Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय भयंकर ट्रेलर आहे.. रितेश
काय भयंकर ट्रेलर आहे.. रितेश देशमुख सारखा छपरी शिवाजी महाराजांच्या रोल मधे इथेच सिनेमा नापास

‘हिन्दवी स्वराज्य‘ ऐवजी फक्तं ‘स्वराज्य’, बघून खूप टिका होतेय !
विद्या बालन ‘बडी बेगम‘ म्हणून चांगली वाटतेय , जितेन्द्र जोशी, सचिन खेडेकर सुद्धा चांगले वाटत आहेत.. बाकी सगळे धन्यवाद !
अफझल खान म्हणून दारुड्या आवाजात संजु बाबा .. संजु बिइंग सन्जु अॅज ऑलवेज ..त्यापेक्षा त्या बिगबॉस मधल्या साडे सहा फुटी अरबाझ पटेलला घ्यायचे होते. फुकटात काम केले असतेत्याने
हा ट्रेलर रिव्ह्यु एकदम पटला :
https://youtu.be/dXIgQ7fqLmo?si=RpFfnzOILO1cTZMI
रामायण च कास्टीन्ग मला आवडलच
रामायण च कास्टीन्ग मला आवडलच नव्हत पण टिझर मधे सेम व्ही एफ एस चा भडीमार वाटतोय..मला रणबिर अजिबातच आवडत नाही त्यामुळे बघण्याची शक्यता फार कमी !! तो सगळ्या मुव्हि मधे रणबिरच वाटतो..कॅरेक्टर ब्लेडिन्ग अजिबातच होत नाही...
त्यातल्या त्यात आता धुरधर मधे रणविरने रोल मधे घुसण काय असत हे ज्या उन्चिला नेलय त्याच्या जवळपासही रनबिर कधी जावु शकेल अस वाटत नाही.
हिज रेस्टिन्ग फेस इज सॅड अॅन्ड नोट प्लेझन्ट टु वॉच!!रामासाठी कुणीतरी नविन घ्यायला हव होत..
रामायणाचा ट्रेलर पाहिला. नाही
रामायणाचा ट्रेलर पाहिला. नाही रे ! छे! छे!
टु बी फेअर, त्याचा लूक चांगला आहे, विशेषतः वनवासातला लूक. तरी पण ते शार्प अल्ट्राथिन स्ट्रेट गंध खटकले. आणि अजिबात काय आवडले नसेल तर रहमान च्या मॉडर्न आवाजात ते बांग दिल्यासारखे काहीतरी विचित्र आलाप. का? का? सेम हीच तक्रार छावाच्या वेळी होती.
इतका खर्च करून परदेशी दिसणारे ग्राफिक्स, लॉर्ड ऑफ द रिंग्स मधुन उसने घेतलेले हिडीस राक्षस असे का?? व्हिडिओ गेम बघत असल्यासारखे खोटे वाटले बरेच सीन्स. चांदोबा मधले विज्युअल्स घ्यायचे होते रेफरन्स ला. राक्षस कसे मस्त उंच, धिप्पाड ,मोठ्या मिश्या , काळे केस असे हवेत
आयोध्येतली काही व्हिजुअल्स आवडली. सुरुवातीला सूर्योदयाच्या बॅकग्राउंड वर रामाच्या इन्ट्रोडक्शनची फ्रेम छान आहे. पण नंतर रणबीर पाठमोरा चालताना पाठीत पोक काढून चालत आहे असे वाटले
त्यातल्या त्यात स्पेक्टॅक्युलर ते पुष्पक विमान आणि पाठमोरा रावण सीन वाटला.
रेहमान is done now. छावा मधे
रेहमान is done now. छावा मधे पण बकवास संगीत होत इथ पण तेच
इथे रेहमान आणि हान्स झिमर
इथे रेहमान आणि हान्स झिमर दोघेही आहेत.
मला तर ट्रेलर मधील संगीत आवडले बुवा.
रामायण ट्रेलर आदिपुरुषच्या
रामायण ट्रेलर आदिपुरुषच्या तोडीस तोड वाटला.
का बनवतात पुन्हा पुन्हा
का बनवतात पुन्हा पुन्हा रामायण वर सिनेमे, त्यात संगीत रेहमानचे, छावा मधे काय कमी हसं झालं होतं..झालच मग इथेही स्वतःचं हसं करुन घेण्याची १००% गॅरेन्टी

Btw रणबीर जितका वाटला तितका वाइट दिसत नाहीये, अरुण गोविल सारखाच दिसतोय थोडा
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/y4zClN8jp6g काहिजण म्हणतात हॉलीवुड च्या फेमस सिन मधुन कॉपी केलेत सिन
रामायण - ट्रेलर मला बरा वाटला
रामायण - ट्रेलर मला बरा वाटला. आदिपुरूषचा आघात अजून मनावर आहे. मधेच हिममानव, यती का काहीतरी इथल्या जायन्ट, ट्रोल टाईप वाटले. प्लॅनेट ऑफ द एप्स आठवला. हॅन्स झिमरच्या संगीताबद्दल खरेच खूप कुतूहल आहे. इन्टरस्टेलर आणि ऑपनहायमरचे अजूनही रिपीटावर ऐकत असते. जरा melancholic संगीत आहे पण त्याचं. वनवासाला सूट होईल म्हणा. रामाने मोगली टाईप झाडावरून उड्या घेतलेल्या दिसल्या. असो. साई पल्लवी सीता म्हणून आवडणार नाही बहुतेक, बरी आहे झाले! रामाचं गंध मलाही नाही आवडलं, सूर्यवंशी म्हणून सूर्य छान दिसला असता भाळी!
राम म्हणजे साधेपणा, सादगी
राम म्हणजे साधेपणा, सादगी ज्यात पवित्र मंगलमय वातावरण अपेक्षित असते. हे असले काळपट सुपरहिरोछाप प्रॉडक्ट कुठल्या विचारांनी बनवले समजत नाही.
आदीपुरुषची झलक पाहिल्यावर ये क्या बवासीर बनाया है असे झालेले. रामायण ट्रेलर आदिपुरुष तुलनेत थोडाफार बरा म्हणू शकतो पण कॅटेगरी तीच वाटत आहे. पुन्हा तसेच काहीतरी बनवायची हिंमत की दुर्बुद्धी का सुचली असावी?
दुसरीकडे रितेश देशमुख आणि राजा शिवाजी चित्रपट बनवला आहे त्याची स्टार कास्ट बघून पर्सनली काही अपेक्षा नाही. पण कदाचित अजय अतुल संगीत जमले असेल तर ते तारून नेऊ शकते. ट्रेलर मध्ये येणारे.. लाख मराठ्यांची तू आग रे, माय भवानीचा तू वाघ रे.. हे गाणे मस्त वाटले. त्यासाठी ट्रेलर मागे जाऊन पुन्हा पाहिला. योग्य प्रकारे मार्केटिंग करत ठराविक लोकांच्या भावनेला हात घातला तर बॉक्स ऑफिसवर मुद्दल तरी वसूल करू शकतो.
Trailer काही काही ठिकाणी बरा
Trailer काही काही ठिकाणी बरा वाटला. भव्यतेमुळे सिनेमा , थिएटर मध्ये बघायला आवडेल.
रणबीर चा चेहरा सात्विक , शांत , मंगलमय वाटत नाही. काही काही shots मध्ये त्याचा चेहरा , pose हनुमानायोग्य वाटतो.
VFX काही ठिकाणी गंडल्याचे रील्स बघितले.
एका ठिकाणी नागरिकाच्या पगडीचा रंग बदलताना पाहिला.
हा ट्रेलर नाहीए.
हा ट्रेलर नाहीए. ढसाळ चित्रपटाची घोषणा.
पण इथे ललित प्रभाकर जे बोलतोय ते चित्रपटाच्या प्रमोशनपुरतं नाही किंवा ती भूमिका केली त्याच्याशी संबंधित चार वाक्य बोलायची म्हणून बोलत नाहीए ; याची खात्री आहे.
रितेश देशमुखने म्हंटलेला
रितेश देशमुखने म्हंटलेला 'हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा' हा डायलॉग बघून झालेला वैताग, उतारा म्हणून जुन्या शिवाजी महाराजांच्या सिनेमातील काही सीन्स पाहिल्यावरच गेला
नो वंडर, नागराज या प्रोजेक्ट मधून बाहेर पडला
ढसाळची आतुरतेने प्रतीक्षा आहे
ढसाळची आतुरतेने प्रतीक्षा आहे. नक्की बघणार.
"हिंदवी" आला का परत? तो शब्द
"हिंदवी" आला का परत? तो शब्द गाळला म्हणून बरीच टीका होत होती.
लोकसत्तेच्या या ट्रेलरबद्दलच्या प्रमोशन टाइप लेखात अभिषेक बच्चनच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख "शंभूराजे" असा आला आहे. शंभूराजे हे नाव/विशेषण फक्त संभाजी महाराजांबद्दल - शिवाजी महाराजांच्या मुलाबद्दल - ऐकले आहे. या पिक्चरमधली व्यक्तिरेखा ही त्यांच्या थोरल्या भावाची आहे.
आणि "विद्रोहः"? कम्युनिस्ट विचारधारेच्या लेखांत दिसणारा हा शब्द इकडे कसा आला? उद्या या चित्रपटात "व्यवस्थेविरूद्धचा लढा", "वर्गकलह" वगैरे दिसतील का?
"हिंदवी" आला का परत? <<<
"हिंदवी" आला का परत? <<<
आला आला... अगदी एखाद्या टपोरी गुंडाला शोभेल असा मानेला झटके देत म्हंटला आहे त्याने डायलॉग.. ते ही अफझल खानासमोर वाघनखे त्याला दाखवत...
त्या आधीचा शामियान्यात चालत येतानाच शॉट चांगला आहे..सजावट, पोशाख चांगले आहेत...
धिप्पाड अफझल खान आणि महाराजांच्या शरीरयष्टीतील फरक दिसून येईल असा कॅमेरा अँगल नीट घेतला आहे...
राजा शिवाजी बद्दल बोलताना
राजा शिवाजी बद्दल बोलताना देशमुख जिथे तिथे भावूक होताना दिसतायत. त्यावर देशमुख वाहिनी तोंड फिरवून डोळे पुसताना फ्री आहेत.
रितेशच्या या चित्रपटावर टीका
रितेशच्या या चित्रपटावर टीका म्हणजे साक्षात राजांचा अपमान

भरत तुम्ही मला रागाची इमोजी
भरत तुम्ही मला रागाची इमोजी टाकली असेल तर, ती मला लागू नाही. कारण मी याचित्रपतटावर टिका केलेली नाही.
दक्षिणा, कोणालाही उद्देशून
दक्षिणा, कोणालाही उद्देशून नाही.
आणि माझा उपरोध नेहमीप्रमाणे वाया गेला म्हणून आता
हा हा.. मायबोलीवर उपरोध केला
हा हा.. मायबोलीवर उपरोध केला की लोकं नंतर त्याचेच स्क्रीन शॉट घेऊन येतात आणि म्हणतात त्या दिवशी तर तू असा म्हणाला होतास
आर्रर्रर्र भरत
आर्रर्रर्र भरत
दुसरा ट्रेलर पह्लियापेक्षा
दुसरा ट्रेलर पह्लियापेक्षा चांगला वाटत आहे पण तरी, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कुणीतरी चांगला अॅक्टर हवा होता हे वाटतच राहते ! डायलॉग गंडले आहेत. जरा भारी पल्लेदार हवे होते. अजय अतुल चे म्यूझिक असले तरी ते अँथम मला फारसे नाही आवडले. फर्गेटेबल आहे अगदीच. याला एक मुख्य कारण म्हणजे अगदी र ला ट टाइप मिडिऑकर लिरिक्स असावेत! हल्ली भाषेची बोंबच असते एकूणच. तसे लिहिणारे कुणी उरले असावे की नाही ही शंका आहे.
होपफुली जरा एक दोन पोवाडे तरी टाकले असावेत.
Pages