एटीकेट्स vs कम्फर्ट – ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसण्यास मनाई.

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 October, 2025 - 15:39

सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.

तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.

सविस्तर बातमी ललनटॉप वर इथे बघू शकता.
https://youtu.be/h-Cme3L3aTw?si=ScpSSvBxSLRJSE5O

त्या महिलेचा ओरिजनल व्हिडिओ इथे बघू शकता.
https://youtube.com/shorts/oBOjfrM6xsk?si=NkbdeQnDi9RiAH-8

वादाला दोन बाजू आहेत.

पहिली बाजू –

जर एखादा ग्राहक पादत्राणे काढून मांडी घालून खुर्चीत जेवायला बसत असेल, जेवतानाची ती पोजिशन त्याला कंफर्टेबल वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याला तो हक्क मिळायला नको का?

काहींची उंची कमी असल्याने पाय खाली टेकत नाहीत किंवा ताणले जातात आणि पोजिशन अजून अनकंफर्टेबल होते त्यांना मांडी घालून बसायचा पर्याय एखादे फाईव्ह स्टार हॉटेल देऊ शकत नसेल तर काय फायदा पैसे खर्च करायचा?

काहींच्या मते पादत्राणे काढले तरी पाय बसायच्या सीटवर ठेवणे चूकच. पण मांडी घालून बसतो तेव्हा पायाचे तळवे आडवे होतात आणि ते सीटवर टेकवले जात नाहीत असे एक निरीक्षण.

आणखी एक भावनेला हात घालणारा मुद्दा म्हणजे मांडी घालून जेवायला बसणे ही भारतीय बैठक आहे. भारतीय परंपरा आहे. आज यालाच भारताच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हे एटीकेट्समध्ये बसत नसल्याचा शिक्का मारला जातोय हे दुर्दैवी आहे.

जर ती महिला बडे बाप की बेटी किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील असती तर...

दुसरी बाजू -

तुम्ही ज्या जागी जाता तिथले नियम तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळू शकत नसाल तर तिथे जाऊच नये.

अर्थात असे नियम तिथे लिखित स्वरूपात आहेत की नाही याची कल्पना नाही. तसेच त्या नियमांची ग्राहकांना आधीच कल्पना देण्यात येते का याचीही मला कल्पना नाही.

पण एखादी खाजगी जागा आपले शिष्टाचाराचे नियम लाऊ शकते हा मुद्दा काही अंशी पटतो.

मी काही अंशी म्हटले आहे कारण मनाने मला पहिलीच बाजू जास्त जवळची वाटते.

सार्वजनिक जागी तारतम्य बाळगावे हे माझेही मत आहे. पण मांडी घालून बसणे हे तारतम्य सोडून वागणे मला वाटत नाही. अर्थात याबाबतीत काय चूक आणि काय बरोबर हे आपण ज्या वातावरणात वाढलो, आणि ज्या निकषांची फुटपट्टी लाऊन जगलो त्यावर बरेचदा अवलंबून असते. त्यामुळे कित्येकांना हे मॅनर्सलेस वाटू शकेल. पण तटस्थ दृष्टीने पाहता जी आपली मूळ परंपरा आहे तीच आधुनिक एटीकेटच्या निकषावर चुकीची ठरते याचा खेद हा वाटतोच.

असो, काहीना हा एकूणच त्या महिलेचा स्टंट वाटत आहे. तिने जाणून बुझून वाद होईल हे बघितले असेही काही म्हणत आहेत.
असेलही.
हल्ली काहीही शक्य आहे. पण ताज मॅनेजमेंटने घेतलेला आक्षेप तर खरा होता.
जर तो तुमच्या बाबतीत घेतला गेला असता तर तुम्हाला तो खटकला असता का?
तुम्ही ताजमध्ये जेवायला गेले असताना तुमच्या शेजारच्या टेबलवर कोणी खुर्चीत मांडी घालून जेवायला बसले असते तर तुम्ही स्वतः त्यावर आक्षेप घेतला असता का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथली चर्चा आणि निष्कर्ष उद्बोधक आहेत. वाचून वाटले की Actually कुठेच कुठलेच नियम नसावेत, असलेच तर न पाळण्याची फ्लेक्सिबिलीटी सर्वत्र हवी.

मस्त मोकळेढाकळे रहावे सर्वांनी. फालतू नियम करून किती छळ चालवलाय ताजवाल्यांनी. एकतर हॉटेल सुरु करून १२२ वर्ष झाली तरी देशाचा साधा कायदा समजला नाहीए त्यांना आणि तोंड वर करून मांडी घालून बसू नका असे सांगतात म्हणजे काय ? शोभतं का ?

मांडीताईंना आपला फुल्ल सपोर्ट. मांडीताई आगे बढो,हम तुम्हारे साथ है 👍

सारे नियम तोड़ दो, दिल से दिल को जोड़ दो.

चप्पल घातल्यावर पायाला धूळ लागते. चप्पल घालणारी व्यक्ती ही धुळीतून येते मग ती सीईओ का असेना. शूज घातल्याने शूजला धूळ लागत नाही.

कांगावा : शूज ना धूळ लागत नाही असा दावा कुणीही करणार नाही. चप्पल घालून ( मग ती सोलापुरी असो वा कोल्हापुरी) येणे व मग ती काढून मांडी (सॉरी पद्मासन ) घालून खुर्चीवर बसणे objectively किळसवाणे आहे. त्यानंतर त्या खुर्चीवर बसणर्‍या पुढच्या कस्टमर वरही अन्यायच आहे. तिथे येणारी इतर ग्राहक ही एक अँबियन्स ची अपेक्षा करून येत असतात. बूट मोजे घालून येणे व मग ते काढून मांडी घालून बसणे हेही किळसवाणेच आहे.

रेड सिनेमात अजय देवगणच्या पायात चप्पल असते म्हणून हॉटेल का क्लब मध्ये प्रवेश नाकारल्याचे दाखवले आहे ना? >>> भ्रमर, बेंगलुरू मधे एका आयटी इंजिनियरच्या वडलांंना गावंढळ आहेत म्हणून एका मॉलने प्रवेश नाकारला होता. त्यांना माफीनामा लिहून द्यावा लागला पोलिसांना.
https://www.youtube.com/watch?v=oY3zBStL-y0

चप्पल घालून ( मग ती सोलापुरी असो वा कोल्हापुरी) येणे व मग ती काढून मांडी (सॉरी पद्मासन ) घालून खुर्चीवर बसणे objectively किळसवाणे आहे >> मागचे प्रतिसाद वाचा विकू. कोल्हापुरातल्या पंचतारांकित हॉटेलना ती किळसवाणी वाटली नाही. शूज किळसवाणे नसतात हे खूप नवीन शिकायला मिळालं. धन्यवाद.

बाकी लग्नसमारंभ आणि हॉटेल यातल्या साम्याबद्दलचे आभार मानायचे राहून गेले होते त्याबद्दल क्षमस्व ! मांडी घालून जेवणे हे किळसवाणे ते ही भारतात आहे ही भर देखील ज्ञानात पडली. आपल्या देशात हा कन्सेप्ट माहितीच नव्हता. जपानमधे हॉटेलमधे मांडी घालून बसायची सोय असते तिथे भारतीय ग्राहकाने आक्षेप घेतला तर सर्वांनाच बाहेर काढत असतील ना ?

मांडी घालून बसू नका आणि चप्पल घालून येऊ नका हे पैसे देऊन सेवा घेणार्‍या ग्राहकाला सांगणे कायद्याला धरून नाही.
>>> अगेन, फाईन डायनिंग रेस्टॉरंटस् किंवा क्लब्स पैसे फक्त सेवेचे घेत नाहीत. म्हणून ती स्वतःला एक्सक्लुझिव्ह म्हणवून घेतात.

ग्राहकांचा भेदभावरहित सेवा प्राप्त करण्याचा अधिकार यावर कायद्याचा किस पाडला जाऊ शकतो. पण एक विशिष्ट वर्ग (धनिक नव्हे, आमचे नियम पाळणारा) ग्राहक म्हणून हवा असणे हा प्रायव्हेट सेवा देणाऱ्यांच्या अधिकाराला कसं नाकारणार? आमचे इतर ग्राहक दुरावतील या आक्षेपाला कायदेशीर उत्तर काय असू शकेल?

बंगलोर केसला भाषा न येणाऱ्या नॉर्थ इंडीयन वॉचमनने साऊथ इंडीयन माणसाला प्रवेश नाकारण्याचा राजकीय ॲंगलही होता.

हेमाशेपो

मांडी घालून जेवणे किळसवाणे नाही तर तसे बसण्या बाबतचे जे संकेत आहेत ते न पाळल्याने, वर्तन-वावर सुसंगत नसल्याने ते किळसवाणे होते. आता ते तसे वाटत नसेल तर मग बोलणेच खुंटले.

माझे मन, मागच्या पानावरच्या कमेण्ट्स वाचाल का प्लीज ? ग्रोकने दिलेली माहिती.
बंगलोर केसला भाषा न येणाऱ्या नॉर्थ इंडीयन वॉचमनने साऊथ इंडीयन माणसाला प्रवेश नाकारण्याचा राजकीय ॲंगलही होता. >> अजूनही काही हॉटेलमधे इथे सर्व धर्माच्या, प्रांताच्या लोकांना प्रवेश दिला जातो अशी पाटी दिसते. तो कायदा बदलला आहे का ? भारतात लोक धोतर नेसतात म्हणून त्यांना प्रवेश नाकारणे चमत्कारीक नाही का ?

जपानचं उदाहरण यासाठी दिलेलं कि त्यांच्यावर ब्रिटीशांचे राज्य नव्हते.
मांडी घालून बसणे हे त्यांना किळसवाणे वाटत नाही. आपल्याकडे जसे काही कुणीच मांडी घालून बसत नव्हते असे का वाटतेय ?
कंटाळा आला.

पुढचा पाढा:

MF Hussain म्हणून एक प्रख्यात चित्रकार होते. ते आयुष्यभर अनवाणीच फिरत. श्रीमंत होते, ताजमधेही जातच असणार. मांडी घालून जेवायचे की नाही ते नाही माहित. त्यांना नाही कधी बंदी केली ताज हॉटेलवाल्यांनी ? तेव्हां कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?

की श्रीमंतांना/ celebrities ना / मुस्लिमांना / चित्रकारांना (आवडीप्रमाणे एक पर्याय निवडा) नियमातून खास सूट असते ?

सर्व कमेंटस् वाचल्या आहेत. ग्रोक इतरांनी दिलेली माहिती कोलेट करते. माहिती पुरवणारे सर्व कायदेतज्ञ नसतात.

ही मात्र खरोखर शेवटची पोस्ट.

ग्रोक इतरांनी दिलेली माहिती कोलेट करते. माहिती पुरवणारे सर्व कायदेतज्ञ नसतात. >> ग्रोक रेफरन्सचे नंबर्स देते. त्यावर क्लिक केले कि रेफरन्स बघता येतात.

ग्रोकच्या पेजवर येतात ते. ते डोक्यावर असतात टेक्स्टच्या. सिलेक्ट ऑल केल्यावर त्यात ते येत नाहीत.
हवे असले तर देईन इथे (स्किप करणार असाल तर नाही देत Lol )

माझ्याकडून आज उपरोधिक प्रतिसाद गेले. चांगल्या चर्चेत असे प्रतिसाद आलेले आवडत नाहीत, पण प्रत्त्युत्तर म्हणून का होईना हा काही जीवनमरणाचा प्रश्न नाही हे माहिती असूनही माझ्याकडूनही तीच चूक झाली. त्यामुळे दुखावल्या गेलेल्या सर्वांची क्षमा !

## कायदेशीर नोटीस (Legal Notice)

**To:
** The Management of [ Maayboli Five Star Hotels ]

पाठवणारा (Sender)

Street Food Customer
पत्ता: Maayboli
संपर्क क्रमांक: ___________________
दिनांक: ___ / ___ / 20___

प्राप्तकर्ता (Receiver)

The General Manager / Managing Director
[Hotel Name] (Five Star Category)
पत्ता: ___________________________

विषय: भारतीय पारंपरिक वेशभूषा (धोतर / पायजमा / कोल्हापुरी चप्पल / शेरवानी) घातल्यामुळे प्रवेश नाकारल्याबद्दल कायदेशीर नोटीस

महोदय,
मी, खाली सही करणारा / करणारी, आपल्या हॉटेलमध्ये दिनांक ___ रोजी जेवणासाठी आलो होतो / आले होते. त्या वेळी माझ्या पारंपरिक भारतीय वेशभूषेमुळे (उदा. धोतर, शेरवानी, किंवा कोल्हापुरी चप्पल) मला प्रवेश नाकारण्यात आला.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की “या वेशभूषेत प्रवेश देणे हॉटेलच्या ड्रेस कोड नियमाविरुद्ध आहे.” असा प्रकार हा **भारतीय संविधानातील कलम १४ व १५(२)** चे उल्लंघन असून, तो **सांस्कृतिक भेदभाव (Cultural Discrimination)** आहे.

तसेच, हॉटेल हे “public accommodation” असल्याने ते सर्व नागरिकांना समानपणे सेवा देण्यास बांधील आहे. म्हणूनच माझ्याशी केलेली वागणूक ही अन्यायकारक, भेदभावपूर्ण व **ग्राहक संरक्षण कायदा, २०१९** अंतर्गत “Deficiency in Service” या श्रेणीत येतदय्,अ

मागणी:

१. माझ्याकडे त्वरित लेखी दिलगिरी व्यक्त करावी.
२. हॉटेलच्या ड्रेस कोडमध्ये पारंपरिक भारतीय पोशाखांना स्पष्ट मान्यता द्यावी.
३. अन्यथा, मला ग्राहक आयोग, मानव अधिकार आयोग किंवा योग्य न्यायालयात कायदेशीर कार्यवाही करावी लागेल.

वेळ मर्यादा:

ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर **१५ दिवसांच्या आत** लेखी उत्तर अपेक्षित आहे. उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील.
सादर,

(स्वाक्षरी)
[आपले पूर्ण नाव]
दिनांक: ___ / ___ / 20___
स्थान: __________________

टीप: ही नोटीस **ChatGPT (GPT-5) कडून सार्वजनिक माहितीच्या उद्देशाने तयार केलेली नमुना प्रत आहे. प्रत्यक्ष कायदेशीर वापरासाठी वकीलाचा सल्ला घेणे योग्य राहील.
------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ :
Indian Hotel Association vs. State of Maharashtra (1991) ( हॉटेल पब्लिक प्लेस असल्याचे मान्य )

Bijoe Emmanuel vs. State of Kerala (1986) ( वैयक्तिक किंवा सांस्कृतिक अभिव्यक्तीला (expression) संविधानिक संरक्षण )

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act, 2019) : ग्राहकाला सेवा नाकारणे (deny service) हे “Deficiency in Service” किंवा “Unfair Trade Practice” ठरू शकते. त्यासाठी ग्राहक खालील ठिकाणी तक्रार करू शकतो:

District Consumer Commission
State Consumer Commission
किंवा National Consumer Commission (NCDRC)
जर हॉटेलने सांस्कृतिक पोशाखावर बंदी घातली असेल, तर तक्रार करता येते.
धोतर, पायजमा, कोल्हापुरी चप्पल हे पारंपरिक, सभ्य व स्वच्छ पोशाख मानले जातात.

यावर बंदी घालणे हे सांस्कृतिक भेदभाव (Cultural Discrimination) ठरेल.
हॉटेल "smart casuals only" म्हणू शकते, पण जर धोतर परिधान केलेला व्यक्ती स्वच्छ आणि सुसंस्कृत पद्धतीने असेल, तर प्रवेश नाकारणे अवाजवी व भेदभावपूर्ण ठरेल.

शेरवानी
शेरवानी ही औपचारिक (formal) भारतीय वेशभूषा आहे.
अशा कपड्यांना बंदी घालणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान ठरू शकतो.
हॉटेलने “formal wear only” असा नियम ठेवून शेरवानी नाकारणे, हे unreasonable and arbitrary ठरेल.

खाजगी मालमत्ता व सार्वजनिक सेवा यातील फरक

फाईव्ह-स्टार हॉटेल हे खाजगी मालमत्ता असते, पण त्याची सेवा (restaurants, banquet halls, clubs इ.) सार्वजनिक वापरासाठी खुली असते.
त्यामुळे हॉटेल काही नियम ठेवू शकते —
उदा. “No shorts/slippers in fine-dining area”
“Formal wear required after 7 PM”

पण हे नियम सर्वांवर समानपणे लागू झाले पाहिजेत, आणि सांस्कृतिक किंवा पारंपरिक ओळखींवर आधारित भेदभाव करू शकत नाहीत.

स्वाती,
एखाद्या फंक्शन बाबतचा ड्रेस कोड पाळण्याचा मुद्दा योग्य आहे. तिथे संकेतभंग टाळणे हेच योग्य.
आपल्याकडे लग्नात कोणी ड्रेस कोड सांगत नाही. उच्चभ्रू समाजाची कल्पना नाही पण मध्यमवर्गीयात तरी असे करत नाहीत.

पण ते सारे वेगळेच झाले. इथे मुद्दा थोडा वेगळा आहे. हे एखाद्या फंक्शन पुरते नाहीये.

तर अश्या फाईन डाईन आणि रेस्टॉरंट सारख्या जागी नियम असावेत का? किंबहुना कितपत असावेत? आणि त्याचे पालन करणे ऐच्छिक असावे की सक्तीचे असावे हा मुद्दा आहे.

आणि हे नियम ठरवताना नक्की काय बघितले जाते? कुठला टारगेट ग्राहकवर्ग बघितला जातो? त्यातील बहुतांश लोकांना नक्की हे असेच नियम हवे आहेत हे कसे ठरवले जाते?

म्हणजे असे तर नाही ना की त्यातील बहुतांश लोक सुद्धा हे नियम आहेत म्हणून नाईलाजाने त्यांची स्वतःची इच्छा नसताना पाळत आहेत आणि हे असे नियम असावेत असे त्यातील फक्त मुठभर लोकांनाच वाटत आहे.

आणि त्यातही मग जर अतिधनाढ्य लोकांसाठी सूट मिळत असेल तर हे पक्षपातीच झाले.

ग्रोक इतरांनी दिलेली माहिती कोलेट करते. माहिती पुरवणारे सर्व कायदेतज्ञ नसतात.
>>>>>>>
मायबोलीवर चर्चा करणारे तरी कुठे सारे कायदे तज्ञ असतात Happy

रानभुली यांनी एआई वापरून दिलेली माहिती उपयुक्त असेल तर काही गैर नाही. पण पॉइंट ऑफ व्यू प्रत्येकाचे स्वतःचे असावेत. ते जाणून घेण्यातच खरी चर्चा आहे.
पण त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की,
"व्हिडीओ नाही पाहिलेला, इच्छाही नाही बघायचा."

जर बातमीच जाणून घेतली नाही तर मत कसे तयार होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ जरूर बघावा, आणि मगच त्यानुसार एआय माहिती शोधावी.

जर बातमीच जाणून घेतली नाही तर मत कसे तयार होणार हा प्रश्न आहे >>> बातम्या टेक्स्ट स्वरूपात पण आहेत. प्रत्येक गोष्ट मायबोलीवर आणायला हरकत नाही, पण धागाकर्त्याने दर वेळी स्वतःचे मोघम मत द्यायचं आणि सर्वांनी माहिती शोधायला लागायचं आणि आपसात रणकंदन करायचं हे पटत नाही. प्रत्येक वेळी असे व्हिडीओ पाहिले तर फीड मधे फक्त तेच राहील. त्यावरचं नियंत्रण जाईल. अशा प्रकारच्या वादावरचा हा शेवटचा धागा आहे याची काही गॅरण्टी पण नाही.

अजूनही हॉटेलची बाजू आलेली नाही, आणि आपण एकाच बाजूवर बोलतोय. त्यातही ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीत सभ्य आहेत त्या किळसवाण्या आहेत असा निष्कर्ष काढला आहे तो कशाच्या जोरावर हे समजलेलं नाही. स्वच्छतेचा मुद्दा किंवा सुरक्षिततेचा मुद्दा हॉटेलने दिल्याचे अजून माहिती नाही. ते ग्रोकच्या माहितीत होतंं.

जपानमधे अशीही हॉटेलं आहेत जिथे पाश्चिमात्य बिझनेसमन येतात. त्यांना पाश्चात्य जगाशी व्यवसाय करायचा असल्याने त्यांच्या सभ्यतेच्या कल्पना सुद्धा त्यांना मान्य आहेत. पण म्हणून ते पारंपारिक पोषाख, मांडी घालून बसणे याला असभ्य समजत नाहीत.

जपान मध्ये ज्या ठिकाणी खाली बसून जेवायचे असते तिथे आपले बूट काढून ठेवायचे असा संकेत आहे. एखाद्याने आडमुठेपणा करून बूट घालूनच जेवायला बसणार असा हट्ट केला व नकार मिळाला की रडारड केली तर? अशा ठिकाणी बूट घालून बसणे किळसवाणे आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी 'केस विंचरू नयेत' अशी पाटी असते. आता एखादी रिकामटेकडी influencer पुण्यात एखाद्या हॉटेलात केसांचा ब्रश घेऊन गेली व केस विंचरू लागली तर ?

“ धागाकर्त्याने दर वेळी स्वतःचे मोघम मत द्यायचं आणि सर्वांनी माहिती शोधायला लागायचं आणि आपसात रणकंदन करायचं हे पटत नाही.” - +१

विकू, तुमच्या बद्दल आदर आहे. पण दर वेळी तुम्ही जी उदाहरणं देत आहात ती लॉजिकल आहेत का स्वतःला विचारा. केस विंचरणे हे भारतात सभ्य आहे का ? घरात जेवायला बसल्यावर कुणी विंचरतं का ? आणि त्यासाठी कुणी भांडलंय का ? हा वितंडा आहे. माफ करा.

भारतात आजही मांडी घालून जेवायला बसतात. हॉटेलमधे बसू नये हे ठीक आहे. पण ती तशी का बसली हे समजलेले नाही . मुंग्या आल्या असतील कदाचित. पण त्यावरून टोकता येतं का ? कुणाला आक्षेप असायचं काय कारण हा मुद्दा आहे. मांडी घालून बसणे शास्त्रीय आहे किंवा कसे याबद्दल माहिती नाही. पण उभ्याने जेवण करू नये हे वाचलेले आहे. उद्या उभ्यानेच जेवण करा असा नियम असेल तर तिथे खुर्चीवर बसणे "किळसवाणे" म्हणायचे का ?

धागाकर्त्याने दर वेळी स्वतःचे मोघम मत द्यायचं आणि सर्वांनी माहिती शोधायला लागायचं आणि आपसात रणकंदन करायचं .>>> Lol

बातम्या टेक्स्ट स्वरूपात पण आहेत.
>>>>>
टेक्स्ट स्वरूपातली बातमी हा बातमीदाराचा पॉइंट ऑफ view काय आहे यावरून तयार होते.
म्हणून जिथे ओरिजिनल व्हिडिओ आहे तिथे तो बघूनच आपले मत बनवणे उचित असे मला वाटते.
पण असो, ज्याची त्याची विचारपद्धती. मान्य करून पुढे जाऊया

धागाकर्त्याने दर वेळी स्वतःचे मोघम मत द्यायचं आणि सर्वांनी माहिती शोधायला लागायचं आणि आपसात रणकंदन करायचं ##ये पैतरे पुराने हो चुके, लेकीन आज भी लोग फसते हैहीच !

त्या मुलीने प्रथमतः पोस्ट केलेला ( हॉटेल मधील) व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहीला. त्यात मॅनेजरने कुणा इतर ग्राहकाच्या सांगण्यावरून नोंदवलेला मूळ आक्षेप हा मुख्यत्वे आसनावर मांडी घालून बसण्याला होता असे दिसते, कोल्हापुरी चप्पल वगैरेचा उल्लेख फारच मोघम होता. इतर 'हार्ड अर्न मनी' वगैरे उल्लेख हा सोशल सायकॉलॉजी मधला 'Passing' चा प्रकार वाटतो. ती मुलगी एक जर्नलीस्ट आहे त्यामुळे मला या बाबीचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. जरी आचार स्वातंत्र्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तरी सार्वजनिक ठिकाणी आपल्या आचरणाने इतर कुणाच्याही न्याय्य हक्कांवर गदा तर येत नाही हा ही आचार स्वातंत्र्याच्या परिभाषेत विचारात घेतला जाणारा एक मुख्य मुद्दा आहे. माझ्या दृष्टीने ग्राहकाच्या हायजीन संबंधीच्या तक्रारींचे निवारण करणे आणि त्या उद्भवू नयेत म्हणून काळजी घेणे हे कोणत्याही हॉटेलच्या हक्काच्यां आणि अधिकाराच्या कक्षेत येते जरी एखाद्या individual चे आचरण स्वातंत्र्य त्याच्याशी इंटरसेक्ट झालं तरीही या प्रसंगात जास्त वेटेज हे हॉटेलच्या अधिकार कक्षेला मिळते. मी मुख्यत्वे त्या मुलीचा पहिलाच व्हिडिओ विचारात घेतला, कारण तोच जास्त pristine असणार असे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. यावर ताज ने नोदवलेली कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आढळली नाही. कुणाला ठावूक असल्यास लिंक पोस्टावी.

सहज प्रश्न - लोकल ट्रेन मधे समोरच्या आसनावर पाय ठेवून बसणे हे चुकीचेच आहे असा स्वाभाविक रोख मला दिसतो(तसा कायदा ही आहे). समजा एखादा प्रवासी आपल्याच आसनावर पाय ठेवून बसला तर त्याने फंडामेंटली काही वेगळे केले का? त्या रो मधली सर्व आसने रिकामी झाली तर तुमचं कोणत्या आसनावर बसण्याला प्राधान्य असेल? ज्या आसनावर प्रवासी पाय ठेवून बसला होता ते आसन तुम्ही कॉंनशिअसली निवडाल?? लोकल ट्रेन मधली आसने रिझर्व्ह नसण्याचा (तुम्ही जे आसन वापरत आहात ते थोड्या वेळाने दुसरा प्रवासी वापरणार) संबंध या नियमाशी तुम्ही जोडू शकत आहात का?? काय वाटते??

>>>>>>मला (बाहेर उभे राहून घाबरटपणे) फार मनात आहे. पण जेवणाला पैसे पडत असल्याने ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी आहे.
Lol Lol

ती बाई एका खुर्चीवर बसून तिने दुसर्‍या खुर्चीवर पाय ठेवले होते ही माहिती मिळाली. आभार.
अजून कुणी त्या बाईबद्दल नवीन माहिती दिली तर आगाऊ आभार. म्हणजे एक पाय या खुर्चीवर, दुसरा दुसर्‍या खुर्चीवर एक हात तिसर्‍या दुसरा हात चौथ्या आणि या अवस्थेत मांडी घालून चपला पंख्याला लटकवलेल्या होत्या वगैरे.
किंवा ती बाई नागीन डान्स करत सगळ्या टेबलांच्या मधून सरपटत चालली होती असा खुलासा लवकर येऊ द्या.

ही माहिती मी वाचलेल्या बातम्यांत नव्हती. असे केले असेल तर खरोखर ती बाई उपद्रवी आहे.

खुर्चीवर मांडी घालून बसू नका आणि चप्पल घालून येऊ नका हे पैसे देऊन सेवा घेणार्‍या ग्राहकाला सांगणे कायद्याला धरून नाही. >> Rofl

**From:
** The Management of [ Maayboli Five Star Hotels ]

काही दीडशहाण्या लोकांना खासगी मालकीच्या ठिकाणी कसे वागावे याचे सामान्य ज्ञान नसते, असे आमच्या लक्षात आले आहे. खास त्यांच्या सोईसाठी आजपासून पुढील पाटी हॉटेलच्या सर्व स्वच्छता गृहात लावण्यात येणार आहे.

20251026-124553

जनहितार्थ प्रसिद्ध

बिटवीन द लाइन्स विषयच अलाहिदा, इथे विद इन द लाईन्स काय लिहीलंय तेच कळायची वानवा दिसतेयं.....काहीतरी करा माबोकरांनो...माबो की ईज्जत का सवाल हे... Rofl

कुठलीही उदाहरणे कुठेही दिल्याने इज्जत वाढते हा शोध लागल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
अजून नो एण्ट्री, वाहन वाकडेतिकडे चालवणे या हक्कांबाबत लिहून माबोची इज्जत वाढते हे "बिटवीन द लाईन्स" समजावून सांगायला कुणी येत असेल तर त्यांचेही आभार.

लिंकसम्राटांचे आभार आणि झटकन गुगल पटकन ढकल मंडळूंचेही आभार !

Pages