TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<अश्विनी चैनानी बहुधा पुण्यातली एच आर ऑफिशियल असावी. तिला का अटक केली ते बातमीत दिसले नाही.>> त्या बातमीत खाली असं म्हटलंय:
Regarding the operations manager, Mitke said she has been arrested because some of the victims allegedly filed oral complaints against the accused, but no action was taken. “While no written complaint was given, the manager was on the Prevention of Sexual Harassment (POSH) committee, where even a verbal complaint is enough to take action,” Mitke said.

द हिंदु मध्ये :
"Over 78 e-mails were exchanged. There were a few phone calls as well. Had she taken note of these concerns on time and escalated them, these things would not have gone so far,” the police argued. Ashwini Chainani is based in Pune.

अय्या! ध्रुव राठीनं अजून या प्रकरणाला पुष्टी दिली नाहीये तर कसा विश्वास ठेवणार नाही का?

आणि स्त्रियांची सुरक्षितता या जनरल मुद्द्याकडे वळण्याची गरज नाही. तो मुद्दा स्त्री पुरुष अस्तित्वात आले तेव्हापासून तसाच आहे. इथे जो मुख्य मुद्दा आहे त्याला वळसा घालून का बोलताय?

इथे या धाग्याचा विषय आहे की धर्मांध मुसलमानांकडून अ त्यंत पद्धतशीर आणि संघटीतपणे हिंदू स्त्रिया आणि पुरुष यांचा सर्वप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळ करून, दबाव आणून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले गेले आहे. यावर बोला.

विशेष म्हणजे हे मुसलमान चुकीचं अजिबात वागत नाहीयेत. ते खरंतर बेस्ट मुसलमान आहेत कारण त्यांच्या धर्मात सांगितलं आहे त्याचं ते तंतोतंत पालन करत आहेत.

एप्स्टिन फाईल्सबद्दल एप्स्टिन फाईलच्या धाग्यावर बोला. कठीण जातंय का इतकी सोपी गोष्ट समजायला?

धाग्याचा विषय TCS - नाशिक आहे. आणि धागार्त्यांनी खरात प्रकरणाचा उल्लेख धाग्यामधे केला आहे. प्रकरण धक्कादायक आहे.

बृजभूषण किंवा मणिपूर बद्दल न लिहीण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. (आरोपी मुस्लीम असल्याने ) आवश्यक असणारे इंधन मिळाल्याचा आनंदात स्त्रियांच्या सुरक्षिततेला जनरल विषय संबोधून एव्हढे पण कमी लेखू नका.

या प्रकरणाची व्यावस्थितपणे चौकशी होईल आणि दोषींना कडक शिक्षा मिळेल अशी अपेक्षा.

वर कुणीतरी राहूल शिवशंकर च्या शो ची लिंक दिली आहे. प्लीज नो !
सुशांत च्या आत्महत्येच्या वेळी याच माणसाने आपल्या नाविका या तात्कालीन सहकार्‍या बरोबर रिया चक्रवर्तीचे लचके तोडले होते. ही आत्महत्याच आहे असे मी व भरत डे वन पासून सांगत होतो व इथे गोंधळ सुरू होता. सीबीआय ने पाच वर्षे तपास करून लाजत लाजत आत्महत्या आहे हे मान्य केले.

या TCS केस मध्ये त्या भाजप च्या कार्यकर्त्याचा locus standi काय आहे ? भीमा कोरेगाव केसमध्येही एका भाजप कार्यकर्त्याच्या हुकुमावरूनच केस केली होती. एखाद्यी हिंदू मुलीने रोजे ठेवायला सुरू केले हे कितीही चुकीचे किंवा आक्षेपार्ह वाटले तरी कायद्याच्या कोणत्याही कलमात निदान आज तरी तो गुन्हा नाही.

अश्विनी चैनानी यांनाही अटक झाली असेल तर तेही चुकीचे आहे. कंपनी चे पॉलिसी व प्रोसेजर्स म्हणजे भादंवि नव्हे. त्या न पाळल्याबद्दल कामावरून काढून टाकायचे अधिकार कंपनी ला नक्कीच आहेत पण पोलिसांना अटकेचे अधिकार नसावेत. python function चे नाव ALL CAPS मध्ये ठेवले म्हणून मला अटक होईल का?

CBI ने चुकीची माणसे भरली आहेत. त्यांनी इथल्या तज्ञ मंडळींची कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली पाहिजे.

रोजे ठेवणे चुकीचे नसेल पण त्यातून हे पुढचे प्रकरण उजेडात आले आणि अजून काही मुली सुरक्षित झाल्या असे नाही का वाटत ? त्या आरोपी माणसांनी जे काही केले ते बरोबर आहे का?

POSH हे भारत सरकारने केलेल्या कायद्याचा भाग आहे. फक्त कंपनी पुरता नाही. दर वर्षी कंपनीला सरकार मधे POSH चा अहवाल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे यात सरकार हस्तक्षेप करु शकते.
फंक्शन चे नाव all caps मधे ठेवून कोणाचा गैरफायदा घेता येत नसेल तर चालायला हरकत नसावी.

एचआर ला माहीत असून त्यावर कारवाई केली नाही म्हणून ती व्यक्ती कोकॉन्स्पिरेटर म्हणून अधिक तपासासाठी का अटक होऊ नये?
बाकी तुमची इथली लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार कलमाखाली १०० टक्के बोगस केसेस असतात, अपवाद ही असूच शकत नाही वगैरे रॅडिकल मते वाचून आणि तक्रारीचे मनातल्या मनात आधीच निवारण केलेले वाचून आता अचंबित व्हावे का काय हे कळेना. तुम्ही एचआर मध्ये काम करू नका.
फंगशन चे नाव लोअर केस मध्ये ' उद्या_अमितचा_नंबर ' लिहा आणि अमितने तुमच्या मताप्रमाणे फूस लावल्याची, फसवणुकीची खोटी केस करु दे की चौकडीची टोपी डोक्यावर असेल. काहीही वादासाठी वाद आणि उदाहरणांची काय गरज आहे?

या प्रकारावरुन कायद्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असलेली सिस्टिम - एच आर - जर का आपले काम योग्य पद्धतीने करणार नसेल/ गैरवापर करणार असेल तर काय हा प्रश्न उभा राहीलाय. टाटा कंसलटंन्सी सारख्या कंपनीत असे घडू शकते तर हे कुठेही घडू शकते. इथे आरोपींचा धर्म, त्या दृष्टीने केलेली हॅरॅसमेंट आहे आणि ते खूप गंभीर आहे पण असेच जात-प्रांत वगैरे वरुनही घडू शकते.
सरकारी महिला आयोग काय किंवा कंपनीचे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट काय संरक्षणासाठीची सिस्टिमच चुकीच्या वर्तनात सक्रिय असल्यास काय हा प्रश्न आहे. बरेचदा पोलीसांकडे गेलो पण त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही मग कुणा कार्यकर्त्याने मदत केली तेव्हा कुठे नोंद झाली वगैरे बातम्यांत बघतो. इथेही कंपनी अधिकार्‍यांनी काही मदत केली नाही बाहेरुन हस्तक्षेप केल्यावर मग सगळा प्रकार उघडकीला आलाय. त्यामुळे 'अ' सिस्टिम अयोग्य वागल्यास चेक आणि बॅलन्स ठेवायला अजून 'ब' आणि 'क' सिस्टिम असे काहीतरी सिस्टिममधेच कायमसाठी हवे.

हे कुठेही होऊ शकते आणि होतेच. कोल्डप्ले किस कॅम वर खुद्द एच आर हेड आणि सीइओ पकडले गेले आठवत असेल. तिकडे फूस न्हवती. पण असे संबंध गैर आहे आणि असले तर ते डिस्क्लोज करणे आवश्यक आहे हे ही पाळता न आल्याने त्यांची आजची स्थिती बघा.
लक्ष्मणरेषा ही पाळलीच पाहिजे.

बाकी पुण्यात एक मित्र एकटा रहायचा आणि रोजे सोडताना एकटाच कुठे सोडू करून बोलवायचा. तेव्हा मी पण काही दिवस रोजे पाळले आहेत.

>>लक्ष्मणरेषा ही पाळलीच पाहिजे.>>+१
संबंध गैर नाहीत, राजीखुषीचे आहेत तरीही एकाच कंपनीत कामाला असाल तर एच आर कडे नोंदणी करणे अपेक्षित असते. इन फॅक्ट तुमच्याच सेफ्टीसाठी हे करावे. लोकेशन, डिपार्टमेंट वेगळे आहे, हायराअर्कीच्या लूपमधे कुठेही संबंध नाही तरी लेकाने आणि संबंधीत पार्टीने नोंदणी केली.

लक्ष्मणरेषा ही पाळलीच पाहिजे हे खरे आहे पण ती पाळली नाही म्हणून अटक करायचे अधिकार पोलिसांना आहेत का? हा कळीचा प्रश्न आहे. त्या कोल्ड प्ले वाल्या जोडीची नोकरी गेली, कदाचित डायव्होर्सही झाला असेल, नोकरी जाताना मिळणारे पैसेही कापले गेले असतील, कंपनीने दिलेले शेयर्स परत घेतले असतील, वगैरे ठीक आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली नाही व केस कोर्टात चालली नाही हे महत्वाचे आहे.

बातम्या आणि हा धागा वाचते आहे. कोणत्याही प्रकारच्या वर्कप्लेस हरॅसमेन्टची दखल घेतली जायलाच हवी. तक्रार करूनसुद्धा त्यावर कारवाई - साधी चौकशीही झाली नसेल तर ते अक्षम्य आहे. पीरिअड.

बाकी आताशा धार्मिक रंग देण्यात किंवा गडद करण्यात न्यूज चॅनल्सचा काही हातभार लागला नसेलच याची मला खात्री वाटेनाशी झाली आहे, पण तो अ‍ॅन्गलही खरा आहे असं गृहित धरलं तर तेही अर्थातच अक्षम्य आहे.
'आमच्या सणाच्या दिवशी तुम्ही मांसभक्षण करू नका' ही अपेक्षा चुकीची आहे तसाच 'आमच्या उपासांच्या काळात तुम्हीही रोजे धरा' हा आग्रहही चुकीचाच आहे.

विकु, तुम्हाला कळलंच नाहीये का समजुन घ्यायचं नाहीये?
एचआरकडे तकार (कदाचित अनेकांनी अनेक तक्रारी) करुन त्याची दखल घेतली नाही म्हणून एचआर ही राजीखुशीने यात सामिल आहे हा सकृतदर्शनी पुरावा आहे. त्यावरुन आणखी चौकशीसाठी अटक का होऊ नये? अटक केली म्हणजे कलम लावलं का? नसेलच. आणि लावलं असेल तर कुठलं? जामिन मिळाला का?
भारतात कलम न लावता अटक करण्याची परंपरा आहे. इथेही ती अवश्य फॉलो व्हावी.

>>लक्ष्मणरेषा ही पाळलीच पाहिजे हे खरे आहे पण ती पाळली नाही म्हणून अटक करायचे अधिकार पोलिसांना आहेत का? हा कळीचा प्रश्न आहे.>>
अमेरीकेत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार वगैरे प्रकार नाही त्यामुळे अटक व्हायचा संबंधही नाही. देशात मरायटल रेप हा रेप धरला जात नाही पण हा धरला जातो तर पोलीस केस करणार. लग्नाचे आश्वासन नाही असा करार नोंदवता येतो का?
तुम्ही रहाता त्या राज्यात्/देशात लिव इन कॉमन लॉ असेल तर ते ऑब्लिगेशन येणार नाही तर नाही. तसेच हे देखील.

निरगुडकरांचे म्हणणे चर्च काही तलवार घेवून आले नाही, सेवाभाव घेवून आले हेच चुकीचे. जिहादवर बोलताना चर्चला कशाला क्लिन चिट?

इथे लिहिण्यापेक्षा तो व्हिडिओ पहाण्यात जास्त योग्य ठरेल. त्यातील धर्मांतराचा इतिहास हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. मी वर एक प्रतिक्रिया दिली होती तेव्हा मी व्हिडिओ पाहिला नव्हता. ती प्रतिक्रिया पर्त इथे देतो.
"वास्तव नेमके काय आहे हे समजणे अवघड असते. कधी कधी ते सोयीचे ही नसते. बातमी व वास्तव यात कधी बृहत अंतर असते. कधी बातमीत अंशत: सत्य असते पण त्यावरुन वाचकांना जे आकलन होते ते वेगवेगळे असू शकते. लैंगिक शोषण हा फारच कळीचा मुद्दा आहे तो नैतिकतेत अडकला आहे धर्मांतर देखील कधी अमिषापोटी कधी फायद्यापोटी कधी सोयी साठी केली जातात. हाणून मारुन मुसलमान असा एक शब्द प्रयोग मी ऐकत/ वाचत आलो आहे. तिथे दहशतीतून धर्मांतरे झालेली असावीत
पण ब्रेनवॉश करुन ईप्सित साध्य करणे हा बचाव कितपत टिकेल यात शंका आहे. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेचे कोर्टातील युक्तिवाद पहा. अजूनही अनेक आयाम आहेत. पिडित व लाभार्थी यांची गल्लत केली जाते. कधी कधि लाभार्थि परिस्थितीवशात पिडीत म्हणून स्वत:ला म्हणवून घेतो"
यातील धर्मांतराचा मुद्दा निरगुडकरांनी उदाहरणे देउन मांडला आहे
कार्पोरेट क्षेत्राविषयी मला काहीही माहित नाही पण लैंगिक व्यवहार व धर्मान्तर यातील धर्मांतराचे उद्दिष्ठ ठेउन लैंगिक व्यवहार हा मुद्दा मला अजून झेपत नाही

स्वाती2, मुस्लिम धर्मांतरे ही तलवारीच्या जोरावर झाली व खिश्चन धर्मांतरे ही सेवाभावा वर झाली असा एक युक्तिवाद केला जातो त्यावर पुरोगामी विचारवंत राम पुनियानी म्हणतात की तसे असते तर मुस्लिमांना तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान धर्मांतरीत करता आला असता म्हणून तलवारीच्या जोरावर धर्मांतरे केली हे खरे नाही. राम पुनियानी हे सद हेतुने हिंदु मुस्लिम दरी कमी व्हावी, सामाजिक सलोखा राहावा राष्ट्रीय ऐक्य वाढावे यासाठी काही बोधकथा पाडतात. आपण त्याला सुपर्यास म्हणु या! इतिहासाच्या अभ्यासकांना ते पटणार नाही. पण जनमानसात द्वेषकथा फैलावण्यापेक्षा खोटे बरे अस त्यांना वाटत असावे. सदहेतुने माणसे नकळत खोटे बोलतात. सोडून द्यायचे

१० एक मिनिटे व्हिडिओ बघितला. बादरायण कशाचा कशाशी संबंध जोडून एआय कडून कनविनियंट चित्रे तयार करुन घेऊन कर्कश्य आवाजात ओरडलेला व्हिडोओ आणखी बघणे शक्य नाही. मूळ मुद्दा (माझ्या दृष्टीने) लैंगिक शोषण, वर्कप्लेस हरासमेंट आहे. त्याचा साधा उल्लेखही मी बघिततलेल्या १० मिनिटांत झाला नाही. प्रयागराजला ६५ कोटी लोकांनी स्नान केलं आणि त्यात ६५ लाख अ-हिंदू होते आणि त्यांच्यावर हिंदू बनायची सक्ती झाली नाही हे परत परत दोन तीन वेळा आलेलं बघुन, तेही अ‍ॅज अ एक्झिबिट.... माझा पेशंस संपला आणि मी बंद केला.

सध्याच्या प्रकरणात आपली पोळी भाजुन घेणे याशिवाय काही असेल तर ते कितव्या मिनिटाला आहे ते सांगा.

>>धर्मांतराचे उद्दिष्ठ ठेउन लैंगिक व्यवहार हा मुद्दा मला अजून झेपत नाही>> का ? पूर्वी स्त्रीया पळवून नेत नव्हते? त्यांचे धर्मांतर केले जात नव्हते? आता असे पळवून नेणे शक्य नाही तेव्हा मग हा शांततेचा मार्ग. प्रेमात पडल्यावर्/लग्नानंतर अमुक विचारधारा स्विकारली हा प्रकार तुम्हाला वाटतो त्या पेक्षा खूप कॉमन आहे. पब्लीक व्हाईट सुप्रमसिस्ट, रॅडिकल मुस्लीम, अतिडावे/उजवे वगैरे कायकाय होते. अमेरीकेत येण्याआधी शाखा वगैरे माहित नव्हते पण लग्न करुन इथे आले आणि आता नवर्‍यासोबत मी देखील .... असे नवे कितीतरी पब्लिक बघायला मिळते.

जेव्हां आपल्याला खात्रीशीर बातमी नसते तेव्हां काठावर बसणेच बरे वाटते.

सोमि वर जे लोक नेहमी महिलांच्या तक्रारीवर पुरूषांची बाजू घेतात आणि तिच्या कॅरेक्टरवर शंका घेतात ते आज अचानक महिलांच्या हक्काविषयी जागृत झालेले पाहिल्याने बरं वाटलं.
जे लोक नाशिकच्या प्रकरणात आतल्या गोष्टी रिपोर्ट करत आहेत त्यांनीच आज एक अशी बातमी शेअर केलीये ज्यात महिलेने तिच्या छातीकडे पाहिले म्हणून केलेली तक्रार कोर्टाने समज देऊन मागे घ्यायला लावली यावर आनंद व्यक्त करत आहेत.
शिवाय क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहेच.

तरीही एकच थंब रूल आहे. पीडीतांना न्याय मिळायला हवा आणि अशा केस मधे अशा व्हॉट अबाउटरीने पीडीतांची केस सामाजिक दृष्ट्या दुबळी होऊ नये. हे व्हायचे असेल तर आक्रस्ताळे लोकांना आवरावे कारण ते जेव्हढी उछलकूद करतील तेव्हढेच हे प्रकरण शिजवलेले आहे असा समज दृढ होत जाईल.

विकु हा कंपनी अंतर्गत मामला राहिलेला नाही, रादर तिथे तक्रार करून उपयोग झालेला नाही हे पीडितांनी सांगितले आहे. वर्कप्लेस मध्ये सेक्सुअल हरॅसमेंट साठी फक्त POSH अंर्गतच तक्रार करता येते असे नाही, IPC अंतर्गत पोलीस तक्रार करण्याचा मार्ग खुलाच आहे. त्यानुसार तक्रार होऊन पोलिसांनी केलेली कारवाई आहे. HR ने अंतर्गत तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. वर अमितने म्हटले तसे ती यात सामिल आहे का आणि हा ऑर्गनाईज्ड क्राईम आहे का या चौकशी साठी तिला ताब्यात घेतले असावे. आरोपी इतर धर्मीय असो नसो, सेक्सुअल हरॅसमेंट केस मध्ये ज्यांनी कारवाई करायला हवी त्यांनी सातत्याने साफ दुर्लक्ष केलेय तर त्यात ते सामिल आहेत का याची ताब्यात घेऊन चौकशी करण्याची तरतूद IPC अंतर्गत असेलच.

श्री विजय कुलकर्णी >>अश्विनी चैनानी यांनाही अटक झाली असेल तर तेही चुकीचे आहे. कंपनी चे पॉलिसी व प्रोसेजर्स म्हणजे भादंवि नव्हे. त्या न पाळल्याबद्दल कामावरून काढून टाकायचे अधिकार कंपनी ला नक्कीच आहेत पण पोलिसांना अटकेचे अधिकार नसावेत. python function चे नाव ALL CAPS मध्ये ठेवले म्हणून मला अटक होईल का?>>>>
याचा निर्णय असा आहे
जर एखाद्या HR मॅनेजरने POSH (लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा) अंतर्गत तक्रारीकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना अटक होऊ शकते का?
हो, जर HR मॅनेजरने तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तर त्यांना अटक होऊ शकते. जरी POSH कायदा हा प्रामुख्याने नागरी (Civil) स्वरूपाचा असला, तरी काही विशिष्ट परिस्थितीत फौजदारी कारवाई केली जाऊ शकते.
## अटक होण्याची प्रमुख कारणे:
१. गुन्ह्यास प्रोत्साहन (Abetment): जर तक्रार करूनही HR ने कोणतीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे पीडित व्यक्तीचा छळ सुरूच राहिला, तर त्यांच्यावर छळाला प्रोत्साहन दिले (Abetting) असल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
२. पुरावे दडपणे (Suppression of Evidence): तक्रार ईमेल किंवा पत्राद्वारे देऊनही ती दाबून टाकल्यास किंवा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला भरला जाऊ शकतो.
३. विहित कर्तव्य पार न पाडणे: जर तो HR मॅनेजर 'अंतर्गत समिती'चा (Internal Committee) सदस्य असेल आणि त्याने कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर वैयक्तिक कायदेशीर जबाबदारी येते.
## इतर कायदेशीर परिणाम:

* दंड: कंपनीला पहिल्या चुकीसाठी ५०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
* परवाना रद्द होणे: वारंवार नियम मोडल्यास कंपनीचा व्यवसाय परवाना रद्द होऊ शकतो.
* मोठी नुकसानभरपाई: काही प्रकरणांत न्यायालयाने कंपन्यांना करोडो रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
जर तुमची कंपनी तुमच्या तक्रारीची दखल घेत नसेल, तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करू शकता किंवा कामगार आयुक्तांकडे (Labour Commissioner) दाद मागू शकता.
Yes, a police complaint (FIR) can be filed in addition to, or instead of, a PoSH Internal Committee (IC) complaint, as they are independent legal remedies. Sexual harassment at the workplace constitutes both a violation of the PoSH Act and a criminal offense, allowing victims to seek criminal action separately from internal redressal.
IMPORTANT: POLICE CAN INDEPENDENTLY INITIATE ACTION

हे भयंकर शॉकिंग आहे! बहुधा "फूस लावली" "लग्नाचे आमिष दाखवले" अशा बातम्या मी "विथ पिन्च ऑफ सॉल्ट " घेते. कारण जर ती एक अ‍ॅडल्ट व्यक्ती असेल तर काही का कारण असेना त्यांनी केलेला तो चॉइस असे मी त्याकडे पहाते.
इथे मात्र तसा काही ग्रे एरिया वाटत नाही. सरळ सरळ कामाच्या ठिकाणी असलेल्या सिनिऑरिटी चा फायदा घेऊन ज्युनियर्स ना या गोष्टी करण्यास भाग पाडले गेले आहे. सगळ्यात धक्कादायक हे वाटले की एका माणासाने केलेला गुन्हा असे स्वरुप नाही तर ऑर्गनाइज्ड पद्धतीने हे करण्यात आले. लोकांना रॅडिकलाइज केले गेले किंवा तशाच लोकांना टीम लीड पदावर घेणे . त्यांनी टार्गेट करून स्त्री सहकार्‍यांना छळ करून अशा धार्मिक प्रॅक्टिसेस करायला भाग पाडले आणि कंपनी/ एच आर ने काहीही केले नाही?!!! Sad

> इथे मात्र तसा काही ग्रे एरिया वाटत नाही. सरळ सरळ कामाच्या ठिकाणी असलेल्या सिनिऑरिटी चा फायदा घेऊन ज्युनियर्स ना या गोष्टी करण्यास भाग पाडले गेले आहे.
Again, असा आरोप आहे. सर्व आरोपांची शहनिशा झाल्यावरच काय ते बोलता येइल. पण इतका डोंगर पोखरून 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' हाच उंदीर असेल तर अवघड आहे.

"विथ पिन्च ऑफ सॉल्ट " पेक्षा "बकेट ऑफ सॉल्ट' योग्य ठरेल.

For the record, बलात्कार अतिशय घृणास्पद गुन्हा आहे आणी ज्यांना हे भोगावे लागले आहे त्यांना २००% सपोर्ट आणी सहानुभुती देणे हे आपले कर्तव्य आहे आणी म्हणूनच बलात्काराचा खोटा आरोप करणार्‍यांना सपोर्ट करणे चुकिचे आहे. ई जीन कॅरोल वर ट्रंप ने बलात्कार केलेला नाही आणी त्याला त्या मुळे रेपिस्ट म्हणणे चूक आहे हे कटू वास्तव मांडल्याबद्दल मला टोमणेही खावे लागले आहेत.

बहुसंख्य हिंदु असलेल्या या देशात कुठल्याही सामान्य ऑफिसात ८० ते ८५ टक्के स्टाफ हिंदुच असतो. बाकी उरलेले इतर सर्व धर्मीय असतात. गणपती सणाला ऑफिसात सर्रास प्रसाद आणला जातो. घरच्या सत्यनारायणाचा प्रसादही आणला जातो. मी ४० वर्षे नोकरी केली. माझ्या एका मल्टिनॅशनल कंपनीच्या ऑफिसात दर दसर्‍याला सत्यनारायण पुजा असायची.

या इतक्या बर्षात प्रसाद नको म्हणणारे कित्येक कलिग्स पाहिलेत आणि त्यांना काहीही नावे न ठेवता शांतपणे पुढे दुसर्‍याला प्रसाद देणारे किंवा हे प्रसाद घेणार नाहीत हे माहित असल्याने त्यांना ऑफर न करणारे कलिग्सही पाहिले आहेत. या प्रसाद न घेणार्‍या मंडळींना ईदीला शीरकुर्मा घेऊन यायची आठवण सगळेजण करायचे आणि ती मंडळीही मोठेमोठे डब्बे भरुन शीरकुर्मा घेऊन यायचे.

मुस्लिमांना हिंदुबहुल ऑफिसात एकच त्रास सहन करावा लागायचा. भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेस कोणीतरी एक्गादा येडा निघायचाच जो मुस्लिमाला तु पाकिस्तानला सपोर्ट करतो का बिचारायचा.

पण कुठल्याही हिंदुबहुल ऑफिसात मुस्लिमावर तु हिंदु हो म्हणुन कोणी प्रेशर घातलेले पाहिले नाही/पेपरात वाचले नाही. मुस्लिम मालक असलेल्या लहान ऑफिसात सहसा हिंदु नसतातच पण असले तरी तिथे आजवर असे कधी झाल्याचे ऐकिवात तरी नाही.

ही असली केस पहिल्यांदा ऐकली. पॉशच्या अंतर्गत जो गुन्हा घडलाय तो धर्म बघुन घडत नाही पण इथे दोन्ही एकत्रित आहेत.

सहसा एच आर तक्रारींकडे दुर्लक्ष करते असा त्यांचा लौकिक आहे. त्याचे कारण हे असेल की एकदा तक्रार स्विकारली की पुढे एच आरचे काम वाढते.

ह्या केसमध्ये दुसर्‍या लोकेशनवर असलेल्या जबाबदार
एच आरलाही अटक झालीय ही गोष्ट इतर सगळ्या छोट्या मोठ्या कंपन्यांच्या एच आर साठी वेक अप कॉल ठरुदे हीच प्रभुचरणी प्रार्थना!

ओह्ह या! करेक्ट! जेनेटल मध्ये फिंगर घालणे हा न्युयॉर्कच्या लॉ प्रमाणे रेप नाही. फक्त सेक्श्युअल अब्युज आहे. त्याबद्दल तिला ५ मिलियन आणि मग ट्रंपने डिनायल केलं म्हणून डेफमेशन मध्ये (मी रेपिस्ट नाही हा ट्रंपचा दावा होतो. आणि त्याची ही केस आहे. त्याचा निकाल हवा असेल तर तो ही देतो. पण तुम्ही भरकटवला तरी मला हा धागा भरकटवायचा नाही, त्यामुळे आणखी इच्छा असेल तर टाको वर बोलू!) दोन वर्षांपूर्वी परत ८३,३ मिलियन मिळाले. पण जेनेटल मध्ये पीनस न गेल्याने तो रेप नाही हे आर्ग्युमेंट तुम्हाला अजुनही करायचं असेल तर खुशाल करा!
समिकरण हे बॅलन्स होतंच. ते बॅलन्स करायला आपण कुठल्या बाजुला उभे आहोत हे ज्याचे त्याने ठरवावे!

Pages