खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर, चित्रातली बासुंदी सुंदर दिसते आहे.

बासुंदी, खीर, रबडी प्रकार कमीच आवडतात, पण जर खाल्ले तर असे होम मेड, ट्रॅडिशनल, नो शॉर्टकट वालेच पसंत मलाही.

गणेश उत्सव संपून अलमोस्ट दोन आठवडे झाले. हे आमचे वरातीमागूनचे अश्व; मदतनीस ताईंनी केलेले उकडीचे मोदक.

b353b403-7fd3-468a-97ae-6efcda6d3d3d.jpeg

घरात एक मेंबर सोडून कुणालाच आवडत नसले तरी the member and her food choice is precious for us !

बाकी कुणी उष्टावले सुद्धा नाहीत Happy आम्ही इतरांनी (फोटोत नसलेले) ड्राइफ्रूट्सचे सारण असलेले कुरकुरीत कव्हरचे तळणीचे मोदक फस्त केले.

@ मनीमोहोर,

मोदकांत थोडी खसखस आमच्याकडेही घालतात, थोडे आधी भिजवून ठेवलेली. टेक्स्चर छान येते हे एकदम बरोबर.

तुमच्या टिप्समधे चव, रूप यासोबत पदार्थाच्या serving time texture चा विचार असतो हे खूप आवडते. खूप दिवसांपासून सांगायचे राहिले होते.

माझ्या २९ वर्षीय अमेरीकास्थित मुलाला उकडीचे मोदक करून बघायची लहर आली आहे. त्याला ममोताईंचं उकडीचं प्रमाण कळवलं आहे. पण पहिल्या फेरीत गूळ खोबर्‍याचं सारण केलं, तर इतकं छान लागलं, की नुसतं सारण खाऊन फस्त झालं! उकडीपर्यंत गाडी पोचलीच नाही. आता पुन्हा करेल. तेव्हा कसेही झालेले असले, तरी इथे फोटो शेअर करीन.

बाकी कुणी उष्टावले सुद्धा नाहीत Happy आम्ही इतरांनी (फोटोत नसलेले) ड्राइफ्रूट्सचे सारण असलेले कुरकुरीत कव्हरचे तळणीचे मोदक फस्त केले.>>> सेम सेम! आमच्याकडे कुणीही खात नाही उकडीचे मोदक..आम्ही पण मस्त कुरकुरित कव्हरचे मोदकच करतो.

@ प्राजक्ता,

Our kind are an acute minority, probably qualifying as an endangered species. Are you aware of that ? 😀

^^पण पहिल्या फेरीत गूळ खोबर्‍याचं सारण केलं, तर इतकं छान लागलं, की नुसतं सारण खाऊन फस्त झालं! उकडीपर्यंत गाडी पोचलीच नाही. ^^
अनया, हे माझे पण खूप वेळा झालेय... Happy

अनिंद्य.. Happy
मीही तुमच्याच बोटीत !
इकडे पुण्या मुंबईत, मोदक म्हणजे अगदी बाय डिफॉल्ट उकडीचेच समजतात!
पण आम्हाला विदर्भातले असल्याने तळणीचेच अधिक पसंत आहेत.
अर्थात, आता गोड आणि तळलेले जास्त खातच नसल्याने प्रश्नच नाही.

पण खरी गेम चेंजर आहे फक्त थोडीशी खसखस. >>> +१११!
मी आजतागायत कधीही मोदकाच्या सारणात सुकामेवा घातलेला नाही. खोबरं परतून घेताघेताच गूळ घालायचा, खसखस जरा भाजून दुखवून घ्यायची. सारण होत आलं की शेवटी ती भरडलेली खसखस आणि वेलचीपूड घालायची. अगदी खमंग आणि मस्त सारण होतं!
(एकदाच चुकून गूळ किंचित जास्त झाला होता तेव्हा मिल्क पावडरशिवाय हाताशी काहीही नव्हतं म्हणून घातली होती; पण नाकझाड्या मंडळींना चवीतला फरक समजलाच एकदाचा! मग मी ते कबूल करून मोदक खाऊ घातले! :कपाळावर हात: )
आमच्याकडेपण कोणतेही शॉर्टकट्स नको असतात. दूध आटवायला मदत करा म्हटलं तर करतात आणि चक्का दिला तर घोटून साखर घालून त्याचं श्रीखंडात रूपांतर करायची तयारी असते. किंवा आमरसाचा आटीव गोळा दिला तर आम्रखंड. कारण हे दोन्ही करून झालं की दूध आटवलेली कढई किंवा श्रीखंडाचं मोठं तसराळं/ पातेलं चाटत बसताना ब्रह्मानंदी टाळी लागते त्याचं आकर्षण जास्त असतं! पण मग बाकी कशातही मदत मागितली तर मिळेल अशी शाश्वती नाही. पुपो, मोदक, रसमलई हे एकहाती करायला लागणारे पदार्थ आहेत.
माझ्यासाठी गूळपोळी आऊट ऑफ सिलॅबस. बाकी खिरी, शिरा, गाजरहलवा वगैरे लिंबूटिंबू... त्याला कशाला मदत हवी?! Uhoh
असो. गोडपुराण समाप्त.

Home Made is Well Made
आमचा रविवारीय खटाटोप.

49195902-5524-41a3-be91-c9edef58b85e.jpeg

# प्रियजनांचा पाहुणचार
# पावभाजी
# Pav Bhaji Butter Mar Ke
# Slow Sundays
# Mumbai Style Veg Fried Rice

छान बेत रविवारचा.
असे पदार्थ बघितले की घरची कारल्याची भाजी खायचा कंटाळा येतो ना...

सुंदर बेत अनिंद्य.
पण आजकाल हे सगळे पदार्थ इतके गिल्ट चे, अन्हेल्दीपणाचे वेष्टण घेऊन येतात की मोकळेपणी खाताच येत नाही!

हा हा, True that.

पण कधीमधी चालतयं, चीट डेज् आर फन टू. नाहीतर रोज दाल-रोटी सलाद खाऊन जगतोच आहे Happy

Hello.
मला पण उकडीचे मोदक मुंबईत येऊन माहीत झाले. आमच्याकडे कणकेचे. सारणात खसखस छान लागते.
केळ्याची कापे मस्त.
अनिंद्य,
All my favourite menu.
तवा पुलाव आणि भाजीचा रंग मस्तच.
पत्ता द्या पळत येतो.

ती अमूल बटरची पॅकेट्स खुणावतात राव! मस्त बेत!
कित्येक महिने झाले घरी पावभाजी नाही केली. आता जरा आठवणीत ठेवून केली पाहिजे.

सर्व पावभाजी / Veg Fried Rice प्रेमींनो, करा पावभाजी आणि Veg Fried Rice याच आठवड्यात आणि द्या झब्बू इथे.

@ ऋतुराज, तुमच्यासोबत जाफत करायची आहे एकदा. लवकर योग यावा.

पावभाजी मस्त!

केळ्याचे काप इंटरेस्टिंग. हे कच्च्या केळ्याचे करतात ना? मला केळी आवडत नसल्याने आमच्याकडे करत नाहीत आता... फार लहानपणी खाल्ले होते.

Our kind are an acute minority, probably qualifying as an endangered species. Are you aware of that ?>>> लोल!! असेल असेल !
वरचा पावभाजीचा बेत यम्मी! .

दडपे पोहे = Guilt free enjoyment !

उगाच “दडपे पोहे दडपो” आठवले 😀

आमचा गावरान बेत.

भाकरी पिठलं.

सोबतीला हिरवा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, कैरीचं लोणचं.

cb3c898b-7c03-44ee-8dda-5b751511da93.jpeg

बाकी तो कांदा बघितला का ?

काय सुरेख कापलाय ! सुंदर दिसत आहेत ते कांद्याचे रेखिव काप (मी स्वत: कांदा कापणे तेव्हढेच केले आहे, म्हणून) 😄

वाह! मस्तच
कालच या बेतची आठवण काढली होती मी घरी.. बरेच दिवस झाले नाही म्हणून....

Pages