TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिक केसमध्ये माझं म्हणणं खोटं ठरलं तर ते कबूल करायला मी कधीही तयार असेन. मुस्लिमांना टारगेट करण्याचा जो पॅटर्न दिसतोय, त्यावरच लिहिलंय.
इथल्या अनेक आयडींसारखी आपल्याला सोयीच्या घटना असतील तेव्हा यायचं आणि इतर वेळी बिळात लपायचं अशी सवय मला नाही.

काही माबोकराना एका पक्षाची अ‍ॅलर्जी आहे. ठिक आहे, असु शकते. पण त्या अ‍ॅलर्जीने सुरवात होताच इतके तीव्र रुप धारण केले की त्या पक्षाने एखाद्या गोष्टीचे नाव घेतले त्या गोष्टीचीही यांना लगेच अ‍ॅलर्जी येते. Happy

त्या पक्षाला अमुक माणसे आवडत नाही, अमुक धर्म आवडत नाही असे यांनीच ठरवले आणि त्या तथाकथित नावडत्या धर्माला डोक्यावर उचलुन घेतले.

आणि यासाठी जी व्हॉट अबाउटरी करतात तितकी तर आसाराम आणि तत्सम बाबांचे अंधभक्तही करत नाहीत. या बाबतीत हे लोक आसाराम व त्या रांगेतल्या इतर लोकांच्या भक्तांइतकेच आंधळे झालेले आहेत. हे कोणी लक्षात आणुन दिले की थयथयाट सुरु…

यांना बघुन हेच पटते की सगळे भारतीय एका माळेचे मणी आहेत. एक दुसर्‍याला अंधभक्त म्हणुन हिणवतोय आणि स्वतःही अंधभक्तीच करतोय.

<<<<<<<
सगळे भारतीय एका माळेचे मणी आहेत. एक दुसर्‍याला अंधभक्त म्हणुन हिणवतोय आणि स्वतःही अंधभक्तीच करतोय.
>>>>>>

हे वाक्य राजकारण आणि चालू घडामोडींच्या प्रत्येक धाग्यावर हेडर मध्ये दिसू लागले तर बरे होईल.

इथे या प्रकरणाबद्दल काहीतरी माहिती मिळेल हे वाचायला आलो होतो तर पुन्हा तेच राजकारणाचे दळण!

असो,
एखाद्या मोठ्या शहरातील नावाजलेल्या आयटी कंपनीत असे महिलांचे लैंगिक शोषण घडते आणि त्या बाहेर कुठे वाच्यता करायला देखील घाबरतात ही एकूणच हॉरीबल स्थिती आहे!

आपल्या समाजात मुली सर्वप्रथम स्वतःच्या बदनामीलाच घाबरतात. पण पुरुषांना देखील नमाज पडायला लावत असतील आणि जबरदस्ती धर्मांतरे होत असतील तर त्या कंपनीत काय चित्र असेल कल्पना करवत नाही.

याची तक्रार कंपनीत करून फायदा नसेल कारण कंपनीत तसेच सडके मॅनेजमेंट असणार. पण इतकी परिस्थिती येईपर्यंत बाहेर देखील याची कुठे तक्रार केली नसेल तर हे कायदा आणि सुव्यवस्था, शासकीय यंत्रणेचे सुद्धा अपयश आहे जे त्यावर लोकांना विश्वास वाटत नाही. स्पेशली नाशिकमध्ये जे एका मागोमाग एक कांड बाहेर येत आहेत ते पाहता तिथे नक्की काय चालते समजत नाही.

मला या आयटी कंपन्यांचे वर्क कल्चर माहित नाही. पण आमच्याकडे दर सहा महिन्यांनी या sexual harrasment विषयावर एक कंपल्सरी ट्रेनिंग होते आणि ती अटेंड करून त्यावर उत्तरे द्यावी लागतात. पास नाही झाले तर पुन्हा ट्रेनिंग.
अगदी बेसिक गोष्टी म्हणजे अप्रत्यक्षरीत्या कॉमेंट पास केली तरी गुन्हा ठरतो हे सांगितले जाते.

एकदा तर एक मुलगी बाजूला आहे याचे भान न ठेवता बॉईज टॉक चालू होते याचीही तक्रार झाली आहे. आणि त्या तक्रारीला कोणी आक्षेपसुद्धा घेतला नाही की यात काय तक्रार करण्यासारखे म्हणून कोणाला वाटले नाही. इतक्या सुरक्षित वातावरणात वावरत आहे त्यामुळे हे चित्र अजून विचलित करत आहे.

त्या दिवशी आमच्या शाळेच्या व्हॉट्स्पग्रूपवर कोणीतरी म्हणाले होते की आता कुठे जातीयवाद चालतो. बरेचदा आपल्याला अश्याच सुरक्षित वातावरणात राहायची सवय असल्याने बाहेरच्या जगाची कल्पना नसते.

आपल्या मुलांना जगात काय काय चालते या सर्व प्रकाराची कल्पना देऊन strong बनवायला हवे. स्पेशली मुलींना. कारण आयुष्यभर सुरक्षित जगातच वावरतील याची खात्री नाही. आणि जिथे जगाचा राज्यकारभार हाकणारे जागतिक नेतेच कुठल्या epstein स्कँडल मध्ये सापडतात तेव्हा कुठले जग सुरक्षित समजावे हा देखील प्रश्न पडतो.

बहुसंख्य मोदीभक्त हे 'लव्ह जिहाद' च्या संकल्पनेत emotionally invested असतात, त्यामुळे लव्ह जिहाद च्या नावाखाली काय वाटेल त्या भाकडकथा त्यांना खर्‍याच वाटतात.

एक मराठी देशस्थ ब्राह्मण मुलगा कोकणस्थ मराठी मुलीच्या प्रेमात पडला आणी आम्हीही कोकणस्थच आहोत असे खोटे सांगून लग्न केले तर जेमतेम महिन्याभरत बिंग फुटेल त्याचे. पण 'अब्दुल ने रचाई चिन्मय बनकर शादी, पांच साल बाद हुवा भांडाफोड' या बातमीवर पटकन विश्वास बसतो.

आजकाल 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' च्या बातम्या मी वाचतही नाही आतला मजकूर सेम असतो, 'ऊटी, लोणावळा, मनाली , गोवा इथे विविध लॉज वर नेऊन बलात्कार, अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करायची धमकी, ई' एका बातमीत तर पीडीतेची आरोपीशी ओळख टिंडर वर झाली असेही होते ! These are all consensual affairs gone bad. मुलगा मुस्लीम असेल तर बीफ खायची सक्ती केली, वगैरे एक्सट्रा मालमसाला , इतकेच.

वरील केस ची सखोल चौकशी व्हावी व दोषींना शिक्षा व्हावी हीच माझीही इच्छा आहे. पण ते 'नया भारत' मध्ये अवघड आहे. भगवे उपरणे घातलेल्या लोकांच्या मोर्चामुळे ते ऑफिसच बंद पडून इतरांच्या पोटावर पाय येऊ नये हीच इच्छा !

> पण पुरुषांना देखील नमाज पडायला लावत असतील आणि जबरदस्ती धर्मांतरे होत असतील
यावर आजतरी माझा विश्वास नाही, पण मी खोटा ठरलो तर प्रांजळपणे मान्य करेन.

आपण सिलेक्टीव संवेदनशील बनत चाललो आहोत का?
या धाग्यावरच्या माझ्या प्रतिसादांतील इथे लागू पडणारी वाक्ये इथे लिहितो

१ मला धाग्याच्या शीर्षकावरून वेगळेच प्रसंग आठवले.

दिल्ली निर्भया आणि हैद्राबाद २०१९ पशुवैद्यक डॉक्टर - ज्यात आरोपींचा एनकाउंटर झाला.

वि. मणिपूर आणि बिल्किस बानोच्या बलात्कारी + तिच्या कुटुंबीयांच्या खुन्यांना स्वातंत्र्यदिनी मुक्त करणं आणि त्यांचं आरती ओवाळून स्वागत होणं.

२ वर मी बलात्काराच्या प्रकरणांचा उल्लेख केला. त्यावर समाजशास्त्रज्ञांनीच केलेलं एक विश्लेषण वाचनात आलं होतं. मध्यमवर्गीय , विशेषतः मध्यमवर्गीय स्त्रिया , निर्भया प्रकरणी रस्त्यावर आल्या , हैद्राबाद प्रकरणी व्यक्त झाल्या कारण त्यातील पीडिता या मध्यमवर्गातल्या, शिकलेल्या, व्हाइट कॉलर जॉब करणार्‍या होत्या. त्यांच्याबाबत झालं ते आपल्या बाबत होऊ शकतं असं वाटलं.
तेच उन्नाव, हाथरस, मणिपूर, खैरलांजी किंवा बिल्किस बानो बाबत झालं नाही कारण त्या स्त्रिया आपल्यातल्या नाहीत. आपण त्या जागी असण्याची शक्यता नाही.

हे या धाग्यावर पुन्हा सिद्ध झालं.

आणि मी मुद्दे घेऊन आणि उदाहरणे देऊन लि हिलं आहे. मला टोमणे मारल्याने वा लेबलं लावल्याने ते मुद्दे व उदाहरणे खोटी ठरणार नाहीत.

<त्या पक्षाला अमुक माणसे आवडत नाही, अमुक धर्म आवडत नाही असे यांनीच ठरवले आणि त्या तथाकथित नावडत्या धर्माला डोक्यावर उचलुन घेतले.> असा शहाजोगपणा करता यायला हवा.

त्या पक्षाला अमुक धर्म आवडतो की नाही याचे असंख्य पुरावे राजकारणाच्या धाग्यांवर भरलेले आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांची वक्तव्ये ऐकली तरी कळेल. अगदी दुसरं कोणी नाही तरी आपल्या जिल्ह्यात्यल्या मंत्र्याची वक्तव्ये ऐकली तरी कळेल.
पण शाहजोगपणा असा की आपल्याला सुद्धा तो धर्म आवडत नाही, हे तरी आपण कुठे मान्य करतो?

मॉब लिंचिंगचे व्हिडियो असलेलं प्रकरण खोटंच आहे, असं छातीठोकपणे सांगणार्‍या व्यक्तीकडून दुसरी अपेक्षा नाही.

भरत तुमचा मुद्दा विचार करण्यायोग्य आहे. फक्त अशा वेळी होतं काय की एका गटाला वाटलेला सिलेक्टिव्ह आउटरेज हा दुसर्‍या गटाला व्हॉट अबाउटरी वाटेल. त्यामुळे अमुक वेळी अमुकच लोकांनी का आवाज उठवला ह्याला काही उत्तर नाही व त्यावर तोडगाही मिळणार नाही. ज्याला जो मुद्दा जवळचा वाटतो तिथे तो निषेध इत्यादी त्याच्या ऐपती प्रमाणे काय काय करणार.

सेम लॉजिक “आता कुठे गेले इन्टलेक्चुअल्स“ म्हणणार्‍यांना पण सांगावासा वाटतो. तुम्हाला महत्त्वाचा वाटणारा मुद्दा इतरांनाही महत्त्वाचाच वाटलाच पाहिजे असं नाही. वरती विकुंचा प्रांजळपणा आवडला. त्यांना तथ्य वाटत नाही, पण खरं निघालंच तर मान्य करेन म्हणालेत. हा विचार मांडण्याचा आणि इतर विचार ऐकण्याचा खुलेपणा मला अंगीकारायला आवडेल.

धाग्याच्या विषयावर बोललं तर मुस्लिमांविरुद्ध बोलावं लागेल आणि आका रागावतील ना! त्यामुळे whataboutery चं दळण दळत व्हिक्टिमकार्ड व्हिक्टिमकार्ड खेळू, कसं?

हरचंद पालव "नाशिक केसमध्ये माझं म्हणणं खोटं ठरलं तर ते कबूल करायला मी कधीही तयार असेन" हे मीही वर लिहिलं आहे. या पानावरचा पहिला प्रतिसाद.

< ज्याला जो मुद्दा जवळचा वाटतो > यालाच सिलेक्टिव्ह आउटरेज म्हणतात ना? तुमच्यापर्यंत भारतातल्या बातम्या किती पोचतात माहीत नाही. पण मणिपूर मध्ये जे झालं त्याबद्दल तुम्ही वाचलंय का? किंवा महिला पहिलवानांच्या आंदोलनाबद्दल? त्यात इथे आता व्यक्त होणार्‍या आयडींनी आपल्या आवडत्या पक्षाची भूमिका पाहून स्वतःची भूमिका ठरवली असं म्हणायला भरपूर वाव आहे. यातही एक व्यवस्थित पॅटर्न दिसतो. निनावी आयडीज तो स्पष्ट दाखवतात. संभावित आयडी मौन बाळगून दाखवतात.

या धाग्यावर तरी स्त्रियांवर अत्याचार झाला म्हणून त्याबद्दल आवाज उठवलाय की आरोपी मुस्लिम आहेत म्हणून हे इथले प्रतिसाद वाचून तुम्ही ताडून पहा.

मणिपूरबद्दलचा धागा आज मुद्दाम वर काढला आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रतिसाद वाचू शकता.

हपा, इतकं सरळ नाही हे.

काही लिंचिंगचे प्रसंग झाले तर त्याचं सरसकटीकरण करायचं. पण मुस्लिमांकडून कितीही भयानक कांड झालं तरी ते trivial ठरवायला तीच तीच जुनीच उदाहरणं देत रहायचं हे नेहमीचंच झालंय.

यात आश्चर्यकारक असे काही नाही. आपल्या जमातीच्या लोकांची संख्या वाढत नाही तोवर एकदम शांत रहाणे आणी एकदा का संख्याबळ मिळाले की मग मनमानी करणे ही यांची पद्धत आहे. मला खात्री आहे असे प्रकार अजूनही घडत असणार कॅारपोरेट जगात, टीसीएस बद्दल कळले म्हणून समोर आले सगळे. युरोपने या जमातीला सहारा दिला आणी आता त्याचे परीणाम सगळे जग बघतंय.

यावर ऊपाय एकच, हिंदूने जागरूक आणी एकजूटीने रहाणे. सो कॅाल्ड सेक्यूलर किडे न वळवळू देणे.

हरितात्या , तुमच्या अमेरिकेतल्या एप्स्टीन फाइल्समध्ये कोणाची नावं आहेत हो?

"सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी सहमत नसायचं स्वातंत्र्य नाही का?"
"नाशिक केसमध्ये माझं म्हणणं खोटं ठरलं तर ते कबूल करायला मी कधीही तयार असेन"

निकाल मनासारखा लागला तर ठीक नाही तर विरोधाच स्वातंत्र्य आहेच.

जर कोणाला खरेच चाड असेल तर नुसते मॉब लिंचिंग हा विषय घेतला तर आजवर जितक्या लोकांची लिंचिंग झाली त्या सगळ्यांची नावे तेव्हा घ्या. नुसते अखलाखचा घोष करत राहातचे आणि केरळातले हिंदु लिंच झाले त्यांना विसरायचे असे करु नका. तुमचा हेतु शुद्ध असेल तर तो लिखाणात दिसु द्या.

इतर जण वाईट असतील, हेतु चांगला नसेलही पण त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा चांगुलपणा का सोडता?

हे जमणे शक्य आहे का??

पण त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा चांगुलपणा का सोडता?

त्यांच्यात कधी चांगुलपणा होता?

नाशकातल्या पिडीत स्त्रियांवर झालेल्या अत्याचार, त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख या सगळ्यांवर -

इथे लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध, बीफ खायला घालणं , धार्मिक भावना दुखावणं अशी सुचतील ती सगळी कारणं एकत्र केलेली दिसतात.

असं म्हणून क्रूरपणे मीठ चोळणाऱ्या व्यक्तीत चांगोलपणाचा अंश तरी अस्तित्वात होता का?

आमच्याकडे दर सहा महिन्यांनी या sexual harrasment विषयावर एक कंपल्सरी ट्रेनिंग होते आणि ती अटेंड करून त्यावर उत्तरे द्यावी लागतात>>>

हे आता सर्वत्र सक्तीचेच आहे. मीही अशी कित्येक सत्रे करुन पास झाले आहे. आमच्याकडे सगळे ऑनलाईन असायचे त्यामुळे विडिओ ऑन ठेऊन आपली कामे करत बसा आणि कॉमन सेन्स वापरुन उत्तरे द्या असे करुन सगळे पास होत होते. काही हजारात कर्मचारी असलेल्या कंपनीत सगळे जण धुतल्या तांदळाचे हे शक्य तरी आहे का? पण ‘या वर्षी १० पॉशच्या तक्रारी आल्या त्यातल्या तिन खर्‍या निघाल्या‘ ह्या डेटापेक्षा ‘एचआरने खुप चांगली वातावरणनिर्मिती करुन झिरो कंप्लेंट्सचे टार्गेट अचिव केले‘ हा डेटा अप्रेझलमध्ये जास्त कामाला येतो. त्यामुळे तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते हे वास्तव आहे.

वरच्या मुळ केसमध्ये नुसते पॉश नाही तर त्यापेक्षा जास्त वाईट घडलेय.

वरच्या मुळ केसमध्ये नुसते पॉश नाही तर त्यापेक्षा जास्त वाईट घडलेय.
असा आरोप आहे.

याच नाशिक मधे एका लग्नाच्या रिसेप्शन ची पत्रिका रिकामटेकड्या व्हॅतॅप अंकल आंटीज नी व्हायरल करून रिसेप्शन कँसल करायची वेळ आणली होती. याच जिल्ह्यात बीफ च्या संशयावरून लिंचिंगही झाले होते.

^^वरच्या मुळ केसमध्ये नुसते पॉश नाही तर त्यापेक्षा जास्त वाईट घडलेय.^^
खरे आहे..
आणि त्याहून जास्त जास्त वाईट म्हणजे हे घडलेले वाईट आहे असे इथे काही जणांना अजिबात मान्यच नाही.
स्वतःला विचारवंत आणि पॉलिटिकली करेक्ट शाबीत करण्यासाठी शांतताप्रेमी धर्माचा उदोउदो करणे अनिवार्य आहे????
ज्यावेळी अनेक बातम्या, डोळ्यासमोर घडणाऱ्या घटना ओरडून सांगत असतात की ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केले जाते आहे त्यावेळी यांचे डोळे, कान आणि डोके बंद पडलेले असते का ??
तेव्हा कुठे जाते हे विचारवंत मत???

टी सी एस चे यु पी मधले लोक हलकट आहेत. माझा तरी तसाच अनुभव आहे. दे आर क्रास, क्लासलेस आणि लैंगिक अंडरटोन असलेले बोलतात. महामूर्ख टीम होती एक.

extremely skeptical असणारे आणि असे काही झाले आहे हे नाकारून व्हाटअबौटरी करून पीडितांना धुडकावून लावणारे प्रतिसाद बायस्ड वाटले.
१) इथे केवळ आरोप नाहीत, तर तक्रार मिळाल्यावर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ६ महिला पोलिसांनी फेब्रुवारी पासून ४० दिवस undercover तपास केल्यावर हे अटकसत्र केले आहे.
२) पीडितांना आधी ई -मेल व फोनद्वारे कंपनीत तक्रारी केल्या होत्या. परंतु एच आर ने दाद दिली नाही.
३) एक-दोन नाही, तर ८ पीडितांनी तक्रार केली आहे.
त्यामुळे हे प्रथमदर्शनी धुडकावून लावण्यासारखे दिसत नाही. Of course आरोपी इनोसंट until proven guilty असले तरी पीडितांबद्दल संवेदनशीलता न दाखवता त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे पटत नाही.
४) " 'बळजबरीने बीफ खाऊ घातले' हेही आहे. इस्लाम मध्ये बीफ खायला हरकत नाही इतकेच, 'काही हिंदू लोकांनी जैन एका माणसाला बळजबरीने कांदा व लसूण खाऊ घालून हिंदू करण्याचा प्रयत्न केला' सारखेच हास्यस्पद आहे." >> ह्याला हास्यास्पद म्हणणे दुर्दैवी आहे. मागे शिवसेनेच्या खासदारांनी कॅन्टीनच्या चपात्या किती वातड आहेत हे दाखवून वेटरला, "तूच खाऊन बघ" असे म्हणून चपाती तोंडात कोंबली. तो वेटर कुठल्या धर्माचा आहे हे त्यांच्या गावी ही नव्हते. त्यांचा मुद्दा कॅन्टीनच्या वाईट अन्नाबद्दल होता. पण तरीही रोजे सुरु असताना त्या वेटरला चपाती भरवली म्हणून सगळ्या चॅनेल्सनी आठवडाभर गहजब केला होता. इथे बळजबरीने बीफ खायला घातले असेल तर धार्मिक भावना दुखावल्या नाहीत का? हेच जर त्या धर्माच्या व्यक्तीला बळजबरीने पोर्क खायला घातले असते तर त्यालाही हास्यास्पद म्हणाला असता का? हिंदू धर्मियांना विहिरीत पाव टाकून बाटवण्याचा इतिहास आहे. बीफ खाल्ले म्हणजे आपला धर्म भ्रष्ट झाला अशी कितीतरी हिंदूंची भावना असते. आणि अशा vulnerable परिस्थितीत, "आता तुझा धर्म भ्रष्ट झाला. आता तुला आमचा धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही" असे ब्रेनवॉश करण्याची ही पद्धत आहे. बीफ खाल्ल्यावर धर्म भ्रष्ट होतो ह्याला नाईव्हिटी किंवा मूर्खपणा सुद्धा म्हटलं जाऊ शकतं पण तरीही बळजबरीने बीफ खायला घालण्याचं समर्थन नाहीच केलं जाऊ शकत.

महाराष्ट्रात काहीही चालू आहे सध्या. ते अशोक खरात प्रकरण आहेच आणि आता हे TCS चं अशक्यच आहे. दोन्ही ठिकाणी बायकांना आपल्याबरोबर काय होतंय, जे होतंय ते बरोबर की चूक हे लक्षात येत नाही का असे प्रश्न पडतात.

खरातकेसमध्ये काही होईल असे मला वाटत नाही. खरातचे जे विडिओ मला फेबुने दाखवले त्यात एकही स्त्री ड्रगच्या अंमलाखाली आहे, बेशुद्ध आहे किंवा जोरदार प्रतिकार करतेय असे दिसत नाहीय. निदान त्याच्या केबिनमध्ये तरी असे दिसत नाही त्यामुळे तो निष्णात वकिलांची फौज कोर्टात उभी करुन सुटणार. अवैध संपत्ती गोळा केली ह्या आरोपातुन कसे सुटायचे हे तर आता कुठल्याही वकिलाचा ड्रायवरही सांगेल इतके गुन्हे दाखल होऊन आरोपी सुटतातही.

टिसिएसमधल्या स्त्रियांच्या नोकरीचा प्रश्न होता. एक नोकरी सुटली तर दुसरीकडे मिळणे कठिण. अशा वेळी ज्यांना नोकरीशिवाय गत्यंतर नाही त्या सगळे त्रास सहन करतात. तक्रार करत होत्याच ना. कोणी ऐकत नाहीत म्हणुन तर पोलिसात गुपचुप तक्रार केली व पोलिस महिलांनी तिथे नोकरी
धरुन हे सगळे खरेच असे घडतेय ह्याची खात्री झाल्यावर अटक केली.

पोलिस महिलांनी तिथे नोकरी
धरुन>>
७-८ पोलिस महिलांनी tcs सारख्या कंपनीत management ला संशय येऊ न देता प्रवेशप्रक्रिया पार पाडून एकाच वेळी एकाच ठिकाणी नोकरी कशी मिळवली याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? फारच सुरस आणि चमत्कारिक प्रकरण दिसतंय.
मी हे सगळंच प्रकरण बनावट आहे असं अजिबात म्हणत नाहीये पण मनात बरीच प्रश्नचिन्ह उमटतायत

आधीचे लोक कसे आले तश्याच ह्या आल्या असतील. Happy कोणाला माहित Happy पोलिस तपासास्सठी पोलिस कुठल्याही थराला जाऊ शकतात, पेपरात सगळेच छापुन येत नाही. टिसिएस नाशिकचे कोणी इथे असेल तर कळेल.

अनेक महिला कुस्तीगिरांनी बृजभूषण वर गंभिर आरोप केले होते. तक्रारींना केराची टोपली दाखविली गेली. रस्त्यावर आंदोलने झाली पण तक्रारींची दखल घेतली गेली नाही. प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाच्या आदेशानंतरच FIR दाखल करावा लागला होता.

पोलीसांनी पीडित कुस्तीगिर मुलींची रस्त्यावर फरफट केलेली बघितली आहे.

TCS प्रकरणांत पोलीसांनी बरिच चपळाई दाखविली आहे.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये टीसीएसच्या नावासकट ही बातमी आली आहे. एका पक्षाच्या कार्यकर्त्याने एक हिंदू तरुणी रमझानचे रोजे पाळत असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसां नी त्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलगी रोजा पाळू लागल्यावर आणि इस्लामी पद्धतीने राहायला लागल्यावर त्यांनी तिचं ऑफिसला जाणं बंद केलं.
मग पोलिसांनी आपल्या काही कॉन्स्टेबल्सना तिथे हाउसकीपिंग स्टाफ म्हणून कामावर ठेवलं. आणि दोन आठवड्यांनी पुरेसे पुरावे गोळा झाले आहेत असे वाटल्यावर एफ आय आर नोंदवला. रोजे ठेवणार्‍या तरुणी ने ज्या मुस्लिम तरुणाच्या सांगण्यावरून रोजे ठेवले, त्याच्याशी शरीरसंबंध होते. तो विवाहित असल्याचे व त्याला दोन मुले असल्याचे त्याने लपवून ठेवले होते. हे त्याच्या पत्नीनेच त्या तरुणीला फोन करून कळवले. या प्रकरणी लग्नाचे आमि ष दाखवून शरीरसंबंध ठेवले म्हणून बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
अशीच इतर तरुण तरुणींची चौकशी करून इतर गुन्हे नोंदवले गेले.
सध्या हे बी पी ओ बंद आहे.
यातला एक तरुण धार्मिक यात्रा (हज?) करून आल्यावर प्रभावित झाला होता व त्याने इतरांना प्रभावित केले.
अश्विनी चैनानी बहुधा पुण्यातली एच आर ऑफिशियल असावी. तिला का अटक केली ते बातमीत दिसले नाही.

मी इथे आधी नोंदवलेले मत चूक होते, असे ही बातमी वाचल्यावर वाटते. पुढील तपासात आणि खटला चालेले तेव्हा गोष्टी स्पष्ट होतीलच.

<< आपल्या मुलांना जगात काय काय चालते या सर्व प्रकाराची कल्पना देऊन strong बनवायला हवे. स्पेशली मुलींना. कारण आयुष्यभर सुरक्षित जगातच वावरतील याची खात्री नाही. आणि जिथे जगाचा राज्यकारभार हाकणारे जागतिक नेतेच कुठल्या epstein स्कँडल मध्ये सापडतात तेव्हा कुठले जग सुरक्षित समजावे हा देखील प्रश्न पडतो. >>

------ सहमत. सर्वांनीच ( मुलींनी, महिलांनी , लहानग्यांनी आणि पुरुषांनी पण ) काळजी घ्यायला हवी आणि एव्हढे करुनही कुठे अडकलांत तर ब्लॅक मेलच्या जाळ्यांत अडकू नका.

Pages