Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खालिद का शिवाजी नावाचा ट्रेलर
खालिद का शिवाजी नावाचा ट्रेलर आला आहे का याची कल्पना नाही. खरंच असा सिनेमा आहे का? असल्यास आनंदच आहे, नसला तरी दु:ख नाही. हा नहाराजांवरच आहे कि कसं हे कुणी सांगेल का? कारण रजनीकांतचा याच नावाचा सिनेमा महाराजांवर नव्हता. त्यामुळं हा शिवाजी साटम यांच्यावर पण असू शकतो. असला तरी काही प्रॉब्लेम नाही. कुणालाही कुठल्याही विषयावर चित्रपट बनवता आला पाहीजे किंवा नाही आला पाहीजे याबद्दल प्रत्येकाची आपापली मतं असतात. सर्वांच्या मतांचा आदर आहे.
मी हा प्रतिसाद लिहिला होता,
मी हा प्रतिसाद लिहिला होता,
Sorry to disturb.
'खालिद का शिवाजी'ची देश-परदेशातही चर्चा, 'कान'मध्ये कौतुक झालेल्या वऱ्हाडी सिनेमाची गोष्ट काय?
https://www.bbc.com/marathi/articles/c8e6y3eg7d9o
हा चित्रपट तुम्ही कुठे बघाल?
कुठेही नाही.
का?
ते मला विचारू नका.
ट्रेलरची लिंक.
https://www.youtube.com/watch?v=gNLS3HWihiE
Submitted by केशवकूल on 6 May, 2026 - 20:24
हा वाचला नव्हता का ?
आहे राजअ, खरंच आहे चित्रपट.
आहे राजअ, खरंच आहे चित्रपट. मी बघितलाय. महाराज एकाच धर्माचे नव्हते, पण विभागले गेलेय यावर आहे.
शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात खालिदची शिवाजी महाराज बनून त्यांचे संवाद म्हणुन दाखवण्याची इच्छा असते. त्याला होणारा विरोध आणि मदत यातून कथानक पुढे सरकते.
लो बजेट चित्रपट आहे. वऱ्हाडी बोलीत आहे. गावातले मास्तर आणि वर्ग याचं चित्रण आणि वापरलेली वऱ्हाडी बोली वास्तवदर्शी आहे. शेवटली कलाटणी मला अनपेक्षीत वाटली, आणि ती शैली अगदी शेवटी एक संदेश देण्याच्या मंजुळे शैली सारखी वाटली. ओव्हरऑल चांगला वाटला मला. काही टिपिकल स्टीरिओ टाईप आहेत (उदा. दोन मास्तरांबाबत एखादं पात्र चांगलं तर सगळं चांगलं दाखवणे आणि एखादं चांगलं नाही तर मग दुर्गुण पेरून दाखवणे ), आणि अधूनमधून जरा कंटाळवाणा वाटला.
बूक माय शो वर रेंट/खरेदीकरून बघता येईल ज्यांना बघायचाय त्यांना. त्या ऍपवरच स्ट्रीम करता येते, दुसरा पण एक पर्याय त्यात होता तो कोणता आता आठवत नाहीय.
ओह. धन्यवाद मानवजी.
ओह. धन्यवाद मानवजी.
खरं तर अगं अगं म्हशी लिखाणाचा सराव करत होतो.
पुर्वी निदान होत नव्हते
पुर्वी निदान होत नव्हते त्यामुळे हे विकारच नव्हते असा गैरसमज होऊ शकतो.
>>>> पूर्वीची आणि आत्ताची तुलना करतच नाहीये. बायोलॉजिकल सत्य मान्य आहेच. ते मी पहिल्या वाक्यात लिहिले होते. मला म्हणायचे आहे की आत्ताच्या घडीला सुखवस्तू घरातले प्रमाण आणि इतर समाजातले प्रमाण यात फरक आहे तो नर्चर किंवा एक्सपोजरचा आहे का?
आज ट्रेलर बदला म्हटलं. उद्या सिनेमा बदला म्हणतील >>> वाघनखं आधी अफझलखानाला दाखवली होती असं ट्रेलरमध्ये दाखवलं आहे याबद्दल लोकांनी आक्षेप घेतला तर दिग्दर्शकाचे उत्तर होतं की चित्रपट बघून मग ठरवा.
पण ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झालं पाहिजे, लोकांना तो बघावासा वाटला पाहिजे. जर चित्रपटाबद्दल निगेटिव्हिटी निर्माण होत असेल तर ट्रेलरचा उद्देश सफल होत नाहीये.
यात सुपर सेन्सर बोर्डचा काय संबंध? फक्त प्युअर कमर्शिअल पॉईंट ऑफ व्ह्यू मांडला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून किंवा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून चित्रपटात काय दाखवायचे आहे ते दाखवा. पण प्रेक्षक यायला तर हवेत ना थिएटरपर्यंत?
बाय द वे ही चर्चा रितेशच्या 'राजा शिवाजी'बद्दल चालू आहे. खालिद का शिवाजीचा ट्रेलर मी पाहिला नाही. त्यामुळे नो कमेंट्स.
एलजीबीटीक्यू विषयासाठीhttps:/
एलजीबीटीक्यू विषयासाठी
https://www.maayboli.com/node/87281#comment-5172731
ओके साधना. मानवदादा, रा अ,
ओके साधना. मानवदादा, रा अ, माझेमन, भरत आणि पर्णिका सगळ्या पोस्टी नीट वाचल्या.
पर्णिका, तुमच्या पोस्टी माहितीपूर्ण आहेत तरीही मला हे मर्यादित वाटतं आहे. सेक्शुॲलिटी विकसित व्हायला कमीतकमी पौगंडावस्थेत यावे लागते ( जरी जनुकांची प्रिंट आधीच असली तरी ) त्यामुळे माणूस सेक्शुॲलिटीत बरेच चुकीचे प्रयोग करून बसतो. हे माझं सिनेमा पाहून आलेलं ज्ञान. त्यामुळे अडीच वर्षे वयाच्या बाळाने कंडिशनिंग मुळे किंवा DNA मुळे काहीही निवडलं तरी ते रॅंडम असणार आहे. आयुष्यभर कारशी खेळणारा आणि नंतर ऑटोमोबाईल इंजिनीयर झालेला पुरुष गे, ट्रान्स काहीही असू शकतो. आणि बाहुली न आवडणारी मुलगी स्ट्रेट असू शकते. ते कंडिशनिंग असेल, नसेल ओरिएंटेशनच्या विपरीत नाही जाऊ शकत. त्याने आवडीनिवडी विकसित होणार फार तर. अर्थात माझा शून्य अभ्यास आहे आणि हे मी फक्त तारतम्य वापरून लिहिलेले आहे.
तुम्ही लिहिलेले मला नीट समजलंय की नाही माहीत नाही पण पटत नाहीये. कारण फक्त या ठोकताळ्याच्या भरवश्यावर it's too early to decide वाटतं आहे. आपण काही आनुवंशिक आजारही घेऊन येतो ते बरोबर त्या- त्या वेळी बाहेर पडतात, लहानपणी शक्यता वर्तवता येत नाही. प्रिंट तर असतेच कायम. कधीतरी आनुवंशिक आजार असूनही काही जणं escape करणाऱ्या प्रिंटही घेऊन येतात. अशा वेळी त्यांना काहीही होत नाही. पण तेही खात्रीशीरपणे लहान वयात सांगता येत नाही. असा माझा dilemma आहे.
माझेमनने लिहिलेला नर्चरचा मुद्दा - नर्चरमुळे माणसाला सेक्शुअल प्रयोगाचे स्वातंत्र्य मिळते म्हणून ते जास्त खुलेपणाने बाहेर येत असेल. त्यामुळे दुर्मिळ सेक्शुअल गोष्टींकडे कल वाढेल असे वाटत नाही. बरेचदा अर्धं आयुष्य लपून राहून किंवा अनभिज्ञ राहून नंतर स्वतःला ओळखलेले लोक असतात. त्यामुळे ही झटपट होणारी किंवा स्वातंत्र्य मिळाले म्हणून होणारी निवड आहे असे वाटत नाही. आधी कमी असलेले पर्सेंटेज फक्त ॲक्सेप्टंस मुळे वाढल्यासारखे वाटत असेल. नॅचरल सेलेक्शन तर पूर्वापार पासून असेलच. संख्या खरोखरच वाढत असली तरी तेही निसर्गाने ठरवूनच होत असेल. त्यामुळे ह्यात आपण काही बदल का घडवायचे? उत्क्रांती समजून तेही स्विकारावे.
टॉय टेस्ट कशासाठी आहे काही
टॉय टेस्ट कशासाठी आहे काही समजलं नाही. मला जे समजलं त्या साठी असेल तर त्यात हजार इफ आणि बट दिसत आहेत. पण मरो.
असले डॉक्टर माझ्या नशिबात नाही हे माझं भाग्य!
अमितव +१००
अमितव +१००
Sexual orientation, gender
Sexual orientation, gender identity इत्यादी संदर्भात माहिती हवी असल्यास माझा हा लेख वाचा असं सुचवेन. ती तीन छोटेखानी लेखांची मालिकाच वाचलीत तर आणखी उत्तम.
मी या विषयातील तज्ज्ञ नाही, पण लेख तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लिहिले आहेत.
रिक्षा म्हणून नव्हे, तर गैरसमज दूर करायची कळकळ म्हणून सुचवत आहे.
टॉय टेस्ट बद्दल काही तरी
टॉय टेस्ट बद्दल काही तरी मुलभुत गैरसमज झाला आहे असे म्हणुन इथेच मुद्दा स्पष्ट करते आणि थांबते. टॉय टेस्ट हे एक टुल आहे, ज्या लहान मुलांना बोलुन व्यक्त होणे जमणार नाही त्यांच्यासाठी. पेडिएट्रिशिअन /काउन्सिलरस लहान मुलांसाठी अशा बऱ्याच बिहेविअरल टेस्ट वापरतात. उदाहरणार्थ अब्युज विक्टिम्स ना अगदी ५/६ वर्षांच्या ही चित्रे काढायला सांगितली जातात. मुल व्यक्त होणे शक्य नसेल तर बिहेविअरल टेस्ट हा एकमेव पर्याय आहे.
पण टॉय टेस्ट हे congenital adrenal hyperplasia (CAH) चे निदान नाही. निदान जनुकीय चाचणीतुन म्युटेशन बघुन आणि काही ब्लड टेस्ट द्वारे होते. मग टॉम टेस्ट कशासाठी? तर त्या बाळाची स्वप्रतिमा काय आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी. जी बदलेली असु किंवा नसु शकते.
माझा मुळ मुद्दा हा होता की जनुकीय वेगळेपण (trisomy) किंवा बिघाड (CAH) असला तरी त्याचा परिणाम म्हणून १००% जेंडर आयडेंटिटी बदलेलच असेही नाही थोडक्यात हा बायलॉजिशी संबंधित विषय असला तरी त्यापुढे जाऊन गुंतागुंत आहे.
आय होप मी मला काय अभिप्रेत होते ते क्लिअर करु शकले. नसेल तरीही हा विषय इथे अस्थानी असल्याने थांबते.
बोलून व्यक्त होणे जमणार नाही
बोलून व्यक्त होणे जमणार नाही हा वयोगट म्हणजे अडीच किंवा तीन वर्षाखालील असावा. मी सर्वसाधारण मुल धरतो, डेव्हलपमेंटल, स्पिच, ऑडिटरी इ. काही समस्या असतील तर वेगळी गोष्ट.
तर अशा अडीच वर्षाच्या बालकांना डॉक्टरकडे का घेऊन गेले आहेत? आणि डॉक्टर नक्की काय शोधत आहेत? आणि शोधून नक्की काय साध्य करायचे आहे?
वाचले पर्णिका.
वाचले पर्णिका.

स्वाती, नोट करून ठेवले.
पर्णिका, पहिल्या वेळीच समजले
पर्णिका, पहिल्या वेळीच समजले होते. त्याची नोंद केली नाही याबद्दल क्षमस्व.
प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नये असे सुचवतो.
आधुनिक काळात ती मर्यादीत टेस्ट म्हणून पाहिली जाते असं गुगल सांगतेय. अर्थात मेडीकल प्रॅक्टीशनर एखाद्या टेस्टचा कसा उपयोग करतात, त्यांचा अनुभव व अन्य काही निरीक्षणे याबद्दल अनभिज्ञ असल्याने त्याबदल बरं वाईट मत नोंदवणे अयोग्य असेल.
खूप वर्षांपूर्वी ससून मधे एक इंटरसेक्सची केस आली होती. त्या वेळी वर्तमानपत्रात हा शब्दप्रयोग वाचला होता. एका मुलीच्या पुरूषी वागणुकीने पालकांनी ससून मधे आणले होते. तेव्हां या टेस्ट घेऊन नंतर तिची तपासणी केली तेव्हां ती मुलगाच असल्याचे आढळले. फक्त लिंग आतमधेच राहिले होते. ते शस्त्रक्रियेने बाहेर खेचून काढले. आता मुलगा म्हणून त्याचे आयुष्य नॉर्मल चालू आहे. त्याला ट्रान्स म्हणणे योग्य नाही. अशी अजून एक केस नंतरही झाली होती. तसेच एका खासगी रूग्णालयात मुलाच्या बाबतीत असे झाले होते. ती खरे तर मुलगीच होती. फेक लिंग काढून टाकल्यावर मुलीचे साधारण आयुष्य तिला जगता येईल असे त्यांनी सांगितले होते. ही केस पण ट्रान्स नाही.
जे जन्मतः चुकीच्या आयडेन्टिटीमुळे भलतेच आयुष्य जगत होते. ते या टेस्ट मुळे कन्फर्म झाले. जरी मर्यादा असतील तरी त्या परिस्थितीत डॉक्टरांनी जो योग्य असेल तो निर्णय घेतला असावा. त्यांची काही प्रोसिजर असेल. त्याची कल्पना इथे बसून येत नाही.
अडीच वर्षाच्या बालकांना
अडीच वर्षाच्या बालकांना डॉक्टरकडे का घेऊन गेले आहेत? आणि डॉक्टर नक्की काय शोधत आहेत? आणि शोधून नक्की काय साध्य करायचे आहे?
>>> हा प्रश्न मलाही पडतो. या वयात मुल जेंडर डेव्हिएंट आहे असं पालकांना का वाटतं? जसं अमुक एक माईलस्टोन आलाच नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो तश्या काही गाईडलाईन्स आहेत का? जेन्युईन प्रश्न आहे.
मला जे कळले (असे मला वाटते)
मला जे कळले (असे मला वाटते) त्याप्रमाणे:
Congenital adrenal hyperplasia हा आधीच डिटेक्ट झालेला आहे, इतर सिम्प्टम्स आणि कन्फर्मेशन चाचण्यांमधुन. यात फक्त सेक्सुअल ओरिएंटशन नसावे, ते इतक्या लौकर कळणारही नाही. हार्मोनल चेंजेस मात्र लौकरच होऊ शकतात, त्यामुळे लौकरच होणारी अवाजवी वाढ, लौकरच येणारी प्युबर्टी वगैरे.
आधीच डिटेक्ट झालाय आता मुलाचे ठरावीक कालावधीत फॉलो अप चेक अप सुरु आहे. त्यात अर्ली हार्मोनल चेन्जेस आहेत का ते बघायला ही टेस्ट वापरत असावेत. त्यात ते एकदाच खेळणी ठेवुन एक उचलले की त्यावरुन 'बघा मी नव्हतं म्हटल!" करत नसावेत, अनेक वेळा करुन त्यावरुन अंदाज घेत असावेत आणि मग पुढची चाचणी करावी की नाही ठरवत असावेत, असा माझा एक अंदाज.
"early hormone exposure—particularly to androgens like testosterone in the womb and during early infancy—can influence a child's toy preferences" असा रिसर्च गुगल वर दिसतो. तो कितपत योग्य आणि अचूक कोण जाणे अशा शंका येणे वावगे नसावे. पण त्या टॉय टेस्ट्स घेण्याचा असा उद्देश असावा.
चूकभूल देणे
घेणे(निदर्शनास आणुन देणे).आज ट्रेलर बदला म्हटलं. उद्या
आज ट्रेलर बदला म्हटलं. उद्या सिनेमा बदला म्हणतील.>>>>>>
ट्रेलर बघुन लोकांचे गैरसमज होताहेत हे दिग्दर्शक बोललाय त्याच्या निवेदनात. मी म्हणत नाहीये. ट्रेलरने चित्रपटाची ओळख होते, दिग्दर्शकाला जशी अभिप्रेत आहे तशीच ओळख ट्रेलरमधुन मिळेल असा ट्रेलर बनवला तर बिघडणार आहे का? असो, विपर्यास कसाही करता येतो हे या निमित्ताने परत एकदा दिसले.
ओरिएंटेशनच्या चर्चेबद्दल धन्यवाद मित्रांनो. म्हणजे यात केमिकल लोचा पण आहेच आणि बाहेरचे वातावरणही. (लोचा हा शब्द वाईट किंवा थट्टेच्या अर्थाने इथे नाहीय).
कार व बाहुली यात कदाचित शेकडो वर्षांचे कंडिशनिंग असावे.
जेंडर आयडेंटीटी वेगळी आणि
जेंडर आयडेंटीटी वेगळी आणि सेक्शुअल ओरीएंटेशन या दोन वेगळ्या गोष्टी.
जेंडर आयडेंटीटी म्हणजे तुम्ही आतुन कोण आहात. तुमचे शरीर आणि आतले तुम्ही हे समान नाही, तुम्हाला चुकीच्या शरीरात आहोत असे वाटणे हे ट्रान्स जेंडर. सेक्शुअल ओरीएंटेशन म्हणजे तुम्हाला कुणाबद्दल आकर्षण वाटते.
CAH असलेल्या मुलांवर टॉय टेस्टिंग हे रिसर्चचा भाग म्हणून केले जाते. हे निदान करायला वापरले जात नाही
<म्हणजे यात केमिकल लोचा पण
<म्हणजे यात केमिकल लोचा पण आहेच आणि बाहेरचे वातावरणही>
अजिबात नाही.
जेंडर रोल समाज - धर्म - संस्कृती - अर्थ इत्यादी बाबींतून तयार होतात. म्हणजे, स्त्रीने स्वयंपाक करावा, बायकांनी स्कूटी व पुरुषांनी यामाहा चालवावी, मुलींचा रंग गुलाबी व मुलांचा निळा, इत्यादी.
मात्र देह स्त्रीचा पण आपण पुरुष आहोत, असं वाटणं, किंवा देह पुरुषाचा, पण स्त्री आहोत असं वाटणं, यात 'बाह्य वातावरणा'चा काडीचा संबंध नाही. हा जेंडर डिस्फोरिया आहे. उलट सामाजिक चौकटींमुळे त्रास अधिक वाढतो.
मला इथे एक बेसिक प्रश्न पडला
मला इथे एक बेसिक प्रश्न पडला आहे. कदाचित बावळट असेल..
देह पुरुषाचा पण स्त्री आहोत असे वाटणे यात स्त्री वाटणे म्हणजे नेमके कसे वाटणे?
एखाद्या पुरुषाला आपण पुरुष आहोत असे वाटत असते आणि एखाद्या स्त्री ला आपण स्त्री आहोत असे वाटत असते म्हणजे नेमके काय वाटत असते?
केरला स्टोरी मध्ये काय
केरला स्टोरी मध्ये काय वाट्टेल ते आकडे दिले जातात, व सगळे ते gospel truth असल्यासारखे वागतात तर महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते ही आकडेवारी दिली तर काय आक्षेप आहे ?
मात्र देह स्त्रीचा पण आपण
मात्र देह स्त्रीचा पण आपण पुरुष आहोत, असं वाटणं, किंवा देह पुरुषाचा, पण स्त्री आहोत असं वाटणं>>>>
हेच नेमके कसे व काय वाटायला लागते हे समजुन घ्यायचा प्रयत्न करतेय. बाहेरुन कसलेही कंडिशनिंग नाहीय अशा वातावरणात मुल असले तरीही हे आतुन असे वाटु शकते असे वरची चर्चा वाचुन वाटले. (असे वातावरण सर्वत्र नाहीय तरी काही पालक मुलांना घरात कंडिशनलेस वातावरण द्यायचा प्रयत्न करतात हे माहित आहे).
स्त्री का पुरुष आहे हे शारिरीकरित्या ठरते, जे डोळ्यांना दिसते. पण हे आतुन वाटणे हे जेंडर रोलप्रमाणेच वाटणार ना??
इन्स्टावर दोन अकाऊंट्स पाहिले होते. एकात व्यक्ती शरिराने तो आहे पण तो साडी नेसतो, मेकप करतो आणि चालण्याबोलण्यातुन बाई असल्याचे सतत ठसवत राहतो, बाईपण हायलाईट करत राहतो. इन्स्टा त्यासाठीच वापरतो असे वाटते.
दुसरी व्यक्ती शरिराने ती आहे. कपडे साधे शर्ट पँट हेच कायम असतात. कुठेही आपण तो आहोत हे ठसवत नाही पण देहबोली मॅनरिझम पुरुषी आहेत. इन्स्टा अकाऊंट फक्त गाण्याच्या रिल्स बनवायला वापरते असे वाटते.
केरला स्टोरी मध्ये काय
केरला स्टोरी मध्ये काय वाट्टेल ते आकडे दिले जातात, व सगळे ते gospel truth असल्यासारखे वागतात तर महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते ही आकडेवारी दिली तर काय आक्षेप आहे ?>>>>>
तुम्हाला ते gospel truth वाटते का? तर नाही. तुम्ही आक्षेप घेताच ना. तसेच मुस्लिम आकडेवारीचे आहे. दोन्ही घटना इतिहासातल्या आहेत आणि कुठेही तो मांडताना शक्य तितका खरा असावा असे तुम्हाला केरला फाईल्सबाबत जसे वाटते तसे इतर सगळ्या चित्रपटांबद्दलही वाटावे.
<<< केरला स्टोरी मध्ये काय
<<< केरला स्टोरी मध्ये काय वाट्टेल ते आकडे दिले जातात, व सगळे ते gospel truth असल्यासारखे वागतात तर महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम होते ही आकडेवारी दिली तर काय आक्षेप आहे ?
>>>>
जर दोघे खोटे असतील आणि दोघे मुद्दाम चुकीची माहिती पसरवून प्रोपगंडा पसरवत असतील
तर दोघांना पोकळ बांबूचे फटके द्यायला हवे यावर एकमत होऊन जाऊ दे !
नाही ! ही तुलना चुकीची आहे !
नाही ! ही तुलना चुकीची आहे ! intent आणी magnitude ही महत्वाचे आहेत.
शिवाय इथे घडलेलेही वेगळेच आहे, इथे ज्याने चांगल्या हेतूने चुकीची माहिती दिली त्याच्या सिनेमावर चक्क बंदी आलेली आहे तर ज्याने वाईट हेतूने चुकीची माहिती दिलेली आहे त्याच्या सिनेमाला नॅशनल अवार्ड, मोठ्या नेत्याकडून प्रमोशन, राजकिय पक्षाकडून फुकट शो वगैरे झलेले आहे.
<<< ज्याने चांगल्या हेतूने
<<< ज्याने चांगल्या हेतूने चुकीची माहिती दिली
>>>
कुठला चांगला हेतू?
शिवाजी महाराजांंचे स्वराज्य
शिवाजी महाराजांंचे स्वराज्य सर्व समावेशक होते, त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना स्थान होते हे लोकांसमोर आणणे हा चांगला हेतू नाही ? बरं.
शिवाजी महाराजांंचे स्वराज्य
शिवाजी महाराजांंचे स्वराज्य सर्व समावेशक होते, त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना स्थान होते >>> हे सांगायला खोटे बोलायची काय गरज? उलट त्याने अविश्वास वाढेल आणि तुम्ही म्हणत आहात त्याच हेतूला हरताळ फासला जाईल असे नाही वाटत.
हा वादासाठी वाद.
हा वादासाठी वाद.
फक्त वाद घालता आला पाहीजे. तात्विक वाक्यं इकडून तिकडून फेकायची, प्रश्न फेकायचे स्ंपलं.
महाराजांच्या सैन्यात सर्वसमावेशकता होती किंवा नाही आणि केरळा स्टोरीतला आकडा किती फुगवलेला आहे याची माहिती ठेवणे अशक्य नाही. सक्ती नाही. पण माहिती ठेवायची गरज नाही हे अभिमानाने सांगत वाद घालण्याची गरज आहे.
Not interested in Kerala
Not interested in Kerala story
पिक्चर सोडा मी त्याचा ट्रेलर सुद्धा पाहिला नाही.
ट्रेलर सोडा त्याचा नेमका विषय काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही.
त्यामुळे तिथे नक्की कुठला आकडा फुगवला आहे हे सुद्धा मला माहीत नाही.
केरला स्टोरी पिक्चर बद्दल किंवा तिथल्या एकूणच राजकारणाबद्दल माझी मायबोलीवर एकही पोस्ट सापडणार नाही.
अजूनही अश्या काही फाईल्स स्टोरी रिपोर्ट वगैरे असतील त्यांनाही हे लागू.
पण शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र तितकाच जवळचा आहे. त्यांच्या सैन्यातले मावळे कुठल्या जातीधर्माचे होते हा विचार सुद्धा कधी मनात आला नाही. त्याची गरज देखील भासली नाही कधी. आणि आताही बिलकुल शोधायला जाणार नाही. पण आज अचानक रयतेचा राजा जाणता राजा म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वसमावेशक होते हे पटवून द्यायला कुठल्या खोट्या आकड्यांची गरज पडावी यावर हसावे की खेद वाटून घ्यावा समजत नाहीये इतकेच.
बाकी वादासाठी वाद तर काय लोकं नावडीचा आयडी दिसला तरी घालत सुटतात. मी एखाद्या मुद्द्यावर वाद घालतो हे चांगलेच आहे की
Pages