पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.
पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.
पेट्रोलमधे इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलची आयात कमी करावी लागत असेल तर हा देशहिताचा विचार आहे असे वाटते. तसेच ब्राझिलने इथेनॉल ब्लेण्डेड पेट्रोल पासून पूर्णपणे इथेनॉलवर शिफ्ट केले आहे हा दावाही या निर्णयाला पुष्टी देतो असे वाटेल. मात्र अनेक संस्थांनी नीती आयोगाचा हवाला देऊन स्पष्ट केलेले आहे कि इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत २/३ असल्याने तितकी कमी उर्जा मिळणार आहे. म्हणजेच मायलेज कमी मिळेल.
नीती आयोग म्हणतो कि इथेनॉल वापरण्याने होणारी उर्जाघट ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असेल. म्हणजे ई२० पूरक वाहनात जर ई ८५ इथेनॉल टाकलं तर ती घट वेगळी असेल. ई२० वाहनात पेट्रोल टाकले तर मिळणारा मायलेज आणि ई २० टाकल्याने मिळणारा मायलेज यात ६% घट दिसेल. ( लल्लनटॉप).
तर ई२० पूरक नसलेल्या म्हणजे ई१० किंवा ई ५ किंवा शुद्ध पेट्रोलवर असलेल्या वाहनात ई २० पेट्रोल टाकले तर होणारी घट वेगवेगळी असेल.
जर शुद्ध पेट्रोलसाठी असलेल्या वाहनात ई८५ पेट्रोल टाकले तर घट खूपच जास्त असेल. तसेच इंजिनालाही नुकसान होईल. अशा तक्रारी येत आहेत. अगदी एबीपी माझा या खासगी सरकारी वाहिनीनेही वाहनचालकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत.
सोशल मीडीयात गडकरींना विरोध होताना दिसतो. गडकरींनी पंधरा वीस दिवसांपूर्वी ई १०० ची घोषणाही केली.
याचे परिणाम म्हणजे लोक नवीन वाहन घ्यायला कचरत आहेत. एबीपी माझाने कुठल्यातरी सर्वेच्या हवाल्याने सांगितले कि ४०% लोकांनी नवीन वाहन घेणे लांबणीवर टाकलेले आहे.
लल्लनटॉपचा हा आणखी एक रिपोर्ट.
https://www.youtube.com/watch?v=_xvM3UaJrbA
त्यांनी सिरीजच केली आहे.
अन्य वाहीन्यांनीही या विषयावर उद्बोधक माहिती दिली आहे. इथे सर्वच सुशिक्षित आहेत.
पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू 45,000 किलो ज्यूल प्रती किलो आहे.
इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू 29,700 किलो ज्यूल प्रती किलो आहे. म्हणजे ३०,००० जवळजवळ. तीन पैकी दोन हिस्से.
इथे १/३ उर्जा कमी आहे. गणित थेट नसेल तरी याचा अर्थ साफ आहे कि शुद्ध पेट्रोलवर एखादा समजा ५ लिटर मधे ४०० किलोमीटर जात असेल
तर
त्याला आता ई२० पेट्रोल वापरून त्याला ५.४० लॉटर पेट्रोल लागेल.
ई८५ पेट्रोल वापरले तर त्याला ७.०३ लीटर पेट्रोल लागेल
आणि ई १०० पेट्रोल वापरले तर ७.५८ लीटर पेट्रोल लागेल.
हे फक्त उर्जा गुणोत्तर लक्षात घेऊन गणित केले आहे. इथेनॉलमुळे इंजिनची कार्यक्षमता वगैरे तीच राहते असे गृहीत धरलेले आहे.
थोडक्यात आयात कमी होईल पण खूप कमी होणार नाही. शिवाय नैऋत्येकडच्या राज्यात इथेनॉल पिकत नाही. तिथे इथेनॉलची वाहतूक करण्यासाठी जे इंधन लागेल त्याचा खर्च पाहता तिथे इथेनॉल ब्लेण्डेड इंधन विकणे पेट्रोलियम कंपन्यांसाठी नुकसानीचा सौदा ठरणार आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागात इथेनॉल ब्लेण्डेड इंधन उपलब्ध करणे शक्य होणार नाही.
म्हणजे देशाच्या मैदानी भागात हे इंधन सहज वापरता येणार आहे. लल्लनटॉपने नीती आयोगाचाच हवाला दिला आहे. त्यानुसार ऊसापासून किंवा तांदळापासून इथेनॉल बनवले तर प्रती एक लीटर इथेनॉलसाठी ऊस किंवा तांदळाला लागणारे पाणी जवळपास ७५०० लीटर ते १०००० लीटर असेल. हा टीकेचा विषय आहे. सरकारने दिशाभूल करणारे उत्तर देताना पिकाला लागणारे पाणी सांगितलेले नाही. त्यांनी फक्त कारखान्यात इथेनॉल बनवण्यासाठी लागणारे पाणी सांगितलेले आहे.
सरकारने असेही सांगितलेले आहे कि आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिले आहे. पण मक्यापासून बनवलेले इथेनॉल एकूण किती टक्के आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही.
सरकारचा कारभार पारदर्शी असेल तर इथेनॉल निर्मितीत सहभागी असलेल्या कारखान्यांची यादी दिली पाहीजे. या कारखान्यात तयार होणारे इथेनॉल सांगितले पाहीजे.
साधारण तर्काने सांगता येईल कि यात बहुतकरून सहकारी आणि खासगी साखर कारखानेच मोठ्या प्रमाणात असणार. मक्याची आकडेवारी उपलब्धच नाही. गडकरींचे साखर कारखाने आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. पण त्यांच्या मुलांचे इथेनॉलचे कारखाने असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत.
मारूती सुझुकीने ई ८५ साठी वॅगन आर बनवली. पण फक्त चार वाहने विकली गेली आहेत. ही परिस्थिती ग्राहकात असलेली भीती स्पष्ट करतेय.
आता ब्राझीलबद्दल.
ब्राझीलने टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेण्डींग वाढवत नेले. पन्नास वर्षे लागली. या काळात त्यांनी कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स इंजिनवर आधारीत वाहनांच्या उत्पादनासाठी पुरेसा वेळ दिला. इन्फ्रास्टृक्चर तयार केले. लोकांना जुनी वाहने भंगारात काढायला पुरेसा वेळ दिला. कुणाचेच नुकसाण होंणार नाही अशा पद्धतीने मधल्या काळात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनासाठी हवे ते पेट्रोल उपलब्ध करून दिले. जसजशी जुनी वाहने बंद होत गेली तसतसे जास्तीचे इथेनॉल पेट्रोलमधे वाढवत नेले.
इथे १२ वर्षातच ई २०, ई ८५ आणि आता ई १०० सुरू केलेय. आज ई २० पेट्रोलच अनेक ठिकाणी आहे. आजही १५ ते २० वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत. ती यासाठी तयार नाहीत. २०२२ च्या आधीची वाहने ई२० साठी तयार नाहीत. ती वाहने खराब होऊ द्यायची का?
एहसान पूनावाला यांनी दिल्लीतल्या गडकरींच्या घरासमोर धरणे देण्यासाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली आहे. ते म्हणतात आमचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही पक्षाला विरोध करत नाही.
यावरून हे आंदोलन सरकारनेच पुरस्क्रुत केले असावे असे वाटते. म्हणजे वाहनचालकात असलेल्या संतापाची कुणकुण लागल्याने गडकरींना बळीचा बकरा बनवून जनक्षोभाला वाट करून सरकार सुरक्षित राहू इच्छिते. या धोरणात अन्य कुणी वक्तव्ये केलेली नसल्याने आओपापच गडकरी हेच लक्ष्य बन्णार आहेत.
म्हणजे जर लोकांनी विरोध केला नाही तरी फायदा आणि लोकांनी गडकरींना विरोध केला आणि सरकारला सोडून दिले तरी फायदा असा हा प्रकार दिसतो.
संदर्भ
१. https://www.youtube.com/watch?v=liTmvZXl4S0
२. https://www.youtube.com/watch?v=i1iaPSLlFaU
३. https://i.ytimg.com/vi/C2VBDjxkqWE/hqdefault.jpg?sqp=-oaymwEnCPYBEIoBSFr...
४. https://www.youtube.com/watch?v=RkTKpuss7c8
५. https://www.youtube.com/watch?v=vZqPsscJZnw
६. https://www.team-bhp.com/news/maruti-wagonr-flex-fuel-only-3-units-sold-...
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये निवृत्त सनदी अधिकारी अशोक खेमका यांचा लेख आहे.
https://indianexpress.com/article/opinion/columns/indias-ethanol-policy-...
बहुतेक आजच्या दिवशीच फुकट वाचता येईल.
सियाम (SIAM) म्हणजे सोसायटी
सियाम (SIAM) म्हणजे सोसायटी ऑफ इंडीयन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स ने केंद्र सरकारला एक पत्र लिहीले होते. यात आम्ही तक्रार करत नसून इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करताना ग्राहकांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी सूचना केल्या होत्या. २८ जुलैला हे पत्र लिहीले होते. त्याची बातमी ५ ऑगस्टला न्यू इंडियन एक्सप्रेसने दिली होती. पण यावर सार्वजनिक चर्चा झाल्या नाहीत. लल्लनटॉपने हे प्रकरण डिजिटल माध्यमातून उघड केले आहे.
द न्यू इंडीयन एक्सप्रेसचा रिपोर्ताज :
Updated on:
05 Aug 2026, 9:26 pm
2 min read
After growing public concern lent credibility to complaints from a large section of car buyers, the Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) withdrew a letter sent to the Ministry of Petroleum and Natural Gas.
The letter had raised concerns that contamination in E20 fuel was causing vehicle-related issues, with SIAM citing the need for further authentication of the findings.
In a statement issued on Tuesday night, SIAM said the communication in question was part of routine and ongoing technical deliberations between various stakeholders, including industry bodies, oil marketing companies, auto OEMs (Original Equipment Manufacturers), and testing agencies. It stated that some of the figures mentioned in the letter require further verification.
The clarification came after a SIAM letter, written on July 28 to Petroleum Secretary Neeraj Mittal, became public. In the letter, the industry body said its members were witnessing a sharp increase in failures of vehicle components such as fuel injectors, fuel pumps, exhaust gas recirculation (EGR) valves, and other parts that come into direct contact with fuel or engine emissions.
The letter stated that investigations into the failed parts pointed to corrosion and wear caused by high chloride contamination in the E20 fuel being used. According to the letter, fuel samples collected from vehicles showed chloride levels of up to 500 parts per million (ppm), while samples collected from retail outlets showed contamination levels of up to 350 ppm.
SIAM said the increase in chloride-related issues had been observed specifically after the implementation of E20 fuel. Chloride accumulation in fuel or exhaust systems can cause corrosion and permanent damage to engine parts, either immediately or over time, depending on contamination levels.
The industry body added that automakers have been raising the issue of chloride contamination at the BIS committee for more than two years, but a decision to include chloride as a mandatory fuel quality parameter remains pending. SIAM sought the government's intervention on the matter.
It also flagged excessive moisture in E20 petrol, stating that high moisture levels can cause phase separation of the fuel and immobilise a vehicle immediately after refuelling. While the permitted moisture level is 3,000 mg/kg, SIAM said levels exceeding 10,000 mg/kg, or 1%, have been observed in many cases.
Responding to the reports, the Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG) said oil marketing companies (OMCs) regularly monitor fuel quality and have further strengthened testing protocols across the country.
"Certain media reports have cited issues of fuel adulteration or contamination. It is hereby clarified that fuel quality is monitored on a regular basis by Oil Marketing Companies. In addition to the advanced and elaborate testing protocols already in place, further checks have been instituted, including water ingress testing 8–12 times a day at over 87,000 outlets," the ministry said in a statement.
In its statement, SIAM said, "MoPNG has also instituted 3 ppm guidelines for chloride/sulphur as a precautionary measure for all ethanol being blended into the petrol supply chain. All of these steps fully meet the needs of the automobile industry."
It further said, "We understand from OMCs that additional checks have been instituted, including water ingress testing about 8–12 times a day at over 87,000 outlets and after every instance of rainfall near petrol pumps."
https://www.newindianexpress.com/business/2026/Aug/05/siam-highlights-hi...
लल्लनटॉप
https://www.youtube.com/watch?v=hBxh-TypnpU
यानंतर सियामने हे लेटर मागे
यानंतर सियामने हे लेटर मागे घेत असल्याचे सांगितले. का?
https://www.awazthevoice.in/india-news/siam-withdraws-letter-on-e-fuel-c...
प्रतिष्ठीत वृत्तपत्र हवे असणार्यांसाठी
https://www.hindustantimes.com/ht-explainers/siam-e20-withdrawn-letter-e...
क्लोराईडचं वाढतं प्रमाण आणि
क्लोराईडचं वाढतं प्रमाण आणि आद्र्ता शोषून घेण्यामुळे वाहनांना नुकसान होतंय हे या धाग्यावर आधी सांगितले गेलेले आहे. आता वाहन उद्योगाने ही चिंता व्यक्त केली आहे. म्हणजे टोयोटा आणि अन्य कंपनीने ग्राहकांवर एफ आय आर का केली यामागे काय प्रकरण आहे या शंका आता गडद होत जाणार आहेत. ग्राहकांना येणारे अनुभव नाकारणे जास्त काळ हिताचे नाही हे या व्यावसायिकांना जाणवले असावे.
इथेनॉल बनवण्याच्या पद्धती
इथेनॉल बनवण्याच्या पद्धती मध्ये chlorides बनत नाहीत. त्यात जे पाणी वापरलेले असते ते chloride 5 ppm पेक्षा कमी असलेले असते.
म्हणजे cholride नंतर केलेल्या पाण्याच्या भेसळीमुळे त्या पाण्यातून येऊ शकते.
याबाबत याव्यतिरिक्त कुणाला काही तांत्रिक माहिती असल्यास कृपया सांगावी.
HT च्या लेखात distillation
HT च्या लेखात distillation process मध्ये वापरलेल्या पाण्यात chloride असते ही माहिती पूर्ण चुकीची आहे. तसेच असते तर सर्व distillation columns एका वर्षात खराब होतील. त्यामुळेच process मध्ये वापरले जाणारे पाणी chloride less than 5 ppm केलेले असते.
Ethanol पुरवठा साखळीत
Ethanol पुरवठा साखळीत पाण्यामुळे chloride contamination होत असणे शक्य आहे व त्यासाठी ethanol specification मध्ये chlorides साठीचे प्रमाण नेमून देणे आवश्यक आहे, जे सध्या नाही.
एक वेगळीच काळजी...
एक वेगळीच काळजी...
माझी गाडी (मारुति अर्टिगा २०१६) आता सहा महिने जागेवरच बंद ठेवावी लागणार आहे. त्यात अंदाजे ५ ते आठ लिटर सध्या उपलब्ध असणारे म्हणजे २०% इथेनॉल असलेले पेट्रोल आहे. बाकी सर्व काळजी (बॅटरी वगैरे) घेतलेली आहे पण...
सहा महिने पडून राहिल्याने टाकीत किंवा फ्युएल लाईन्समध्ये पाणी साठेल का व नंतर ती मोठा खर्च न काढता चालू शकेल का? कोणाला अधिक माहिती असल्यास कृपया सांगा.
माझी गाडी अशीच 4 महिने बंद
माझी गाडी अशीच 4 महिने बंद असते. मला तरी काहिही प्रॉब्लेम गेल्या वेळे आला नाही.
मात्र मी जेंव्हा सर्विसिंग केली त्यावेळेस गाडी जुनी असल्याने ( असे मला वाटले) शॉक absorber बदलावे लागले. आता ethanol मुळे झाले का ही चिंता लागून राहिली आहे. बघतो कुठला सपोर्ट करणारा YouTube मिळतो का. कुणाला काही माहिती असल्यास सांगावे. मला मदत होईल.
इथेनॉल मुळे गाडी बंद असली तर
इथेनॉल मुळे गाडी बंद असली तर इंजिन पार्टस , रबर पार्टस, प्लास्टीक पार्टस खराब होतात हे पेट्रोलियम कंपन्यांचे रिपोर्टस खोटारडे, चुकीचे असून, त्यामधे शॉक अॅब्जॉर्बर्स, नंबर प्लेटस, इंडीकेटर्स, हँडल, हॉर्न, लाईटस खराब होत असल्याचे रिपोर्टस मधे असायला हवे होते. तसेच अशा शंका घेणारे हे त्या लॅब्ज पेक्षा ऑथेंटिक लोक असून ले मॅनने त्यांचे समाधान न केल्यास हा प्रपोगंडा आहे हे आपोआपच सिद्ध होते याची दखल घेण्यात यावी अध्यक्ष महोदय!
मात्र मी जेंव्हा सर्विसिंग
मात्र मी जेंव्हा सर्विसिंग केली त्यावेळेस गाडी जुनी असल्याने ( असे मला वाटले) शॉक absorber बदलावे लागले. आता ethanol मुळे झाले का ही चिंता लागून राहिली आहे. बघतो कुठला सपोर्ट करणारा YouTube मिळतो का. कुणाला काही माहिती असल्यास सांगावे. मला मदत होईल.>>> इथेनालमुळे शॉक ऍबसॉर्बर खराब होतो; इतके वर्षे मला वाटत होते की भारतातील गुळगुळीत रस्ते याकरता जबाबदार आहेत.
इथेनॉल समर्थकांच्या गाड्यामधे
इथेनॉल समर्थकांच्या गाड्यामधे इथेनॉल फ्युएल लाईन्स मधून शॉक अॅब्सॉर्बर मधे जाऊ शकतो. याला आक्षेप न घेणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.
विक्रमसिंह,
विक्रमसिंह,
>> माझी गाडी अशीच 4 महिने बंद असते. मला तरी काहिही प्रॉब्लेम गेल्या वेळे आला नाही.
तुमच्या प्रतिसादातील हे कामाचे वाक्य. काही झाले नाही तर आनंदच आहे, पण चार पाच महिन्यांनी कळेल.
बाकी शॉक अॅबसॉर्बर बाबत बहुधा तुंम्ही उपहासाने लिहिले आहे असे वाटते, ते सोडून देतो.
ब्राझिलमधे इथेनॉलबाबतीत काय
ब्राझिलमधे इथेनॉलबाबतीत काय काळजी घेतली जाते आणि भारतात काय घेत नाहीत हे एकदा येऊन गेलेले असताना ते सर्व फाट्यावर मारण्याचे तंत्र आहे. वर जर माहितीत आले आहे कि वाहतूक, साठवणूक इथे काळजी घेतली नाही तर त्या ठिकाणच्या साखळीत प्रॉब्लेम येईल. या सर्व परम्युटेशन आणि काँबिनेशनमधे कुठे काळजी घेतली, कुठे नाही आणि त्या साखळीत नेमक्या कुणाची गाडी आयडेल असेल आणि त्याला मिळणारे इंधन कंटॅमिनेटेड कि प्युअर याचे उत्तर कुठल्या फॉर्म्युल्याने द्यायचे असते?
Ethanol-blended diesel ruled
Ethanol-blended diesel ruled out as it fails safety specifications
Oil marketing companies found that blending ethanol with diesel sharply lowers the fuel’s flash point.
https://www.autocarindia.com/industry/ethanol-blended-diesel-ruled-out-a...
https://www.autocarindia.com/industry/omcs-reject-e20-fuel-contamination...
OMCs reject E20 fuel contamination claims after nationwide testing
The companies said fuel samples collected across the supply chain recorded chloride levels within the prescribed limits, while enhanced checks have also found no signs of water ingress in underground fuel storage tanks.
डिझेल मधे आयसोब्युटेनॉल
डिझेल मधे आयसोब्युटेनॉल मिसळण्याची घोषणा गडकरींनीच केली होती.
https://www.moneycontrol.com/news/india/after-e20-petrol-india-eyes-15-i...
डिझेल इंजिनसाठी फ्लॅशपॉइण्ट महत्वाची गोष्ट आहे.
आता सीएनजी मधेही (सीएनजी + पीएनजी) सीबीजी (बायोगॅस)ची भेसळ करंणार. स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलं प्रकरण.
एलपीजीची एक बातमी उडत उडत पाहिली होती. नक्की माहिती नाही.
https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/govt-exploring-blending-...
एप्स्टीन फाइल फेम पुरींचं
एप्स्टीन फाइल फेम पुरींचं खातं गडकरी बघतात, तर ते पुरी काय करतात?
ते नोकरशाहीतून आलेले आहेत.
ते नोकरशाहीतून आलेले आहेत. मर्जी राखण्याचा गुण आहे त्यांचा.
Exclusive: Hours after India
Exclusive: Hours after India made public assurances last week that its ethanol-blended petrol was safe, the country's main auto lobby withdrew a complaint about fuel contamination it had sent to the government a week earlier. The group said some figures needed more checks.
But separate communications between industry executives, reviewed by Reuters, showed that in the preceding days, top automakers Maruti Suzuki, Tata Motors and Mahindra discussed their concerns about contamination of petrol blended with 20% ethanol, called E20.
The carmakers' emails show for the first time how they are privately worried about contaminants in E20, like chloride and moisture, which they say are hurting vehicles, even as they publicly back the government's rollout of the fuel
https://www.reuters.com/world/india/emails-reveal-indian-carmakers-fuel-...
बातमी वाचायला साइन करावं लागतंय , त्यामुळे वाचली नाही.
या ट्वीटमधला मजकूर वर दिलाय
https://x.com/Reuters/status/2087790001748939039
सारांश काढायचं काम तुंबलंय.
सारांश काढायचं काम तुंबलंय.
चीनच्या घुसखोरीबद्दल वाचत होतो.
दुसरं हे इतकं विस्कळीत आहे कि पुन्हा पुन्हा वाचणे जिकीरीचे आहे. तरी प्रयत्न करेनच.
हे थांबायचं नावच घेत
हे थांबायचं नावच घेत नाहीत
https://www.facebook.com/share/v/19HhcGE9CD/
गडकरी साहेबांना इथेनॉल धोरण राबवायची इतकी घाई झाली होती की त्यांनी त्याबाबतची टेक्निकल स्टँडर्ड्ससुद्धा नीट तयार करू दिली नाहीत. संबंधित खात्यावर/अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी परदेशातील स्टँडर्ड्स कॉपी पेस्ट करायला लावली. आणि इतका विवेकशून्य कारभार करून झाल्यावर ते भाषणात त्याचा आधार घेऊन स्वतःच त्याबाबत बढाई मारताना दिसत आहेत...
इथेनॉल पासून दारू देखील बनते
इथेनॉल पासून दारू देखील बनते त्यामुळे इथे लिहायला हरकत नाही. FSSAI ने हल्लीच काही दारू कम्पनीच्या ब्रॅण्ड्स वर फ्लेवरिंग एजन्ट वापरतात म्हणून उत्पादन थांबवले, पण काही पत्रकार असे सांगत आहेत की गडकरींच्या मुलाची कंपनी देखील कप्तान ब्रॅण्डची रम बनवते आणि ती कंपनी सध्या नुकसानीत आहे. तर त्या कंपनीच्या भल्याकरता ओल्ड मोन्क वर बंद आली आहे.
नागेश्वरन भारत सरकारचे मुख्य
नागेश्वरन भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत.
https://www.reuters.com/world
https://www.reuters.com/world/india/india-considers-limited-duty-free-su...
India weighs limited duty-free sugar imports to rein in record prices, sources say
याचा इथेनॉलशी काही संबंध असेल का?
पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळल्याने विदेशी चलन वाचणार होतं. ते आता साखरेवर खर्च होणार का?
पूर्वी इथेनॉल उसाच्या
पूर्वी इथेनॉल उसाच्या मळीपासून तयार होत असे, साखर उद्योगाला फायदाच होत होता. त्यानंतर सरकारने सांगितले की इतर धान्यांपासून पण इथेनॉल बनवा आणि त्याचा वापर करा. का? कारण बरेच साखर कारखाने विरोधी पक्षातील नेत्यांचे आहेत. आता पेट्रोल महाग झाले (जे आधीपासूनच होते विविध कर आकारणी मुळे), साखर महाग झाली आणो धान्य महाग झाले. पण शेतकऱ्याला आधारभूत किंमत मिळाली का, तर नाही. जनतेला स्वस्त धान्य मिळाले का, नाही. धन कोणाची झाली, इथेनॉल उत्पादकांची. साखर महाग झाली म्हणून आता ब्राझील कडून ने घेता अमेरिकेकडून विकत घेणार. पैसा जनतेचा, झोळी मित्रांची.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/1C7nHb8N2Q/
इथेनॉल मिश्रित इंधनाविरोधात आंदोलन
या धाग्याचं सार खर्चा पानी
या धाग्याचं सार खर्चा पानी च्या या एपिसोडमधे आहे.
https://www.youtube.com/watch?v=-PeNTDeUj6A
भरत यांनी नागेश्वरन यांचे वक्तव्य दिलेले आहे.
आता नागेश्वरन यांच्याबरोबरच सरकारमधले अनेक मौनी लोक व्यक्त होऊ लागले आहेत. सरकार ई १० पुन्हा आणण्याचा विचार करत आहे. या आधी या धाग्यावर एक लिंक दिली आहे, त्यानुसार सध्या पेट्रोल पंपावर ई५ मिळतंय. यामागचा उद्देश म्हणजे लोकांचा हा समज असेल कि पंपावर ई२० मिळतंय आणि माझ्या गाडीत काही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यानंतर ई२० पुन्हा सुरू करता येईल.
आता महत्वाचं.
इथेनॉलसाठी फक्त ऊसच लावला पाहीजे असं नाही. त्यामुळं मका आणि ऊस या दोन पीकांवर शेतकरी भर देत आहेत. इथेनॉल उत्पादक लगेच पैसे देत असल्याने शेतकरी त्यांना आपलं पीक देणार. यामुळं आता साखर आयात करावी लागेलच, पण अन्नधान्याच्या बाबतीत कृत्रिम दुष्काळ निर्माण होईल. ज्या भागातून देशाची अन्नधान्याची गरज भागवली जाते, त्या भागात मका आणि ऊस लावला, धान्यं सडवण्यासाठी दिलं तर खाण्यासाठी अन्नधान्यं आयात करावी लागणार आहे. साखरेने सुरूवात केली आहे.
साखर पाकिस्तानातून आणली तर स्वस्त पडते. पण ती अमेरिकेतून आणली तर वाहतूक खर्च मोठा असेल.
इथेनॉल मुळे वाचलेले पैसे आणि अन्नधान्य आयातीमुळे येणारा खर्च याचं गणित जर जनतेला समजलं तर सरकारच्या अडचणी अजून वाढणार आहेत.
मुळात हा जो फ्युएल क्रायसिस झालेला आहे, त्यातून जनतेला एकच मनुष्य वाचवू शकतो असे संजय राऊत म्हणतात. त्यांचं म्हणणं मनावर घ्यावं.
मुळात देशात साखरेचे शॉर्टेज
मुळात देशात साखरेचे शॉर्टेज अजिबात नाही. सध्या देशातील सरकारविरोधी वातावरणाने व्यापारी निर्ढावले आहेत, ते सणासुदीचे दिवस सुरू असल्याने साखरेची साठेबाजी करत आहेत.
आग्या , तुमच्या तोंडात साखर
आग्या , तुमच्या तोंडात साखर पडो !
या रील ला 'गोल माल है, भाई सब
या रील ला 'गोल माल है, भाई सब गोल माल है' हे BGM होतं.. :हाहा:
Pages