अंडररेटेड सेलिब्रिटी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2018 - 15:58

ओवररेटेड सेलिब्रेटींच्या धाग्यावर सातत्याने या धाग्याची मागणी होत असल्याने....

ईथे लिहू शकता Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते शाहरुख खानची अभिनय क्षमता खूप अंडररेटेड आहे. त्याने एंटरटेनमेंट, प्रसिद्धी, ब्रँड व्हॅल्यू, रेस टू द टॉप, पैसा ह्याला झुकते माप देऊन त्याच्यातल्या टॅलेंटेड, हरहुन्नरी अभिनेत्यावर अंमळ अन्यायच केला म्हणायचा.
सुपरस्टार शाहरूख खान सगळ्यांना माहीत असतोच पण अ‍ॅक्टर शाहरुख खान फार कमी लोकांना कळतो.

वा, वा. ऋन्मेऽऽष ला आनंद होईल हे वाचून. नुसताच सुपर स्टार नाही तर सुपर नट!
आता फक्त सुपर गायक झाला की झाले.

दाऊद इब्राहीम
अरूण गवळी
हसिना पार्कर
रवी पुजारी
छोटा राजन

Submitted by मेरीच गिनो on 30 November, 2018 - 12:54

अंडररेटेडचा अर्थ अंडरवर्ल्डमध्ये टॉपचे रेटिंग असा आहे की काय?

मला वाटते शाहरुख खानची अभिनय क्षमता खूप अंडररेटेड आहे. त्याने एंटरटेनमेंट, प्रसिद्धी, ब्रँड व्हॅल्यू, रेस टू द टॉप, पैसा ह्याला झुकते माप देऊन त्याच्यातल्या टॅलेंटेड, हरहुन्नरी अभिनेत्यावर अंमळ अन्यायच केला म्हणायचा.
सुपरस्टार शाहरूख खान सगळ्यांना माहीत असतोच पण अ‍ॅक्टर शाहरुख खान फार कमी लोकांना कळतो.

रणदीप हुडा ,अक्षय खन्ना ,सोनू सूद , मनोज वाजपेयी , शर्मन जोशी , अभय देओल , माधवन ,शर्मन जोशी , श्रेयस तळपदे ,पीयूष मिश्रा, झिशान अय्युब

तब्बु ,रिचा चड्ढा , दिव्या दत्ता , टिस्का चोप्रा , रायमा सेन

१) सुनिल शेट्टी - याच्यात आणि अक्षयकुमारमध्ये खरे तर ओवरऑल विचार करता उन्नीसबीसचा फरक आहे. पण अक्षय ओवररेटेड झाला आणि हा अंडररेटेड त्यामुळे फरक खूप वाटतो.

२) शाहरूख खान द अभिनेता -
माझीच दुसरया धाग्यावर लिहिलेली पोस्ट कॉपीपेस्ट
.
"
बरेच लोक या सिनेतारकांना जोखायला अभिनय हा एकच निकष लावतात. आणि ईथेच चुकतात. अभिनय हा अनेक निकषांपैकी एक निकष आहे. संवादफेक, नृत्य, हावभाव, हातवारे, एनर्जी, एक्शन, स्क्रीन प्रेजेन्स, लूक्स, स्टाईल वगैरे अनेक पैलू असतात.. सर्वांचे मिळून शेवटी ध्येय एकच असते की जे काही साकाराल ते लोकांना अपील झाले पाहिजे वा लोक एंटरटेन झाले पाहिजेत. जर तेच होत नसेल तर तुम्ही अभिनयात तीसमारखान का असेनात ते व्यर्थ आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास कितीही तंत्रशुद्ध फलंदाज असा पण धावा करून संघाला जिंकवून देण्याची क्षमता नसेल तर तुमची किंमत शून्य वा तितकीच कमी आहे.

शाहरूखबाबत बोलायचे झाल्यास त्यात हे ईतर गुण ईतके अफाट आहेत की त्याकडे अभिनयक्षमता देखील बरेच ताकदीची आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. जर कोणी अंडररेटेड कलाकारांबद्दल धागा काढणार असेल तर तिथे पहिले नाव शाहरूख द अभिनेता हेच मी लिहेन.
"

३) जिमी शेरगील - याचे नाव त्या धाग्यावर कोणीतरी घेतलेले तेव्हाच अनुमोदन द्यायचे होते. पण त्या धाग्याचा विषय वेगळा असल्याने मोह आवरला.
हा मला मोहोब्बतेपासूनच आवडलेला. शाहरूखसमोर रोमांटीक भुमिकेत आपले वेगळेपण जाणवू देणे हे तेव्हा येरागबाळ्याचे काम नव्हते. पण याने ते जमवले. नंतर त्या मेरे यार की शादी है चित्रपटातही जो त्या उदय चोप्रासाठी बनवलेला चित्रपट असूनही याने संयत अभिनय करत छाप पाडली.
मुन्नाभाईंचे दोन्ही पिक्चर असो वा वेडनसडे सारखा चित्रपट. चांगल्या भुमिकांचे याने सोने केले. पण तरीही ते कौतुक वाट्याला कधी आलेच नाही.

४) अक्षय खन्ना - एक तोंड वाकडे करत कधीतरी संवाद फेकायचा ते वगळता हा गुणी अभिनेता होता. चित्रप्ट परीवारातीलही होता. पण म्हणावे असे नावलैकिक याला कधी मिळाला नाही. बरयाच चांगल्या चित्रप्टांमध्ये काम करूनही त्याच्या वाट्याला श्रेय आले नाही.

५) सचिन पिळगावकर - असा चतुरस्त्र कलाकार मराठी मातीत पुन्हा होणार नाही. पण हा सन्मान याला हल्ली हल्ली मिळू लागला. आणि त्यातही ते पाहून काही ट्रोलर्सना पोटदुखी सुरू झाली.

क्रमश: .....

अवांतर - एक हुमायून नेचरबद्दलचे सूक्ष्म निरीक्षण,
लोकांना एखादा कलाकार कसा अंडररेटेड आहे हे सांगण्यापेक्षा एखादा कसा ओवररेटेड आहे हे सांगायला जास्त मजा येते Happy

मराठीतला अमिताभ की काय म्हणतात ना त्याला... अंडर रेटेड कसा?
<<<<<<

हे कोण म्हणते? मला नाही माहीत.. काय साम्य दिसते? काय निकष लावून बोलतात.. दोघांची बलस्थाने वेगवेगळी आहेत

पहिला प्रतिसाद वाचुन लोल.
नंतर हर्पेन चा सेम प्रतिसाद वाचुन Uhoh
अंडररेटेड सेलेब्रटी
राज्कुमार राव
आयुष्मान खुराना
नवाजुद्दिन सिद्धिकी
निम्रत कौर
हुमा कुरेशी
आणि बरीच लिस्ट आहे नंतर लिहिइन.

नवाजुद्दिन सिद्धिकी? सलमानसोबत बजरंगी भाईजान आणि शाहरूखसोबत रईस.. त्याचा भाव वधारतोय

सस्मित,
हाब च्या प्रतिसादापुढे मलाही 'लोल' लिहायचे होते पण त्याला मराठीत काय म्हणतात हे विचार करण्याच्या नादात राहून गेले आणि नंतर वेळ निघून गेली. Proud

पण हा धागाच मुळी
जर कोणी अंडररेटेड कलाकारांबद्दल धागा काढणार असेल तर तिथे पहिले नाव शाहरूख द अभिनेता हेच मी लिहेन.
ह्या साठी निघालाय,

तर तुमचं आपलं काहीतरीच काय तर म्हणे रारा आखु नसि
आधी यादीत सगळ्यात पहिले नाव शाखा लिहा पाहू Wink

नवाजुद्दिन सिद्धिकी? सलमानसोबत बजरंगी भाईजान आणि शाहरूखसोबत रईस..>>>
नवाजुद्दीनला सुमार सिनेमांमध्ये, सुमार नटाबरोबर साईड रोल करावे लागतात यातच तो किती अंडररेटेड आहे हे कळतं

नवाजुद्दीनला सुमार सिनेमांमध्ये, सुमार नटाबरोबर साईड रोल करावे लागतात यातच तो किती अंडररेटेड आहे हे कळतं>>> हओ ना कच्चा ना लिंबू.
मला तर कहानीपासुनच आवडलाय तो.

प्रश्न हा आहे की सुबोध भावे वर जे बायोपिक येईल त्यात जर स्वप्नील जोशी सुबोध भावे बनला (शक्य आहे ना.केतकी माटेगावकर मोठी झाल्यावर तिची प्रिया बापट बनलेली होती.) तर इतक्या प्रेक्षकांचा इलाज कसा करायचा ☺️☺️☺️

शाहरुख खान चा बायोपिक पण सुबोध भावे च करणार की काय
>>>>
जर मराठीच कलाकार हवा असेल तर स्वप्निलला पर्याय नाही. बाकी ज्याची त्याची मर्जी.

नवाजुद्दीनला सुमार सिनेमांमध्ये, सुमार नटाबरोबर साईड रोल करावे लागतात यातच तो किती अंडररेटेड आहे हे कळतं
>>>>

कमाल आहे, अश्या अभिनयनिपुन लोकांना समांतर सिनेमांतच भुमिका मिळतात यासाठीही रडायचे आणि आता कमर्शिअल सिनेमात सुपर्रस्टार्ससोबत ताकदीच्या भुमिका मिळत आहेत तर त्यातही समाधान नाही. मग नक्की हवेय काय? झिरोमध्ये शाहरूखचा रोल नवाझुद्दीन सिद्दीकीला द्यायला हवा होता का?

हर्पेन असे काही नाही. धागा सर्वच प्रकारच्या अंडररेटेड कलाकारांसाठी काढलाय. मुळात माझा हेतू काहीही असो, प्रतिसाद देणारे आपल्या आवडीने आणि विचारांनीच देणार ना...

मी स्वत: शाहरूखव्यतिरीक्त ५ कलाकारांची लिस्ट दिलीय.. आणि अजून क्रमश: आहे ... वाचत राहा

Pages