सध्या सोशलसाईटवर ट्रोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.
सध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.
पहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.
विराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.
दुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.
खरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.
आता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.
Official : Amchi Mumbai -The Mumbai Anthem | Sachin Pilgaonkar |
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ
प्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते? त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.
एखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.
आज तुम्ही म्हणाल पण नाही हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.
त्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.
कऊ धन्यवाद
कऊ धन्यवाद
ही अशी पोस्ट कशी शोधता येते चटकन ?
चटकन नाही
चटकन नाही

कालच वाचलं होतं हे
मग हिस्टरी मध्ये जाऊन बघितल तर सापडलं
आणि
ऋन्मेऽऽष सचिन पिळगावकर फक्त तीन words सर्च केले तरी खूप काही सापडलं
उदाहरण
ओके ओके धन्यवाद
ओके ओके धन्यवाद
मला हे जुने पोस्ट शोधा फार जमत नाहीत. त्यात माझा मोबाईल जुने मॉडेल, २जी नेटवर्क. कधी लॅपटॉप असेल तरच शोधू शकतो. त्यापेक्षा लोकांना जे समजायचे ते समजू देणे सोयीस्कर पडते.
पण आपण ते केल्याबद्दल आभार
कऊ हा ऋन्मेषचा ड्युआयडी आहे
कऊ हा ऋन्मेषचा ड्युआयडी आहे का ?
कऊ=ऋन्म्या ????
कऊ=ऋन्म्या ????

ऋन्म्या कुठं फेडशील ही एवढी पापं ??
कऊ म्हणजे कविता ! एक स्वतंत्र अभिव्यक्ती असलेली प्रतिलिपीवरील कथालेखिका. जिच्या कथांचे ४५०+ चाहते प्रतिलिपीवर आहेत.
हे कऊचं प्रतिलिपीवरील प्रोफाईल―
कऊ
ड्युआयडी सारखी वागणूक का आहे
ड्युआयडी सारखी वागणूक का आहे या आयडीची ? रच्याकने ऋन्मेषचे आडनेम पण नाईकच आहे ना ? अर्चना सरकार नाहीत का प्रतिलिपीवर ?
विपू पाहिली. ती एका ड्युआयडी
विपू पाहिली. ती एका ड्युआयडी वर रुसून मायबोली सोडून जाण्याची भाषा करताना दिसतेय आणि तिची समजून घालण्यासाठी ऋन्मेष ड्युआयडी टीम कामाला लगलेली आहे. संशोधक आघाडीवर आहेत त्यात. मनोरंजक विपू आहे.
प्रतिलिपी नवी साईट आहे का
प्रतिलिपी नवी साईट आहे का?मायबोली सारखी?
Mi_anu
Mi_anu
हो पण एवढी नवीन नाहीये
कारण मला तिथे दोन वर्ष तरी झाली असतिल,
माबोवरील असणाऱ्या बर्याच सुविधा प्रतिलिपि वर नाहीत.
(त. टी. - हा प्रतिलिपी चा प्रचार नाही mi_anu यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे)
Pages