Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
होय बोटावर मार्करनेच खूण केली
होय बोटावर मार्करनेच खूण केली.
महाराष्ट्रात काही ठिकाणी
महाराष्ट्रात काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्करनी शाई लावली जाते, जी सहज पुसली जाते. चांदी महाग झाल्याने हा निर्णय घेतला की काय अशी शंका येतेय.>>> दहा मिनिटां पुर्वी मतदान करुन घरी आलो आणि हे स्टेटस ठेवलंय आता वॉट्सॲपला......LONG LIVE DEMOCRACY!!!
हाताला काम देता येत नसले
हाताला काम देता येत नसले म्हणून काय झाले? बोटाला तर दिले आहे.
धन्य धन्य
धन्य धन्य
https://www.facebook.com/share/16TQZvsAgy/
शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडून मार्कर वापरण्याबाबत स्पष्टीकरण.
आता लाखो मतदारांची नावं याद्यांत दोनदा किंवा अधिक वेळाही आहजत हे राज्य आयोग वा मनपांनीच सांगितलंय.
यो दोन गोष्टींची सांगड घाला. शाम भागवतांना मतदानवाढ का अपेक्षित आहे, ते कळलं .
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/16TQZvsAgy/
Ec website वर दाखवलेल्या बूथवर आपलं नाव नाही, हा अनुभव अनेकांना आला आहे.
बोटावर मार्करच होता आज . आणि
बोटावर मार्करच होता आज . आणि मतदान करते वेळेस टेबलच्या भोवतीने टेबल पेक्षा दीड फूट उंच एवढंच कुंपण . मतदान करते वेळेस काहीच प्रायव्हसी वाटली नाही अगदी सगळे दिसत होतं अवतीभोवती पाहिलं तर केशरी रंगातील सूचनेचे पेपर होते . इतर लोकही माझ्या नजरेत नजर देऊ शकत होते .
मी तेथे कळवले सुद्धा की या बॉक्सची थोडी हाईट वाढवा म्हणून . कुणाला वोट देतीय याचा डोळ्यांच्या हालचालीतून अंदाज सहज येतो.
असो चार जणांना मत दिले बघू आता प्रभागाची काही विकासाची 'अजून स्वच्छ पाण्याची कामे होतात की नाही . या चौघांच्या खांद्यावर आता खूपच छोटासा प्रभाग आलेला आहे .
घरी आल्यानंतर मेकअप रिमूवरने markसुद्धा बऱ्यापैकी fade झाली .
मार्कर बद्दल शासनाकडून असं
मार्कर बद्दल शासनाकडून असं निवेदन आले की शाई एकदा dry झाल्यानंतर पुसली जात नाही . पण मुळात ज्याला दुसऱ्यांना मतदान करायचा आहे तो ड्राय व्हायचे वाटच कशाला बघेल लगेच पाकिटात हात घालून chemical ne पुसून घेईल ना . आणि दुसऱ्यांदा मतदान करताना त्याच नावाने थोडंच होतं दुसऱ्या नावाने पण करतात . दुबार मतदार आढळल्यास तेथील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहेत म्हणे .
दुबार मतदान करायला कुणाच्या
दुबार मतदान करायला कुणाच्या चेहऱ्यासारखे चित्र , नाव असलेले ओळखपत्र तर लागेल ना?
--------------------
बाकी मुंबई महापालिकेची सत्ता हातात आल्यावर त्या अदाणीला आंतर्राष्ट्रीय कंत्राटांमधून कसे हुसकावणार आहेत कोण जाणे.
मुंबईत महायुतीला सत्ता मिळेल
मुंबईत महायुतीला सत्ता मिळेल असे एक्सीट पोल चे निकाल आहेत
>> मुंबईत महायुतीला सत्ता
>> मुंबईत महायुतीला सत्ता मिळेल असे एक्सीट पोल चे निकाल आहेत <<
भाजप दोनशेच्या आसपास जाऊ शकते, दोनशे ओलांडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. २२७ पैकी.
एग्जिट पोलवर विश्वास ठेवू नका.
मुंबई भाजप कडे आली तर मुंबईला
मुंबई भाजप कडे आली तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून तिचा अधिक विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. किंवा मुंबईला स्वतंत्र राज्य करावे.
>>मुंबईला केंद्रशासित प्रदेश
>>मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून.....>>> अगदी हे कागदोपत्री झालेलं नाही परंतू मुंबईतील मराठी लोकांच्या भल्यासाठी काही होत नाही , हे मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे पाहून लक्षात येईल. मराठी लोकांनी ( प्रवाशांनी) चालवलेली रेल्वे प्रवासी संघटना काहीही करू शकत नाहीत हे दिसेल.
यावेळेस मराठीचा मुद्दा खूप
यावेळेस मराठीचा मुद्दा खूप मेजर होता असे दिसले. एकेकाळी शिवसेना परप्रांतीयांविरूद्ध आवाज उठवत होती तेव्हा जवळजवळ इतर सर्व पक्ष त्याला कडाडून विरोध करत होते. आता भाजप व काँग्रेस सोडून इतर सर्व पक्ष परप्रांतीयांच्या व हिंदीच्या वाढत्या प्रभावाविरूद्ध आहेत. मग तेव्हा शिवसेना बरोबर होती, की आता भाजपला विरोध म्हणून लोकांचे त्याला समर्थन आहे? फेसबुकवर इतक्या लोकांच्या पोस्ट्स आहेत याबद्दल, ज्या तेव्हाच्या शिवसेनेच्या धोरणाशी तंतोतंत जुळतात. यातील बहुसंख्य लोकांनी जेव्हा सेना व भाजप एकत्र होते तेव्हा त्याला सपोर्ट केलेला नाही. दुसरे म्हणजे खुद्द सेनेने मधे बराच काळ मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्त्वाचा घेतला होता. तेव्हा कित्येक अमराठी लोक शिवसेनेत आले व नेतेही झाले. इव्हन काँग्रेसच्या काळात मुंबईत मराठीला फार भाव नव्हताच. खुद्द इंदिरा गांधींनी भर मुंबईत बॉबेचे मुंबई होऊ शकणार नाही असे जाहीर सांगितले होते.
याबाबतीत कन्सिस्टंट भूमिका फक्त काँग्रेसची राहिली आहे असे वाटते. आणि पसंत नसली तरी भाजपचीही. मराठी-परप्रांतीय याबाबतीत दोन्ही पक्षांच्या भूमिकेत फार फरक नसेल.
हिंदी भाषा सक्तीची नसावी व मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी भाषा व गायपट्ट्यातील काही प्रकार प्रबळ होऊ नयेत असेच मला वाटते (प्रचाराच्या स्टेजवर स्त्रियांचे डान्स वगैरे निदान शहरी भागात पाहिले नव्हते पूर्वी). पण हे मराठी लोकांच्या कितपत हातात राहिले आहे कल्पना नाही. ९/११ नंतर त्याच न्यू यॉर्क मधे वीस पंचवीस वर्षांनी मुस्लिम महापौर येईल यावर तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नसता. पण मतदारसंख्या व डेमोग्राफी बदलत गेली की काहीही होऊ शकते.
मराठी खासगी शाळांमध्ये पूर्वी
मराठी खासगी शाळांमध्ये पूर्वी चार भाषा होत्याच. हिंदी , इंग्रजी पाचवीपासून होत्या.
काही ठिकाणी तर इंग्रजीचे धडे पहिलीपासून चे देतात. म्हणजे तशी पालकांचीही इच्छा असते. आता हिंदी पहिलीपासून केल्यावर काय होईल ते पुढे लिहिले आहे.
आता मराठी मुले फारच कमी मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. म्युनिसिपल स्कूलमध्ये तर इतर उप्र बिहारी मुलेच जातात. मराठीतच दहावी होतात. पुलं, अत्रे, केशवसूत, गोविंदाग्रज ,चिवीजोशी वाचतात. त्यांनाच पुढे सचिवालयात नोकऱ्या मिळतील.
आपली मुले चर्चच्या किंवा इतर इंग्रजी माध्यमाच्या ( अगदी बॉम्बे स्कॉटिश) शाळेत पाठवायची आणि भाषेच्या प्रश्नांवर रड काढायची हे पटणारे नाही.
फार लोड घायचा नाही. एकतर
फार लोड घायचा नाही. एकतर मुंबई महाराष्ट्राच्या डोक्यावर का बसवून ठेवली आहे ते मला कळत नाही. आम्ही पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात राहतो आणि मुंबईत मराठी माणूस असला काय नसला काय आम्हाला त्याचा काडीचाही फरक पडत नाही. कोणतेही एवढे मोठे शहर मल्टिपल समाजांचे आणि भाषांचे असते. फक्त एका कोणत्याही भाषेवर किंवा एका कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि सगळ्यांना सेम स्पेस आणि सेम संधी मिळावे एवढीच एका अशा अजस्त्र आणि महाकाय शहराबद्दल अपेक्षा आहेत. स्पेशल केस आहे.
मुंबईवर मराठी माणसांची सत्ता असल्यावर महाराष्ट्र राज्याचा काय फायदा होणार आहे हे मला अजून पण कोणी नीट समजावून सांगत नाही काही लोक आंबेडकरांचे मुंबई महाराष्ट्रात का असावी यावरचा एक निबंध पाठवत असतात. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे आणि आता मराठी वगैरे कोणी वाचत नाही किंवा शिकत सुद्धा नाही तर तिथे मराठी लोकांनी आपला झेंडा गाडल्याने मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा असा काय मोठा फायदा होणार आहे?
निकाल यायला सुरू झालेली आहे
निकाल यायला सुरू झालेली आहे आणि भाजपने महायुतीने प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे हे स्पष्ट आहे त्यावरून भाजप 200 पर्यंत जाईल असे वाटत आहे
न्यूयॉर्क सारख्या महाकाय
न्यूयॉर्क सारख्या महाकाय शहरांमध्ये दीडशे च्या वर भाषा तरी बोलल्या जातात. मात्र संघर्ष नेहमीच पहिल्या तीन किंवा चार मोठ्या भाषिक समूहांमध्ये असणार. भाषेचा संघर्ष मोठा नसेल तर तो धर्माचा तरी असेल. त्यामुळे अशा मोठ्या शहरांमध्ये नेहमी पहिले तीन-चार गटच प्रॉब्लेम्स तयार करत असतात. अतिशय मायनॉरिटी असणाऱ्यांचे फार लाडही कोणी करत नाही आणि त्यांना फार त्रासही कोणी देत नाही. ते आपापली कम्युनिटी शांततेमध्ये सांभाळत शहराला एकाच वेळेस बहुसंस्कृतिकता देत असतात आणि स्वतःचाही उत्कर्ष साधून घेतात. मात्र पहिले दोन-तीन प्रबळगटच नेहमी बोंबलत असतात
रॉय, तुमचं पटतंय. सविस्तर
रॉय, तुमचं पटतंय. सविस्तर नंतर लिहितो
मुंबई ( बंदर)उभारली
मुंबई ( बंदर)उभारली इंग्रजांनी. ती त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केली ही गोष्ट बाजूला ठेवू पण इतर कुणी त्यावर हक्क सांगणे पटत नाही. मुंबईविषयी खूप चांगली पुस्तकं आहेत त्यातील एक दोन वाचल्यानंतरच मुंबईविषयी बोलले पाहिजे.
कोल्हापुरातल्या शाहु महाराजांनी किंवा बडोद्याच्या गायकवाडांनी किंवा औंधच्या सरकारांनी काय केले हे पाहिल्यावर ते किती भविष्याची काळजी करत होते ते कळेल.
आताच्या मनपा निवडणुकींत
आताच्या मनपा निवडणुकींत झालेल्या पैसेवाटपावरून लोकसत्तेचा आजचा अग्रलेख. आज फुकट वाचता यावा. उद्यापासून बहुधा पैसे लागतील.
काय मग बरे आहात ना सगळे?
काय मग बरे आहात ना सगळे?
इतना दुःखी हो आप गम मे हो?
इतना दुःखी हो आप गम मे हो? बताओ ना मे क्या करू
मे मुस्कूराऊ और गम छुपाऊ आपका या जाऊ दूर कही
ही वाट दूर जाते जरा विसाऊ त्या वळणावर
और अपना दुःख छुपाऊ मेंदीच्या पानावर.
मी आधी लिहिलं तसं या
मी आधी लिहिलं तसं या निवडणुकीत माझं मतदान हुकणार होतं. चार दिवसांनी काल रात्री घरी आलो. आज लेटरबॉक्स उघडला तेव्हा मतदान केंद्राची माहिती देणार्या दोन चिठ्या होत्या. एक भाजपची. एक आयोगाची. दोन्हीमध्ये मी आधी लिहिलेलं घरापासून दोन किलोमीटरवरचं केंद्र दिलं होतं.
सोसायटी ग्रुपवर परवा मतदारयादीच्या रिव्हाइज्ड फोटोसह मेसेज आला की मतदानकेंद्र बदलून जवळचं आलं आहे.
आपल्याला आलेल्या चिठीतल्या केंद्रावर आपलं नाव नाही हा अनुभव असंख्य मतदारांना आलेला आहे..
मतदारांना सहजी मतदान करता येऊ नये असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न होता का? आमच्या सोसायटीचे पदाधिकारी भाजपच्या स्थानिक नेत्यांशी नित्य संपर्कात असतात. आमच्याकडचा नगरसेवक त्यातल्या अनेकांना भाजपच्या सभांना बस अॅरेंज करून नेत असे. त्यांना गर्धी जमवायचं काम दिलेलं असतं. सोसायटी मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाची आहे. तर असे रिव्हाइज्ड मेसेजेस किती लोकांना आले असतील?
>>मुंबई भाजप कडे आली तर
>>मुंबई भाजप कडे आली तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून तिचा अधिक विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. किंवा मुंबईला स्वतंत्र राज्य करावे.<<
संयुक्त महाराष्ट्राचा लढा का झाला, हुतात्मा चौक मुंबईत का/कुठे आहे हे सगळे विषय तुम्हि ऑप्शनला टाकले होते काय? इतरांनीहि टाकले होते असं जाणवतंय...
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना गौहाटी व्हाया सूरत जायची संधी मिळू शकते.
संध्याकाळी ४.३० पर्यंत
संध्याकाळी ४.३० पर्यंत मुंबईच्या १०० ठिकाणच्या मतमोजणीला सुरुवातच झाली नसताना महायुतीला विजयाच्या जवळपास जागा मिळाल्याचे दाखवत होते. लोकांचे जाऊ दे विरोधी उमेदवार गप्प का ?
बोललेत विरोधी उमेदवार. मी
बोललेत विरोधी उमेदवार. मी वरुण सरदेसाईंचं ट्वीट पाहिलं होतं.
मुंबई भाजप कडे आली तर मुंबईला
मुंबई भाजप कडे आली तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून तिचा अधिक विकास व्हावा अशी माझी इच्छा आहे. किंवा मुंबईला स्वतंत्र राज्य करावे.>>> ही इच्छा अशी मायबोलीवर लिहून प्रभावीपणे व्यक्त नाही होणार.....एक काम करा मुंबईत हुतात्मा चौकात येऊन हुतात्मा स्मारकावर थुंकलात तर अधिक प्रभावी ठरेल ते.
मुंबईत भाजप काठावर पास झाली
मुंबईत भाजप काठावर पास झाली असे म्हणावे लागेल. सुदैवाने उबाठा पक्षाने शिवसेना शिंदे गटाला इतके हीन पद्धतीने वागवले आहे की त्यांची युती होणे अशक्य आहे.
कॉग्रेस आणि उबाठा एकत्र आले तरी पुढे जाऊ शकत नाहीत. देवाचे आभार!
महापौर, स्थायी समिती वगैरे रसमलाई वाली खाती आता उधोबाच्या घशात जाणार नाहीत.
बाकीच्या अनेक महापालिकेत फडणवीसांचा झंझावात आपली जादू दाखवून गेला!
ठाणे, कण, नवी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, विरार-भाईंदर कितीतरी!
जितं मया! जितं मया!
शेवटी कौरव बोललेच..
शेवटी कौरव बोललेच..
Pages