हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Late post

ही पोस्ट मागच्या शुक्रवारी लिहिणार होतो कारण तो दिवस जुन्या हैदराबाद शहराचा खूप खास आणि गर्दीचा दिवस - “मुहर्रम” च्या मिरवणुकांचा.

Actually, मुहर्रम हे इस्लामी महिन्याचे नाव (दिवसाचे नाही) आणि सध्या “मुहर्रम” (= पवित्र) महिनाच चालू आहे पण महिन्याचा दहावा दिवस शिया मुस्लिम समुदायासाठी “अशूरा” चा दिवस म्हणजे मातम / जाहिर शोक, उपवास-प्रार्थना आणि दिवसाअखेर ताबूत मिरवणुकांसाठी राखिव असतो. भारतात लखनौ पाठोपाठ सर्वात जास्त संख्येनी शिया समुदाय हैदराबादेत आहे, त्यामुळे मुहर्रमच्या मिरवणुका आणि संबंधित कार्यक्रम, चालीरिती जास्त दृश्यमान असतात, बघणाऱ्याच्या लक्षात येतात.

शहरात अनेक शतकांपासून अशूरखाना, मजलिसखाना, इमामबाड़ा, हाथी सलीब आणि मर्सिया सलाबत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रेखीव, भव्य, सुंदर इमारती आहेत. Nothing immortalises unique cultures and history of humanity/ faith more powerfully than built environments like these. आतली लाकडी आणि Stucco कलाकुसर, क्रिस्टल झुंबरं, शमादानं, गडद निळ्या-जांभळ्या- हिरव्या रंगांचे; सोनेरी किनारींचे रेशमी इराणी गालीचे वगैरे तर ❤️

c9082c69-51cb-4343-a1dc-9dcda85197e0.jpeg

काही इमारती थेट क़ुतुबशाही (शिया) राजवटीच्या सुरवातीच्या काळातल्याही आहेत, त्यांची आता खूप पडझड झाली आहे, होते आहे.

b35e01aa-394d-456d-9dda-c7018a91968d.jpeg
मोहर्रमच्या विधींनिमित्त या जागांना ‘जाग’ येते. एरवी बंदिस्त असलेल्या या जागा पर्यटक किंवा स्थानिक हैदराबादकर कुणाच्याच खिजगिणतीत नसतात.

ddb184a1-0333-46ce-bb5b-86cf5d94d1c8.jpeg

फार कमी लोकांनी बघितलेल्या जुन्या वैभवाच्या झळाळीचे कवडसे… मायबोलीकरांच्या डोळ्यांसाठी 👆

नुकतीच हर्षा भोगले ची माझा कट्टा वर मुलाखत बघितली. अतिशय प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्व आहे. मुलाखत खूपच ऐकण्या बघण्यासारखी आहे.
शेवटची ३/४ मिनिटाच्या भागामध्ये त्याला दख्खनी हिंदी बोलायला सांगितलं.
तो मूळचा हैदराबाद चा आहे. खूप छान बोलला.

फोटो सगळे मस्तच… कलाकुसर किती छान दिसतेय!!

रोट पाहुन जीव तडफडला.

जुम्मन शब्बो किस्से मस्त!!! शब्बो भारीच आहे. गंजी औरत पर्यत पोचली Happy

@ प्रज्ञा९, स्वानंदी, सामो

किस्सा आवडल्याची पोच दिल्याबद्दल तिघींना थँक्यू.

@ साधना, अस्मिता.

थँक्यू. इमारतींची दुरवस्था आणि पडझड बघता त्या “कुछ दिनों के मेहमान” असाव्यात.

@ रोट

हे मात्र भारतभर ऑनलाइन मागवता येतात आपल्याकडे ₹ ८८० प्रति किलो. सुभान बेकरीचे जास्त प्रसिद्ध असले तरी पिस्ता हाउस ने दर्जा, स्वच्छता, टापटीप, packing आणि open kitchen वगैरेमधे बाजी मारलीय.

@ शर्मिला,

हर्षा भोगले मूळ हैदराबादकर ?

हे नव्हते माहित. मी त्यांना एकदाच भेटलोय, चेन्नै मधे एका हॉटेलच्या लॉबीत, अचानक.

मला आजवर भेटलेल्या लोकांमधे फार उच्च, सहज, उत्तम quality चे इंग्रजी बोलणाऱ्यांमधे भोगलेंचा समावेश करीन मी.

काही मिनिटे आम्ही मराठीतही बोललो. तेव्हां कल्पना असती तर हैदराबादी दक्कनीतही बोललो असतो 😀 बातां के बादशा है जी वो तो

जुम्मे का वादा, आज का फ़्रेश हैदराबादी किस्सा जो मैइच लिखा आप लोगां के वास्ते. नफ़ासत हौर प्यार से बातां करने में हैदराबादी लोगां का कोई जवाबीच नै. तो सुनो:

रहीम चिचा हस्पताल में चेकअप करवाए हौर सब रिपोर्टां ले कर कू मेन डाक्टर कन्ने पहुँचे.

डाक्टर साब इत्मीनान से सब रिपोर्टां पढ़ कू फिर पुच्छे

- तुम जरीना बेगम के शौहर हो ना चिचा ?

- हौ

- उनों मेरेइच पेशंट थे. उनकू मेरा सलाम बोलना

- क्या बातां कर रै डाक्टर ? जरीना बेगम का इंतक़ाल हो कू तीन साल हो गए ना

- हौ. मालूम है मेरे कू

# डाक्टरां के क़िस्से
# हैदराबादी Swag
# हैदराबादी नफ़ासत

नेहमीप्रमाणेच छान किस्सा.

हर्षा भोगले मूळ हैदराबादकर ?

हे नव्हते माहित. मी त्यांना एकदाच भेटलोय, चेन्नै मधे एका हॉटेलच्या लॉबीत, अचानक.

मला आजवर भेटलेल्या लोकांमधे फार उच्च, सहज, उत्तम quality चे इंग्रजी बोलणाऱ्यांमधे भोगलेंचा समावेश करीन मी.>> व्वा!! नशिबवान आहात.
त्यांना बऱ्याच भाषा येतात.

हैदराबाद मध्ये माझे काही कार्यालयीन मित्र होते. त्यातील एक मुनीर खान त्याने घरी नेऊन अप्रतिम बिर्याणी खायला घातली होती. रोट मुळं आठवण झाली. हा प्रकार खाल्ला असावा. पण त्याला रोट म्हणतात हे माहीत नव्हतं.
दुस-या मित्राने आर्टिफिशियल नेकलेस मुलीला दिलेलं. ते वर्षानुवर्षे तसेच सुंदर होते.

@ दत्तात्रय साळुंके

बेस्ट. घरच्या बिरयानीची चव न्यारीच. प्रत्येक घराची रेसिपी निराळी आणि चवसुद्धा वेगळी.

रोट स्वत: घरी तयार करून फक्त “भाजायला” / bake करायला बेकरीमधे नेण्याची पद्धत काही हैदराबादी घरात अजूनही आहे, तश्या अल्पदरात बेक करून देणाऱ्या बेकरीज् अजून आहेत पण हा खटाटोप करणारी पिढी मात्र आक्रसते आहे. बाजारात तयार रोट भरपूर मिळतात मग ही उस्तवार कश्यासाठी असा मुद्दा आहे.

रोट भाजले जात असतांनाचा सुवास मात्र स्वर्गीय ❤️

अनिंद्य, फोटो मस्तच. रोट नाही खाल्ले कधी पण ते बघून कराची बेकरीच्या बिस्कीटांची आठवण झाली.

किस्से भारीच. डॉक्टरांचा optimism भारीच आवडला. चाचांचे दु:ख हलके झाले त्यांच्यामुळे - जरीनाच्या भेटीच्या आशेने.

… Doctor’s optimism and intelligence …

Exactly. तोच तर फ़ोकस होता क़िस्सा लिहितांना.

किस्सा पढ़ने वाले हौर फोटू पसंद करनेवाले सबकू भौत थँक्यू है.

आज का किस्सा थोड़े वखत बाद लिखतुं.

ये रहा आज का जुम्मा स्पेशल हैदराबादी किस्सा जो मैइच लिखा आप सभू के वास्ते.

फरजाना बेगम का घरवाला खो गया, दो चार दिनां होगए घर कू नै आया तो उनों सहेली कू साथ में लेकू पुलिस चौकी गए रिपोर्टां लिखाने कू.

हवलदार पुच्छे :

- उमर बताव गुमशुदा की ?

- २७ साल का है, २८ का होनेवाला है जल्दीच.

- हुलिया?

- अब क्याइच बताना हवलदार साब … छे फिट लंबा है, रंग बोले तो दूध जैसा गोरा, गालां गुलाबी रंगत के है, सुनहरे बालां है उसके, नीली नशीली आँखां 😍 हौर जिम वाला 🏋️‍♂️ मज़बूत बदन..जीन्स की पतलून हौर सफेद टाइट टी शर्ट पहना है उनों ..

ये सुन कू बेगम की सहेली बीच में बोली :

- झूठ कायकू बोलरई तू फरजाना ? तेरा घरवाला तो नाटा, गंजा 👨‍🦲 हौर भेंगा है ना ? चेहरा भी सड़े सीताफल जैसा है उसका. तू ग़लत हुलिया कायकू लिखवा रई ?

- अब जो खो गया सो तो गयाच, कमसकम आऐंगा वो तो बी ढंग का मिलनेकू होना, येवास्तेच 😜

# Empowered Begums
# हैदराबादी Swag

जबरी Rofl
चेहरा भी सड़े सीताफल जैसा है उसका>>>> भारी

Pages