तर मागच्या आठवड्यात लॉटरीच लागली. एखादा नवीन पक्षी त्याहीपेक्षा अगदीच अनपेक्षित पक्षी आला की मी म्हणते लॉटरी लागली! ( गंमत जंमत सिनेमातल्यासारखे
) माझ्यासाठी असा एखादा पक्षी बर्ड बाथवर येणे, इतक्या जवळून न्याहाळता येणे हे लॉटरीसमानच आहे!
तर शनिवारी दुपारी अचानक सिडर वॅक्सविंग (Cedar Waxwing) या पक्ष्याने नव्हे, पक्ष्यांच्या थव्याने बर्ड बाथला भेट दिली! ती दहा पंधरा मिनिटे जादूई होती. अचानक अनपेक्षित आनंदाचा धक्काच. तेव्हा खरं तर बर्ड बाथवर एकाच वेळी ४ गोल्डफिंच धूमाकूळ घालत होते आणि ते बघण्यात, शूट करण्यात मी मग्न होते. आणि एका सेकंदात अचानक तिथे एक Cedar Waxwing अवतरला. तो बहुतेक म्होरक्या असावा, कारण त्यामागोमाग सहा-सातजण आले. काही males आणि काही females किंवा पिल्लं (juveniles) होती. थाळीमध्ये उतरुन, त्यात टाकलेल्या फांदीच्या झुल्यावर बसून त्यांनी मनसोक्त आंघोळ केली!
जमेल तितके मोबाईलमध्ये शॉर्ट्स शूट केले. घाईने ते ठेवून कॅमेर्यातून जमतील तसे फोटोही काढले. (आणखी दोन हात असते तर बरं झालं असतं, सगळी आयुधं एकाच वेळेला वापरता आली असती. बर्ड वॉचिंगमध्ये ऐसे मौके बार बार नही आते!)
कमाल म्हणजे, ती वेळ काय स्पेशल होती माहित नाही, पण त्या काही मिनिटांमध्ये बाकी प्रकारच्या पक्ष्यांनाही अगदी तेव्हाच बर्ड बाथवर यायचं होतं. काही हाऊसफिंच होतेच पण त्याच्या काही मिनिटे आधी दोन अमेरिकन रॉबिन्स येऊन गेले. आता ते कसे काय आले हे नवलच आहे कारण आता ऑक्टोबरच्या शेवटाला बहुतेक रॉबिन्सनी दक्षिणेकडे स्थलांतर केले असणार. हे शेवटी राहिलेल्या बॅचमधले असतील कदाचित. हे कमी की काय म्हणून नेमक्या त्याच वेळेला दोन प्रकारचे Warblers येत होते - Yellow-rumped आणि Townsend's warbler (female). (आता टाऊनसेन्ड्ज हे एक स्वतंत्र देखणे प्रकरण आहे. Warblersबद्दल स्वतंत्र लिहिन तेव्हा फोटोवरुन कल्पना येईल). तर ते थाळ्यांच्या आसपास, वर फांदीवर नाचत होते की कधी खाली उतरायला मिळतंय. पण Waxwingsच्या थव्यामध्ये पाचर मारता येत नव्हती बहुतेक. गोल्डफिंच मात्र बिनधास्त Waxwingsच्या अगदी बाजूला धीटपणे उतरुन आंघोळ करत होते. हे सर्व शॉर्टसमध्ये कैद केलेय. नक्की बघा.
https://youtube.com/shorts/XunUeJjSuZI?si=0X7fAu8xBWVmkiSD
https://youtube.com/shorts/Q-8eLPtObDQ?si=J_1EHqmZUEyt8mOf
Cedar Waxwing हा पक्षी दिसायला गंमतीशीर आहे. देखणाही. डोळ्यांवर काळी फित बांधली असावी तशी कापडी पट्टी बांधल्यासारखे किंवा गॉगल्स घातल्यासारखे दिसतात ते. शेपटीचे टोक पिवळेजर्द दिसते आणि पंखांच्या शेवटाला काही लाल ठिपके! डोक्यावर तुरा.
अशी लॉटरी सारखी लागत नाही. मागे एकदा मी घरी नसताना घरच्या मेंबर्सना लागली होती जेव्हा Western Tanager (Male) हा सुंदर पक्षी येऊन गेला होता. सिडर वॅक्सविंग्ज आले हेही आश्चर्यच, कारण हे फळं, खास करुन बेरी टाईप फळं खाणारे पक्षी आहेत आणि माझ्या आजूबाजूला अशी झाडेही नाहीत बहुतेक. आता परत येतील की नाही, माहित नाही, पण हा पाण्याचा स्रोत ते विसरले नाहीत तर बरं!
माझी पक्ष्यांची लिस्ट आता आणखी एकाने वाढलीय!
Happy birding!
क्रमशः
या सिरीजमधील आधीचे लेखः
छंद पक्षीनिरीक्षणाचा - Window birding!
पक्षीनिरीक्षण - फिंच!
पक्षीनिरीक्षण - Hermit Thrush आणि अमेरिकन रॉबिन
वा… किती मस्त… अशी लॉटरी
वा… किती मस्त… अशी लॉटरी लागणे भाग्यच म्हणायला हवे.
मस्त!
मस्त!

अश लॉटर्या वारंवार लागोत!
वा मस्त पक्षी आणि पक्षी
वा मस्त पक्षी आणि पक्षी निरिक्षण
अमेझिंग. वॅक्सविंगचा थवा मी
अमेझिंग. वॅक्सविंगचा थवा मी कधीच पाहिलेला नाही. एका दुक्का च पाहिला आहे.
तुमचा बर्ड बाथ जामच हिट दिसतोय पक्षांमध्ये
मस्तच
मस्तच
मराठीत खाटीक म्हणून पक्षी आहे तो आठवला डोळ्याजवळची पट्टी बघून
झकासराव खाटिक हा पक्षी, सरडे
झकासराव खाटिक हा पक्षी, सरडे वगैरे मारुन म्हणे टांगून ठेवतो ना झाडावर, तारेवर वगैरे. आणि पुरवुन वापरतो. म्हणुन खाटिक म्हणतात ना त्याला. किती ती उद्योगी वृत्ती.
वर्षा सेडर वॅक्स्विंग आपण
वर्षा, सेडर वॅक्स्विंग आपण एकदा फिरताना , न्यु जर्सीत पाहीलेला स्मरतो. इकडे कधी येशील? परत फिरता येइल. आमच्या कडे एका ठिकाणी कार्डिनल्स्ची अक्षरक्षः कॉलनी आहे. सपासप इकडुन तिकडे सुळक्या मारताना दिसतात.
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.

>>तुमचा बर्ड बाथ जामच हिट दिसतोय पक्षांमध्ये
>> मराठीत खाटीक म्हणून पक्षी आहे तो आठवला डोळ्याजवळची पट्टी बघून
अरे हो की, shrike ना? हो त्याच्या डोळ्यावर पण पट्टी असते खरी..
धनश्री, आपण वॅक्सविंग कधी पाहिला होता ते लक्षात नाही माझ्या पण ब्ल्यू जे दिसला होता आपल्याला अचानकच, कुठे तेही आठवतेय मला.
पुढच्या वर्षी आपण कॉफी विथ बर्डींग करुच. कार्डिनल्स इथे मी मिस करते अगदी.
हा लेख, फोटो , व्हिडिओ पण छान
हा लेख, फोटो , व्हिडिओ पण छान!
हो
हो
Shrike
सामो
ही मलाही।नवीन माहिती
सुंदर!
सुंदर!
वा मस्त आहे हा पक्षी. खरंच
वा मस्त आहे हा पक्षी. खरंच वॅक्स लावल्यासारखी तुकतुकीत कांती आहे.
वर्षा, फोटो व व्हिडिओ दोन्ही
वर्षा, फोटो व व्हिडिओ दोन्ही मस्तच आहेत. आपण बर्ड बाथ ठेवणे व त्याचं उद्दिष्ट साध्य होणे यासारखा दुसरा आनंद नाही.
मी पण मर्लिन वापरते खूप. एखादा फोटो टाकून पण आयडी शोधता येतो त्यावर. वेगवेगळ्या देशांचे, प्रांतांचे बर्ड पॅक्स आहेत त्यावर ते डाऊनलोड करायचे.
धन्यवाद अमित, सायो, आडो.
धन्यवाद अमित, सायो, आडो.
>>आपण बर्ड बाथ ठेवणे व त्याचं उद्दिष्ट साध्य होणे यासारखा दुसरा आनंद नाही.
नक्कीच.
>>वेगवेगळ्या देशांचे, प्रांतांचे बर्ड पॅक्स आहेत त्यावर ते डाऊनलोड करायचे.
ओह, मी आता चेक केलं अॅप मध्ये. डाऊनलोड बर्डज भागात इंडीया ऑल पासून, अंदमान निकोबार, नॉर्थ, साउथ, नॉर्थइस्ट, नॉर्थवेस्ट असे भाग दाखवत आहे. @साधना, हे करुन पाहिलं आहेस का? अर्थात तो ऑफलाईन कंटेट आहे असं म्हणताहेत.
वा! काय मस्त अनुभव आणि भारीच
वा! काय मस्त अनुभव आणि भारीच लिहीलायस. फोटो तर फार मस्त.
बाकीचे लेखही वाचते.
सध्या थंडी फारच असली तरी
सध्या थंडी फारच असली तरी कंटाळा न करता बर्डींगसाठी जातेय. मागच्या आठवड्यात माझ्या नेहमीच्या ट्रेलवर एका झाडावर सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात पिसे साफसूफ करत बसलेले सिडर वॅक्सविंग दिसले. चिक्कार वेळ, अगदी एकाचजागी, भरपूर सेल्फ ग्रूमिंग चालले होते त्यांचे. एरवी पक्ष्यांचे फोटो काढायचे म्हटले की बहुतेक पक्षी काही सेकंद, फारतर मिनिटभर चांगले दर्शन देतात पण इथे म्हणजे चांगली पंधरा वीस मिनिटे हे आपले तिथेच! बरं बर्यापैकी लांब होते त्यामुळे झूम केल्यावर फारच हलत होते फोटो. घरी ट्रायपॉड असूनसुद्धा न आणण्याचा आळशीपणा चांगलाच भोवला. कसेतरी फोटो काढले.
आज त्याच ठिकाणी पुन्हा सेल्फ ग्रूमिंग सेशन होताना दिसले आणि भारी वाटले कारण आज ट्रायपॉड होता! त्यामुळे जरा बरे फोटो काढता आले!
छान!
छान!
वर्षा इतके अमूल्य देखणे फोटो
वर्षा इतके अमूल्य देखणे फोटो काढतेयस , स्वत"चे नाव घाल ना त्यांवर. म्हणजे अग्ली नको पण कोपर्यात तरी.
-------
ते निसर्गाच्या गप्पा वरचे फोटो प्लीज इथे टाक.
सेडर विंग ची साफसफाई चाललेली
सेडर विंग ची साफसफाई चाललेली आहे. मी असे वाचलेले की सर्व पक्ष्यांना, प्रत्येक केस विंचरावा लागतो. पिसांच्या शेवटी ज्या ऑइल ग्लँडस असतात त्यातील ऑइल पिसां वर लावतत ते - त्यामुळे पिसे वॉटर प्रुफ होतात, पिसांचे कंडिशनिंग होते, उडण्यात सफाई येत व पॅरेसाईट (परजीवी घटक) व बॅक्टेरिया निघून जातात.
छान आहे लेख आणि फोटो!
छान आहे लेख आणि फोटो!
आमच्या बॅकयार्ड मध्ये मलबेरीचे झाड आहे. मला त्याची फळे खायला प्रचंड आवडतं . त्यामुळे झाड अगदी लहान असताना माझे या पक्ष्यांशी चांगले भांडण व्हायचे. आता झाड मोठे झाले आहे. ते फळांनी लगडलं की शेकडो सिडर वॅक्सविंग्ज च्या झुंडी दिवसभर अंगणात असतात. आता ते वरची फळं खातात आणि मी खालची!
बाकी तुम्ही लकी आहात, इतके वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. मी डलास जवळ राहते, शहरी भाग असल्याने सिडर वॅक्सविंग्ज सोडल्यास आमच्या नशिबी नेहमीचे ब्लू जे, कार्डिनल , रेड हाऊस फिंच , कबुतरं, मॉकिंगबर्ड आणि कावळे वगैरे. कधी वूडपेकर, कॅरोलिना चिकाडी . क्वचित गोल्ड फिंच. bewicks रेन एकदाच बघितली.
माझा अतिशय लाडका पक्षी म्हणजे सीझर टेल्ड फ्लाय कॅचर . दिसला की मूड छानच होतो एकदम
धन्यवाद छंदी.
धन्यवाद छंदी.
धनश्री, वॉटरमार्क ह्म्म मला कंटाळा आहे खरं म्हणजे त्या सोपस्कारांचा,
>>मी असे वाचलेले की सर्व पक्ष्यांना, प्रत्येक केस विंचरावा लागतो. पिसांच्या शेवटी ज्या ऑइल ग्लँडस असतात त्यातील ऑइल पिसां वर लावतत ते - त्यामुळे पिसे वॉटर प्रुफ होतात, पिसांचे कंडिशनिंग होते, उडण्यात सफाई येत व पॅरेसाईट (परजीवी घटक) व बॅक्टेरिया निघून जातात.
वा, भारी माहिती!!
>> ते निसर्गाच्या गप्पा वरचे फोटो प्लीज इथे टाक.
अगं हा धागा फक्त सिडर वॅक्सविंगचा आहे म्हणून इतर पक्ष्यांचे इथे नाही टाकले.
स्नेहा१, छान वाटले तुमचा प्रतिसाद वाचून, धन्यवाद!