सध्या सोशलसाईटवर ट्रोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.
सध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.
पहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.
विराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.
दुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.
खरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.
आता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.
Official : Amchi Mumbai -The Mumbai Anthem | Sachin Pilgaonkar |
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ
प्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते? त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.
एखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.
आज तुम्ही म्हणाल पण नाही हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.
त्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.
काही व्यक्तींना हे वरदान असते
काही व्यक्तींना हे वरदान असते. >>वरदान == बोटॉक्स ?
आपणच आपलं कौतुक करून घेतलेलं
आपणच आपलं कौतुक करून घेतलेलं लोकांना पसंत पडत नाही .. ही नापसंती व्यक्त करण्यासाठी मग ट्रोलिंग ..
>>>>
धाग्यात राजकारण आणायचे नाही. अन्यथा स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेणारया आणि तरीही लोकांनी डोक्यावर ऊचलून घेतलेल्या राजकीय नेत्यांची उदाहरणे दिली असती.
दुसरयावर टिका करणारयांपेक्षा स्वत:चे कौतुक करणारे केव्हाही चांगलेच नाही का?
लोकांना अशी लोकं आवडत नाही कारण लोकांच्या स्वताच्या मनात अहंकार असतो. त्यांना समोरच्याने आपलेच केलेले कौतुक पटत नाही. तू कसा आहेस ते तुझे तूच काय ठरवणार, ते आम्ही ठरवणार.. हा एक मीपणाच झाला.
खरं सांगायचे तर मला पर्सनली विनम्रतेचा आव आणणारयांचा रग येतो. जे आत ते बाहेर अशी लोकं केव्हाही परवडली.
पण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचे वागणे रुचत नाही म्हणून मला त्याचे ट्रोलिंग करायचा काहीएक अधिकार मिळत नाही. तुम्ही इग्नोर करू शकता. ते जरुर तुमच्या अखत्यारीत येते.
सचिन महागुरू आणि एकापेक्षा एक म्हणाल तर एक जज म्हणून ते नाचातल्या एकेक बारकावे टिपत जे कॉमेंट करायचे ते ऐकून मी थक्क व्हायचो. त्यामुळे त्यांना महागुरू म्हणवायचा हक्कही आहे.
नच बलियेचा पहिलाच सीजन त्यांनी ईतर तरुणांना मात देत जिंकला. तिथे त्यांचे सळसळते तारुण्य आणि उत्साहही सिद्ध झाला.
एक चतुरस्त्र कलाकार म्हणून ते अफाट आहेत. त्यांचे चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखाद्याला त्यांचे वागणे वा स्वभाव पटो न पटो त्यांचा आदर व्हायलाच हवा असे मला वाटते.
अगदी बरोबर ऋन्मेष. हे म्हणजे
अगदी बरोबर ऋन्मेष. हे म्हणजे शाहरुख सिगरेट फार पितो म्हणून त्याच्या अभिनयाला शिव्या देणे प्रकार आहे. किंवा संजय दत्त जेल मध्ये गेला म्हणून त्याचे चित्रपटाच नका बघू असा प्रकार. किंवा आतिफ अस्लम पाकी म्हणून त्याची गाणी बेसूर?
कला बघा आणि ठरवा.
कला बघा आणि ठरवा. >>> +१००१
कला बघा आणि ठरवा. >>> +१००१
धन्यवाद मन्या .
धन्यवाद मन्या .
मला हा जेनरेशन प्रॉब्लेम वाटतो . आजची जेनेरेशन इतका लोड घेत नाही - मायबोली वरील जुने लोक फार अतिविचार करतात.
एक टीपापा म्हणून सिनियर सिटीझन क्लब आहे इथे . सगळे ज्येष्ठ मायबोलीकर - पंधरा वीस वर्ष जुने आयडी आहेत त्यांचे. त्यांच्या चर्चा कधी वाचल्या प्रश्न पडतो इतके का बोर करतात एकमेकांना. नंतर जाणवले - आपल्याला बोर वाटत असेल पण त्यांना आनंद मिळतो. त्यांचे वागणे पटो ना पटो आदर मात्र करायलाच हवा. लेट देम एन्जॉय .
तीच गोष्ट सचिन बाबत. त्याला टीप टॉप राहून आनंद मिळत असेल तर आपण का चिडा ? लेट हिम एन्जॉय हिज लाईफ !
मी एकुण सर्व कलाकारांच्या
मी एकुण सर्व कलाकारांच्या बाबतीत +१००१ दिला आहे.
मी लहानपणी सचिन पिळगावकरांचे बरेच जुने चित्रपट बघितलेले आणि enjoy केलेले आहेत.
आणि इथे मुळात मुद्दा (generation problem) कोण कोणाला
ट्रोल करत? हा नसुन एक माणुस दुसऱ्या माणसाला जज करतो हा आहे.
तुम्ही सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत जे म्हणालात. तेच वाक्य इथे लागु पडतं..
लेट देम एन्जॉय देअर लाईफ!
ट्रोलर्स आर लूजर्स !
ट्रोलर्स आर लूजर्स !
जे लोकं आपल्या आयुष्यात य्शस्वी नसतात, समाधानी नसतात, ते लोकं आपल्या अपय्शाची बोच कमी करायला म्हणा किंवा असूयेने म्हणा ईतर यशस्वी लोकांबाबत बोलायची संधी मिळताच तुटून पडायला बघतात.
एखादी व्यक्ती आवडत नाही. रुचत नाही. एखाद वेळेस ते मत व्यक्त केले. फाईन. पण त्यावरून ट्रोल करत आनंद घेणे हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे असे वाटते.
बरोबर
बरोबर
बरोबर आहे, पण महागुरु तर
बरोबर आहे, पण महागुरु तर सेलेब्रिटी पण नाहीत, त्यांना का ट्रोल केले जाते ?
पण महागुरु तर सेलेब्रिटी पण
पण महागुरु तर सेलेब्रिटी पण नाहीत,
>>>
सिरीअसली??
एखादा नवीन धागा कढावा लागेल त्यांचे कलागुण यश अचिव्हमेण्ट योगदान एकूणच आढावा घ्यायला.... फार म्हणजे फारच चतुरस्त्र व्यक्तीमत्व आहे सचिन
जुना सचिन - नक्कीच सेलिब्रिटी
जुना सचिन - नक्कीच सेलिब्रिटी... सध्याचा सचिन - नाही.
जुना शाखा - नक्कीच सेलिब्रिटी... सध्याचा शाखा - नाही.
सध्याचा शाखा सेलिब्रेटी नाही?
सध्याचा शाखा सेलिब्रेटी नाही?
भारतातील जाहिरातींमधील सर्वात मोठा ब्रांड सेलिब्रेटी नाही ?
भारतातील सर्वात श्रीमंत ॲक्टर आणि जगातला दुसरया क्रमांकाचा श्रीमंत ॲक्टर सेलिब्रेटी नाही?
फिल्मफेअर वा तत्सम ॲवार्ड शोमध्ये आजही जो भाव खाऊन जातो तो सेलिब्रेटी नाही?
आयपीएल कलकत्ताचा मालक सेलिब्रेटी नाही?
मायबोली असो वा एकूणच कुठलेही संकेतस्थळ तिथे ज्याची सर्वाधिक चर्चा होते तो सेलिब्रेटी नाही?
तुम्ही बहुधा पिक्चरचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ईतकेच लक्षात घेऊन हे बोलत आहात..
पण शाहरूख सुपर्रस्टार होता आहे राहील
सचिनचे म्हणाल तर आपली मराठी
सचिनचे म्हणाल तर आपली मराठी जनता आपल्याच लोकांचे पाय खेचण्यात म्शगूल असते. एखादी मराठी हिंदीत स्टार बनली व तिला अगदी ऑस्कर मिळाले तरी तिला मराठी चांगले बोलता येत नाही म्हणून हिणवतील.
काल एके ठिकाणी पाहिले की सचिनने हिण्दी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेय हे समजल्यावर फेसबूकवर काही जनता महागुरूंना काय काय येते म्हणून आश्चर्य व्यक्त करत होते आणि त्यातही दात काढत होते
पण त्या वेड्यांना कोण सांग्णार की ऑलटाईम क्लासिकल मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचा दिग्दर्शक दस्तुरखुद्द सचिनच होता
सदर लेखकाच्या कमेण्टस अनेकदा
सदर लेखकाच्या कमेण्टस अनेकदा सेलेब्रिटी ट्रोलिंगच्या अनुषंगाने येत असतात. कधी कधी बादरायण संबंधानेही त्या येतात. सेलेब्रिटी ट्रोलिंगवर अजून एक धागा आहे.
या देशात सेलिब्रेटी / सुपरस्टार होणे गुन्हा आहे का?
https://www.maayboli.com/node/62978
तसेच सेलेब्रिटी हा शब्द असलेले अन्य काही धागे आहेत. त्यातले दोनच घेतलेत.
https://www.maayboli.com/node/68204
https://www.maayboli.com/node/65736
याशिवाय बर्याच फिल्मस्टार्स, क्रिकेटीअर्स बद्दल धागे आहेत. कुणी कशावर धागे काढावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सतत झेंडा घेऊन फिरणे वा एखाद्या विषयाला ट्रोलिंगच्या विषयाकडे ढकलण्याचा प्रयत्न करणे हे कितपत बरोबर आहे ?
फिल्मस्टार्स आणि क्रिकेटस्टार्स यांचा एव्हढा प्रभाव आहे कि त्यांच्यावर ५०% तरी धागे आहेत. म्हणजे तुमच्या जगण्याचा किती तरी भाग हे व्यापून उरलेत. आज पडद्यावरचे आणि मैदानावरचे हिरोज हे लोकांचे हिरोज झालेत. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी फ्रीडम फायटर्स हिरोज होते. सामाजिक सुधारणा घडवणारे लोक हिरोज होते.
त्यांचे काम हे एव्हढ्या उंचीचे होते कि त्यांच्याबद्दल आदराची भावना असणे हे नैसर्गिक आहे. या कामातून त्यांना काही उत्पन्न नव्हते मिळत. आपल्या पोटाला चिमटा काढून कामं केली आहेत. त्याला अजून इतकाही काळ झालेला नाही कि लोक त्यांना विसरून जातील. आज तसा आदर्श समाजासमोर नसल्याने ती जागा पैशासाठी काम करणार्या सेलेब्रिटींनी घेतली आहे. त्यांना त्या जागी बसवणे हे अनेकांना न पटणारे आहे.
हे लोक पैसे घेऊन मनोरंजन करतात. त्यांची स्वतःची एको सिस्टीम असते, पीआर एजन्सी असते. ते त्यांच्यासाठी राबतात. ट्रोलिंग झाले तर ते हुषारीने मोहीमा राबवतात. सेलेब्रिटी ट्रोलिंग बद्दल वर्तमानपत्रं आणि सोशल मीडीयात इन्ल्फ्युएंसर्स लेख लिहीतात, इंटर्व्ह्यूज देतात. हा त्याचाच भाग असतो. त्यामुळं ते सक्षम असतात.
सामान्य लोकांनी त्याचा एव्हढा बाऊ का करावा ?
अनेकदा अनेक चीप पब्लिसिटीचे ड्राईव्ह या सेलेब्रिटींच्याच संमतीने चालत असतात. निगेटिव्ह असो वा पॉझिटिव्ह पब्लिसिटी त्यांना हवीच असते. उर्फीन जावेद जे काही करते ते काही शहाणपणाचे आहे का ? पण तिने तसं मुद्दाम करायचं, मग लोक त्यावर कमेण्ट्स करणार, त्यांनी कमेण्ट्स केल्या कि मग तात्विक चर्चा घडवून आणायच्या हा खेळ आहे. कुणी काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे नक्कीच. पण ही बाजू मांडणारे असे ड्रेसेस घालून का फिरत नाहीत ? विवेक सुटला कि लोक बोलणारच. व्यवहारज्ञानाचं भान सुटलं कि कशाला ट्रोलिंग म्हणायचं कशाला नाही हे सुद्धा समजत नाही.
मोठ मोठी तत्त्वे लावून आपण कशाचेही समर्थन करू शकतो. त्या तत्त्वाला विरोध करता येत नाही म्हणून अशा तत्वांच्या मागे मूर्खपणा लपवला जातो. जनतेत असलेला आदर टिकवण्यासाठी पथ्यं पाळावीच लागतात. एकदा जनतेच्याच प्रेमाखातर तुम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलात तर वागण्या बोलण्याच्या मर्यादा पाळाव्याच लागतात. नसतील पाळायच्या तर जनतेच्या रोषाला सामोरे जायला काय हरकत आहे ?
अनेकदा सेलेब्रिटी ट्रोलिंग हा विषय इग्नोरच केला आहे. पण आज सर्च देताना समोर आला आणि राहवले नाही. इग्नोर करता आले नाही. क्षमस्व.
)
( या कमेण्ट मधे जे म्हटले आहे ते स्पष्ट आहे. यात जे म्हटलेले नाही ते घुसडून तुम्हाला असे म्हणायचे आहे का हे ट्रोलिंगच. भरकटवणे म्हणजे ट्रोलिंग ही बेसिक व्याख्या आहे. जे म्हटलेले नाही त्यावर प्रतिसाद आले किंवा प्रश्न विचारले तर अर्थातच....
एवढेच स्पष्टीकरण द्यायची गरज
एवढेच स्पष्टीकरण द्यायची गरज नव्हती
रानभूली +१०००
रानभूली +१०००
प्रतिसाद खूप पोटतिडकीने लिहिलेला जाणवतोय.
Thanks Piyu
Thanks Piyu
ती उर्फी जावेद डोक्यात जाते. तीच डोळ्यासमोर आली.
राभु, ट्रोल्स सगळीकडे भरलेत.
राभु, ट्रोल्स सगळीकडे भरलेत. त्यांचे वेळ घालवायचे ते साधन आहे. दुर्लक्ष हेच उत्तम औषध कारण पोटतिडिकीने काही लिहीलेत तरी तिकडे दुर्लक्ष करुन आपलाच अजेंडा राबवण्यात ते पटाईत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे जितके खरे तितकेच आपल्याला सगळ्यांचे प्रॉब्लेम्स माहित नसतात हेही खरे. दिवसभर सोमिवर पडिक राहुन चांगले वाईट खरडणार्यांचे व्यक्तीगत आयुष्य आपल्याला माहित नसते. काय माहित, सोमि हाच एकमेव आधार उरला असेल त्यांच्या आयुष्यात.
उर्फी जावेद जे करते ते तिने केले नसते तर बिचारी कुठेतरी पॉर्न आर्टिस्ट म्हणुन खितपत पडली असती किंवा त्याहीपेक्षा वाईट अवस्थेत असती. तिचे वडिल तिला असे म्हणाले होते असे तीच एकदा म्हणाली होती. त्यामुळे जाऊदे. मला ती अगदी गोड मुलगी वाटते. हल्ली इन्स्टाने मला तिचे रिल्स दाखवणे बंद केलेय. त्याबद्दल इन्स्टाला थँक्यु पाठवणार होते पण बदल्यात काय दाखवेल माहित नाही म्हणुन बेत रद्द केला
साधना
साधना
उर्फी जावेद ला असले फोटो देऊन
उर्फी जावेद ला असले फोटो देऊन आपले फारसे काही होणार नाही हे लक्षात येवो व ती python , ML चा कोर्स करून तिला infosys मध्ये नोकरी मिळो हीच सदिच्छा !
हल्ली लोक उर्फी जावेद नाही तर
हल्ली लोक उर्फी जावेद नाही तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या कपड्यांच्या मागे पडले आहेत.
आम्ही नाही त्यातले म्हणणारे लोक सुद्धा जेव्हा कॉमेंट करतात ते बघून खेद होतो.
तुम्हाला त्यांचे कपडे पटले नाही पटले तरी कॉमेंट करायचा मोह आवरणे इतके अवघड आहे का?
तुम्ही घरी खुशाल चर्चा करा, पण सोशल मिडीयावर कॉमेंट करताना भान हवे.
ट्रोल्स सगळीकडे भरलेत.
ट्रोल्स सगळीकडे भरलेत. त्यांचे वेळ घालवायचे ते साधन आहे. दुर्लक्ष हेच उत्तम औषध कारण पोटतिडिकीने काही लिहीलेत तरी तिकडे दुर्लक्ष करुन आपलाच अजेंडा राबवण्यात ते पटाईत असतात.
>>> +786 आणि इगॉरस्त्र जमले नाही तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून रिप्लाय करायचा अशा लोकांना... सॅडीस्ट असतात लोक.. हे बुलिंग च...
किती चलाखीने अमृता फडणवीस ना
किती चलाखीने अमृता फडणवीस ना ह्या धाग्यावर आणण्यात आले आहे
अहो भ्रमर,
अहो भ्रमर,
मायबोली चलाखीच्या स्पर्धेत ऋन्मेऽऽष यांचा प्रथम क्रमांक असे मला एक सर्टिफिकेट बनवून द्याल का?
घरी बायको मला बावळट समजते तिला दाखवले असते
किती चलाखीने अमृता फडणवीस ना
किती चलाखीने अमृता फडणवीस ना ह्या धाग्यावर आणण्यात आले आहे
>>> rofl
घरी बायको मला बावळट समजते
घरी बायको मला बावळट समजते तिला दाखवले असते Happy
>>> बायको तुम्हाला बावळट समजते.. अशी इमेज तयार केलीत.. यापेक्षा जास्त चलाखी काय असू शकेल...
कदाचित बायको मला बावळट समजते
कदाचित बायको मला बावळट समजते असे वरवर दाखवून मला गाफील ठेवत असेल आणि मी तिच्या या गैरसमजाचा फायदा उचलतो का यावर नजर ठेवून असेल
नवऱ्याला खरेच बावळट समजणाऱ्या बाईचे लग्न व्हायचेय अजून
असो,
भ्रमर यांच्या एका पोस्टने विषय माझ्यावर नेला. उद्या सकाळी येऊन याचेही बिल ते माझ्यावरच फाडतील त्या आधी थांबतो.
शुभरात्री
<< भ्रमर यांच्या एका पोस्टने
<< भ्रमर यांच्या एका पोस्टने विषय माझ्यावर नेला. उद्या सकाळी येऊन याचेही बिल ते माझ्यावरच फाडतील. >>
सर, तुमच्या या 'मी मी' न करण्याच्या विनम्र स्वभावामुळेच तुम्ही पण मायबोलीचे एक सेलिब्रिटी आहात.
अहो दिवा कशाला देत आहात
अहो दिवा कशाला देत आहात

मी ऍक्च्युली जेव्हाही सोशल मीडियावर लॉग इन करतो तेव्हा सेलिब्रिटी मोडमध्येच जातो. त्यामुळे कोणी काहीही बोलो, सेलिब्रेटीवर चर्चा होणारच असे समजून मनावर न घेता एन्जॉय करत पुढे जाता येते
तुम्हाला त्यांचे कपडे पटले
तुम्हाला त्यांचे कपडे पटले नाही पटले तरी कॉमेंट करायचा मोह आवरणे इतके अवघड आहे का?>>> तुम्ही स्वतः आवरता का स्वतःच्याच धाग्या वर १०० कॉमेंटी पोस्टायचा मोह?
Pages