सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.
एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!
काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.
आपल्याकडे अॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.
'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.
असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!
सादरीकरण आणि पात्र परिचय :
'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.
ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...
चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'
३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.
ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.
"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल
ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.
चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'
"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."
रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.
क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.
चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'
नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!
प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.
ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.
उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.
चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'
अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.
बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!
आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.
नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.
ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!
पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.
चॅप्टर - ५ : 'द जिन्न'
ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!
खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.
चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.
पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.
असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.
संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.
सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!
एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
तेवढंच नाही. बघू किती लोकांना
तेवढंच नाही. बघू किती लोकांना कळतंय.
या धाग्यावर विरोधातल्या ९९ %
या धाग्यावर विरोधातल्या ९९ % पोस्टस माझ्या आहेत.
काही काही धागे माझे नसून ते माझ्यामुळे जोरात आहेत.
धागालेखकाला सुद्धा युट्यूबप्रमाणे इन्कम नाही, आणि जास्तीचे प्रतिसाद देणार्याला सुद्धा.
>>"हे खोटं आहे, हे अजूनही
>>"हे खोटं आहे, हे अजूनही तुम्हांला कळलं नाही?">>
तो प्रतिसाद तुम्हाला खरंच कळला नाहिये की विषय भरकटवण्याचा प्रयत्न आहे?
ह्यातले जे काही असेल ते असो, मला असला काथ्या कुटण्यात रस नाही, आणि केकुशेठ्च्या जोडीने खंडीभर निरर्थक प्रतिसाद देत राहिलात तर त्याला माझी हरकतही नाही. तेवढाच धाग्याचा टीआरपी तरी वाढेल 😂
>>"धागालेखकाला सुद्धा
>>"धागालेखकाला सुद्धा युट्यूबप्रमाणे इन्कम नाही, आणि जास्तीचे प्रतिसाद देणार्याला सुद्धा.">>
सत्यवचन! 🙏
दीपिकाच्या सौंदर्याची चर्चा
दीपिकाच्या सौंदर्याची चर्चा विषयाला धरून आहे?
दुसर्यांदा पाहीला. जास्त
दुसर्यांदा पाहीला. जास्त आवडला.
त्याच्या त्या दातामुळे, पॉइझमुळे वगैरे, अर्जुन रामपाल जास्त खुनशी वाटतो.
---------------
संजय दत्त च्या एन्ट्रीचे 'हवा-हवा' मस्त वाजवले आहे.
पाहिला धुरंधर. प्रचंड
पाहिला धुरंधर. प्रचंड हिंसेच्या आवरणाखाली एक राजकीय प्रॉपोगंडा मूव्ही वाटला. सगळ्या कलाकारांची कामं छान आहेत. पण खूप इंपॅक्ट नाही झाला.
कालच्या Insian Express
कालच्या Insian Express मध्ये धुरंधर सिनेमातल्या ना तो कारवाकी तलाश ... ह्या कव्वालीचा रोचक इतिहास आलेला आहे.
How Dhurandhar’s repurposed qawwali with Pakistani origins engages with a shared cultural past, one the film ignores.
लिन्क
https://indianexpress.com/article/express-sunday-eye/how-durandhars-repu...
ह्या लेखातील शेवटचे वाक्य आहे
"In a film about terrorism, when a filmmaker chooses othering instead of nuance, it ignores the valuable lessons that the history and meaning of its own song are citing for him. The question is whether we are listening."
अमित, आज आठवलं. दीपिका आणि
अमित, आज आठवलं. दीपिका आणि सोनम कपूर चित्रपटात आल्या तेव्हा शोभा डे यांनी दीपिका मिस डोंबिवली स्पर्धाही जिंकू शकणार नाही, अशी कमेंट केली होती. त्याची बातमी झाली होती.
---
तर दीपिकाची तुलना करणारी इथली पोस्ट misogynist, classist आणि castiest आहे. भारतात अजूनही काही व्यवसाय हे जातीशी निगडीत आहेत. शहरांत आता सर्रास तसं होत नसलं तरी दोन्हीचा संबंध सुटलेला नाही. आणि सोसायटीत कचरा गोळा करणार्या स्त्रीचं आडनाव काही राजाध्यक्ष * असणार नाही.
* शोभा डेचं माहेरचं आडनाव. इथे मी दुसरं एखादं आडनाव घेऊ शकलो असतो. पण मला फक्त मुद्दा पोचवायचा आहे. तो पोचेल याची आधीच्या दोन अनुभवांवरून खात्री नाही. न पोचण्याची शक्यताच अधिक आहे. तसंच लिहिणार्याला त्यामागचे सामाजिक संदर्भ माहीत नसावेत, हेही मी लिहिलं आहे.
अशा प्रकारचा castiest slur वापरल्यामुळे युवराज सिंगवर अॅट्रोसिटीची केस झाली आहे. त्याने तो शब्द वर ज्याचे नाव आले आहे अशा गलिच्छ शिव्या देण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी बोलताना वापरला होता.
इथे तो शब्द सरळ आला नसला तरी तोच व्यवसाय का निवडला गेला? आता मोलकरणीला आपण हाउसहेल्प म्हणू लागलो, त्यातलाच प्रकार.
उलट्या सुलट्या चर्चा वाचायला
.....................................
Munmun Dutta
Munmun Dutta
In 2021, Munmun Dutta, who plays Babita in "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah," faced backlash for using a casteist slur in a video. She later apologized and deleted the video, stating she did not intend to offend anyone.
Following the incident, there was significant public outcry. Many netizens demanded action against her, urging the Mumbai Police to take strict measures under the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act.
Dutta issued an apology, stating that she did not intend to offend anyone and was unaware of the term's meaning. She later deleted the video segment.
>>>> तेव्हा शोभा डे यांनी
>>>> तेव्हा शोभा डे यांनी दीपिका मिस डोंबिवली स्पर्धाही जिंकू शकणार नाही, अशी कमेंट केली होती. त्याची बातमी झाली होती.
>>>>>
बरेचदा पब्लिसिटी स्टंट असतो या क्षेत्रात.
लोकांचे लक्ष वेधून घेणे.
जसे हे वाचून लोकं कोण या शोभा डे बघायला जातील..
अन्यथा कोण काय जिंकू शकणार किंवा नाही याचा कोणाशी काय संबंध जे अशी कॉमेंट करावी..
जसे हे वाचून लोकं कोण या शोभा
जसे हे वाचून लोकं कोण या शोभा डे बघायला जातील.. >> मी त्यांचा एकही पिक्चर पाहिलेला नाही.
ईशा डे माहिती आहे.
एका मैत्रिणीच्या रेकमेंडेशनला
एका मैत्रिणीच्या रेकमेंडेशनला बळी पडून , थेटरात जाऊन पाहिला सिनेमा .
कन्टेन्ट अजिबात आवडला नाही .
ऍड्रेनॅलीन रश मिळवायचा असेल तर जरूर बघण्याजोगा आहे .
काही ठिकाणी लांब केसांमुळे रणवीर सिंग आकर्षक दिसतो .
अक्षयने चांगली छाप पाडली आहे .
रणवीर सिंगची हिरोईन अजिबात म्हणजे अजिबात आवडली नाही . झिरो केमिस्ट्री (मायनस actually)
राकेश बेदी ने छान काम केलेय.
सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे , रेहमान डकैत ला रणवीर सिंग स्वतः इतका जखमी असून दवाखान्यात घेऊन जातो , सगळं रामायण घडतं पण दवाखान्यात त्याच्यावर कोणी साधी मलम पट्टी करत नाही .
ह्यात राजकीय प्रचार केला आहे
ह्यात राजकीय प्रचार केला आहे म्हणून काही स्नोफ्लेक्स विव्हळत आहेत ते हास्यास्पद आहे.
जवळपास सर्व सिनेमात राजकीय प्रचार असतो. पठाण सिनेमात पाकिस्तान चांगला देश आहे. रॉ चा निवृत्त झालेला अधिकारी हाच खरा खलपुरुष आहे वगैरे थोर संदेश दिला गेला. ह्या रॉच्या खलपुरुषाला नष्ट करायला पठाण नामक महात्मा आणि आय एस आय नामक शांतिप्रिय संस्थेतील तोकड्या कपड्यात नाच करण्यात पटाईत असणारी गुप्तहेर कंबर कसून (आणि कंबर हलवत) प्रयत्न करतात आणि अर्थातच त्यांचा विजय होतो.
धुरंधर मधे असे काय अ तर्क्य आणि अचाट आहे? संसद हल्ला, विमान अपहरण, २६/११ हल्ला सर्व प्रकरणी भारताने षंढ भूमिका घेतली आणि कुठलेही थेट प्रत्युत्तर दिले नाही. हा इतिहास आहे. आणि अनेक भारतीय ज्यात राजकारणी आणि सरकारी अधिकारीही येतात हे अशा नंपुंसक भूमिकेबद्दल असमाधानी होते. ह्यातही काही अ तर्क्य वा अविश्वसनीय काही नाही.
बनावट नोट प्रकरण. पाकिस्तानातून प्रचंड प्रमाणात बनावट नोटा नेपाळमार्गे येत होत्या. २००० नंतर ह्या बनावट नोटांच्या गुणवत्तेत अफाट सुधारणा झाल्या होत्या. कागद अस्सल नोटेच्या तोडीस तोड होता. सामान्य लोकांना कळणार नाही इतक्या बेमालूम पद्धतीने बनावट नोटा बनत होत्या. हा इतिहास आहे.
चिदंबरम ने एका विशिष्ट ब्रिटिश कंपनीला नोटा बनवायचे कंत्राट देण्याचा आग्रह धरला होता. काही काळ चिदंबरम अर्थमंत्रीपदावरून गेला आणि प्रणव मुखर्जी आले तेव्हा ह्या कंपनीला बाद करण्यात आले होते. नंतर पुन्हा चिदंबरम अर्थमंत्री झाला आणि तत्काळ त्या कंपनीशी पुन्हा काम सुरू झाले. योगायोग? तुम्हीच ठरवा! हा इतिहास आहे.
सिनेमात एकच गोष्ट दाखवली आहे की कतार इथे चिदंबरम आणि त्याचा कार्टा (थेट नाव न घेता आडवळणाने) यांच्या विमानाने एक अनियोजित थांबा घेतला . तिथे आय एस आय आणि ही दुक्कल यांची भेट झाली आणि ह्या नोटा छापण्याच्या प्लेटा आय एस आयला देण्यात आल्या.
ह्याबद्दल कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही परंतु आरोप झालेले आहेत. कार्टी चिदंबरम ह्या दिवट्यावर अनेक केसेस दाखल केल्या आहेत. पण आपल्या दिव्य कोर्ट व्यवस्थेत दिरंगाई करायला भरपूर वाव असल्यामुळे खट्ला सुरु झालेला नाही. निर्णय लागणे तर कदाचित अनेक दशके होणार नाही.
परंतु उपलब्ध पुरावे पहाता असे घडले असणे अशक्य वाटत नाही.
चित्रपटात सुरवातीलाच ठळक डिस्क्लेमर लिहिला आहे की खरोखर घडलेल्या घटना आणि काल्पनिक घटना ह्यांचे ह्या सिनेमात मिश्रण आहे.
तेव्हा स्नोफ्लेक मंडळींंनी इतके हळवे होऊन जाऊ नये.
बापरे शेंडेबच्चन, केव्हढा हा
बापरे शेंडेबच्चन, केव्हढा हा थयथयाट!. उपरोध सोडून, इतरही अलंकार मराठी भाषेत आहेत. बरं ते स्नोफ्लेक म्हणजे काय आणि कुणाला उद्देशून आहे ते समजलं नाही. त्यामुळे तो बॉल सोडून देतो.
कुठलंही सरकार हे परिस्थितीनुरूप आणि कॉमन सेन्स निर्णय घेतं असा समज असल्यामुळे कुणी षंढ / नपुंसक वगैरे आहे ह्या ऊंटावरून हाकलेल्या शेळ्या सुद्धा सोडूनच देऊ या.
पण तुमच्या पहिल्या आणि दुसर्या ओळीतला मजकूर एकत्र वाचला तर 'धुरंधर' मधे राजकीय प्रॉपोगंडा आहे हे तुम्हीच मान्य केलंय. त्यामुळे बाकीची पोस्ट ही फक्त ते जस्टीफाय करण्यासाठी आहे, इतकंच.
"ह्यात राजकीय प्रचार केला आहे म्हणून काही स्नोफ्लेक्स विव्हळत आहेत ते हास्यास्पद आहे.
जवळपास सर्व सिनेमात राजकीय प्रचार असतो."
"संसद हल्ला, विमान अपहरण, २६/११ हल्ला" - हा इतिहास आहे. पण "भारताने कुठलेही थेट प्रत्युत्तर दिले नाही आणि अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकारी अशा भूमिकेबद्दल असमाधानी होते" - हा तुमचा अंदाज / आरोप आहे. known military action घेतली नाही इतपतच ह्यात तथ्य आहे.
"ह्याबद्दल कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही परंतु आरोप झालेले आहेत. ....आपल्या दिव्य कोर्ट व्यवस्थेत दिरंगाई करायला भरपूर वाव असल्यामुळे खट्ला सुरु झालेला नाही. निर्णय लागणे तर कदाचित अनेक दशके होणार नाही. - आता तर तुमचं लाडकं - पौरुषानं रसरसलेलं सरकार आहे ना. खरं तर असा वेळ लागायला नको आहे.
>>
>>
कुठलंही सरकार हे परिस्थितीनुरूप आणि कॉमन सेन्स निर्णय घेतं असा समज असल्यामुळे कुणी षंढ / नपुंसक वगैरे आहे ह्या ऊंटावरून हाकलेल्या शेळ्या सुद्धा सोडूनच देऊ या.
<<
आजिबात नाही. लोकशाहीत असा आंधळा विश्वास, मायबाप सरकारला सग्ग्ळं सग्ग्ळं कळतं ते जे करते ते योग्यच करते वगैरे वगैरे म्हणणे जमणार नाही. वाजपेयी सरकार आणि काँग्रेस सरकार एक तर अल्पसंख्य (अर्थात मुस्लिम) नाराज होतील म्हणून किंवा अमन की आशा वगैरे खुळे ऊराशी बाळगून असल्यामुळे षंढ बनली होती. वाजपेयींकडे अप्रिय निर्णय घ्यायची ताकदच नव्हती. कदाचित बहुतेक कारकीर्द विरोधी पक्षाच्या बाकावर गेली असल्यामुळे सरकार चालवणे जमत नसावे.
संसदेवर हल्ला आणि २६/११ हल्ला हे एकतर्फी युद्धच होते. त्याला प्रत्युत्तर देता येत नसेल तर असले सरकार न आलेलेच बरे.
>>
"संसद हल्ला, विमान अपहरण, २६/११ हल्ला" - हा इतिहास आहे. पण "भारताने कुठलेही थेट प्रत्युत्तर दिले नाही आणि अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकारी अशा भूमिकेबद्दल असमाधानी होते" - हा तुमचा अंदाज / आरोप आहे. known military action घेतली नाही इतपतच ह्यात तथ्य आहे.
<<
अशा प्रकारे षंढ पणाच्या प्रदर्शनाने सगळे लोक सरकारात असलेले आणि नसलेलेही आनंदित आणि उल्हासित असतील असे माझा कॉमन सेन्स मला सांगत नाही.
एक उदाहरण देतो. आर व्ही एस मणी हा गृहमंत्रालयात असणारा उच्चपदस्थ अधिकारी ह्याविषयी मोकळेपणाने बोलला आहे. युटुबवर आहे.
>>
पण तुमच्या पहिल्या आणि दुसर्या ओळीतला मजकूर एकत्र वाचला तर 'धुरंधर' मधे राजकीय प्रॉपोगंडा आहे हे तुम्हीच मान्य केलंय. त्यामुळे बाकीची पोस्ट ही फक्त ते जस्टीफाय करण्यासाठी आहे, इतकंच.
<<
प्रत्येक सिनेमा हा दिग्दर्शक, पटकथा लेखक आपला विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी निर्माण केलेली कलाकृती असते. त्यात कला असते, विचार असतो. अनेकदा हा विचार राजकीय असतो. दिग्दर्शकाला असा विचार मांडायची पूर्ण मुभा आहे. काहीवेळा जाणीवपूर्वक काहीवेळा तरल पद्धतीने दिग्दर्शकाचा पूर्वग्रह सिनेमात व्यक्त होत असतो. इतके दिवस यशस्वी दिग्दर्शक डावे, पुरोगामी विचार मांडायचे म्हणून आवडायचे किंवा त्यातील प्रचार लक्षात येत नसेल कदाचित. पण हल्ली दुसरी बाजूही चांगले सिनेमे बनवू लागल्यामुळे खटकू लागले आहे. हा ढोंगी दुटप्पीपणा आहे.
केवळ काही लोकांना पटत नाही म्हणून त्याने अशा प्रकारे विचार मांडणे थांबवून निव्वळ करमणूकवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा हास्यास्पद आहे.
धुरंधर हा सिनेमा प्रचंड ब्लॉकबस्टर होण्यामागे त्यात मांडलेला भारताचा आक्रमक पवित्रा, विशेषतः मागील दशकांतील षंढपणाच्या पार्श्वभूमीवर , हा लोकांना आवडलेला असावा. निव्वळ चांगली गाणी, नाच, सेट, अभिनय आणि हाणामारी यावर हा सिनेमा ब्लॉकबस्टर झालेला नाही.
>>
>>
आता तर तुमचं लाडकं - पौरुषानं रसरसलेलं सरकार आहे ना. खरं तर असा वेळ लागायला नको आहे.
<<
आपण नागरिक शास्त्र ऑप्शनला टाकले होते काय? भारतीय सरकारच्या तीन स्वतंत्र शाखा आहेत.
केंद्रपातळीवर बोलू.
विधीमंडळ ज्यात लोकसभा, राज्यसभा हे येतात.
कार्यपालिका ज्यात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ येतात. राष्ट्रपती हा रबर स्टँप असतो. निर्णय घेणारा पंतप्रधानच असतो.
न्यायपालिका ज्यात सर्वोच्च न्यायालय म्हणजे त्यातील न्यायाधीश येतात.
न्यायपालिका ही कार्यपालिकेच्या अधिकारात येत नाहीत. कुठल्या केसेस काय गतीने निकालात काढायच्या हा निर्णय सर्वस्वी न्यायाधीशाचा असतो.
जर इथे पंतप्रधानाने दबाव आणला तर बोंबाबोंब सुरु होते. इंंदिरा गांधीने आणीबाणी आणण्याच्या आधी अलाहाबाद उच्च न्यायलयात अशी ढवळाढवळ केली होती.
आले का लक्षात ? नाहीतर चॅट जीपीटीची मदत घ्या!
"दिग्दर्शकाला असा विचार
"दिग्दर्शकाला असा विचार मांडायची पूर्ण मुभा आहे." - सहमत आहे. किंबहूना राजकीय बाजू घेतल्यामुळे / प्रॉपोगंडा असल्यामुळे सिनेमा वाईट होत नाही. चांगला अभिनय, वास्तव - काल्पनिकता ह्यांच्या सरमिसळीतून तयार झालेली सशक्त कथा, वेगवान पटकथा, लोकप्रिय संगीताचा बॅकग्राऊंडला केलेला उपयोग, कास्टिंग आणि चांगला अभिनय ह्या सगळ्यातून एक चांगला करमणूक करणारा सिनेमा उभा राहिला आहे हे नक्कीच.
"आर व्ही एस मणी हा गृहमंत्रालयात असणारा उच्चपदस्थ अधिकारी ह्याविषयी मोकळेपणाने बोलला आहे. युटुबवर आहे." - शोधतो आणी बघतो.
बाकी माझी राजकीय मतं तुमच्याइतकी कट्टर नाहीत. त्यामुळे त्याबद्दल पास. मला अजूनही असं वाटतं की भारतासारख्या देशाला आर्थिक सबलता येईपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून काही निर्णय घ्यावे लागले आणि त्यात कुणाच्या दुबळेपणाचा भाग नव्हता. पण ते असो. तुमच्या मतांचा आदर आहे.
"आपण नागरिक शास्त्र ऑप्शनला
"आपण नागरिक शास्त्र ऑप्शनला टाकले होते काय? ...निर्णय घेणारा पंतप्रधानच असतो." - नाही चांगले पैकीच्या पैकी मार्क होते.. म्हणूनच निर्णय घेणारी संसद असते (मंत्रीमंडळ) पंतप्रधान नव्हे हे माहित आहे.
पंतप्रधान हा सरकारातला घटनात्मक नेता असतो आणि राष्ट्रपती हा प्रतिकात्मक प्रमुख. - चॅटजिपीटीची गरज नाही.
तेव्हा स्नोफ्लेक मंडळींंनी
तेव्हा स्नोफ्लेक मंडळींंनी इतके हळवे होऊन जाऊ नये. >>>
लालसिंग चढ्ढा हा सिनेमा बघू नका असे आवाहन विविध संघटनांद्वारे आणि सोशल मीडीया प्रचारात आले होते. नंतर अशा घटना नाकारल्या जातात.
या बातम्या.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/b...
https://www.siasat.com/up-hindu-outfit-demands-ban-on-movie-laal-singh-c...
https://www.aajtak.in/india/delhi/story/laal-singh-chaddha-full-movie-co...
छपाक या दीपिका पदुकोणच्या चित्रपटावर बहीष्कार घालण्याचे आवाहन केले होते.
https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/deepika-padukones...
https://en.wikipedia.org/wiki/Chhapaak
धुरंधर हा सिनेमा इतका अफाट
धुरंधर हा सिनेमा इतका अफाट लोकप्रिय आहे की डाव्या लोकांनी कितीही रडारड आदळापट तोडफोड केली तरी त्या सिनेमावर काहीही फरक पडणार नाही.
लालसिंग चड्डा नामक सिनेमा आला कधी आणि गेला कधी हे कळलेही नाही. बकवास पटकथा आणि अस्सल अमेरिकन गोष्ट उचलून भारतात कलम करून लावण्याचा हास्यास्पद प्रयत्न होता. ह्या सिनेमाच्या भव्य अपयशामागे उजव्या बाजूचा बहिष्काराचा वाटा किती आणि सिनेमाच्या अंगभूत फडतूसपणाचा वाटा किती ह्यावर कुणी संशोधन केले आहे का?
तिच गोष्ट छपाक ची. एक अ तिशय रटाळ सिनेमा होता असे ऐकले आहे. त्यामुळे बहिष्काराचा वाटा आणि सिनेमा फालतू असण्याचा वाटा किती?
दोनदा थिएटर मध्ये जाऊन पाहून
दोनदा थिएटर मध्ये जाऊन पाहून आले. तिसर्यांदा जायची तयारी आहे
लेख छान आहे.
इथे आगीनलोळ पोस्टी लिहीणाऱ्या
इथे आगीनलोळ पोस्टी लिहीणाऱ्या आग्यावेताळांसाठी एक कोटी रुपये कमावण्याची संधी आली आहे. लवकरात लवकर संगीत सोम यांना भेटा..
प्रकरण तापल्याने इतरांनीही ते तापत ठेवण्यासाठी उड्या घेतल्या आहेत.
https://www.facebook.com/share/1BKB96ajB7/
वाटलं होतं शाहरुख खानच्या जवानच्या यशस्वी नंतर ज वरून जुबान येईल. पण आता बेजुबान येण्याची शक्यता आहे.
कडक! मस्त! जबरदस्त! तुफान
कडक! मस्त! जबरदस्त! तुफान आवडला पिक्चर. कालच थिएटरमधे पाहिला. ते कडक, मस्त वगैरे कोणत्यातरी चहाच्या जाहिरातीत होते, पण तेच पहिले आठवले.
(टाकीवरच्या वीरूच्या टोनमधे) इस पिक्चर मे प्रोपोगंडा है, जिंगोइजम है, व्हायोलन्स है - ते सगळे खरे आहे. पण तरीही पिक्चर अफाट भारी जमला आहे.
आज पुन्हा हा मूळ लेख व प्रतिक्रिया वाचून काढल्या. पहिले त्याबद्दलः
संजय भावे - मस्त लेख जमला आहे. पिक्चरप्रमाणे लेखातलेही "चॅप्टरीकरण", मधेमधे पेरलेले फोटो आणि स्पॉइलर न देता व्यवस्थित करून दिलेली ओळख - त्यामुळे लेख खूप आवडला. आधीही वाचनीय वाटलाच होता पण आता पिक्चरशी रिलेट करता आल्याने जास्त आवडला.
पिक्चरमधले उच्चार खटकतात पण ते लोकांना समजावे म्हणून तसे असतील तर ठीक आहे. संजूबाबाला सीन देऊन जे पाहिजे ते बोल सांगितले असावे असे संजय भाव्यांनी लिहीलेले एकदम चपखल आहे
विविध भागांतली हिंदी कराची मधे एकाच वेळी बोलली जात आहे असे वाटले. पण पिक्चरच्या वेगामुळे त्यावर विचार करायला वेळ मिळत नाही.
म्हटलं तर प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी प्रेझेंट पण त्याच्या अस्तित्वाची फारशी कुणी दखल घेऊ नये अशी. तसंही हेराने बॅकग्राऊंडमध्ये मिसळून जाणं अपेक्षित असतं. ती त्याने उत्तम निभावली आहे. त्याची बॉडी लॅंग्वेज परफेक्ट बाउन्सरसारखी आहे
फक्त काही वेळा नजरेतून तो वेगळं काही व्यक्त करू पाहतो >>>> हे फार चपखल निरीक्षण आहे. अशा सीन्सचे चित्रीकरणही खूप चांगले जमले आहे. मुख्य हीरोला प्रत्येक फ्रेममधे पुढे ठेवायचा खटाटोप केलेला नाही हे मस्त.
शेवटच्या मारामारीबद्दल अनेकांनी ऑलरेडी लिहीले आहे - ती जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायला हवी होती. ती पिक्चरच्या इतर दर्जाच्या मानाने खास नाही. एका सीनहून वेगवेगळ्या वेळी जंगलात पळालेले लोक एकाच ठिकाणी भेटतात हे क्लासिक बॉलीवूड आहे.
अस्मिता - आता पोस्ट परत वाचली आणि आवडली.
घाऱ्या डोळ्यांचा रगेड, मधूनच हरवल्यासारखा , कव्हर उघडे पडू नये म्हणून सहन करणारा, योग्य वेळेची वाट पाहणारा, पटत नसतानाही सहभागी होणारा, प्रसंगी आपल्याच देशातील घातपात बघून अश्रू पुसून अतिरेक्यांसोबत जयघोष करणारा - असे अनेक पदर असलेली भूमिका आहे >> टोटली! भन्नाट रोल केला आहे त्याने. एरव्ही भयानक अॅण्टिक्स करणारे लोक जेव्हा रिस्ट्रेण्ड रोल करतात ते फारच भारी वाटतात. यातला रणवीर तसाच आहे.
राकेश बेदीच्या व्यक्तिरेखेबद्दल सहमत. अर्जुन रामपललाही आव्हानात्मक नाही, निदान या भागात. सारा अर्जुनच्या रोलची "कहानी की माँग" म्हणून गरज होती
इतके सगळे कळकट दाढीवाले पाहून मधे जरा कलरफुल रिलीफ हवा म्हणून टाकले असेल पण ते स्टोरीत बेमालूम मिसळले आहे. मला ती हिरॉइन मुळात माहीत नव्हती. सारा अर्जुन नाव वाचल्यावर "अरे तेंडुलकरच्या दोन्ही मुलांची नावे आहेत" असेच आधी वाटले होते. तिची कोणती ती फेमस सिरीज मी पाहिलेली नाही. इथेही मला ती काही खास वाटली नाही दिसायला. नॉट माय टाइप.
इतके पावरफुल वडील मुलीला वाचवण्यासाठी काहीच करताना दिसत नाहीत. >>> ते तर आहेच. आणि मंत्र्याची मुलगी रॅण्डम बार्स मधे नाचताना एकही अंगरक्षक जवळ नाही (रणवीरला थांबवणारे बहुधा बार मधले जनरल बाउन्सर्स असतात), तिची गाडी पंक्चर करताना तेथे सिक्युरिटी नाही हे जरा अतर्क्य आहे.
बाकी स्त्रियांच्या भूमिका अगदीच नगण्य आहेत. >>> हो. इन फॅक्ट पिक्चर मधे "लीड फीमेल कॅरेक्टरची एन्ट्री सर्वात लेट" चे रेकॉर्ड या पिक्चरने तोडले असेल
या आधी माझ्या "अभ्यासा"तून शोले आणि थ्री इडियट्स मधे पहिली ४०-४५ मिनिटे लीड फीमेल कॅरेक्टर नव्हते. यात आणखी नंतर आहे बहुधा. पुढे नेफिवर पाहताना टायमर लावून बघेन.
चित्रपट प्रोपोगंडा वाटला नाही कारण तुम्ही मनात काही प्रतिमा कलुषित करून येत नाही >>>> कोणीही सेन्सिबल लोक हा पिक्चर पाहून कोणाबद्दलही कलुषित मन करून बाहेर पडतील असे वाटत नाही. प्रोपोगंडा आहे तो आधीच्या सरकारांबद्दल. त्यातले एक दोन सीन्स मला खटकले, त्याबद्दल वेगळे लिहीतो.
क्लीन आणि रिफाईन्ड सिनेमा आहे. पॅकेज चकाचक आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी खटकत नाहीत कारण तुम्हाला तो अनुभव मिळतो ज्यासाठी तुम्ही थिएटर मधे जाता >>> याच्याशी सहमत.
हा पिक्चर नक्कीच थिएटरमधेच पाहण्यासारखा आहे. लहानपणी तीन तासांपेक्षा मोठे पिक्चर्स पाहिले आहेत पण आता सवय राहिली नाही. त्यामुळे पिक्चर पाहायला जाताना साशंक होतो. पण एक मिनिट सुद्धा कंटाळा आला नाही.
>> बाकी स्त्रियांच्या भूमिका
>> बाकी स्त्रियांच्या भूमिका अगदीच नगण्य आहेत. >> हा पिक्चर त्यांचा आहे असं वाटतंच नाही. म्हणजे त्यांच्या असण्याची गरजही वाटली नाही. सारा अर्जून फक्त कहानी की मांग म्हणून आहे.
मला पिक्चर पाहताना खटकलेली
मला पिक्चर पाहताना खटकलेली गोष्ट - तत्कालीन अर्थमंत्री व त्यांच्या मुलाने दुबईला विमान वळवून नोटा तयार करण्याच्या प्लेट्स पाकला दिल्या असे यात दाखवले आहे हे. या आरोपांबद्दल पूर्वीही वाचले आहे. ते खरे असते तर इतक्या वर्षांत त्याबद्दल काहीतरी झाले असते. आमच्या विरोधातले पक्ष डायरेक्ट देशद्रोही आहेत आणि देशाच्या विरोधात कामे करत आहेत हे दाखवायचे असेल तर त्याला किमान काही पुरावा हवा.
पण बाकी आक्षेप नेम चुकलेले आहेत. धृव राठीचा व्हिडीओ मी आधी पाहिला होता, आणि पिक्चर पाहिल्यावर आज पुन्हा पाहिला. सुचरिता त्यागीचाही पाहिला. अनुपमा चोप्राचा अजून पाहिला नाही. पण ते पाहून असेच वाटले की हा पिक्चर त्यांना खटकला आहे पण नक्की काय खटकले यावर त्यांना नेमके बोट ठेवता आलेले नाही (सुचरिताने तर शेवटी स्वतःच असे सांगितले आहे). कारण त्यांचे बरेच आक्षेप ज्यावर आहेत ते इतरही अनेक पिक्चर्समधे पूर्वी झालेले आहे.
धृव राठीचे २-३ आक्षेप बरोबर आहेत.
- नोटांच्या प्लेट्स देण्याबद्दल. यावर मी वरती लिहीलेच आहे.
- व्हायोलन्सचे ग्लोरिफिकेशन. त्यात त्याने "अॅनिमल" व "वन्स अपॉन अ टाइम इन बॉम्बे" ची उदाहरणे दिली आहेत व त्याला ते ही चुकीचेच वाटले असे त्यांने सांगितले. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. फेअर पॉइण्ट
- प्रत्यक्ष घटनांचे संवाद वगैरे वापरले आहेत. ते वापरायची गरज नव्हती. पिक्चरच्या फ्लो ला काहीही फरक पडला नसता. त्या घटनांचे संदर्भ तरीही पब्लिकला बरोब्बर माहीत असतात. मात्र ते दाखवल्याने नक्की काय डॅमेजिंग होते ते मला समजले नाही.
एक दोन मला नीट कळाले नाहीत
- त्यात मनमोहन सिंगांबद्दल काहीतरी म्हंटल्याचे त्याने सांगितले. मला ते पिक्चरमधे पाहिल्याचे आठवत नाही. मनमोहन सिंगांबद्दल काहीच म्हंटल्याचे लक्षात नाही.
- "वो लोग दंगा करेंगे" - हे त्या सन्यालचे वाक्य. संदर्भ लक्षात नाही पण हे वाक्यही आठवत नाही.
पण त्याचे बाकीचे बरेच आक्षेप गंडलेले आहेत.
१. उद्या सरकार बदलले तर दुसरा कोणीतरी उलटा प्रोपोगंडा काढेल -> काढू दे. यांना हक्क आहे तसा त्यांनाही आहे. आणि सरकारवर आरोप असलेला प्रपोगंडा नसला तरी इतर राजकीय विचारधारा पिक्चरमधून पसरवणारे प्रोपोगंडा आलेलेच आहेत पूर्वीही.
२. रहमान बलोच चा मृत्यू वगैरे घटना व पिक्चर मधे दाखवले यात तफावत आहे. -> असेल. ते ही काही पहिल्यांदा झालेले नाही. त्यात काय विशेष.
३. मुस्लिम विरोध. -> हा मुद्दा त्याने कोठून उकरून काढला कोणास ठाउक. पिक्चरमधे मुस्लिमविरोधी काहीही नाही. टोटली अनावश्यक मुद्दा.
४. भारताच्या रिस्पॉन्सची बदनामी. -> भारताने २६/११ च्या बदल्यात काहीही केले नाही हा २६/११ प्लॅन करणार्यांच्या तोंडचा संवाद आहे. त्याबद्दल बोलताना धृव राठीने तेव्हा पोलिसांनी कशी बहादुरी दाखवली वगैरे यात आणले आहे. पिक्चरच्या सीनमधे त्याबद्दल काहीच नव्हते. भारत हल्ला करेल असा त्यांचा अंदाज होता त्याबद्दल ते आहे. हा सगळा पॉइन्ट त्याने बळंच आणला आहे.
५. भारतीयांचा खरा शत्रू भारतीयच आहेत अशा अर्थाचा एक संवाद आहे त्याबद्दल तो म्हणतो की हा पिक्चर तुम्हाला आम्हाला सर्वांना हे म्हणतोय. -> हे ही उगाच घुमवले आहे. तो संवाद ऐकताना कोणालाही समजेल की हे जनरल पब्लिकला उद्देशून नाही.
६. हा पिक्चर पाहून लोकांना हे सगळे खरेच वाटत आहे हे त्याने पिक्चर पाहून आलेल्या एक दोघांच्या मुलाखती दाखवून क्लेम केले आहे. -> पण हे इतर असंख्य पिक्चर्सबद्दल म्हणता येईल. समाजातील सर्वात बिनडोक लोक पिक्चर कसा समजून घेतील हा बॅरोमीटर धरला तर बरेच पिक्चर रद्द करावे लागतील.
हे धृव राठीबद्दल. सुचरिता त्यागीचा नक्की आक्षेप काय आहे हे मला तर समजले नाहीच, पण खुद्द तिलाही पहिल्या भागात काय खटकले आहे हे दुसरा भाग आल्यावर समजेल असे तीच म्हणत आहे. पिक्चर इंटरेस्टिंग नाही वगैरे कॉमेण्ट्स ठीक आहेत. तिचे मत. इतर लाखोंचे तसे नाही हे आता क्लिअर आहे.
संदर्भः
धृव राठीची क्लिप
https://www.youtube.com/watch?v=wWIJNCU8OOs
सुचरिता त्यागीचा रिव्यू
https://sucharitatyagi.medium.com/dhurandhar-movie-review-sucharita-tyag...
उद्या सरकार बदलले तर दुसरा
उद्या सरकार बदलले तर दुसरा कोणीतरी उलटा प्रोपोगंडा काढेल -> काढू दे. यांना हक्क आहे तसा त्यांनाही आहे. आणि सरकारवर आरोप असलेला प्रपोगंडा नसला तरी इतर राजकीय विचारधारा पिक्चरमधून पसरवणारे प्रोपोगंडा आलेलेच आहेत पूर्वीही. >> हा व्हिडीओ पाहून महिना उलटून गेला. आता इतक्या उशिराने पुन्हा पाहण्याइतका वेळ नाही. पण त्याने मी मोदींच्या विरोधात (कि भाजपच्या) चालवलेल्या मोहीमेचाही निषेध केला होता हे त्यात उदाहरण देऊन सांगितले होते. त्याने अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, इंदू सरकार, इमर्जन्सी, बंगाल फाईल्स हे वाईट सिनेमे असल्याने त्यातला प्रपोगण्डा हा टिकणारा नाही असे म्हटले होते. धुरंधर हुषारीने बनवल्याने बोलावे लागते आहे असे म्हटले आहे. त्याचा स्वतःचा अजेण्डा आहेच. पण त्याला पूर्णपणे मोडीत काढता येत नाही.
उलट लोकांना बिनडोक म्हटल्याने पॉइण्ट प्रूव्ह होतो. मी अजून धुरंधर पाहिला नाही. असे सिनेमे मी बघत नाही. पण नोटबंदी का केली याचे धूर्त जस्टीफिकेशन जर त्यात असेल तर राठी बरोबर आहे.
जर त्यात पाकिस्तानी जल्लोष करत असताना आपला गुप्तहेर खिन्न उभा असतो, त्याच्या चेहर्यावर वेदना असतात असे दाखवले असेल तर कुठलाही हेर असे करणार नाही हे सांगावेसे वाटते. कारण त्यामुळे पकडले जाण्याची शक्यता वाढते. ( हा राठीचा मुद्दा नाही).
प्रश्न हुषार, सेन्सिबल, इंटेलिजंट लोकांचा नाही. सर्वसामान्यांचा (बिनडोक ?) आहे. प्रश्न सिनेमे रद्द करण्याचा नाही तर तो उलगडून सांगण्याचा आहे. त्या उलगडण्यात सुद्धा प्रपोगंडा असू शकतो. तो बाजूला ठेवता येऊन जर त्यातले "सांगणे " एखाद्याला पटत नसेल तर हाच न्याय सिनेमाला पण लागू होतो.
समाजात काही लोक बिनडोक आहेत,
समाजात काही लोक बिनडोक आहेत, त्यांच्यावरून पिक्चर जोखणे बरोबर नाही असा तेथे मुद्दा आहे. लोक इन जनरल बिनडोक आहेत असा नाही. आणि सर्वसामान्य तर नाहीतच. धृव राठीबद्दल मला जनरल तक्रार काहीच नाही. त्याचे पटलेले मुद्देही लिहीले आहेत. पण न पटलेलेही बरेच आहेत. आणि तो जे उलगडून सांगतोय ते पटले न पटले तरी त्याचे मत म्हणून ठीक आहेच. मात्र त्यापुढे जाउन तो कॅन्सल कल्चरही दाखवतोय. हृतिक रोशनला पिक्चर म्हणून आवडला तर नुसते त्याला ज्ञान पाजलेले नाही, तर सर्वच कलाकारांना भाडे के टट्टू वगैरे गौरवले आहे त्याने. ते जरा जास्तच होत आहे. रद्द करण्याचा संदर्भ तेथे आहे.
सिनेमा ज्यांना आवडला नाही, पटला नाही त्यांचे मत जे आहे ते आहे. किमान माझ्या पोस्टमधून त्याविरोधात काही मी लिहीले आहे असे मला वाटत नाही. धृव राठीने त्याच्या रिव्यू मधे ८-१० मुद्दे काढले आहेत. त्यातले मला काही पटले, बरेच पटले नाहीत - मी एकेक मुद्दा लिहून फक्त त्यावर लिहीले आहे.
त्याच्या न पटलेल्या मुद्द्यांत अजून एकः
७. यात भारताने हेर पाठवल्याची खुली माहिती पिक्चरमधे देणे हे भारताच्या हिताचे नाही. -> "हा पिक्चर पाहून नोटाबंदी का झाली हे मला समजले" हा निष्कर्ष जितका भाबडा आहे तितकाच भाबडा विचार या पिक्चरवरून भारतविरोधी देश भारताला अडचणीत आणतील हा ही आहे. उद्या पाकने प्रूफ म्हणून यातली क्लिप दाखवली तर युनोमधे हशा पिकेल.
आधीच म्हटल्याप्रमाणे हा
आधीच म्हटल्याप्रमाणे हा वादविवाद सुरू होऊन आता महिना उलटला आहे. आता ध्रुव राठीचा व्हिडीओ नव्याने पाहण्याची ताकद नाही. त्यामुळे डिटेलमधे त्याने काय सांगितले हे आठवणे अवघड आहे. दुसरे म्हणजे सिनेमा पाहिलेला नसल्याने त्या बाबतीत आंधळा आहे.
तुमचा मुद्दा मला समजतो. समाजात काही लोक कोणताही सिनेमा, भाषण किंवा व्हिडीओ अतिशय वरवर घेतील हे खरेच आहे; पण त्यामुळे “सर्वसामान्य लोक” किंवा “प्रेक्षक” यांना एकसारखे जोखणे योग्य नाही, हे तुम्ही स्पष्ट केले आहे — आणि ते रास्त आहे.
माझा आक्षेप ध्रुव राठीच्या सर्व मुद्द्यांवर नाही, तर अशा सिनेमांच्या प्रभावाबाबत होणाऱ्या चर्चेच्या दिशेवर आहे. सिनेमा रद्द करावा किंवा पाहू नये, असे तो थेट म्हणतो असे नाही; पण त्याच्या मांडणीतून काही ठिकाणी ‘हे पाहणेच धोकादायक आहे’ असा सूर येतो, असे मला वाटले.
तुम्ही म्हणता तसे, चित्रपट आवडला किंवा नाही, यावर मतभेद असू शकतात आणि ते पूर्णपणे योग्य आहेत. तुम्ही स्वतः ध्रुव राठीचे काही मुद्दे मान्य केले आहेत आणि काही अमान्य हीच तर संतुलित भूमिका आहे.
माझा मुद्दा एवढाच आहे की, जर आपण “सर्वात टोकाच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया” हा निकष धरला, तर मग जवळजवळ प्रत्येक राजकीय किंवा सामाजिक चित्रपट प्रश्नांकित ठरेल. त्यामुळे चित्रपटाचा आशय उलगडून सांगणे आवश्यक आहे, पण त्याच वेळी प्रेक्षकांवर अविश्वास दाखवणेही टाळायला हवे.
एकूणच, तुमच्या विश्लेषणाशी मी अनेक ठिकाणी सहमत आहे; काही ठिकाणी मतभेद आहेत, पण ते दृष्टिकोनाचे आहेत, हेतूचे नाहीत. त्यामुळे ही चर्चा “कोण बरोबर” यापेक्षा आपण काय पाहतो आणि कसे समजतो यावर राहावी, असे मला वाटते.
थोडे अवांतर : प्रपोगण्डा मूव्हीज हे गेल्या सात साठ वर्षात जेव्हढे आले तेव्हढे आधी कधी आले होते का ? अजेण्डा असतोच. पण त्याचा हेतू काय हे मला वाटतं त्याच व्हिडीओत आहे . नसेल तर इथे वाचले असेल. तसेच या आधीच्या काळात आपल्याला पटत नाही त्या चित्रपटांना विरोध, घोषणाबाजी असे प्रकार या प्रपोगंड मूव्हीजच्या चित्रपटगृहांच्या बाहेर झाले का ? मग ध्रुव राठीचं मत हे स्विकारायला (काहींना ) हरकत काय ? त्याला ट्रोल केले गेले तसेच इतरांनाही गलिच्छ भाषेत ट्रोल केले गेलेले आहे. धुरंधरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी पत्करलेला हा मार्ग लोकशाहीवादी आहे का ?
ऋत्विक रोशनने जे मत मांडले ते योग्य होते. त्यावर ध्रुव राठीने त्याला ट्रोल केले असेल तर चुकीचे आहे. पण ऋत्विक रोशनला धुरंधरप्रेमींनीही ट्रोल केले आणि आदित्य धरने त्याला सुनावले असे शीर्षक असलेले लेख होते पण मी ते वाचले नाहीत.
धुरंधर बद्दल ऋत्विक रोशन म्हणाला होता कि मी या सिनेमाने इंप्रेस झालो. सिनेमा कसा बनवावा याचे हे उदाहरण आहे. जरी मी अजेण्डाशी सहमत नसलो तरी.
यात मला वावगे दिसले नाही. त्यालाही ट्रोल का केले गेले असेल ? ध्रुव राठीने तर आक्रमक होत मत मांडले. मग तो सुटणार नव्हताच. त्याने ज्या फॅक्ट्स म्हणून सांगितल्या त्या तशा नसतील तर मला त्याचं चुकतंय हे स्विकारायला काहीही अडचण नाही.
पण एक ऐसी सरकार आयेगी असं म्हणताना ते सरकार कोणतं ? मग त्याच विचाराच्या सरकारच्या काळात झालेल्या कारगिल घुसखोरीच्या इंटेल बद्दल काय ? विमान अपहरण प्रकरणाचे काय ? पुलवामा मधल्या स्फोटकांचे काय आणि पहलगाम हल्ल्यातले function at() { [native code] }इरेकी आले कसे या प्रश्नाचे काय ? हे त्याचे प्रश्न अनुत्तरित आहेत. इथे पिक्चरचा अजेण्डा त्याने उघड केला आहे. त्याचा अजेण्डा मनमोहन सरकारची भलावण हा असेल. त्यात ज्या चुका आहेत त्या संदर्भासहीत उघड्या पाडू शकता. पण त्यामुळे त्याचे व्हॅलिड प्रश्न उडवून लावता येणार नाहीत. इति लेखनसीमा.
Pages