TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक एखादा शब्द धरून विपर्यास करतात म्हणून माझे जनरल मत - ते प्रश्न तेव्हाही रास्त होते व आत्ताही आहेत
नव्हते/नाहीत म्हणायचंय ना तुला >> अरे हो की! Happy विपर्यास करायला उलट फुल संधी दिली मी Happy हो रास्त नव्हते आणि नाहीत

निदा खान एचआर नाही असा खुलासा कंपनीने केला आहे. त्यावर शंका का घ्यायची हे कळत नाही.
त्यावर विश्वास ठेवला तर आतापर्यंत जो बनाव रचला आहे तो कोसळून पडतो. तिने प्लानिंग करून तिच्या धर्माचे लोक कंपनीत भरले, त्यांना सांगितले कि सावज हेरा आणि मग त्यांना कंपनीत नोकरी दिली. त्यानंतर सावजाला तिने सुचवले कि अमक्या तमक्याच्या प्रेमात पड.

हे सगळं ऐकतानाच एका विशिष्ट संघटनेच्या प्रचाराबरहुकूम घटनाक्रम असल्यासारखं वाटत होतं. अगदी केरळा स्टोरी सारखं. हा सिनेमाही पराचा कावळा बनवूनच केला होता. इथेही तेच.

जर हे कुभांड रचलं नसत तर एका विवाहीत माणसाने एका अविवाहीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले ही केस गंभीरच होती. पण आता ती छोटी वाटायला लागली आहे.

प्रशांत कदम यांनी बातमीच दिली आहे. कोणत्याही प्रकरणाला दोन बाजू असतात. एकच बाजू सातत्याने समोर राहील याची दक्षता घेणे हा सुद्धा पॅटर्न आहे. हा पॅटर्न जाणवू लागला कि दुसरी बाजू काय आहे याची उत्सुकता राहते. ती कोण मांडणार होतं? ज्यांच्यावर आरोप आहे ते समोर येऊन मांडणे शक्यच नाही. त्यांना कुणी मांडू देईल हे ही शक्य नाही. आपण एका मोठ्या कारस्थानाचे शिकार होत आहोत हे समजल्यावर त्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? पोलीसांकडे गेले तर ते ऐकून घेतील का?

जोपर्यंत वकील न्यायालयातून त्याच्या अशीलाला दिलासा घेऊन येत नाही तोपर्यंत कुणी का समोर यावे? या आधी जे निरपराध होते त्यांना किती मानसिक त्रासाला समोर जावे लागलेले आहे?

ज्यांना आता पोलीसांवर, न्यायसंस्थेवर विश्वास वाटू लागलेला आहे त्यांचे तडीपार प्रकरण, सय्यद शहाबुद्दीन केस आणि एका पोलीस अधिकार्‍याच्या मृत्यूवर समाधान व्यक्त करणार्‍या साध्वीच्या बाँबस्फोटातल्या केस बद्दल काय मत होते? न्यायसंस्था, पोलीस याबद्दलची मतं आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

तिकडे यूपी मध्ये बारावीच्या दोन मुस्लिम मुलींवर आपल्या वर्गातील हिंदू मुलीला कर्न्व्हर्ट करायच्या प्रयत्नासाठी एफ आय आर झाला आहे. तक्रारदार हिंदू मुलीचा भाऊच आहे. त्याने आपल्याला हॅरॅस केले अशी तक्रार आधी या मुलींनी केली होती. गंमत म्हणजे हा एफ आय आर रद्द करायला हायकोर्टानेही नकार दिला आहे.

बाकी या नाशिक च्या केस मधे बीफ खायची सक्ती वगैरे आता ऐकू येत नाही. Happy

हे प्रकरण खरे निघाले तर याचे समाजावर होणारे संभाव्य परिणाम फार वाईट असू शकतील. आताच सोमि वर लोक अमक्या तमक्या कंपनीचे दाखले देत तिथेही असेच होते, अशा बातम्या पसरवत सुटलेत. एकूणच पॅनिक, द्वेष अणि तेढ वाढणे, मुलींच्या करियर अँबिशन वर रिस्ट्रिक्शन येणे, मुलींनी "वेळेत" लग्न करण्याचे दबाव, "आपण" वि. "ते" अशी सरसकट हेट्रेड आणि त्यातून लोकांनी शोधलेले आपापले भले बुरे मार्ग असा सगळा स्लिपरी स्लोप आहे.

>>>>+ १००००

Axis Bank मधे देखील नाशिक टीसीएस सारखा प्रकार व्हायचा असे विधान अमृता फडणवीस ह्यांनी केले आहे. स्त्रियांनी सावध राहावे, लगेच तक्रार करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे

बारा वर्षांपूर्वी उदयास आलेल्या एका सुप्रसिद्ध गोड गळ्याच्या गायिकेच्या घरी रील बनवण्यासाठी एक शांतताप्रिय कम्युनिटीचा युवक येत असे.
हा रीलजिहाद असेल तर पोलिसांनी त्याचा तपास केला का?

अमृता फडणवीस यांनी चक्क संधीसाधू कमेंट केली आहे. एरवी राज्याच्या मुखमंत्र्याची व गृहमंत्र्याची (सु?)प्रसिद्ध बायको तिथे कामाला असताना असं होत असेल याची शक्यता शुन्य.

देवेंद्र मुख्यमंत्री होण्यापूर्वी हे घडत असेल आणि अमृता यांच्या नंतर लक्षात आलं असेल तर एवढ्या प्रिव्हिलेज्ड बॅकग्राउंडचा वापर करून त्यांनी त्याविरुद्ध आवाज का उठवला नाही?

केरला स्टोरी या प्रचार पटात ३३००० आकडा सांगितला होता, नंतर कोर्टात ३ सत्य कथांवर आधारित स्टोरी आहे असे सांगितले.

इतर अशाच गंभिर गुन्ह्यांत साधा FIR नोंदवायला खळखळ करणार्‍या पोलीसांचा उत्साह बघून संशय येतो.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू चा फायदा कसा करुन घेतला ? तेव्हा विकु आणि फार मोजक्यांनी हत्या, खून, मोठ्ठा कट प्रकरण अवाजवी रंगविलेले आहे हे अनेकदा सांगितले. काही वर्षानंतर तपास यंत्रणा कोर्टात वेगळेच ( सत्य ) काही सांगते आणि नैसर्गिक मृत्यू म्हणून फाईल बंद होते पण तो पर्यंत बहुतेक मतदार खोटे स्विकारुन पुढे निघून गेलेली असतात.

दुसरे एक उदाहरण ( किती लोकांना आठवत असेल माहित नाही Happy ) रेल्वे गाडीमधे दोन प्रवासी गटांत बसण्याच्या जागेवरुन हाणामारी झाली, एकाचा मृत्यू झाला. या बातमी मधे तसे काहीच चमकदार नाही पण मृत्यू झालेला व्यक्ती हिंदू असेल आणि मारणारे बुरखे घातलेले असतील अशी बातमी दिली तर मोठी राळ उडविता येते. हे *** लोक असेच असतात , *****ना शांतता नकोच असते. अशा नरेटिव साठी या घटनेचा उपयोग झालेला बघितला आहे. बस तसेच रेल्वेमधे अनेकदा जागे वरुन भांडणे झालेली आपण रोज बघतो. काही तुरळक प्रकरणांत जिवघेणी हाणामारी होते. पण आपला विषारी अजेंडा पसरविण्यासाठी या असल्या प्रकरणाचाही फायदा करुन घेणारे कल्पक कार्यकर्ते/ पक्ष आहेत.
दुसर्‍या गटातील लोक हे बुरखे घातलेले नव्हते ( मराठी हिंदू च होते) हे लक्षांत आणून देईपर्यंत सुसंघटीत पणे मोठा अपप्रचार करुन झालेला असतो.

नाशिक मधे मोठी फसवणूक झाली असेल. विबास ही असेल, लैंगिक तसेच मोठा मानसिक छळ झाला असेल पण हे सर्व संघटीतपणे झाले आहे, बळाजबरीने धर्मांतर हे जास्त होत आहे.

समोर दिसत असलेल्या माहितीवरुन ( कदम यांचा व्हिडिओ एक आहेच पण अनेकांनी फार रोचक प्रश्न विचारले आहेत) आणि उड्या मारणार्‍या भक्तांचा उत्साह बघून, एखाद्या खर्‍या घडलेल्या गंभिर गुन्ह्याचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर केला गेला आहे असे माझे मत बनले आहे. नरेटिवसाठी अत्यावश्यक असा महत्वाचा घटक (core building blocks) या प्रकरणांत आहे. ३ सत्य घटनांचा डॉट आहे मग त्यावरुन ३३००० ची मोठी, जाड रेषा का नको लोकांच्या मनांत "बिंबवायला " ? पुढे कोर्टात या प्रकरणाला काहीच अर्थ नाही आहे असे आढळले तरी त्याचे आष्चर्य वाटायला नको पण तोपर्यंत आपली विद्वेषाची पोळी शेकायला काय हरकत आहे ?

<< हे प्रकरण खरे निघाले तर याचे समाजावर होणारे संभाव्य परिणाम फार वाईट असू शकतील. आताच सोमि वर लोक अमक्या तमक्या कंपनीचे दाखले देत तिथेही असेच होते, अशा बातम्या पसरवत सुटलेत. एकूणच पॅनिक, द्वेष अणि तेढ वाढणे, मुलींच्या करियर अँबिशन वर रिस्ट्रिक्शन येणे, मुलींनी "वेळेत" लग्न करण्याचे दबाव, "आपण" वि. "ते" अशी सरसकट हेट्रेड आणि त्यातून लोकांनी शोधलेले आपापले भले बुरे मार्ग असा सगळा स्लिपरी स्लोप आहे. >>

----- मुलींनी शिकायला नको, नोकरी करायला नको - केवळ घरकाम, मुलांचे संगोपन ( चूल आणि मूल ) आणि वडिलधार्‍यांची निस्वार्थ सेवा करावी असा मोठा शक्तीशाली वर्ग आहे त्यांना या प्रकरणाचा मनापासून आनंद झालेला आहे.

ऑफिस स्पेस मधे कुणाला किती स्वातंत्र्य असायला हवे?

भारतात असतांना - ऑफिसमधे कपाळावर टिळा लावून आलेले, सत्य नारायणाची पूजा, ऑफिसच्या वेळे मधे गणपती वर्गणी, ऑफिसमधेच गणापती / देवी ची पूजा हे असले धार्मिक स्वातंत्र्य बघितले आहे. गुरवार म्हणजे दत्ताचा / गणपती चा वार. कधी घरुन प्रसाद आणतात, सगळ्यांना वाटतात. भक्तीभावाने दिलेल्या त्या प्रसादांत आत्मियता असते, गोडी असते , प्रेम असते. मला कुठेही या गोष्टीचा त्रास होत नाही. Happy

काही उत्साही लोक कुठल्या बाबा / स्वामी/ मठाला भेट देतात आणि परत आल्यावर हातावर प्रसाद ठेवतात. तुमच्या घरी अमका अमका प्रॉब्लेम आहेत, मी गजानन बाबाचा अंगारा आणला आहे आणि हा घ्या प्रसाद. मला प्रेमाचे भरते येते आणि मी हात जोडून नमस्कार करतो. मला कुठेही या गोष्टीचा त्रास होत नाही. Happy भक्तीभावाचा त्याच्या कामावर आणि माझ्या कामावर परिणाम होत नाही.

मला इतर धर्मांबद्दल आदर असेल तर त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मला काडीचाही त्रास होत नाही. कधी झालेला नाही.

ऑफीस आणि धार्मिक कर्मकांडं या विषयावर चर्चा व्हायला हवी. माझेही काही गोंधळ आहेत. ते क्लिअर होतील.
पण ते अशा प्रपोगंडा विषयाशी जोडून नकोत. एखाद्या लांच्छनास्पद गोष्टीशी जोडून अन्य गोष्टीशी चर्चा झाल्याने ती ही लांच्छनास्पद आहे असा समज तयार होतो. हा ही पॅटर्नच आहे. एरव्ही या विषयावर कुणीही चर्चेला सुरूवात करू शकतो. अशा घटनांची वाट बघायची गरज नसते.

इथे काही जण म्हणतात कि कंपनीने इतका वेळ का घेतला? पण जबरदस्तीने नमाज पढायला लावला याबद्दल त्याच वेळी तक्रार का केली नाही असा प्रश्न कुणालाच का पडला नाही? बीफ खायला लावले, त्यांच्या समोर हिंदू देवीदेवतांची बदनामी केली तरी कुणीच तक्रार का केली नाही?

दुसरा प्रश्न पोलिसांनी अंडरकवर ऑपरेशन केले. कंपनीत भरतीशिवाय?
सगळेच्या सगळे सिलेक्ट झाले? अंडकरकवर असेल तर कंपनीच्या अधिकार्‍यांना विश्वासात घ्यावे लागले असेल. ते एच आरच असतात. त्यांनाच अटक केली. शिवाय जिला आता एच आर म्हटले जातेय तिने मुंबईला स्वतःची बदली करून घेतली असेही म्हटले जातेय. एव्हढे चांगले रॅकेट चालू असताना ती एव्हढी मोठी जबाबदारी अर्धवट सोडून का निघून गेली?

जेव्हां आरोपांचं स्वरूप वाचलं तेव्हांच शंका येऊ लागल्या. याच ग्रुपवर अन्य एकाने महिला कशा कुभांड रचतात असे म्हणून हायकोर्टाच्या निकालाची कॉपी सादर केली होती (मागच्या पानात दिले. चिडीचूप).

या बातमी नुसार:
Nashik Police Commissioner Sandeep Karnik said Khan’s role in the case was limited. “So far, her role has not emerged in any other FIR. She was an associate and not in HR at the company and in our probe no link has been found to the accused in any case registered across the country. However, since some news channels have been reporting about some accused being linked to banned groups, we have written to central agencies to check as our probe is limited to the nine FIRs," he said.

तर विकु मी म्हटलेले मिक्स अप हे अनवधानाने नसून तुम्ही म्हटल्याप्रमाणे मीडियाने खोडसाळपणे केलेले दिसतेय.
NIA, ATS पण चौकशी करतेय वगैरे तर ते केवळ मीडियावर पसरलेले आरोप बघुन!

दुसरीकडे ती अद्याप पोलिसांना सापडली नाही. अजुन का समोर आली नाही असा प्रश्न मलाही पडला आहे पण त्याबद्दल कसलाही तर्क नाही.

POSH चॅनेल मध्ये कोणतीही लेखी तक्रार आलेली नव्हती असे म्हणले आहे. >>>> तोंडी तक्रारही चालते. मैत्रेयीने बरोबर लिहीले आहे. तिच्या पोस्मधल्या "संभाव्य परिणाम" च्या भीतीशीही सहमत. स्त्रीस्वातंत्र्य व समान हक्क याचा तिरस्कार असलेल्या एका मोठ्या गटाला यातून मोठे इंधन मिळेल.

विकु - आणि जिल्टेड लव्हर इतकेच सांगून त्यातील फसवणूकीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. ही फसवणूक आहे की आधी परस्पर संमतीने झालेल्या अफेअर नंतर झालेले आरोप आहेत, माहीत नाही. याबद्दल काहीही ठोस माहिती उपलन्ध नाही. त्यातील एका व्यक्तीचे लग्न झालेले आहे हे माहीत असून असलेले अफेअर असेल तरच ती "परस्पर संमती" धर ता येईल. नाहीतर फसवणूक. त्यातून ती मुलगी धार्मिक प्रथा पाळू लागली अशीही बातमी आहे. बाय द वे जिल्टेड लव्हर इतर दहा जणांना कशाला गोवेल काहीतरी कारण असल्याशिवाय? म्हणजे लगेच ते थेट दोषी आहेत असे नाही पण किमान चौकशी करण्याइतके तरी कारण दिसते. तसे काही "नाहीच" इतका निर्वाळा देण्याइतके काही अजून समोर आलेले नाही.

हा फक्त दोन व्यक्तींमधला मामला आहे आणि इतरांचा आणि इव्हन कंपनीचा त्यात काही संबंध नाही हे कंपनीला आत्तापर्यंत समोर आणता यायला हवे होते. त्यांची वकिलांची फौज असेलच आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे कंपनीला यातून बाहेर काढणे, घटनेतून वेगळे करणे यालाच या वकिलांचे सर्वात प्राधान्य असेल यात शंका नाही. दुसरे म्हणजे यात "गुन्हा" काही नसेल आणि फक्त कंपनीच्या नियमांशी संबंधित गोष्टी असतील, तर तसेही त्यांना सहज दाखवता यायला हवे (फक्त कंपनीचा अंतर्गत मामला). त्यांनीही तसे अजून काही केलेले नाही, म्हणूनच कोठेतरी पाणी मुरत आहे अशी शंका आहे.

मानव - कालच्या माझ्या पोस्टनंतर तुम्ही तुमच्या कोणत्यातरी पोस्टचा संदर्भ दिला आहे. तो नक्की कोणता ते समजले नाही. पुन्हा थोडे आधीपासून वाचून पाहीन.

<<तोंडी तक्रारही चालते.>>
हो. जर ७८ इमेल्स ही बातमी खोटी असेल तरीही आमच्या रेकॉड्स आणि सिस्टमच्या प्राथमिक तापसणी नुसार या एफआयआरशी रिलेटेड कसल्या तक्रारी आढळल्या नाही असे सांगताना तोंडी तक्रारींचे काय याबद्दल सुद्धा खुलासा यायला हवा. तो टाळणे बेजबाबदारपणा, अंग काढुन घेतल्या सारखे वाटले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तोंडी / इमेल्स द्वारे तक्रारी अश्विनी चैनानीकडे केल्या होत्या आणि तिने त्याबाबत काही केले नाही म्हणुन तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ती अद्याप ज्यूडीशियल कस्टडीत आहे. तिच्याशी न बोलता ही प्राथमिक तपासणी झाली का, तिचे डिव्हाईसेस पोलिसांकडे असतील आणि हे इमेल्स त्यावर असतील तर ते विचारात घेतले नाही का असे प्रश्न पडले.

Axis Bank मधे देखील नाशिक टीसीएस सारखा प्रकार व्हायचा असे विधान अमृता फडणवीस ह्यांनी केले आहे. स्त्रियांनी सावध राहावे, लगेच तक्रार करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे >> Axis बँकेच्या मानव संसाधन विभागात होत्या ना? मग त्या याविरुदध काही करू शकल्या नाहीत का?

Axis मध्ये काम करताना धर्मांतरासाठी प्रचंड दबाव आल्यानेच 'मेरे रूह का परिंदा फडफडाये' हे गाणे गायची प्रेरणा मिळाली असेल का ?

> बाय द वे जिल्टेड लव्हर इतर दहा जणांना कशाला गोवेल काहीतरी कारण असल्याशिवाय?
फारेंड, लगता है आपका अभि तक jilted lover से पाला पडा नहीं है !
अशा प्रकारचे एफ आय आर कसे नोंदवले जातात याची मला कल्पना आहे, दिसतील तितके मुस्लिम एफ आय आर मध्ये भरूयात! इथे या सार्‍या प्रकरणाची सुरुवात एक एम्प्लॉयी ने केलेल्या तक्रारीवरून नव्हे तर एका भाजप कार्यकर्त्याच्या सूचनेवरून झाली हाही एक रेड फ्लॅग आहे.

बाय द वे एका आरोपीच्या वडिलांनी आपल्या मित्रासाठी गिफ्ट म्हणून कुठून तरी आणलेली टोपी त्याला घालतानाचा व्हिडिओ चॅनल वाले धर्मांतर की कोशीश म्हणून दाखवत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=v-jrFZawkgE
इथल्या चर्चेचे अर्क म्हटले तरी चालेल. रेड माईक चॅनेल आहे. ज्यांना नाही बघायचा ते स्किप करू शकतात.

काही प्रश्न आहेत.
पोलिसांनी स्टेटमेण्ट दिले आहे कि निदा खान एचआर आहे असे त्यांनी कधी म्हटलेले नाही.
हा कॉर्पोरेट जेहाद आहे असे पोलीस म्हणत नाहीत.
इतर अनेक आरोपांबाबत पोलीस काही म्हणत नाहीत.

तर इथे आणि बाहेरही अनेकांनी ठामपणे जी विधाने केली आहेत ती कशाच्या जोरावर?

टीसीएस कंपनी तपास का प्रभावित करेल? त्यांना दोषींना बाहेर करणे जास्त सोपे आहे. जेव्हढी झाली बदनामी तेव्हढीही त्यांनी होऊ दिली नसती. पोलीस टीसीएसच्या प्रभावाखाली येतील कि सर्वशक्तीमान सरकारच्या? दोन्हीत प्रभावी कोण आहे?

पोलीसांचे अभिनंदन कि त्यांनी स्वतंत्र स्टेटमेण्ट दिले. याचाच अर्थ त्यांना हवं तसं स्टेटमेण्ट द्यायला भाग पाडले नाही. मनात आणले असते तर इतर अनेक प्रकरणांप्रमाणे इथेही पोलिसांनी संदिग्ध किंवा सरकारच्या बाजूने हवे ते स्टेटमेण्ट दिले असते जसे भीमा कोरेगाव प्रकरणात केले.

म्हणजे सरकारला हे प्रकरण रेटून न्यायचे नव्हते. जो काही धुरळा उडवला त्याचा उद्देश कशावरून तरी लक्ष हटवणे इतकाच असावा. ते नेमके काय हे सांगता येत नाही. पण ते इप्सित साध्य झाले असेल कदाचित म्हणून आता प्रकरण खाली बसत चालले आहे. कदाचित टीसीएस आणि कॉर्पोरेटला योग्य तो संदेश गेला असावा. इथून पुढे बजरंग दल सर्ट्फाईड इच्छुकांना नोकर्‍या देण्यात येतील.

राज अज्ञानी यांनी दिलेल्या व्हिडीओत बजरंगदलाच्या प्रदर्शनांची झलक आहे. टीव्हीवरील बातम्या पाहिल्या नसल्याने याची तसेच मीडिया ट्रायलने काय काय उभे केले आहे याची कल्पना नव्हती.
त्याचे काही पडसाद मात्र सुपरिचित नातेवाईक व मित्रमंडळी समूहात पहायला मिळाले.
वरती हे प्रकरण खरे निघाले तर काय परिणाम होतील लिहिले आहे. अशा मीडिया ट्रायल्समुळे तसे परिमाण थोड्या फार फरकाने इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ खरे की खोटे होणारच.

वरती हे प्रकरण खरे निघाले तर काय परिणाम होतील >> खोटे निघाले तरी वेगळे काय होणार होते?
केरळा स्टोरीने झालेले परिणाम किंवा धुर्ंधर मधे अन्य राजकीय पक्षाचे नेते पाकशी हातमिळवणी करतात हे दाखवल्याने ते खरे असो कि खोटे व्हायचे ते परिणाम होतातच. यथावकाश कॉर्पोरेट जेहाद वर चित्रपट येईल. त्या वेळी लोकांना नाशिक प्रकरण अंधूकसे आठवत असेल.

जसे केरळातल्या लव जेहाद मधे पोलिसांनी खुलासा केला होता कि गायब झालेल्या मुलींचा एव्हढा मोठा आकडा नाही, हे नंतर विस्मरणात गेले.

दोन गोष्टी आहेत.
हे असे गंभीर आरोप, त्यांची पूर्ण गांभीर्याने दखल व चौकशी त्यानुसार न्यायप्रकिया वेळेवर होऊन न्याय मिळणे गुन्हे सिद्ध झाल्यास शिक्षा होणे.
या प्रक्रियेत हे प्रकरण खरे निघाले तर, याबाबत मैत्रीयी यांनी लिहिले आहे असा माझा समज आहे आणि त्यांनी लिहिले त्याच्याशी सहमत आहे. यात ते खोटे निघाले तर तेवढे परिणाम होणार नाहीत. जेवढे झाले त्यातील रिव्हर्स होतील. मीडिया अगदी आदर्श केव्हाच असणार नाही पण रिपोर्ट करताना सगळे एकमेकांना कॉपी करत तेच ते दाखवणार नाहीत. यात जे काही परिणाम होतील ते होतील त्यात मीडियाला वगैरे दोष देता येणार नाही.
असले आरोप दखल न घेता धुडकावले, दाबून टाकले तर त्याचेही फार गंभीर परिणाम होणार.

दुसरे म्हणजे प्रकरण खरे असो खोटे असो मीडिया ट्रायल्सने उभा केलेला अवास्तव डोलारा व बहुतेकांनी एकत्रित पणे केलेले पध्दतशीर हॅमरिंग. यात मग खोटे निघाले तरी माहीतच होते दाबुन टाकणार म्हणत खरे निघाल्यास जे परिणाम होतात ते थोड्याफार फरकाने होतीलच असे मी म्हणतोय.

तुमच्या दृष्टीकोणाला डिनाय करत नाही. हा दृष्टीकोन आपल्या जागी बरोबर आहे.

मात्र प्रकरण खोटं निघालं तरी मधल्या मधे जो खोटा प्रचार झालेला असतो तो धुवून निघत नाही असं माझं म्हणणं आहे. अचूक बातम्या हुडकून दोन्ही बाजू तपासण्याचे कष्ट फारसे लोक घेत नाहीत. म्हणून केरळा स्टोरीचं उदाहरण दिलं. एव्हढ्या मुली बेपत्ता झाल्या हे खरं नाही असं पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्याची दखल कमी लोकांनी घेतली म्हणूनच केरळा स्टोरी काही वर्षांनी आला तेव्हां तुफान चालला. लोकांना सगळेच लक्षात राहते असे नाही. हे माझे म्हणणे होते.

अशी प्रकरणं जेव्हां महिनोनमहिने चालवली जातात तेव्हां एका स्क्रीप्टमधून दुसरी अशा कहाण्या येत राहतात. यातली एकही कहाणी जेव्हां टिकत नाही तेव्हां निव्वळ या फेक कहाण्या प्रकरण चिघळवण्यासाठी निर्माण केलेल्या असतात हे लक्षात येतं. जसं सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार निवडणूक हे लक्ष्य होतं.

आताच्या प्रकरणात असं टार्गेट दिसत नाही, कदाचित आता लक्षात येत नाही, नंतर धागे दोरे मिळाले कि समजेल. एका मित्राने मीमला मुस्लिमांचे तारणहार म्हणुन उभे करण्यासाठी भाजपने मुस्लिमांमधे फिअर तयार करणे आणि हिंदूंमधे द्वेष निर्माण करणे या दुहेरी हेतूने हे प्रकरण चालवले आहे असे म्हटले. तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला असे वाटले.

काही लोक खरात प्रकरणातला विशिष्ट नेत्यांचा सहभाग दाबण्यासाठी ही सजावट केली आहे असे म्हणत आहेत. हे सगळे अंदाज आहेत.

जोपर्यंत निदा खान आणि संबंधित पीडीत मुलगी दबावाविना जबाब देत नाहीत तोपर्यंत काहीच समजणार नाही. स्क्रीप्ट चालवण्यामागे काय हेतू होते याचे पुरावे कुणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे ते अंदाजच असतील.

सत्य एकच असेल, हे प्रकरण मुळात काय होते आणि त्यात मसाला किती भरला किंवा नाही भरला हे.

टिसिएसची सारवासारव अपेक्षित आहे. प्रत्येकवेळी त्यांनी अभिमानाने मिरवलेली झिरो टॉलरंस पॉलिसी हि वराती मागुन घोडे या प्रकारात मोडणारी नसते, हे ठणकाउन सांगण्याची वेळ आलेली आहे. निदा खान खरोखर कल्प्रिट असेल (इंन्स्ट्रुमेंटल इन कंन्वर्जन) तर तिला एचआर किंवा कुठल्याहि लिडरशिप पोझिशन वर अस्णं गरजेचं नाहि, आणि हे एलबरेट करण्याची आवश्यकता नाहि असं मला वाटतं.. इदर वे, तिची जबानी टिसिएसला गोत्यात आणु शकते...

निदा खान एच आर मध्ये नव्हती.
दुर्दैवाने ही बातमी चॅनेल्स वर इतक्या वेळ चघळली आहे की आता ती नेहेरुंनी अ‍ॅटली ला लिहिलेल्या खोट्या पत्राप्रमाणे लो इन्फर्मेशन लोकांना अनंत काळ पर्यंत खरीच वाटणार आहे.

अमृता फडणविस यांनी शोषणाच्या केसेसमधे मॅनेजमेंटने अ‍ॅक्शन घेतली असे म्हटले आहे . त्यात धर्माचा उल्लेख नाहीये पण मुलांना आपल्या रुट्सशी जोडून ठेवल्या.. वगैरे म्हटलय.
ही बातमी TOI मधली

मुलींच्या कॉलेजमधे जाऊन मुलींना अश्लील कमेण्टस करणे, त्यांना धमकावणे, धक्काबुक्की करणे ही घटना घडली आहे. या घटनेला अशीच प्रसिद्धी मिळणार आहे का?
https://indianexpress.com/article/cities/delhi/du-gargi-college-chaos-st...

रायपूरमधे के सालेम इंग्लीश मेडीयम स्कूल मधे जबरदस्ती धर्मांतरण केले जाते या आरोपावरून बजरंग दलाने गोंधळ घातला. पोलिसांना फैलावर घेतले.

सगळीकडे धर्मांतराची बातमी बजरंग दलाला आधी समजते आणि तरीही यात काहीही कारस्थान वाटत नसेल तर धन्य आहे.
https://www.youtube.com/watch?v=FtLDGGhi-NQ

वर ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या सर्व प्रसिद्ध चॅनेल्सच्या नाहीत. सीएनएन - न्यूज १८ नेटवर्कची ही लिंक.
https://www.youtube.com/watch?v=_8oFOpPK2UQ

या शिवाय हिंदुस्तान टाईम्स, वायर आणि बर्‍याच चॅनेल्स मधे ही बातमी व्हिडीओ फूटेजसहीत आहे.
( या धाग्यावरच्या कमेण्टस एआय च्या सहाय्याने लिहील्या आहेत असे वाटत असल्यास ठसठस एआय वर चेक करावे)

जर कुणी इस्लाम, त्याचा अंतिम प्रेषित याबद्दल काही टीका, टिंगल, विनोद केले तर मुस्लिम लोक "सर तन से जुदा" च्या घोषणा देतात आणि अनेकदा त्या अमलात आणतात. नुपूर शर्मा प्रकरणी उदयपूर इथे कन्हैया लाल नामक माणसाची गळा चिरुन हत्या झाली. काही दिवसांपूर्वी सलीम वास्तिक नामक इस्लाम धर्माचा त्याग केलेल्या ब्लॉगरवर हाच प्रयोग झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो आज जिवंत आहे.
तर स्वतःच्या धर्मावरील टीका सहन न करू शकणारे मुस्लिम हिंदू धर्मातील पौराणिक कथांची टी सी एसच्या ऑफिसमधे हिंदू मुलींसमोर टिंगल कशी करू शकतात? हा दुटप्पीपणा कसा काय चालवून घ्यायचा हिंदूंनी? आमच्या धर्माची टिंगल करणार्याला जशास तसे उत्तर द्यायला हवे असे कुणी म्हटले तर त्याला काय प्रतिवाद?

Pages