पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
पुरोगामी विचारांच्या जेष्ठ लोकांच्या सहजीवनात अजून एक बाब येते. जेष्ठत्वाच्याच नव्हे तर एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे विचारांनी, आर्थिक दृष्ट्याही स्वतंत्र असतात. तसेही सहजीवन ही तडजोडच असते. पुरोगामी विचारांमधे व्यक्ति स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. सहजीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक राहत नाहीत त्या टप्प्यात तडजोडी करत सहजीवन जगणे जाचाचे बनत जाते. चिडचिड वाढते. आतापर्यंत सहन केले आता नाही असा विचार बळावू लागतो. शिवाय तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असता. मग आता तडजोडी करत का जगायचे? आता पर्यंत केल्याच ना! तुमचे उर्वरित ऎक्टिव्ह आयुष्य थोडे असते. ते आपल्या मनाप्रमाणे जगावे असे वाटत राह्ते. त्यात सहजीवनाचे ओझे व्हायला लागते. त्यामुळे उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो. तसेही जेष्ठ ही काही एकजिनसी संकल्पना नाही. पण मुले व आईवडील अशा चौकटीत सोयीसाठी ती एकजिनसी ग्राह्य धरली जाते. व्यक्तिस्वांतंत्र्याचा अतिरेक असे जरी म्हटले जात असले तरी कुठल्या बिंदूपासून तो अतिरेक व कुठपर्यंत तो विवेकी असे काही ठोस उत्तर नसते. ते सापेक्ष आहे.अनेकदा असे होते की आयुष्याच्या उत्तरार्धात पतिपत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. मग एकमेकांची डोकी खात बसतात. तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते. मग मागचे हिशोब निघतात. कधी जुने हिशोब चुकते केले जातात. असे स्कोअर सेटलिंग चालू असते. या वयात घटस्फोट घेणे ही एकमेकांना परवडणारे नसते मग नाईलाजाने संसार रेटत राहतात. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
करोना काळात एक निरिक्षण आहे. हे निरिक्षण जेष्ठांच्या सहजीवनालाही लागू आहे. एकमेकांच्या "स्पेस" वर या सामायिक काळात अतिक्रमण झाले. एकमेकांच्या सहवासात जास्त काळ गेल्याने एकमेकांचे गुणदोष समोरासमोर प्रकर्षाने दिसू लागले. परिणिती एकमेकांना सहन करण्याची वेळ आली. कुटुंबासाठी वेळ दया, घरासाठी वेळ द्या हे जे पुर्वी सांगाव लागायच तेच इथे प्रश्नांकित झाले. घटस्फोट ही बाब असफल वैवाहिक जीवन, विवाहाचे अपयश अशी मानली जाते. त्यामुळे वाढलेल्या घटस्फोटांची संख्या ही विवाहसंस्थेला उतरती कळा किंवा विवाहसंस्थेची गरज कमी कमी होत चालल्याचे लक्षण म्हणता येईल. आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे. त्याचे प्रमाण ही एका वर्गात लक्षणीय वाढते आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा तत्वावरचे हे एक प्रकारचे ट्रायल मॅरेज आहे. तो सामंजस्याने सहजीवन जगण्याचा एक प्रकारचा करार आहे. तो लिखित वा मौखिक/ अलिखित असू शकतो. त्याला कायद्याची मान्यताही आहे. स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टीवर, आर्थिक कमाईवर हक्क न सांगता परस्परांची लैंगिक, वैचारिक, सांस्कृतिक भूक परस्पर संमतीने भागवून सहजीवन जगणे हा हेतु. या सहजीवनाच्या प्रवासात होणार व्यक्तिमत्वातील बदल जर परस्परांना घातक ठरु लागले तर सहजीवनातून बाहेर पडण्याचे प्रत्येकाचे हक्क सुरक्षित ठेवुन हा मार्ग अवलंबला जातो. अजून तरी हा प्रायोगिक अवस्थेत आहे. एकमेकांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश जपत सहजीवन जगणे ही तशी कसरतच आहे. त्यासाठी विवेकी प्रगल्भता लागते. ती आपोआप येत नाही. तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत घ्यावी लागते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शरीराच्या फिटनेसाठी जशा जिम्स आहेत तशा मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
मला वाटते 2021 मधे जेष्ठांचे लिव्ह इन हे सरिता आव्हाड यांचे लोकसत्तेतील पंधरा दिवसांनी चालणारे सदर सर्वांनीच वाचले असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी निरिक्षणे व उदाहरणॆ त्यात दिली आहेत.
वैवाहिक सहजीवन
Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 September, 2023 - 01:44
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आचार्य, 'घोटुल'ची माहिती भारी
आचार्य, 'घोटुल'ची माहिती भारी आहे >> धन्यवाद.
आशिष विद्यार्थीने ५७ व्या
आशिष विद्यार्थीने ५७ व्या वर्षी २४ वर्षांनी लहान महिलेशी लग्न केले. त्यानंतर सोशल मीडीयात चर्चेला उधाण आले होते. त्याच्या पहिल्या बायकोबद्दल लोक बोलू लागले. आता तिचं स्टेटमेण्ट समोर आलं. तिला आता लग्नाच्या बंधनात रहायचे नसल्याने आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुढे वाटचाल करायची असल्याने तिने वेगळे व्हायचा निर्णय घेतला. दोघांनीही मग समजुतीने वेगळे होत त्याचा आदर केला.
तो व्हिडीओ पाहून बायको म्हणाली कि किती समंजस आहेत दोघेही. मी ही पत्नीला म्हटले कि तुझ्याही मनात असा काही विचार असेल तर आताच सांग. ५७ व्या वर्षापर्यंत थांबण्याची काहीही गरज नाही. पण बायकोने ते म्हणणे हसण्यावारी नेले. मी काळजीने पुन्हा विचारल्यावर ती म्हणाली " हुं म्हणजे दुसरी तरूण बायको लगेच घरात आणायला मोकळे".
हे असं असतं. मोठ्या लोकांचं कौतुक होतं, पण आपल्यावर आलं कि असे अर्थ चिकटतात.
धाग्याचा विषय गंभीर वाटला तरी
धाग्याचा विषय गंभीर वाटला तरी रंजक आहे. धन्यवाद प्र घा!
(लग्न करायचेच असेल तर ) स्वाती 2 यांचे सगळे प्रतिसाद पटले.
वरचा रघू यांचा प्रतिसाद वाचून या विषयावरचा गेल्या 1-2 महिन्यात केव्हा तरी पाहिलेला 'The Threshold ' (नीना गुप्ता आणि रजत कपूरचा ) सिनेमा लगेच आठवला. मला आवडला सिनेमा. खरं तर या सिनेमाच्या विषयात एका धाग्याचं potential आहे. पण माझ्याकडे तेवढा वेळ आणि संयम दोन्हीची कमतरता आहे.
सिनेमा संपल्यावर आम्हा नवराबायकोत घनघोर चर्चा झाली.
लग्नाच्या कोणत्याही टप्प्यावर नातं संपवायचं स्वातंत्र्य दोघांनाही असलं पाहिजे या मुद्यावर एकमत झालं तरी सहजीवनामुळे होणारी भावनिक गुंतवणूक आणि त्यामुळे नातं तोडताना होणारी, थकवणारी मानसिक आंदोलनं, मुलं असल्यास त्यांची होणारी परवड ( ती आर्थिक असण्याची गरज नाही ) इ . विषयांवर 'समाधानकारक' उत्तरं सध्याच्या समाज व्यवस्थेत नाहीत हेही अधोरेखित झालं.
इथं अधिक लिहीत नाही. सिनेमा Hulu वर पाहिला होता.
स्वाती_आंबोळे, आपल्या यशस्वी
स्वाती_आंबोळे, आपल्या यशस्वी विवाह या मुद्द्यावरुन मला एक आठवण आली. वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान ज्योतिष विषयी चर्चेच्या हेतुने गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . घटस्फोटितांच्या कुंडल्या व सर्वसाधारण विवाहसौख्य असलेल्याच्या ( नॉन घटसफोटीत) कुंडल्या यात काही वेगळेपण असते का? मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले). आजच्या काळात घटस्फोटाचा योग ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हे जी कुंडलीत शोधावी. वि.म.दांडेकर आज असते तर त्यांनी हा उद्योग केला नसता.
सुखाने नव्हे तर नाईलाजाने
सुखाने नव्हे तर नाईलाजाने नोकरी करणार्या लोकांशी ही तुलना केली तर?
मुलीचं लग्न झाल्यावरही तिचं
मुलीचं लग्न झाल्यावरही तिचं आपल्या आई-बाबांची सतत चौकशी, काळजी करणं, हेसुद्धा समजण्यासारखं. पण जेव्हा प्रेमाचं हे नातं मुलींच्या संसारात सततची, अति ढवळाढवळ करतं तेव्हा?.. अंजली जोशी यांचा आजच्या लोकसत्तेमधील लेख
वळणबिंदू : लेक लाडकी या घरची!
मला तरी ९०% वैवाहिक आयुष्य
मला तरी ९०% वैवाहिक आयुष्य अपयशी दिसते, सर्व माणसं असुखी दिसतात. किमान ५०% लोक जरी वैवाहिक सहजीवनात सुखी दिसले असते तरी मी याला 'बेनेफिट ऑफ डाऊट' दिला असता. >> हे जरा हे जरा exaggerated statement वाटतंय. तुमच्या आसपास असलेली ९०% विवाहीत लोक असुखी आहेत? बरं, घडीभर मानलं की असतीलही ते लोकं असुखी, पण वर्षातले ३६५ दिवस आणि दिवसातले २४ तास आनंदी कोणीच राहू शकत नाही. आणि प्रत्येक दु:खाचा संबंध लग्नबंधनाशी जोडणे चूक ठरेल.
जगभर फिरावं , आवडत्या पार्टनरसोबत रहावं, मुलं होऊ द्यावीत/ न द्यावीत, दत्तक घ्यावीत , प्राण्यांसाठी-पृथ्वीसाठी-समाजासाठी काही तरी करावं, छान करिअर करावं, स्वतः ला आनंद मिळेल ते करावं. रूळलेल्या वाटा निवडून मर्यादित आयुष्य जगू नये. सहन करू नये आणि करायलाही लावू नये. मी त्यांना यातून मोकळं केलंलं आहे. >> रूळलेल्या वाटा सोडून आयुष्य जगण्याने मुलांना आनंद मिळेल याची काय खात्री? उलट रूळलेल्या वाटा सोडून जगण्यासाठी कितीतरी पट जास्त धाडस/ मनाची तयारी लागते. ती तुम्ही तुमच्या मुलांची करून घेतली असेल, करत असाल अशी आशा आहे. ह्या तयारीचाच एक भाग म्हणून तुम्हीसुध्दा असा एखादा जगावेगळा निर्णय घेऊन आणि आपल्या निभतोय का हे तपासून पहा. मुलं आई-वडिलांच्या आयुष्याकडे पाहून, त्यांनी घेतलेल्या निर्णयांकडे बघून खूप काही शिकतात.
मला तरी ९०% वैवाहिक आयुष्य
मला तरी ९०% वैवाहिक आयुष्य अपयशी दिसते, सर्व माणसं असुखी दिसतात. किमान ५०% लोक जरी वैवाहिक सहजीवनात सुखी दिसले असते तरी मी याला 'बेनेफिट ऑफ डाऊट' दिला असता.
बरेच वेळा माणूस आपल्याच चष्म्यातुन जग बघत असतो , ९० टक्के विवाहितांचा पंचनामा करावयाचा म्हणजे पूर्णवेळ हाच जॉब होईल मग स्वतःचा संसार कधी करणार माणूस?
>>कुठल्याही नात्याकडे
>>कुठल्याही नात्याकडे 'म्हातारपणची काठी' म्हणून पाहणं म्हणजे त्या नात्याची कबर आपल्या हातांनी खोदायची सुरुवात करणं.>> हे फारच आवडले आहे!
>>>>> उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो>>
एकमेकांना एकमेकांची गरज आहे हे म्हणताना विवाह झाल्यापासून आत्तापर्यंत एकमेकांच्या गरजा खरेच भागवल्या गेल्या आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो. सहजीवनाचा अभाव असेल, जोडीदाराकडून गरजा पूर्ण होत नसतील किंवा फक्त एकाच पार्टीच्या गरजा पूर्ण होत असतील, ते लग्न केवळ मुलांना स्थैर्य मिळावे म्हणून टिकवलेले असेल तर आता घरटे रिकामे झाल्यावर घटस्फोट घेवून वेगळे होणे धक्कादायक का वाटावे?
नाईलाजाने, दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून एकत्र रहायला भाग पडत होते ते कमी होत आहे, उतारवयात तरी मनासारखी साथ असावी आणि तसे नसल्यास एकटे रहाणे चांगले असा विचार करु शकत आहेत, घटस्फोटाचा स्टिग्मा कमी होत आहे अशा दृष्टीने याकडे बघायचे. आता नात्यात एखाद्याने समोरच्या व्यक्तीला कायम गृहित धरले असेल तर त्याच्यासाठी हे वाटा वेगळे होणे धक्कादायक असणार पण कागदोपत्री आकडेवारी कमी म्हणजे सगळे आलबेल होते आणि आता वाढली म्हणजे खूप विपरीत असे नाही. मन मारुन एकत्र रहाताना काहीतरी किंमत मोजावी लागत होतीच आणि आता तसे जगायचे नाही ठरवल्यावर त्याचीही किंमत मोजणे आले यातून नवे प्रश्न नक्कीच उभे रहाणार पण त्याची उत्तरेही आपणच शोधायची.
मी शाळा-कॉलेजात असताना
मी शाळा-कॉलेजात असताना बस्तरबाबत वाचले होते तेव्हा पहिल्यांदा घोटूलबद्दल कळले. तो काळ म्हणजे गर्ल्स होस्टेलचे मेन गेट रात्री ८ वाजता बंद, यादीतील पुरुष नातेवाईंकांशिवाय इतरांना रेक्टरच्या परवानगीशिवाय भेटायला बंदी वगैरे. त्या पार्श्वभूमीवर घोटूल म्हणजे 'बाब्बो' असेच होते. पण मग आईने ती त्या समाजाची पद्धत आहे, त्यात त्यांचेही कडक नियम आहेत हे समजावून सांगितले होते. पुढे लग्नानंतर काही काळाने जालावर पुन्हा घोटूलबाबत वाचले. काल इथे घोटुलचा उल्लेख वाचल्यावर शोधले तर तो जुना लेख मिळाला.
मन मारुन एकत्र रहाताना
मन मारुन एकत्र रहाताना काहीतरी किंमत मोजावी लागत होतीच आणि आता तसे जगायचे नाही ठरवल्यावर त्याचीही किंमत मोजणे आले यातून नवे प्रश्न नक्कीच उभे रहाणार पण त्याची उत्तरेही आपणच शोधायची.>>>>>> सहमत आहे.पण कुठली किंमत ही आपल्याला परवडणार आहे किंवा नाही याचा अंदाज बांधणे कठीण.
आपल्या अगोदरच्या प्रतिसादात जी कॉम्पॅटिबिलिटी टेस्ट आहे जी दरवर्षी प्रकाशित करतात तिचा असे अंदाज बांधण्यासाठी काही उपयोग होतो का?
अहो सर, ते कॉम्पॅटिबिलिटी
अहो सर, ते कॉम्पॅटिबिलिटी टेस्टच्या मागे सारखे धावू नका ओ. नाहीतर पत्रिकेमागे धावणाऱ्या मुर्खांमध्ये आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही.
लग्न, सहजीवन हा एक जुगार आहे. त्यात यश आहे आणि अपयशही आहे. एकमेकांच्या आवडीनिवडी, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण, उत्पन्न, आर्थिक सुबत्ता हे बघून लग्न ठरवली जातात. (प्रेमविवाह म्हणत नाहीये इथे). त्यामागे हेतू हा असतो की एकाच पातळीवर असलेल्या कुटुंबात लग्न टिकायची शक्यता जास्त असते. (१००% खात्री कधीच नसते). पण शेवटी नवरा बायको एकमेकांना कसे जुळवून घेतात, त्याच्यावरच सगळे काही अवलंबून असते. त्यात पत्रिका आणि कॉम्पॅटिबिलिटी टेस्ट अशा भोंदू गोष्टींची अजिबात आवश्यकता नाही. नवरा-बायको यांनी adjust केले नाही, तर संसार सुखाचा होणार नाही मग भले पत्रिकेचे ३४ गुण जुळले तरीही.
प्र घा,
प्र घा,
मी दिलेल्या लिंकमधे ११ टेस्ट्सची माहिती आहे. प्रत्येक टेस्टमागे काही विचारधारा आहे. मुलांचा कल समजून घेण्यासाठी कल चाचण्या असतात तसेच हे देखील. कल ओळखून अभ्यासक्रम निवडला तरी शेवटी त्यात यश मिळवायचे तर त्यासाठी इतर घटकही कारणीभूत ठरतात तसेच या काँपॅटिबिलीटीचे. तो एक घटक झाला पण एकमेकांबद्दल प्रेम, आदर, विश्वास याचा अभाव असेल तर काय उपयोग? कागदावर काँपँटिबिलीटी स्कोअर हाय असला तरी कुठेतरी एकमेकांना संभाळून घेणे करावे लागणारच आहे. ते करायची तयारीच नसेल तर कसे जमावे?
कुठलेच एकतर्फी नाते दीर्घकाळ टिकत नाही. विवाह बंधनातले नाते फुलवायची, मैत्र जपायची आस दोन्ही पार्टींना हवी. एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास आहे , एकमेकांना संभाळून घ्यायची मनापासून इच्छा आहे पण तरीही विसंवादी सूर उमटतोय, का ते उमजत नाहीये अशावेळी टेस्ट्सच्या मदतीने स्वतःचे आणि जोदीदाराचे व्यक्तिमत्व जाणून घेणे, व्यक्तिमत्वातील फरकामुळे निर्माण होणारा कंफ्लिक्ट समजून घेणे, तो योग्य पद्धतीने सोडवायला शिकणे हे काउंसेलरच्या मदतीने करत नाते सशक्त करता येते.
आमच्या इथे नो फॉल्ट डिवोर्स आहे, लिव - इन स्थिरावलेले आहे आणि तरीही विवाह बंधनातल्या नात्याची-प्रेमाची आस असते. लग्नाचे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो. अगदी लिव-इन बाबतही ते नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या इथे स्थळं बघताना जसे कौटुंबीक परीस्थिती, शिक्षण वगैरे बघितले जाते तसे इथेही 'डेट सुचवताना' शिक्षण, नोकरीचे स्वरुप, कौटुंबिक स्थिती, धर्म/राजकारण कल वगैरे लक्षात घेणे चालते.
अहो सर, ते कॉम्पॅटिबिलिटी
अहो सर, ते कॉम्पॅटिबिलिटी टेस्टच्या मागे सारखे धावू नका ओ. नाहीतर पत्रिकेमागे धावणाऱ्या मुर्खांमध्ये आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही.>>>>>>>>>> मला हाच मुद्दा हवा आहे की गुणमेलन व अशा कॉम्पॅटिबिलिटी टेस्ट यात काय फरक आह?. दोन्हींची विश्वासार्हता किती हे तुलनात्मक पातळीवर अभ्यासायचे आहे. पैकी मी ज्योतिषाच्या गुणमेलनाबद्दल काही विश्वासार्हता नाही हे सांगु शकतो पण मानसशास्त्राबद्द्ल तेवढा आवाका माझा नसल्याने त्या क्षेत्रातील तज्ञांचे मत अजमावण्याचा प्रयत्न असतो.
आपण जिथे राहतो त्या जागेविषयी
आपण जिथे राहतो त्या जागेविषयी नाते बनते, कित्येक रोजच्या गोष्टींशी ऋणानुबंध बनतात ( काहींना मात्र तिथेच नरक आहे असा अनुभव येऊ शकतो, असे अपवाद वगळता).
पाळीव प्राणी असेल तर त्याच्यावर सुद्धा लोक माया करतात.
मित्र म्हणून दीर्घ काळ टिकलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते. (पुन्हा अपवाद वगळता).
तर मग स्त्री आणि पुरुष हे परस्परपूरक घटक असताना, संसार उभा केलेला असताना एकमेकांची सवय होणे, एकमेकांत विरघळून जाणे हे होणे स्वाभाविक आहे. एकमेकांना पसंत असणे नसणे हे मागे पडते.
पण जर असे होत नसेल, दोघांपैकी एक किंवा दोघेही समाधानी नसतील, तडजोडी मान्य नसतील तर त्यांनी नात्यात विष वाढू देण्यापेक्षा लवकरात लवकर वेगळे होणे आवश्यक आहे.
लोक आपल्या नात्यात समाधानी आहेत किंवा नाहीत हे फक्त तेच दोघे सांगू शकतात. रोज भांडणारे नवराबायको एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत असेही दिसते.
नवऱ्याची तक्रार करणारी बायको किंवा उलटे, जेव्हा घरातले वेगळे व्हायला सांगतात तेव्हा कच खातात. तिसऱ्या व्यक्तीकडे तक्रारी करण्याची अनेक कारणे असतात. पण तक्रारी आहेत म्हणजे समाधान नाही असा अंदाज करणे धाडसाचे ठरेल. नवरा बायको हे नातं एखाद्या सस्पेन्स पिक्चर पेक्षा ही किचकट असं डोक्याचं गिरमिट लावून भुगा करणारं असतं.
त्यामुळे लग्नाचे / बिनलग्नाचे एकत्र राहणारे लोक सर्वसाधारणपणे समाधानी आहेत / नाहीत असे कोणतेही सरसकट निष्कर्ष पुरेशा विदाशिवाय काढता येतील असे वाटत नाही.
केस टू केस फरक पडतो.
आचार्य सॉलीड!!! मस्त लिहिलय.
आचार्य सॉलीड!!! मस्त लिहिलय.
कधीकधी एकजण नात्यात आऊट्ग्रो
कधीकधी एकजण नात्यात आऊट्ग्रो होतो, पुढे जातो. त्यामानाने दुसरा मागे पडतो. दोघांचीही कुचंबणा होते.
__/\__ सामो.
__/\__ सामो.
काही माणसांना जशी बोट / बस
अशा मानसशास्स्त्रीय
अशा मानसशास्स्त्रीय चाचण्यांची मर्यादा व वैधता लक्शात घेउन सुद्धा या क्षेत्रातील लोकांनी compatibility test ही विकसित केली पाहिजे असे मला वाटते. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग असूनही गाईडलाईन म्हणुन वापरला जातो तर विकसित होत जाणारे मानसशास्त्र गाईडलाईन म्हणुन का वापरात येवू नये? मी अन्य समाजमाध्यमातून यावर फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करत आहे.interpersonal relationship हा डायनॅमिक मुद्दा मानला तरी व्यक्तिमत्वाचे प्रकार म्हणुन काही मूलभूत गोष्टी असतीलच ना? त्या मूलभूत चौकटी पासून किती दूर जाउ शकतात? गुण मेलन व personality tests हे सगळच मंबोजंबो असेल तर हाही जुगार व तो ही जुगार!
आयपीएच ठाणॆ व पुणे या आनंद नाडकर्णी यांच्या संस्थेत अशी compitability test आणि विवाह्पुर्व समूपदेशन आहे अशी माहिती प्रतिक्रियेत मिळाली. राधानिशाने दिलेल्या लिंकवर अनिल भागवतांच्या विवाह अभ्यास मंडळाची पुस्तके आहेत तीच मला तशी महत्वाची वाटली. त्यात टेस्ट नाहीये पण चाचपणी करण्यास प्रश्नावली आहे.
लग्नसंस्थेला सुद्धा एक
लग्नसंस्थेला सुद्धा एक एक्सपायरी डेट असायला हवी का? हा एक उत्तम व्हिडिओ नुकताच पाहिला. चांगले विश्लेषण केले आहे
https://youtu.be/CV_ONV1l4Rs?si=Vx7XXJjxpEKmAfWV
एक्सपायरी डेट म्हणजे आगीतून
एक्सपायरी डेट म्हणजे आगीतून फुफाट्यात.
एक्सपायरी डेट म्हणजे आगीतून
एक्सपायरी डेट म्हणजे आगीतून फुफाट्यात.>>>>>>>काही बाबत तुम्ही म्हणता तशी परिस्थिती उद्भवते. गाडी 15 वर्षांनंतर पुन्हा 5 वर्षांसाठी रिन्युअल रजिस्ट्रेशन करता येत. उत्तम स्थितीत असेल तर होते. पुन्हाहि पुढे करता येते. भाडेकरु व मालक यांचे परस्पर गरज व संमती असेल तर भाडेकरार किती ही वेळा पुन्हा करता येतो. त्याच अथवा नव्या कंडिशनवर
End result काय आहे?
End result काय आहे?
घरोघरी जाऊन घटस्फोट घ्या म्हणून मोहीम चालवायची का?
रानभुली, व्हिडिओ मध्ये फक्त
रानभुली, व्हिडिओ मध्ये फक्त याबाबतचे मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. एकच एक उत्तर असे काही नाही.
व्हिडिओ पाहीला नाही परंतु हे
व्हिडिओ पाहीला नाही परंतु हे नीरीक्षण आहे की एखाद्या फिल्डमध्ये एक जोडीदार पार पुढे निघून जातो. उदा - इन्टेलेक्च्युअल. सुरुवात सेम फुटिंगवर होते पण एकजण पार क्षितीज ओलांडतो. दुसर्याची ग्रोथ तितकीशी होत नाही. मग एकतर एक जण एकाकी पडतो (खरे तर दोघेही) किंवा एकाची फरफट होते, आत्मविश्वास ढासळतो.
अश्या वेळी एकत्र रहाण्याचा पुनर्विचार करावा पण फायनॅन्स व भावना एकमेकांत इतक्या गुंतून गेलेल्या असतात की त्या रेशीम गाठी सोडविणे अशक्य होउन बसते.
.
मग विवाहात आधीपासूनच सजगपणे , आर्थिक घटक व भावनांची गुंतवणूक काटेकोरपणे मॅनेज करावी का? पण आर्थिक बाबी करता येतील, भावना कश्या मॅनेज करायच्या? आणि तश्या करता येत असतील तर ते नाते कितपत अर्थपूर्ण राहते?
.
सब घोडे १२ टक्के - असा नियम लावता येत नाही.
मग विवाहात आधीपासूनच सजगपणे ,
मग विवाहात आधीपासूनच सजगपणे , आर्थिक घटक व भावनांची गुंतवणूक काटेकोरपणे मॅनेज करावी का? पण आर्थिक बाबी करता येतील, भावना कश्या मॅनेज करायच्या? आणि तश्या करता येत असतील तर ते नाते कितपत अर्थपूर्ण राहते?>>>> मूळात विवाहाची गरज आहे का? असा प्रश्न जेन झी वाले विचारतात. उदा. हा व्हिडिओ पहा. नवीन पिढीच्या रिलेशनशिप कोच लीना परांजपे
https://youtu.be/UhbL53y0ygo?si=z7NjmYKTWFMdwNgj
>>>>>>> जेन झी वाले विचारतात.
>>>>>>> जेन झी वाले विचारतात.
हे त्रिवार सत्य आहे. न्यु यॉर्क मध्ये तर जास्तच. व्हिडिओ पहाते.
Pages