा जाहिराती चालू झाल्या की दोन जाहिरातीच्या मध्ये एक-दोन सेकंदाची धून वाजायची ... त्या !
आकाशवाणी युट्यूब चॅनलवर शोधून
आकाशवाणी युट्यूब चॅनलवर शोधून पहा. कदाचित तुम्हाला सापडू शकतात.
Ok
Ok