तुम्ही सेलिब्रेटींची ट्रोलिंग करता का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2018 - 18:31

सध्या सोशलसाईटवर ट्रोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.

सध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.

पहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.
विराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.

दुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.
खरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.

आता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.
Official : Amchi Mumbai -The Mumbai Anthem | Sachin Pilgaonkar |
https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ

प्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते? त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.

एखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.

आज तुम्ही म्हणाल पण नाही हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.

त्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्या धाग्यावर कॉमेंट द्यायचा मोह आणि आपली प्रत्यक्ष ओळखपाळख नसलेल्या एका महिलेच्या पोशाखावर कॉमेंट देण्याचा मोह एकसमान झाले का?

त्या तसे करत नाहीत.
त्या त्यांना जसे वाटते तसे चांगले वाईट दोन्ही मते व्यक्त करतात
And this is good

Pages