मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.
माझ्या पाहण्यात अग्दी
माझ्या पाहण्यात अग्दी सुरूवातीला एक वयस्कर मुस्लीम कर्मचारी होते ते दोनदा नमाज पढायचे. पण ते लायब्ररीत जाऊन कपाटांच्या मागे जागा होती तिथे जाऊन नमाज पढत. दुसरे मुस्लीम गृहस्थ होते ते पाठीमागे मस्जीद होती तीत संध्याकाळी नमाज पढत. माझ्या सोबतच चार मुस्लीम कर्मचारी आले. ते आजतागायत कधीही ना नमाज पढण्यासाठी बाहेर गेले, ना ऑफीसमधे त्यांनी नमाज पढला.
याउलट बहुतेक हिंदू कर्मचारी आल्यानंतर टेबलाची आणि भिंतीवरच्या देवाची पूजा करतात. कुणाला पाच मिनिटे तर कुणाला दहा, पंधरा मिनिटे लागतात. खांडेनवमीला वर्कशॉप बंद असते. सर्वच मशीन्स, हत्यारांची पूजा असते. गेट मधे सत्यनारायण असते. मध्यवर्ती पूजा असते. दसर्याला सुटी असते त्यामुळे खांडेनवमीला पूजा करतात. याखेरीज संकष्टी चतुर्थीची पूजा असते. विविध सणांच्या पूजा असतात.
नऊशे कर्मचारी आणि अधिकार्यांमधे चारच मुस्लीम आहेत. ते पूजेला आले नाहीत तर चर्चा होते यामुळे ते येतात. इथे जे अनुभव वाचतोय तसे मला आलेले नाहीत. इतकंच नाही कामानिमित्त विविध ठिकाणी फिरावे लागते. मुस्लिमांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी आहे. आयटीची कल्पना नाही. पण जिथे मेहनतीचे काम आहे तिथे मुस्लीम असतात. तिथे दिवसभर नसल्याने नमाजाच्या वेळी ते वेळ घालवतात का याबद्दल कल्पना नाही. पण तसे असते तर मुस्लीम कर्मचार्यांना कामावर ठेवले नसते.
विशिष्ट विचाराच्या लोकांच्याच नजरेला असे प्रकार पडतात याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे.
ताक : इंजिनिअरैंग कंपन्या, बांधकाम साईटस इत्यादी ठिकाणी पाय धुण्यासाठी खालच्या उंचीला नळ असतो. जिथे काम चालते तिथे मोरी सुद्धा असते. कुणालाही पाय धुण्यासाठी शीर्षासन करावं लागत नाही.
नवीन बातमी आहे......
नवीन बातमी आहे......
फरार एच आर निदा खान हिचे दिल्ली बॉम्ब स्फोट आरोपि डॉ. शाहीन शाहीद हिच्याशी संपर्क होते!!!
<<एक एकोणीस वर्षांचा मुलगा
<<एक एकोणीस वर्षांचा मुलगा काही साधारण समवयीन साथीदारांसाहित १८० मुलींचे ३५० आक्षेपार्ह व्हिडीओ कसे काढू शकतो हे अनाकलनीय आहे.>> हो. अगदी सुरवाती पासून 180+ मुली आणि 350 व्हिडीओज अशा बातम्या येत होत्या. ( विदर्भाचा असल्याने शाळा कॉलेज ग्रुपवर.) तेव्हा चेक केले तर पोलिसांनी ७ मुली आणि १५-२० व्हिडिओ सांगितले होते काही मुंलीची ओळख पटली होती. काल ८ मुली, १८ व्हिडिओ, ३९ फोटो सांगितले. तसेच या केस मध्ये असलेला धार्मिक अँगलही बदलला. तरीही केसचे गांभीर्य तेवढेच रहाते.
भारत अधिकृत रित्या
भारत अधिकृत रित्या हिंदूराष्ट्र नाही झालेला अद्याप. पण इतक्यातच काही जणांना "वेगळे" दिसले कि खटकते. बहुसंख्याकांनी जे केले ते नॉर्मल असते. त्यात अल्पसंख्या़कांनी सहभाग घेतला नाही कि त्याच्या कट्टरपणावर चर्चा होते. पण हेच त्यांच्या नमाजात कुणीही सामील होत नाही. याउलट ते करतात ते ही खटकते. मुस्लीम राष्ट्रात जे नोकरीला जातात त्यांना सार्वजनिक नमाज कंपल्सरी आहे का?
ख्रिस्ती राष्ट्रात गेल्यानंतर आपले धार्मिक सण, मिरवणुका याचे अभिमानाने फोटो शेअर केले जातात. तिथल्या स्वच्छ पाण्यात मूर्त्यांचे विसर्जन होते. एरव्ही यावर कुणीही नापसंती दर्शवत नाही. फक्त असा मुस्लीम बॅशिंगचा धागा आला कि मग तिथे हिंदू असता तरी मी हीच प्रतिक्रिया दिली असती असा पवित्रा घेतला जातो. एरव्ही तुम्हाला कोण रोखून धरत असतं?
विषयावर लिहीण्यासारखं काहीच नाही हे आधीच सांगितले होते. कुणाला अवांतर खटकत नसल्याने त्यावर लिहीले. आता रजा घेतो. चालू द्या.
अजून आयसिसचं कनेक्शन उघड होत नाही तोपर्यंत धागा पळायला हवा.
वीसेक वर्षांपूर्वी मायबोलीची
वीसेक वर्षांपूर्वी मायबोलीची एक ऑनलाइन मेगा मीटिंग झाली. (या पुढे तिला ऑमेमि संबोधावे) त्यात मंजूर झालेल्या अनेक ठरावांपैकी (ऑमेमीठ) एक हा:
ऑमेमीठ-६७: धाग्याच्या शीर्षकात शेवटी "च्या निमित्ताने गप्पा" असे लिहिले तर ते सगळे धागे एकछाप वाटतील. त्यामुळे तसे न लिहिता प्रत्येक धाग्याच्या शेवटी तसे नमूद केले आहे असे कल्पावे.
मी हमझा बनून tcs नाशकात जाणार
मी हमझा बनून tcs नाशकात जाणार आहे. आँधी बनके आया hu
>फरार एच आर निदा खान हिचे
>फरार एच आर निदा खान हिचे दिल्ली बॉम्ब स्फोट आरोपि डॉ. शाहीन शाहीद हिच्याशी संपर्क होते
ती फरारही नाही आणी एच आरही नाही !
आत हे सारे सुशांत आत्महत्येच्या वळणावर चालले आहे. त्याहीवेळी डे वन पासून मी सांगत होतो की आत्महत्या आहे, पण 'ब्रेकिंग न्यूज' पाहून इथले अनेकजण रियानेच खून केला आहे या निष्कर्षाप्रत आले होते, आर्णब ने तर #ArrestRhea हा हॅशटॅग ही चालवला होता. इतरही अनेक यू ट्यूब चॅनल वाल्यांनी खोर्याने पैसा कमावला. मला जे डे वन ला कळले ते सीबीआय ला कळायला पाच वर्षे लागली. त्याहीवेळी 'विकु तुम्हाला आतल्या बातम्या कळतात का? ' हा प्रश्न आला होता, मला आतल्या बतम्या वगैरे कळत नाहीत, फक्त नीरक्षीरविवेक आहे. 'ब्रेकिग न्यूज' पाहून मी वहावत जात नाही. हे सारे प्रकरण एक अफेयर मोडल्यावर ' हम तो डूबेंगे, मगर तुम्हे लेके डूबेंगे' सारखे दिसतेय
विकु, तिकडे सीबीआयमध्ये नोकरी
विकु, तिकडे सीबीआयमध्ये नोकरी मिळतेय का बघा. त्यांचे ‘अच्छे दिन‘ येतील.
डे वन ला नीरक्षीरविवेक!!! ..
डे वन ला नीरक्षीरविवेक!!!
... तरी चुकलातच डे झिरो म्हणा!
तुम्ही आणि हिंदुत्त्ववादी दोघांना गुन्हा घडायच्या आधीच तो कुणी केला हे माहित असतं. तपास वगैरेची गरजच नसते. तोवर लक्ष पुढील न घडलेला गुन्हा कधी घडतोय त्यावर असतं.
माबोला अर्थात सिनेमा बघायच्या आधीच परिक्षण काही नवे नाही.
काल रात्री पासूनचे सगळे
काल रात्री पासूनचे सगळे प्रतिसाद वाचले नव्हते, वाचले त्यातले सगळे पूर्ण, नीट वाचले नव्हते आता मॅट लिव्ह वगैरे सोडून वाचले (का? का? का?)
असो, तर आता वाचलेत आहेत तर एक निरीक्षण: हा कार्पोरेट जिहाद आहे आणि इतरत्रही उघडकीस येतोय, निदा खानचे दिल्ली बॉम्बब्लास्ट अतिरेक्यांशी संबंध असे अपडेट्स ) चालतात आणि आरोपीच्या पत्नीने काय म्हटले ही बातमी चालत नाही असे का? हे सगळेच स्पेक्युलेशन्स आहेत किंवा कुणाची तरी मते आहेत आणि त्याचे सध्यातरी काही पुरावे नाहीत. शेकडो वर्षांचा इतिहास हे पण मत आहे, या केस मधला पुरावा नाही. पुरावे येतील तेव्हा येतील.
मग न्यायपत्रक द्यायचे असेल तर दोन्ही बाजुंनी द्यावे लागेल ना. दुसरे न्यायपत्रक: चार्जशीट, खटला वगैरे खेळत बसु नका आता, सरळ शिक्षा ठोठवा.
फक्त कुठले न्यायपत्रक मान्य करायचे हा प्रश्न न्यायालयापुढे उभा राहील, तर ज्या न्यायपत्रकावर जास्त सह्या ते मंजूर करावे.
--
हे टायपुन पोस्ट होई पर्यंत तीन प्रतिसाद आले. हे माझे नेहमीचेच.
त्या निरा खान ने आता गर्भवती
त्या निरा खान ने आता गर्भवती असल्याचा दावा केलाय!
त्यामुळे तिला बेल हवी आहे म्हणे.
नक्की काय प्रकार आहे? त्या
नक्की काय प्रकार आहे? त्या नाशिकच्या ऑफिसला कुणी एच आर म्हणून होते की नव्हते?
अश्विनी चैनानी एच आर मॅनेजर
अश्विनी चैनानी एच आर मॅनेजर असावी आणि निदा खान प्रोसेस असोसिएट. (असं टीसीएसने तिला पाठवलेल्या सस्पेन्शन लेटर मध्ये नमूद केलेय. ते लेटर बनावट असेल का किंवा टीसीएसने सस्पेन्शन लेटर्स पाठवताना मजकूर कॉपी पेस्ट केला, नाव बदललं आणि पद बदलायचं राहून गेलं का माहीत नाही. (मला पण मिळेल का सीबीआय मध्ये एन्ट्री?
))
सुरवातीला मिडियातल्या कुणीतरी मिक्स अप केलं आणि इतर सगळ्यांनी ते कॉपी पेस्ट केलं आणि इतके दिवस तेच म्हणत राहिले हे पण अगदीच शक्य आहे.
----
आताच टीसीएस कडून स्टेटमेंट आलंय:
TCS CEO and MD K Krithivasan used the statement to address what the company described as inaccuracies circulating in media coverage. Nida Khan, whose name has appeared repeatedly in press reports with the designation of HR manager, held no such title or authority within the organisation. She worked as a process associate without any leadership responsibilities and was not involved in recruitment functions.
बाकी त्यांनी इंटरनल इन्क्वायरीसाठी कुणाला नेमलंय वगैरे.
जेवढी माहिती उपलब्ध आहे
जेवढी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार कामाच्या ठिकाणी झालेली हॅरॅसमेण्ट आहे, धार्मिक अँगलही आहे. हॅरॅसमेण्ट कोणत्या लेव्हलपर्यंत झालेली आहे त्याबद्दल बरेच दावे वाचले पण काहीतरी सिरीयस असावे असेच वाटते. नक्की ठोस कळत नाही. जागतिक षडयंत्र वगैरे असे काही पोलिसांना सापडलेले नाही. गेल्या ४-५ दिवसांत इथली माहिती, विविध पेपर्सच्या बातम्या ई वाचून हे मत. हे बदलणारी माहिती मिळाली तर बदलेन.
तो प्रशांत कदम यांचा व्हिडीओ पूर्ण पाहिला. मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. इथे विकुंनी त्याचा हवाला देत "केस डिसमिस" केली आहे त्याचे आश्चर्य वाटले. मुळात तो एक विश्लेषण असलेला व्हिडीओ आहे. त्यात काही नवीन "बातमी" किंवा नवीन उलगडा नाही. इव्हन त्यांनी इण्डियन एक्स्प्रेसचा उल्लेख केला आहे ती ही "बातमी" नाही. एक्स्प्रेस मधला उल्लेख हा एका आरोपीच्या पत्नीच्या मुलाखतीचा आहे.
त्याहून आश्चर्य म्हणजे प्रशांत कदम यांनी काही प्रश्न असे विचारले आहेत जे एरव्ही स्त्रियांच्या तक्रारींबद्दल अविश्वास दाखवणारे लोक विचारतात. उदा - मीटू चळवळीच्या वेळी - तेव्हा अशा लोकांवर टीकाही झाली होती. पण आता यांनीही एक्झॅक्ट तोच प्रश्न विचारला आहे - "या स्त्रियांनी आत्तापर्यंत या तक्रारी का केल्या नाहीत". मीटू च्या वेळी जे प्रश्न चुकीचे ठरले ते आता कसे रास्त झाले?
(लोक एखादा शब्द धरून विपर्यास करतात म्हणून माझे जनरल मत - ते प्रश्न तेव्हाही रास्त होते व आत्ताही आहेत)
आणखी थोडे वर पोलिसांनी यात काही षडयंत्र असल्याचे आढळलेले नाही असे म्हंटलेले जर ग्राह्य धरायचे असेल, तर त्याच बातमीत त्यांनी "यांच्यापैकी एकजण हाजला जाऊन आला व तो इतरांना प्रभावित करू लागला" म्हंटले आहे ते ही ग्राह्य धरायला हवे. हे उद्योग कामाच्या ठिकाणी करणे हे इतरत्र फार गंभीर समजले जाते. त्याला इथे इतक्या किरकोळीत ("होक्स") का गणले जात आहे?
मात्र इथे "नॉइज" काढून टाकणे गरजेचे आहे. एका बीपीओ अधे एक मुस्लिम आला, त्याने इतर दहा आणले यात काहीही चुकीचे नाही आणि आश्चर्यही नाही. हे अनेक गटांमधे सर्रास चालते. वरती अमितने बहुधा उदाहरणे दिली आहेत. पहिल्या व्यक्तीला संधी दिसतात, मग तो "आपल्या" नेटवर्क्स मधून इतर "आपले" लोक आणतो. हे ट्रायबल वागणे भारतात आणि अमेरिकेत अनेक धार्मिक आणि भाषिक गटांचे खूप पाहिले आहे. तेव्हा इतर काही अँगल नसेल तर निव्वळ यात शंका घेण्यासारखे काही नाही.
थँक्स मानव आणि फारएण्ड .
थँक्स मानव आणि फारएण्ड .
>>> लोक एखादा शब्द धरून
>>> लोक एखादा शब्द धरून विपर्यास करतात म्हणून माझे जनरल मत - ते प्रश्न तेव्हाही रास्त होते व आत्ताही आहेत
नव्हते/नाहीत म्हणायचंय ना तुला?
सीबीआयला कोणत्याही क्षणी या
सीबीआयला कोणत्याही क्षणी या केसमध्ये लक्ष घालावे लागेल.
ते ही गाफील बसले नाहीत. अपडेटेड तर आहेतच पण राज्य पोलिसांच्या दोन पावले पुढे आहेत.
ते मायबोली वाचत आहेत.
<<आणखी थोडे वर पोलिसांनी यात
<<आणखी थोडे वर पोलिसांनी यात काही षडयंत्र असल्याचे आढळलेले नाही असे म्हंटलेले जर ग्राह्य धरायचे असेल, तर त्याच बातमीत त्यांनी "यांच्यापैकी एकजण हाजला जाऊन आला व तो इतरांना प्रभावित करू लागला" म्हंटले आहे ते ही ग्राह्य धरायला हवे. हे उद्योग कामाच्या ठिकाणी करणे हे इतरत्र फार गंभीर समजले जाते. त्याला इथे इतक्या किरकोळीत ("होक्स") का गणले जात आहे?>>
त्या बातमीची लिंक देऊन त्यातील हा उतारा मी पोस्ट केला होता काल की परवा. पण तो वेगळ्या संदर्भात. हा 'कार्पोरट जिहाद' इतर कंपन्यांमध्येही पोचलाय या दाव्या बाबत.
गर्भवती असणे चुकीचे आहे का ?
गर्भवती असणे चुकीचे आहे का ?
>सुरवातीला मिडियातल्या कुणीतरी मिक्स अप केलं आणि इतर सगळ्यांनी ते कॉपी पेस्ट केलं आणि इतके दिवस तेच म्हणत राहिले हे पण अगदीच शक्य आहे.
सॉरी ! हा संशयाचा फायदा गोदी मेडियाला द्यावा असा त्यांचा इतिहास नाही.
फा तुमची पोस्ट पटण्यासारखी आहे पण त्यात jilted lover चा अॅंगल नाही. तोच इथे महत्वाचा आहे,
TCS लेटेस्त निवेद्नाप्र्माणे त्यांना प्रोसिजर चा भंग झालेले प्रथमदर्शी तरी दिसत नाही आणी POSH चॅनेल मध्ये कोणतीही लेखी तक्रार आलेली नव्हती असे म्हणले आहे.
ती फरारही नाही आणी एच आरही
ती फरारही नाही आणी एच आरही नाही !
>>>> ती फरार नाही असं तिचे कुटुंबीय आणि विकु म्हणतात. तिच्या वकिलाला ती कुठे आहे हे माहिती नाही असं तो म्हणतो. या दरम्यान पोलिसांनी आज तिच्या नवऱ्याला मुंब्र्यात गाठून त्याची चौकशी केली.
बाकी TCS च्या स्टेटमेंटचे जरा आश्चर्य वाटले. म्हणजे ७-८ दिवस प्रत्येक बातमीत तिचा HR म्हणून उल्लेख असताना त्यांना हे सांगावंसं का वाटलं नाही? ट्विटरवर कुठेतरी तिचा linkedin प्रोफाइल पाहिला होता. त्यातही HR असा उल्लेख होता. अर्थात तो फेक असू शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेस असोसिएट HR मध्ये पण असू शकतात. म्हणजे प्रोसेस असोसिएट, सिस्टिम्स इंजिनीअर वगैरे तुमचा बँड असतो आणि त्याच्यापुढे तुमची बिलिंग हायरार्की असते. उदा. प्रोसेस असोसिएट - ऑपरेशन्स. म्हणजे तुमच्या जॉइनिंग आणि रिलिव्हिन्ग लेटरवर उल्लेख प्रोसेस असोसिएट येईल पण तुमचं काम/पोझिशन मॅनेजरिअल असू शकते. इथे टाटांनी कॅटेगरिकली हे खोडून काढले आहे. कारण HR असेल कंपनी रेप्युटेशनला जास्त धोका. बाकी ती कुठल्याही पोझिशनवर असली तरी आरोपांची ग्रॅव्हिटी कमी होत नाही.
मी नाशिकची आहे आणि तिथलं
मी नाशिकची आहे आणि तिथलं social dynamics मला माहिती आहे. या आधी कोणी म्हणालं असतं की नाशिक मध्ये नॉन मुस्लिम आणि मुस्लिम गटां मध्ये टेन्शन तर मी खूप हसले असते. पण यावेळेस चे सो.मि. सगळे bits and pieces एकत्र केले तर ही बातमी खरीच वाटते आहे. गरीब घरातल्या लोकांना ठरवून टार्गेट केलं त्यांनी. आता ती बुरखेवाली किती सराईतपणे पटकन पळून गेली आहे. It was a well thought well organised crime. जे false alarm म्हणत आहेत ना, त्यांनी त्या दिड शहाणीचे फोटो बघा आणि थोडा अंदाज घ्या, सोज्ज्वळ दिसतेय कि खुनशी कट्टर दिस्तेय.
Best news - या नंतरकाही शाळांनी मुलींना 'केरला स्टोरी' बघायला नेलं. आणि हिंदूंनी मस्त रॅली काढली काल की आज.
>ती फरार नाही असं तिचे
>ती फरार नाही असं तिचे कुटुंबीय आणि विकु म्हणतात.
Nope ! TCS ने अधिकृत स्टेटमेम्ट देऊन हा खुलासा केला आहे.
Nope ! TCS ने अधिकृत
Nope ! TCS ने अधिकृत स्टेटमेम्ट देऊन हा खुलासा केला आहे.
>>>>
TCS चं स्टेटमेंट मी वाचले आहे. त्यात निदा खान फरार आहे की नाही याचा कुठलाही उल्लेख नाही. त्यांनी ती प्रोसेस असोसिएट आहे एवढे म्हटले आहे आणि बाकी काय ऍक्शन घेतल्या/घेणार आहेत याचा उल्लेख आहे.
ती फरार आहे की नाही हे TCS
ती फरार आहे की नाही हे TCS कसं ठरवेल?
तिच्या वकिलाला पण माहिती नाही की ती कुठं आहे ते. तिच्या नवऱ्याची चौकशी पोलीस करत आहेत म्हणजेच ती पोलिसांना सापडत नाही.
लिखित तक्रार नव्हती? मग ७८
लिखित तक्रार नव्हती? मग ७८ ईमेल्स आहेत म्हणले आहे रिपोर्ट मधे त्याचे काय ?
तो एकजण हाजला जाऊन आला, तो इतरांना प्रभावित करू लागला, तसेच एक नव्हे तर अनेक फिर्यादी आहेत , आणि अनेक आरोपी आहेत म्हटल्यावर ही ग्रुप अॅक्टिविटी आहे हेही दिसतेय. हे पुरेसे गंभीर नाही का? हे जागतिक रॅकेट नाही असे धरून चालू. तरीही प्रकरणाची गंभीरता कमी होत नाही.
टि सी एस सारखी कंपनी त्या स्त्रियांना सेफ वर्क एन्वायर्न्मेन्ट देण्यात कमी पडली आणि आता रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यातही कमी पडते आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
हे प्रकरण खरे निघाले तर याचे समाजावर होणारे संभाव्य परिणाम फार वाईट असू शकतील. आताच सोमि वर लोक अमक्या तमक्या कंपनीचे दाखले देत तिथेही असेच होते, अशा बातम्या पसरवत सुटलेत. एकूणच पॅनिक, द्वेष अणि तेढ वाढणे, मुलींच्या करियर अँबिशन वर रिस्ट्रिक्शन येणे, मुलींनी "वेळेत" लग्न करण्याचे दबाव, "आपण" वि. "ते" अशी सरसकट हेट्रेड आणि त्यातून लोकांनी शोधलेले आपापले भले बुरे मार्ग असा सगळा स्लिपरी स्लोप आहे.
मैत्रीयी +१
मैत्रीयी +१
टि सी एस सारखी कंपनी त्या स्त्रियांना सेफ वर्क एन्वायर्न्मेन्ट देण्यात कमी पडली आणि आता रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यातही कमी पडते आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.>>> एकदरीतच आपली इमेज ब्रॅन्ड व्हॅल्यु साभाळायला फारस काही झालच नाहीये अस ठसवण्याचा प्रयत्न वाटतोय.
टीसीएस ने आपल्या कर्मचार्
टीसीएस ने आपल्या कर्मचार्यांचं पद आणि अधिकार काय आहेत हे स्वतः ठरवू नये.
त्यांना या धाग्याची लिंक पाठवावी. अभ्यास करून बोलावं (त्यांनी) एव्हढीच अपेक्षा.
https://x.com/darab_farooqui
https://x.com/darab_farooqui/status/2045090174426812417
निदा खान इज द न्यू रिया चक्रवर्ती !
<<सॉरी ! हा संशयाचा फायदा
<<सॉरी ! हा संशयाचा फायदा गोदी मेडियाला द्यावा असा त्यांचा इतिहास नाही.>> यात मला कुणालाही फायदा देण्याचा वगैरे हेतू नाही. जे वाटलं ते लिहिलं. एनडीटीव्हीने एका मुलीसोबत व्हिडिओ कॉल करून केवढी खोडसाळ बातमी दिलीय, त्यांना हवं ते तिच्या तोंडी कसं कोंबलंय आणि सगळ्यांनी ते कसं कॉपी केले हे कालच मी इथे लिहिलंय. तेव्हा हे मिक्सिंग एखाद्या मीडियाने मुद्दाम केले असेल तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही. पण तक्रारी केल्या आणि त्यावर कारवाई केली नाही हा आरोप चैनानीवरच आहे IE आणि The Hindu मध्ये तरी.
निदा खान धर्मांतरणाची मास्टरमाईंड असा आरोप आहे. तो ती एच आर असो नसो तसाच राहील.
तिने हेरून सगळ्यांना रिक्रुट केले असाही मीडियाने स्पेसिफिक आरोप केला असेल आणि ती एच आर नसेल तर तो टीसीएसने स्पेसिफिकली खोडणेही ओघाने आले. आताच का खोडला आधी का नाही, तर एका मुलीला रुफ टॉपवर आयसोलेट करून तिचा फोन confiscate करत होते वगैरे चुकीचे रिपोर्ट पण अद्याप खोडले नाहीत. अजून दोन तीन दिवसांनी ते खोडले तर त्यावरही प्रश्न चिन्ह उभे करायचे का?
दुसरीकडे ती खरंच एच आर मध्ये होती आणि टीसीएस आता ते स्वतःच्या बचावासाठी फिरवत असेल तर ते अक्षम्य आहेच आणि ते फार मोठी रिस्क पण घेत आहेत. तीचे लेटर्स, इमेल्स आणि साक्षीदार वगैरेतून पोलीस सिद्ध करू शकणार नाहीत का?
हे प्रकरण खरे निघाले तर याचे
हे प्रकरण खरे निघाले तर याचे समाजावर होणारे संभाव्य परिणाम फार वाईट असू शकतील. आताच सोमि वर लोक अमक्या तमक्या कंपनीचे दाखले देत तिथेही असेच होते, अशा बातम्या पसरवत सुटलेत. एकूणच पॅनिक, द्वेष अणि तेढ वाढणे, मुलींच्या करियर अँबिशन वर रिस्ट्रिक्शन येणे, मुलींनी "वेळेत" लग्न करण्याचे दबाव, "आपण" वि. "ते" अशी सरसकट हेट्रेड आणि त्यातून लोकांनी शोधलेले आपापले भले बुरे मार्ग असा सगळा स्लिपरी स्लोप आहे.>>>>> मैत्रेयी +१०००
Pages