एटीकेट्स vs कम्फर्ट – ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसण्यास मनाई.

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 October, 2025 - 15:39

सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.

तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.

सविस्तर बातमी ललनटॉप वर इथे बघू शकता.
https://youtu.be/h-Cme3L3aTw?si=ScpSSvBxSLRJSE5O

त्या महिलेचा ओरिजनल व्हिडिओ इथे बघू शकता.
https://youtube.com/shorts/oBOjfrM6xsk?si=NkbdeQnDi9RiAH-8

वादाला दोन बाजू आहेत.

पहिली बाजू –

जर एखादा ग्राहक पादत्राणे काढून मांडी घालून खुर्चीत जेवायला बसत असेल, जेवतानाची ती पोजिशन त्याला कंफर्टेबल वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याला तो हक्क मिळायला नको का?

काहींची उंची कमी असल्याने पाय खाली टेकत नाहीत किंवा ताणले जातात आणि पोजिशन अजून अनकंफर्टेबल होते त्यांना मांडी घालून बसायचा पर्याय एखादे फाईव्ह स्टार हॉटेल देऊ शकत नसेल तर काय फायदा पैसे खर्च करायचा?

काहींच्या मते पादत्राणे काढले तरी पाय बसायच्या सीटवर ठेवणे चूकच. पण मांडी घालून बसतो तेव्हा पायाचे तळवे आडवे होतात आणि ते सीटवर टेकवले जात नाहीत असे एक निरीक्षण.

आणखी एक भावनेला हात घालणारा मुद्दा म्हणजे मांडी घालून जेवायला बसणे ही भारतीय बैठक आहे. भारतीय परंपरा आहे. आज यालाच भारताच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हे एटीकेट्समध्ये बसत नसल्याचा शिक्का मारला जातोय हे दुर्दैवी आहे.

जर ती महिला बडे बाप की बेटी किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील असती तर...

दुसरी बाजू -

तुम्ही ज्या जागी जाता तिथले नियम तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळू शकत नसाल तर तिथे जाऊच नये.

अर्थात असे नियम तिथे लिखित स्वरूपात आहेत की नाही याची कल्पना नाही. तसेच त्या नियमांची ग्राहकांना आधीच कल्पना देण्यात येते का याचीही मला कल्पना नाही.

पण एखादी खाजगी जागा आपले शिष्टाचाराचे नियम लाऊ शकते हा मुद्दा काही अंशी पटतो.

मी काही अंशी म्हटले आहे कारण मनाने मला पहिलीच बाजू जास्त जवळची वाटते.

सार्वजनिक जागी तारतम्य बाळगावे हे माझेही मत आहे. पण मांडी घालून बसणे हे तारतम्य सोडून वागणे मला वाटत नाही. अर्थात याबाबतीत काय चूक आणि काय बरोबर हे आपण ज्या वातावरणात वाढलो, आणि ज्या निकषांची फुटपट्टी लाऊन जगलो त्यावर बरेचदा अवलंबून असते. त्यामुळे कित्येकांना हे मॅनर्सलेस वाटू शकेल. पण तटस्थ दृष्टीने पाहता जी आपली मूळ परंपरा आहे तीच आधुनिक एटीकेटच्या निकषावर चुकीची ठरते याचा खेद हा वाटतोच.

असो, काहीना हा एकूणच त्या महिलेचा स्टंट वाटत आहे. तिने जाणून बुझून वाद होईल हे बघितले असेही काही म्हणत आहेत.
असेलही.
हल्ली काहीही शक्य आहे. पण ताज मॅनेजमेंटने घेतलेला आक्षेप तर खरा होता.
जर तो तुमच्या बाबतीत घेतला गेला असता तर तुम्हाला तो खटकला असता का?
तुम्ही ताजमध्ये जेवायला गेले असताना तुमच्या शेजारच्या टेबलवर कोणी खुर्चीत मांडी घालून जेवायला बसले असते तर तुम्ही स्वतः त्यावर आक्षेप घेतला असता का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवस नाही रात्र नाही, घरात नाही बाहेर नाही, मांडी घालुन नाही आणि उभ्याने नाही.... म्हणून टेबल खुर्चीवर बसुन जेवावे हे आमच्या नरसिंह अवतारात एस्टॅब्लिश झाले आहे!

आर्टिकल २१ मधे राईट ऑफ हायजेन असा शब्दप्रयोग नाही.
जे आहे ते सॅनिटेशन /ड्रेनेज साठी आहे. भारताची राज्यघटना उपलब्ध आहे. लॉ शी संबंधित वेबसाईट्स आहेत. तिथेही (आधी कुणी विचारले असेल तर) पडताळून बघता येते.

विकु , कोण भांडतंय ? तुमच्या पुर्‍या झाल्या का बुटाने तुडवलेल्या कणकेच्या ?

Q) Is the right of individuals to hygiene and cleanliness in public establishments like hotels considered part of the constitution?

Ans: The right to hygiene/cleanliness is an implicit constitutional right in public establishments like hotels, stemming from the fundamental right to life and personal liberty under Article 21 of the Indian Constitution. This right includes access to clean sanitation, a healthy environment, and dignity, which means public spaces, including hotels, have a legal obligation to maintain hygiene.

Basis in the constitution

  • Article 21: The "right to life" under Article 21 is interpreted broadly to include the right to live with human dignity, which encompasses the right to a healthy and pollution-free environment, clean water, and sanitation.
  • Right to Sanitation: Recent court judgments have explicitly linked the right to clean and functional toilets as a facet of human rights, a fundamental right under Article 21.
  • Right to Healthy Environment: This is a fundamental right, and a healthy environment includes the absence of disease and infection. Public establishments must adhere to this principle to prevent the spread of illness.

Obligation for public establishments

  • Responsibility: Public establishments like hotels are responsible for providing and maintaining clean and hygienic conditions, including toilets and other facilities.
  • Human dignity: The right to cleanliness is intrinsically linked to human dignity. A lack of basic sanitation or cleanliness in a public place is seen as a violation of this right.
  • Health and safety: Providing clean and safe environments is crucial for public health and contributes to the overall well-being of the community.

खूप निराशा झाली.
कुणीच स्पेस शटलचे नियम सांगितले नाहीत, स्पेस शटलमधे स्पेस सूट कसा कंपल्सरी आहे हे सुद्धा सांगितलं नाही. एव्हढा वेळ घालवल्यावर जर हे बक्षीस मिळत नसेल तर काय उपयोग ? Sad

ताक : भविष्यात ए आय चा रोल काय हे सांगता येत नसला तरी ए आय चं चर्चेतलं भविष्य स्पष्ट दिसतंय. इथून पुढे फक्त उत्तर नाही, प्रश्न काय विचारला ते पण द्या अशी मागणी होणार. ए आय ला लोडेड प्रश्न विचारून डोनॉल्ड टृंप आणि पुतीन हे भाऊ भाऊ आहेत असं उत्तर त्याच्या कडून जबरदस्ती घेता येऊ शकेल.

प्रश्न डकवला आहे, मात्र हायजीनचे आणि सॅनीटायजेशनचे मुलभूत अधिकार सोशल सेटअपमधे (पालीकेमार्फत ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन) लागू आहेत पण व्यक्तिगत पातळीवर तो मूलभूत अधिकार त्याला दिलेला नाही हे लॉजीक मधे कसे बसवले??

तुम्ही मला विचारत असाल तर माझा पास. आधी तुम्ही खूपच विलोभनीय भाषेचा प्रयोग केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. Happy
आणि जी गोष्ट सगळीकडे उपलब्ध आहे त्याचे स्पष्टीकरण मला द्यायचे नाही. मायबोलीच्या युजर्सला इच्छा असेल तर ते वाचू शकतात.

राईट ऑफ क्लीनलीनेस हे स्वच्छ राहण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी आहे आणि हेल्थ एन्ह्वायरमेंट म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन. हे सगळीकडे उपलब्ध आहे. उगीचच आधी निष्कर्ष काढून त्याप्रमाणे अर्थ लावण्याच्या आणि उर्मट गोग्गोड भाषेत उत्तर देण्याच्या प्रयत्नांना माझा पास.

एक सिंपल गोष्ट होती ही. किती ताणायची ?

Question -Taj controversy with the Shradha Sharma on incidence of sitting in padmasna posture on seat in fine dine of taj. Her argument hotel was prohibiting her from obtain her right of freedom to practice her tradition. I'm looking at it from hygiene perspective , from the view of next customer who is going to sit on that chair, wasn't that act of depriving the next customer from his fundamental right of hygiene too. what do you think if a case stands in court which side is constitutionally superior and correct.

हा प्रश्न लोडेड आहे. यात जेमिनी गंडलं आहे. यात पद्मासनाचा उल्लेख केल्याने जेमिनीने असा समज करून घेतला कि एका क्स्टमरला योगा करायचा आहे. हॉटेलमधे योगा हे कुठलाच कायदा मुलभूत हक्क म्हणून मान्य कसा करेल ? त्या ऐवजी भारतीय बैठक किंवा crossed legs पोश्चर असा उल्लेख असायला हवा होता. भारतीय बैठक ही भारतात नॉर्मल आहे हे जेमिनीला माहिती नसेल तर सांगावे लागते.

घटना काय घडली हे फॅक्च्यअली सांगून (न्युट्रली) हायपोथेटिकल केस म्हणून जर त्या बाईने लीगल नोटीस दिली तर ती कुठल्या कायद्यांचा आधार घेईल आणि हॉटेलचे त्याला काय उत्तर असेल असा प्रश्न हवा होता. त्याला आधीच राईट ऑफ हायजिन असं सजेस्ट केल्याने त्याने असा कायदा आहे असा अर्थ घेतला. असो.

आमची पोरं पाय खाली ठेवून, व्यवस्थित शूज घालून खुर्चीवर बसतात आणि खुर्ची आणि धरित्रीवर अन्न सांडवतात. नशिबाने अजुन मला नोटिस आलेली नाही. नाहीतर जेमिनाय आणि ग्रोपलाच शरण गेलो असतो.

शाहरुख खानला सुद्धा काही कारणामुळे वानखेडे स्टेडियमच्या मॅनेजमेंटने प्रवेशबंदी केली होती. ते ही उदाहरण विचारात घेण्याजोगे आहे.
चला आणला एकदाचा शाहरुखला ऋन्मेषच्या धाग्यावर!

मी आता खुर्चीवर मांडी घालुन बसुन पाहिले
(तसा मी घरी नेहमीच बसतो जेवताना.. पण पद्धत असते एक बोलायची)

पायाचे तळवे खुर्चीला लागत नाहीत की मांडी घालायला वर घेताना लागत नाहीत. तळव्यांचा खुर्चीला स्पर्श करायचा असेल तर गुडघे वर घेऊन टेकवावे लागतील.
तेव्हा हायजिन मुद्दा गैरलागु आहे.
आणि कुणाला खुर्चीत मांडी घालुन बसलेल्या व्यक्तीचे तळवे बघायचे असतील तर पार वाकुन बघावे लागतील.

मी एकदाच मुंबई ताजमध्ये गेलो हतो.
तिथेही बरेच लोक टेबलावर हाताचे कोपरे टेकवून बसत होते. काही लोक हात आडवे टेबलावर टेकवत होते. माझ्या बाजुच्या टेबलच्या समोरच्या खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती अधूनमधून माने मागे खुर्चीच्या बॅक रेस्टला टेकवत होती, उघडी मान त्या बॅक रेस्टला लागत होती. मानेचे जंतु तिथे लागु शकतात.
तो टेबल रिकामा झाला तेव्हा टेबल पुसुन साफ केला पण खुर्चीची बॅक रेस्ट काही पुसली नाही. खुर्चीच्या बॅक रेस्ट मधुन संसर्ग होऊ शकतो हे आजोबांनी लहानपणीच मला सांगितले असल्याने लगेच खटकले.
एकुण काय तर ताज मध्येही हायजिनची खात्री नाही एवढे पैसे मोजून.
मग आमचे हैद्राबादच्या इराणी टपऱ्या काय वाईट?
तिथे वेटरला "मियां जर्रासा बॅकरेस्ट पे भी कपडा मारते क्या हल्लुहल्लु " म्हटले की तो पुसून देतो.
तेव्हा पासुन मी ताजमध्ये जेवायला जात नाही.

उघडी मान त्या बॅक रेस्टला लागत होती. मानेचे जंतु तिथे लागु शकतात.
>>>>>

छान मुद्दा
पण भीती आहे की समोरचा पक्ष हे मान्य करून मांडीत काही वावगे नाही म्हणेल की आता मानेला सुद्धा कव्हर करावे, आणि बुरखा घालूनच जेवायला यावे असा फतवा काढेल?

मग आमचे हैद्राबादच्या इराणी टपऱ्या काय वाईट?
तिथे वेटरला "मियां जर्रासा बॅकरेस्ट पे भी कपडा मारते क्या हल्लुहल्लु " म्हटले की तो पुसून देतो.>>>
मा पृ क्या थकेली जगह है... Biggrin
Screenshot_20251028-104550__01.jpg

Pages