सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.
तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.
सविस्तर बातमी ललनटॉप वर इथे बघू शकता.
https://youtu.be/h-Cme3L3aTw?si=ScpSSvBxSLRJSE5O
त्या महिलेचा ओरिजनल व्हिडिओ इथे बघू शकता.
https://youtube.com/shorts/oBOjfrM6xsk?si=NkbdeQnDi9RiAH-8
वादाला दोन बाजू आहेत.
पहिली बाजू –
जर एखादा ग्राहक पादत्राणे काढून मांडी घालून खुर्चीत जेवायला बसत असेल, जेवतानाची ती पोजिशन त्याला कंफर्टेबल वाटत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याला तो हक्क मिळायला नको का?
काहींची उंची कमी असल्याने पाय खाली टेकत नाहीत किंवा ताणले जातात आणि पोजिशन अजून अनकंफर्टेबल होते त्यांना मांडी घालून बसायचा पर्याय एखादे फाईव्ह स्टार हॉटेल देऊ शकत नसेल तर काय फायदा पैसे खर्च करायचा?
काहींच्या मते पादत्राणे काढले तरी पाय बसायच्या सीटवर ठेवणे चूकच. पण मांडी घालून बसतो तेव्हा पायाचे तळवे आडवे होतात आणि ते सीटवर टेकवले जात नाहीत असे एक निरीक्षण.
आणखी एक भावनेला हात घालणारा मुद्दा म्हणजे मांडी घालून जेवायला बसणे ही भारतीय बैठक आहे. भारतीय परंपरा आहे. आज यालाच भारताच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये हे एटीकेट्समध्ये बसत नसल्याचा शिक्का मारला जातोय हे दुर्दैवी आहे.
जर ती महिला बडे बाप की बेटी किंवा एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातील असती तर...
दुसरी बाजू -
तुम्ही ज्या जागी जाता तिथले नियम तुम्हाला पाळावे लागतात. ते पाळू शकत नसाल तर तिथे जाऊच नये.
अर्थात असे नियम तिथे लिखित स्वरूपात आहेत की नाही याची कल्पना नाही. तसेच त्या नियमांची ग्राहकांना आधीच कल्पना देण्यात येते का याचीही मला कल्पना नाही.
पण एखादी खाजगी जागा आपले शिष्टाचाराचे नियम लाऊ शकते हा मुद्दा काही अंशी पटतो.
मी काही अंशी म्हटले आहे कारण मनाने मला पहिलीच बाजू जास्त जवळची वाटते.
सार्वजनिक जागी तारतम्य बाळगावे हे माझेही मत आहे. पण मांडी घालून बसणे हे तारतम्य सोडून वागणे मला वाटत नाही. अर्थात याबाबतीत काय चूक आणि काय बरोबर हे आपण ज्या वातावरणात वाढलो, आणि ज्या निकषांची फुटपट्टी लाऊन जगलो त्यावर बरेचदा अवलंबून असते. त्यामुळे कित्येकांना हे मॅनर्सलेस वाटू शकेल. पण तटस्थ दृष्टीने पाहता जी आपली मूळ परंपरा आहे तीच आधुनिक एटीकेटच्या निकषावर चुकीची ठरते याचा खेद हा वाटतोच.
असो, काहीना हा एकूणच त्या महिलेचा स्टंट वाटत आहे. तिने जाणून बुझून वाद होईल हे बघितले असेही काही म्हणत आहेत.
असेलही.
हल्ली काहीही शक्य आहे. पण ताज मॅनेजमेंटने घेतलेला आक्षेप तर खरा होता.
जर तो तुमच्या बाबतीत घेतला गेला असता तर तुम्हाला तो खटकला असता का?
तुम्ही ताजमध्ये जेवायला गेले असताना तुमच्या शेजारच्या टेबलवर कोणी खुर्चीत मांडी घालून जेवायला बसले असते तर तुम्ही स्वतः त्यावर आक्षेप घेतला असता का?
मी ईथे असे सुचवेन की आपल्या
मी ईथे असे सुचवेन की आपल्या सर्वांना वादविवाद करताना 'Changing the goalposts' या लॉजीकल फॅलसीबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. माझ्यामते हॉटेलने त्यांच्या अधिकार क्षेत्रात हायजीन च्या अनुषंगाने नोंदवलेला आक्षेप हा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीगत आचरण स्वतंत्र्यावर कोणत्या मर्यादेपर्यंत निर्बंध घालू शकतो याचा उहापोह ईथे करने ( माझ्या प्रतिसादा दाखल उत्तरात) अपेक्षित आहे.....बाकी माबोकर चर्चेत काय चालू आहे हे 'changing the goalposts' न अभ्यासता देखील समजायला सुज्ञ आहेतच.
लोकल मधे बसण्याचे उदाहरण इथे
लोकल मधे बसण्याचे उदाहरण इथे कसे लागू होते ? वर सगळी कायद्याची कलमे दिलेली आहेत, न्यायालयाचे खटले पण दिलेले आहेत. पण वेगळे काहीतरी लिहून "नेहमीप्रमाणेच सेन्सीबल " अशी शाबासकी जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत वडाची साल पिंपळाला लावणारी उदाहरणे देऊन वितंडवाद घालायचाच असेल तर कोण काय करणार ?
माझी बुद्धी एव्हढी नाही चालत. कारण माझ्या मते
लग्न समारंभ म्हणजे "बाय इन्व्हिटेशन" असणारा समारंभ आहे. इथे कसे जावे याचे नियम वगैरे नसतात. इन्व्हिटेशन शक्यतो सारख्याच लोकांना दिले जाते. स्त्रियांमधे नैसर्गिक रित्या इतरांपेक्षा जास्त नाही तरी त्या प्रकारे सजून जावं याचं प्रेशर असतं. पुरूष मंडळी कुणी फॉर्मल, कुणी झब्बा, कुणी कोट अशा वेगवेगळ्या पेहरावात येतात. हे माझं आकलन.
कुणाच्या निधनानंतर स्मशानात जाणं ही सामाजिक जाण असल्याचं लक्षण असतं. तिथे कुणी पैसे देऊन जात नाही. तिथे तुम्ही शोक व्यक्त करायला जात असता. तिथे भडक मेक अप करून जाऊ नये असा नियम नाही, पण लोक मागे बोलतील म्हणून आपण तसे जात नाही. गेलाच तर नियम दाखवून तुम्हाला कुणी बाहेर काढत नाही.
लोकल ट्रेन मधे धोतर नेसून जा, चप्पल घालून जा, तुम्हाला कुणी टोकायला येत नाही हे माझे आकलन आहे. इथे आपण जेवायला जातो हे माहिती नव्हतं. आणि समोरासमोरच्या सीटवर पाय बसरून बसणे हे अगदीच गैरलागू उदाहरण देऊन "बिटवीन द लाईन्स" इतरांना समजत नाही असे मत असणार्या महान विद्वानांशी चर्चा करण्याची माझ्यासारख्या सामान्यांची टाप नाही. त्यामुळे तुमचे चालू द्या. ज्ञान मिळेल आणि मायबोलीची इज्जत जगात वाढेल. अ त्यंत उदात्त विचार आहेत.
तुमच्यासारखी चर्चा कुणीच करू शकत नाही. ( हे कौतुक आहे).
@फार्स विथ द डिफरंस
**From:
** The Management of [ Maayboli Five Star Hotels ]
@फार्स विथ द डिफरंस
तुमची सूचना तुम्ही रेल्वे प्रशासनाला द्यावी अशी नम्र विनंती करत आहे.
दरम्यान आपले लक्ष अजून एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. नुकतेच एका व्यक्तीने तक्रार केली आहे की नाकात बोट घालून मेकडे काढणे, हे माझे व्यक्तीगत आचरण स्वातंत्र्य असून हॉटेल मॅनेजमेंट कोणत्या मर्यादेपर्यंत निर्बंध घालू शकते? आमचे वकील लवकरच या संदर्भात Grok बरोबर चर्चा करणार आहेत.
तुम्हाला कदाचित या प्रकरणी काही इंटरेस्ट असेल म्हणून कळवत आहे.
हा धागा निवडक दहात नोंदवला
हा धागा निवडक दहात नोंदवला आहे.
नाकात बोटं घालणे ही भारतीय
नाकात बोटं घालणे ही भारतीय सभ्यता हे ही नव्यानेच समजलं.
पूर्वी दुखावल्या गेलेल्या स्कोर सेटलमेंट शिष्टमंडळास संपूर्ण सहानुभूती.
लोकल मधे बसण्याचे उदाहरण इथे
लोकल मधे बसण्याचे उदाहरण इथे कसे लागू होते ?>>> लोकलचा नियम का असावा असंं तुम्हाला वाटतं?? सरकारला नागरीकांच्या आचरण स्वतंत्र्यावर मर्यादा आणायच्या आहेत म्हणून?? मला तसं वाटत नाही तिथेही हायजीनचाच मुद्दा प्रामुख्याने विचारात घेतला असणार , दोन्हीकडे आपण वापरलेलं आसन थोड्यावेळाने दुसरा वापरणार म्हणून मला ते उदाहरण संयुक्तिक वाटले.
मी व्हिडिओ त पाहील्या प्रमाणाणे चप्पल चा मुद्दा त्या मुलीने मोघम मांडला होता जर प्रामुख्याने चप्पलला आक्षेप असता तर पहिलेप्रथम तो मुद्दा ती बोलली असती
बाकी चर्चा तर चालू राहीलच.....माझ्या दृष्टीने यात हायजीन चा मुद्दा महत्वाचा होता, जो प्राजक्ता कागदे यांनी मांडला आणि तो प्रत्येकाने उचलून धरायला हवा होता...असो....आम्ही निमित्तमात्र.
लोकलमधे हायजीन ? "हाहा:
लोकलमधे हायजीन ? "हाहा:
मांडी घालून बसतात कि लोक. एका सीटवर बसून दुसर्या सीटवर पाय टेकवणे हे तुम्ही दुसर्याच्या हक्कावर गदा आणणे यासाठी सांगितले होते असा माझा ग्रह झाला होता. चेंजिंग द गोलपोस्ट म्हणजे काय हे समजावून सांगितल्याबद्दल आभार.
वर येऊन गेलेले आहे कि हायजीन हे उत्तर अद्याप हॉटेलने दिलेले नाही. मांडी घालून बसणे हा एकच मुद्दा नाही. चप्पल सुद्धा खटकली होती ना ? असो. पुन्हा पुन्हा तेच नको आता. चालू द्या.
आता विनोदवीर येतील. एंजॉय करू.
तुमचे comprehension weak आहे
तुमचे comprehension weak आहे असे खेदाने म्हणावे लागते.
नाकात बोटं घालणे
ही भारतीय सभ्यता आहेहे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे.मी स्कोर सेटलमेंट करत नाही, पूर्वी दुसऱ्या धाग्यावर काय लिहिले ते बघून नवीन धाग्यावर लिहित नाही. पण पूर्वग्रह असलेल्यांना तसे वाटले, तर त्याचे आश्चर्यपण वाटत नाही.
हा धागा निवडक दहात नोंदवला
हा धागा निवडक दहात नोंदवला आहे.>>> @ हपा

तुम्ही जे आसन वापरत आहात ते
तुम्ही जे आसन वापरत आहात ते थोड्या वेळाने दुसरा प्रवासी वापरणार
>>>>>>>>>
फाविद हा मुद्दा योग्य आहे.
ट्रेन मध्ये कोणी असे समोरच्या सीटवर पाय ठेवून बसला असेल आणि आपल्याला त्या सीटवर (समजा विंडो सीट असल्याने) बसायची इच्छा असल्यास कोणी पाय ठेवलेल्या सीटवर बसायला लागतेय हा विचार मनात येत हलकीशी चिडचिड होतेच.
पण हो, त्याचवेळी हे सुद्धा नमूद करतो की कोणी मांडी घालून बसलेले असेल आणि त्या जागेवर बसायची वेळ आली तर तेव्हा ती सीट खराब झाली आहे असे मनात येत नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक वाटणे आहे. प्रत्येकाचे वाटणे वेगळे असू शकते, असते यात वाद नाही.
फक्त समोरच्या सीटवर पाय ठेवणे आणि मांडी घालून बसणे यातील फरक अधोरेखित करायचा होता इतकेच.
जेवणाच्या ज्या सार्वजनिक पंगतीत लोक मांडी घालून खाली जेवायला बसतात तिथे मागच्या पंगतीच्या मनात सुद्धा ती जागा खराब झाली असे येत नसावे.
Infact तिथे तर मांडी घालून बसायच्या आधी त्याच जागेवर पाय ठेवून उभे राहिले जाते. मग बसले जाते. खुर्चीवर मांडी घालून बसताना आपण आधी पाय टेकवून जमिनीवर उभे असतो. त्यामुळे खुर्चीच्या सीटवर पायाचे तळवे लागत नाहीत.
असो,
एकंदरीत मला असे वाटते की हे सगळे आपल्या मनात काय विचार येतात त्यावर अवलंबून आहे आणि आपल्या मनात येणारे विचार आपण काय कसल्या वातावरणात वाढलो आणि राहतो यावर बरेपैकी अवलंबून आहेत.
तळटीप - शंभरावा प्रतिसाद धागाकर्त्याचा ही अदभुत घटना इथे घडली आहे
मी स्कोर सेटलमेंट करत नाही,
मी स्कोर सेटलमेंट करत नाही, पूर्वी दुसऱ्या धाग्यावर काय लिहिले ते बघून नवीन धाग्यावर लिहित नाही. >>> आणि नेमके काय चालू आहे हे समजून घेत नाही पण उडी घ्यायची हौस दांडगी हे राहिलं. सभ्यता आणि व्यक्तीगत स्वातंत्र्य एकच वगैरे वगैरे. उबोंनी जर म्हटलं कि तुम्ही असंच लिहीलंय तर तसंच हे मान्य करावं एव्हढी दहशत आहे त्यांची.
चालू द्या. मीम्स येऊ द्यात. विनोद येऊ द्यात. हा धागा पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवायचाय.
उबोंनी जर म्हटलं कि तुम्ही
नेमके काय चालू आहे हे समजून घेत नाही पण उडी घ्यायची हौस दांडगी >>
तुमचे Comprehension weak आहे, हे किती वेळा सांगाल? कळलं की.
उबोंनी जर म्हटलं कि तुम्ही असंच लिहीलंय तर तसंच हे मान्य करावं एव्हढी दहशत आहे त्यांची. >>
पुन्हा एकदा पूर्वग्रह...इतकेच म्हणू शकतो.
लोकलमधे हायजीन ? "हाहा: >>>
लोकलमधे हायजीन ? "हाहा: >>>
रस्त्यावर थुंकणे कायद्याने अपराध आहे त्याने सार्वजनिक स्वच्छतेत ( हायजीन) तडजोड होते.
भारतीय नागरीक: रस्त्यावरील स्वच्छता ( हायजीन)? हाहा:
कोणतेही नियम- कायदे बनवण्यामागची मुळ भुमिका काय आहे/ होती याची निदान चर्चा तरी होऊच शकते, त्यासाठी हा मुद्दा गौण ठरतो की किती टक्के लोक तो नियम/ कायदा पाळतात आणि किती मोठा घटक तो पायदळी तुडवतो, म्हणजे निदान व्यक्तीश: मी तरी या मानसिकतेचा आहे( या बद्दल मतभिन्नता असू शकते ).
जेवणाच्या ज्या सार्वजनिक
जेवणाच्या ज्या सार्वजनिक पंगतीत लोक मांडी घालून खाली जेवायला बसतात तिथे मागच्या पंगतीच्या मनात सुद्धा ती जागा खराब झाली असे येत नसावे.>>> गोष्टी व्हॅक्यूम मधे विचारात घेऊन कसे चालेल बरं? सार्वजनिक पंगतीत आणि फाईव्ह स्टार हॉटेलची हायजीन संदर्भात त्यांच्या ग्राहकांप्रती येणारी बांधीलकी ( दोहोंपैकी एका ठिकाणी ग्राहक त्या आणि इतर गोष्टींसाठी रग्गड पैसे मोजतोय) या गोष्टी कॉंटेक्स्ट मधे विचारात घ्याव्याच लागतील ना?
रग्गड पैसे मोजतोय >>> हा
रग्गड पैसे मोजतोय >>> हा मुद्दा तर पलीकडचे सुद्धा मांडत आहेत. रग्गड पैसे मोजतोय तर आरामदायी मांडी घालायचे स्वातंत्र्य द्या
स्वतःच्या घरात बसून बीफ खायचे
स्वतःच्या घरात बसून बीफ खायचे स्वातंत्र्य द्यायचे का ?
हा मुद्दा तर पलीकडचे सुद्धा
हा मुद्दा तर पलीकडचे सुद्धा मांडत आहेत. रग्गड पैसे मोजतोय तर आरामदायी मांडी घालायचे स्वातंत्र्य द्या>>>(पेट पिव्ह धाग्या मधले पैसे मोजलेत म्हणून मुलांना हवी तशी मस्ती करायची मुभा असावी अशि मगणी या निमित्ताने आठवली)
मग हॉटेलच्या त्यांच्या सर्व ग्राहकांच्या प्रती असलेल्या हायजीन च्या
बांगड्यांचेबांधिलकचे काय? That's a non negotiable for them, over anything else.ताक.: मस्त ताजे फ्राय बांगडे खाल्लेयत, तेच जिभेवर रेंगाळतायत.... सॉरी....उरलेली चर्चा नंतर.
चिडके विनोद बघावे म्हणून
चिडके विनोद बघावे म्हणून उघडला खरा पुन्हा तर मुद्द्यावर चर्चा

पाचशेव्या प्रतिसादानंतर त्या बाईने पर्समधून तोफ काढून गोळीबार केला इथपर्यंत चर्चा नक्की गेली असेल.
>हा मुद्दा तर पलीकडचे सुद्धा
>हा मुद्दा तर पलीकडचे सुद्धा मांडत आहेत. रग्गड पैसे मोजतोय तर आरामदायी मांडी घालायचे स्वातंत्र्य द्या.
मग कुणीतरी रग्ग्गड पैसा मोजतोय म्हणून ताटातच हात धुवू द्या म्हणतील.
(बाय द वे इतकाही रग्गड पैसा मोजत नाही कुणी, अन्यथा ताज खरेदी करा आणी मग घाला काय तो गोंधळ)
हायजिन वरून एक शंका
हायजिन वरून एक शंका
फाईव्ह स्टार हॉटेल मधे काटे चमचे प्रत्येक वेळी नवीन वापरतात का ? कि तेच परत परत धुवून देतात ?
त्याबद्दल शंका असेल तर हाताने जेवलं तर ते किळसवाणे होईल का ?
एकमेका पालथे पाडू, अवघे करू विपर्यास !
अरे काय बंडल चर्चा चाललीये.
अरे काय बंडल चर्चा चाललीये. किती मूट मुद्दा आहे. जिथे जाऊ तिथले नियम पाळा. कॉमन सेन्स आहे.
धनश्री-तै,
धनश्री-तै,
कॉमन सेन्स इज नॉट कॉमन.
अरे काय बंडल चर्चा चाललीये.
अरे काय बंडल चर्चा चाललीये. किती मूट मुद्दा आहे. जिथे जाऊ तिथले नियम पाळा. कॉमन सेन्स आहे.
>>>>>
इतके सरळसोपे नाही ना हे.
अश्याने कोणी काहीही नियम बनवेल आणि पाळा म्हणेल.
हे नियम जाचक, अन्यायकारक, भेदभाव किंवा पक्षपात करणारे किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाचा अपमान करणारे असे काहीही असू शकतात.
ते तसे या केस मध्ये आहेत की नाही याचीच इथे चर्चा चालू आहे.
तुमच्यामते कदाचित नाहीत म्हणून तुम्हाला इथली चर्चाच बंडल वाटली.
पण समजा नियम काही वेगळा असता तर...
म्हणजे एक चटकन आठवणारे फेमस उदाहरण,
Indian and Dogs are not allowed.
इतके सरळसोपे नाही ना हे.
इतके सरळसोपे नाही ना हे.
अश्याने कोणी काहीही नियम बनवेल आणि पाळा म्हणेल.
हे नियम जाचक, अन्यायकारक, भेदभाव किंवा पक्षपात करणारे किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाचा अपमान करणारे असे काहीही असू शकतात. >> हे लक्षात आल्याबद्दल अभिनंदन.
>>तुमच्यामते कदाचित नाहीत
>>तुमच्यामते कदाचित नाहीत म्हणून तुम्हाला इथली चर्चाच बंडल वाटली.<<
ऋन्म्या, तुझ्यामते त्या बाईच्या तक्रारीत मेरिट असेल तर काहितरी कंस्ट्रक्टिव कर. कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार कर. इथे पॉइंटलेस मुद्द्यावर व्हाइन करुन काय साध्य होणार? हेच त्या बाईंनी पण करायला हवं होतं. हल्ली अटेंशन सिकिंगच्या नादात लोक आपलंच हसं करुन घेतात...
ऋन्म्या, तुझ्यामते त्या
ऋन्म्या, तुझ्यामते त्या बाईच्या तक्रारीत मेरिट असेल तर काहितरी कंस्ट्रक्टिव कर. कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार कर.>>>>कंज्यूमर कमिशन कडे The Consumer Protection Act, 2019 खाली unfair trade practices साठी कंप्लेंट करु शकली असती. मुलगी जर्नलीस्ट आहे इतके तर माहीत असायला हरकत नव्हती. पण तिला मिडीया ट्रायल (घर की खेती असल्याने कदाचित) करुन फॉलोअर्स आणि क्लिक फार्मींग करवीशी अधिक श्रेयस्कर वाटली तर पुर्वग्रहदुषीत असल्याचा ठपका पडायचा...या प्रसंगात मुलीच्या आचार स्वतंत्र्यावर आस्थापनाने मर्यादा आणली(माझ्या मते for right cause) म्हणून प्रत्येक बाबतीत असे करुन आचार स्वातंत्र्याची पुर्ण गळचेपी केली जाईल असे वाटणे, अथवा अशी भीती घालणे म्हणजे hasty generalization झाले.
ऋन्म्या, तुझ्यामते त्या
ऋन्म्या, तुझ्यामते त्या बाईच्या तक्रारीत मेरिट असेल तर काहितरी कंस्ट्रक्टिव कर. कंझ्युमर कोर्ट किंवा तत्सम अथॉरिटिकडे तक्रार कर.
>>>>>>
तसे मला स्ट्राँगली वाटत नाहीये. लेखातही काही अंशी त्या बाजूने आहे असेच लिहिले आहे. चर्चेत दोन्ही बाजूने होणारे विचार कळतील, ऐकता येतील म्हणून धागा आहे. तसेच बाई जे करत आहे ते स्टंट आहे की जेन्युइन याची कल्पना नाही. पण त्याने चर्चेवर फरक पडू नये.
कुणाला काय वाटतं या पेक्षाही
कुणाला काय वाटतं या पेक्षाही त्या बाईने जर कायदेशीर नोटीस दिली तर हॉटेल काय उत्तर देईल ?
आधीही म्हटलेलं कि सर्वसामान्य माणूस शक्यतो वाकड्यात जात नाही. पण एखाद्याला वाकड्यात जावंसं वाटलं आणि नियमांच्या वैधतेबाबत कायदेशीर तक्रार केली तर मांडी घातलेली किळसवाणी वाटते हे व्यवस्थापन सांगू शकेल का ?
कोल्हापुरी चप्पल असभ्य आहे असे म्हणू शकतील का ? एव्हढाच मुद्दा आहे.
बाकी आपण या होटेलांच्या वाटेलाही जात नाही, आणि तिथे जाऊन पंगा घेण्याइतकी हिंमत, ताकद, वेळ आंणि पैसा याबाबतीत आपण शून्य आहोत. डॉग्ज अॅण्ड इंडीयन्स आर नॉट अलाऊड ही पाटी सर्वांनाच खटकत नसणार. कुणालातरी एकाला खटकल्यावर त्यालाही काय सल्ले मिळाले असतील त्याची झलक दिसली.
सैन्याच्या कुठल्यातरी नियमवलीत क्वीन किंवा क्राऊनशी निष्ठा असल्याचा उल्लेख कुठल्यातरी डिबेट मधे ऐकला होता. हे किती सत्य ते माहिती नाही. पण खरंच असं असेल तर ते बदलायचं कि नाही, आव्हान द्यायचं कि नाही ?
गुजराती सोसायट्यात मासे, मटण घरात बनवायचं नाही असे नियम बनतात. मग मराठी माणसाने तिकडे घर घ्यायचं नाही किंवा त्यांचे नियम पाळायचे का ? प्रश्न ते वैध आहेत का हा आहे कि नाही ?
एव्हढंच आहे ते. कुणी त्या बाईच्या कृत्याचं समर्थन करायचा किंवा त्याला विरोध असण्याचा इथे संबंध नाही. तिचे मुद्दे व्हॅलिड आहेत का ? कि हॉटेल ला कायदेशीर बाजू मांडता येईल ? तुमचं हॉटेल भारतातल्या कायद्यांप्रमाणे चालतं कि नाही ? साऊथ मधे लुंगी नेसून येऊ नये असा बोर्ड लावतील का ? शेरवानीचं उदाहरण दिलंय ते स्वतः अनुभवलंय. कायदा पण सांगतो कि तुम्ही लॅण्डची सभ्यता जी असेल तिचा अपमान होईल असे नियम बनवू शकत नाही. ग्रोक आणि चॅटजीपीटी नक्कीच झटकन संबंधित कायदे देऊ करतात. ती संबंधित कलमं वाचता येतात कि आपल्याला. चुकीची कलमं दिली असतील तर देणार्याचा फजितवाडा होईल ना ?
न्यायालयाने जर पंचतारांकित हॉटेल्स ही खासगी जागा आहे पण तिथे पैसे घेउन दिली जाणारी सेवा ही सार्वजनिक आहे असा निर्णय दिलेला असेल तर अशी माहिती देणारी पोस्ट स्कीप करून वाद घातल्याने काय साध्य होतं ? रग्गड पैसा वगैरे.
माझा थोड्या वेळापूर्वी पर्यंत हा समज होता कि पब आणि क्लब्ज मधे सदस्यता घ्यावी लागत असल्याने तिथे हा कायदा / घटनेचं कलम (खासगी जागा) लागू होणार नाही. पण आता लक्षात आलं कि एखाद्या सदस्याला अपमानास्पद किंवा भेदभावाची वागणूक मिळाली तर तो नक्कीच तक्रार करू शकेल. फक्त ही पेड सेवा असल्याने सार्वजनिक सेवा आहे हे त्याला सिद्ध करता आलं पाहीजे.
उद्या कुणी खून करेल आणि माझ्या खासगी जागेत खून झाला असल्याने कायदा लागू होत नाही असे म्हणेल. यहा हमरा ही कानून चलता है !
आता शेपो.
>उद्या कुणी खून करेल आणि
>उद्या कुणी खून करेल आणि माझ्या खासगी जागेत खून झाला असल्याने कायदा लागू होत नाही असे म्हणेल.
बापरे ! तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून तुम्ही सिव्हिल आणी क्रिमिनल लॉ , दखलपात्र आणी अदखलापात्र गुन्हे यावर वाचन करावे असे सुचवेन.
स्कॉलरशिप च्या 'पराचा कावळा करणे' , 'सुतावरून स्वर्ग गाठणे' या म्हणी आठवल्या.
पुणेरी हॉटेल्स मधल्या 'चूळ भरू नये', 'केस विंचरू नयेत' अशा पाट्या खटकत नाहीत पण हा नियम खटकतो ही विसंगती का?
:पॉपकॉर्न:
:पॉपकॉर्न:
Pages