निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
दोन वेगवेगळे संदर्भ? ते
दोन वेगवेगळे संदर्भ? ते प्रतिसाद एका फ्लो मध्ये आहेत. मध्ये इतर कोणाचे प्रतिसाद नसते, तर एकाखाली एक आले असते. केविलवाणं कोण आहे ते सगळ्यांना दिसतंय.
सी यू इन वलहाला! यावर फार
सी यू इन वलहाला!
यावर फार विनोदी कमेंट वाचली.
ना तू सर्व केलंय ना त्या चार्ली ने. आता हे जीवनच लढा आहे प्रकार नको.

“The Hindu FBI director tells a deceased Protestant he’ll meet him in pagan paradise with a Mormon Governor watching on,”
कॅश पटेल उगा कूल बनायला जातो. कुठे काय बोलायचं पाचपोच नाही!
मार्वल चालले तर त्या मुव्हीज वर टाकोने कर लावले तर काय घ्या! कॅश घाबरून थॉर ची मॅरेथॉन करतोय बहुतेक
इंग्रजीत सगळेच प्रोनाउन
इंग्रजीत सगळेच प्रोनाउन वापरतात हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा काय करेल बिचारा!
इकॉनॉमी सुधारण्याचा टाको वे!
इकॉनॉमी सुधारण्याचा टाको वे! 'कोंबडं झाकलं की तांबडं फुटायचं राहतं.'
कंपन्यांनी तिमाही रिपोर्ट करण्याऐवजी दर सहा महिन्यांनी रिपोर्ट करायचं. म्हणजे झाकली मूठ सहा महिने मार्केटला समजणार नाही.
<<
<<

टॅरीफ लागु झाल्यापासुन किंमती वाढल्याची उदाहरणं मिळण्याची वाट बघतोय...
>>
१०% टेरिफ चार्ज
आता सगळी इंडीयन ग्रोसरी स्टोर्स एक्स्टींक्ट होतील कोडॅक सारखी.
ABC Suspends ‘Jimmy Kimmel
ABC Suspends ‘Jimmy Kimmel Live!’ “Indefinitely” Over Charlie Kirk Comments
वॉवच! आता फेलन आणि सेथचा नंबर
वॉवच! आता फेलन आणि सेथचा नंबर ना?
कोणाला अजुन वाटतंय अमेरिका बनाना रिपब्लिक नाही?
वाईट जॉब्ज रिपोर्ट दिल्यावरून
वाईट जॉब्ज रिपोर्ट दिल्यावरून बीएलएस कमिशनर फायर होऊ शकते तर कोल्बेर आणि किमेल किस झाड की पत्ती आहेत!
इट इज इलिगल टू क्रीटिसाईझ
इट इज इलिगल टू क्रीटिसाईझ टाको.
हे लिटरल आयतुल्ला डोलान ट्रम्प यांचे शब्द आहेत, काहीही अतिशयोक्ती नाही. बाकी अफगाणिस्तान युद्ध परत चालू करतोय म्हणे.
किमेल डिस्नीवर बिलियन डॉलरला चा खटला भरतोय. त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 'ते' ७ शब्द सोडून पॉलिटिकल साटायर करण्याबद्दल काहीही नाही. किमेल जसा गेला तसे पुढच्या डेमोक्रॅटिक प्रेसिडेन्सी मध्ये सगळे राईट विंगर्स फायर होतील. याला अंत नाही. फर्स्ट अमेंडमेंटला इतके पायदळी इथले मागा लोक पण तुडवतात का?
जिमी किमलचं ओरिजिनल कोट: “We
जिमी किमलचं ओरिजिनल कोट: “We hit some new lows over the weekend with the MAGA gang desperately trying to characterize this kid who murdered Charlie Kirk as anything other than one of them and doing everything they can to score political points from it.”
डज एनिबडि सी एनिथिंग राँग इन इट? किमलचं वरचं वाक्य जोक आहे कि काहि ठोस पुरावा असल्या शिवाय केलेलं मिसलिडिंग कोट आहे? इथे तसा आरोप शेंडेनक्षत्रांवर विहमेंटली झालेला आहे. डाव्यांनी केली म्हणुन चालुन जात असावा..
किमलचं कोट चूकिचं आहे त्याचबरोबर त्याच्यावर घातलेली बंदिहि चूकिची आहे. चार्ली कर्क, मेहदि हसन, रिचर्ड डॉकिन्स यांच्यासारखी ठोस मतं असणारी, ती मतं सिविलाय्ज्ड पद्धतीने मांडणारी व्यक्तिमत्वं समाजात असणं, आणि त्यांचे विचार पटो वा ना पटो, ते अॅकनॉलेज करणं हे एका हेल्दि समाजव्यवस्थेचं लक्षण आहे..
बाकि चालु द्या...
जिमी किमलचं ओरिजिनल कोट: “We
डपो
खुद्द तुमचा प्रेसिडेन्ट
खुद्द तुमचा प्रेसिडेन्ट कुठलीही माहिती मिळवण्याआधीच 'रॅडिकल लेफ्टिस्ट लूनाटिक ग्रूप्स'वर ठपका ठेवून मोकळा झाला होता की! तेव्हा तो जोक होता की मिसलीडिंग कोट?
>>> बाकि चालु द्या...
थँक्यू हं, अशीच तुमची परवानगी देत जा वेळोवेळी.
किमेलची कमेंट ट्रुली सिक होती
किमेलची कमेंट ट्रुली सिक होती म्हणे. पुसी ग्रॅब करण्याच्या वल्गना करणार्या प्रेसिडेंटला आणि त्याच्या समर्थकांना ती असभ्य वाटली.
आल्टरनेट सोर्सेस शोधण्यावरच्या एक्स्पर्ट कमेंट वाचून फिसकन हसू आले. मी मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कन्सल्टिंग मध्ये काम करतो. माझे बरेचसे मित्र, सहकारी याच क्षेत्रात आहेत - विविध कंपन्यात - बुटिक ते बिग ४. सध्या सगळ्यांचा धंदा तेजीत आहे. कारण टॅरिफ आणि त्यातल्या अनसर्टनटींमुळे आणि बरेचसे मार्केट आता अमेरिकेबाहेरही असल्याने प्रोजेक्ट अमेरिका, प्रोजेक्ट न्यु एज वगैरे गोंडस नावांखाली मॅन्युफॅक्चरिंग लाइन अख्ख्या उचलून आशिया आणि लॅटीन सेंट्रल अमेरिकेतल्या कॉन्ट्रॅ़क्ट मॅन्युफॅक्चरर्स कडे नेत आहेत. उगा नाही शेअर प्राइसेस वाढत आहेत.
** सगळ्यांना समजावे म्हणून खूप इंग्रजी शब्द वापरले आहेत.
किमलचं ते वाक्य त्या
किमलचं ते वाक्य त्या मारेकऱ्याबद्दल नसून maga gang बद्दल आहे, असा अर्थ मला लागतो आहे. त्याची ओळख पटण्याआधी आणि तो पकडला जाण्याआधीच हे सुरू झालं होतं ना?
प्रेसिडेंटला पब्लिक
प्रेसिडेंटला पब्लिक ब्रॉडकास्टिंग नेटवर्कवर नावं ठेवली तर परिणाम भोगायला तयार रहा इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांच्याच प्रेसिडंटने सांगून सुद्धा हे अजुन एकदम मोराल बिराल आणि चूकीचं (त्यात पण मिष्टेक करुन) वगैरे लिहून, चालू ठेवा वगैरे सांगून काय आव आणत आहेत त्यांचंच त्यांना ठाऊक. मलाच तुमच्या पोस्ट वाचुन गरीब वाटतं.
हे असलं तुमच्या एको चेंबर मध्ये बोललात तर टाळ्या मिळतील. इथे कशाला आपल्याच चिंध्या करुन घेताय. सध्या नेहेमी सारखं बिळात लपून इग्नोर मारा. अनएम्प्लॉयमेंट, मार्केट इ. काही थोडंस एका दिवसा पुरतं का होईना फेवरेबल काही झालं की एक लाईन लिहा आणि मग चालू दे वगैरे पण शेवटी लिहा. सध्या पाजळून घेऊ नका. ते फायद्याचे नाही.
भरत, तो किड आणि सीके या बद्दल त्यांच्या प्रेसिडेंटला ही काही एक पडलेली नाही. ते मागा बद्दल होतं म्हणूनच हे चिडलेत. इतकं खरं कसं कोण बोलू शकतं!
तर बोलायचं असेल तर आपण बॉलरुम बद्दल बोलू. कसं चाललंय बांधकाम?
>>> बोलायचं असेल तर आपण
>>> बोलायचं असेल तर आपण बॉलरुम बद्दल बोलू.
बोलू ना, एपस्टीन फाइल्स सोडून कशाबद्दलही बोलू!
किमेल जो बोलला तसेच अगदी
किमेल जो बोलला तसेच अगदी मलाही वाटले होते. कुठल्याही थराला जाऊ शकतात हे लोक. लहान मुलींचा बलात्कार ओके वाटणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार. आमच्या नेबरहूडात एका मुलीच्या कारवर जोरजोरात धडका देऊन एक रॅंडम माणूस हेट अमेरिका, हेट मागा असं काही तरी बोलून गेला. लोक चर्चमधे सध्या जे चाललं आहे त्यावर बोलून निचरा करणारा योग्य पेस्टर शोधत आहेत. हे माझ्या नेबरहूडात फेसबुकवर झाले आहे. टेक्सासमधे. चार्ली कर्क गेल्यावर (तोही किती नीच) काय एकेक मुक्ताफळं. हा आणि तो युनायटेड हेल्थचा सिईओ - मला काहीच वाटलं नाही. नो फीलिंग्ज. हे सगळे युवाल्डी स्कूल शूटिंग नंतर गप बसले, धर्माचे शिक्षण द्यायला हवे म्हणे मुलांना, इथे कॅंप मिस्टीक मधे मुली वाहून गेल्या चिमण्या ( का तर हवामान खात्याने मनुष्य बळ कमी केले/ फंडींग काढले) तेव्हाही गप बसले आणि आता पेस्टर शोधत आहेत. रेड स्टेट आहे. काही महिन्यांपूर्वी युटी ऑस्टिन मधेही येऊन गेला होता कर्क. एपस्टीन, ट्रंप आणि सगळ्या पेडोफाईल मित्रमंडळात स्टीफन हॉकिंग होता म्हणून त्याचाही आदर वाटेनासा झाला अचानक.
न्यूयॉर्क अटर्नि लटिशिया
न्यूयॉर्क अटर्नि लटिशिया जेम्स विरुद्ध वर्जिनिया फेडरल प्रॉसिक्युटरला काही पुरावा सापडला नाही म्हणून त्याची गच्छंती होणार दिसतंय.
सीडीसी डिरेक्टरला वॅक्सीन
सीडीसी डिरेक्टरला वॅक्सीन एक्स्पर्ट्सना हाकलायला नकार दिल्यावरून हाकललं.
आता करन्सीवरचं 'इन गॉड वी ट्र्स्ट' बदलून 'इन ट्रम्प वी ट्रस्ट' करा, तेवढंच राहिलंय. आणि हो, तेवढं नोबेल द्यायचं बघा!
न्यूयॉर्क टाईम्स विरुद्धचा
न्यूयॉर्क टाईम्स विरुद्धचा अब्रुनुकसानीचा १५ बिलियन डॉलरचा खटला अटर नॉनसेंस आहे म्हणून फ्लोरिडाच्या फेडरल जज ने रद्दबातल ठरवला. वर शालजोडीतले ही दिलेत.
“A complaint is not a megaphone for public relations or a podium for a passionate oration at a political rally or the functional equivalent of the Hyde Park Speakers’ Corner,” Judge Steven Merryday, an appointee of former President George H. W. Bush, wrote in the order, saying his court was not a venue for Trump to “rage against an adversary.”
१५ मिलियन डॉलरचा खटला भरताना याला एक धड वकिल सापडेना म्हणावं का?
चीनला हा मनुष्य वचक बसवु शकेल
चीनला हा मनुष्य वचक बसवु शकेल त्या ड्रॅगन ला आळा घालेल, वेसण घालेल या आशेवर मत दिले होते. 'तिच्या कुठुन कुठुन रक्त निघत असेल' आणि 'पुसी ग्रॅब' सारखी गलिच्छ खरच किळसवाणी आणि खालच्या पातळी वरची वक्तव्ये दुर्लक्ष करुन. लेकिन इसने हर एक जगह सिर्फ रायता फैलाया| या माणसाने टोपी घातली अमेरिकेला. ते ही दुसर्यांदा. इथे इमेजवरती लोक फार भाळतात. माचो, कॉन्फिडन्ट, बुली इज नॉट नेसेसरीली इक्विव्हॅलंट टु गुड फॉर अमेरिका. पण हे कळले नाही कारण समोर बायडेन होता एकदा तर एकदा कमला होती.
.
रायता फैला के रख्ख्हा है! तो चायना अजुन बळकट झालाय , रशिया, भारताशी हात मिळवुन. ट्रंप समर्थक तोंडघशी पडलेत हे मान्य आहे.
.
किमलचं कोट चूकिचं आहे त्याचबरोबर त्याच्यावर घातलेली बंदिहि चूकिची आहे.
_/\_ धन्यवाद राज.
-----------------------------
आणि अजुनही असे वाटते की टेरिफ आणि त्याने घेतलेले अन्य उद्योगजगताचे निर्णय कसे प्ले आऊट होतात ते अजुन कळायचय. मोठे मोठे इकॉनॉमिस्टही गप्प आहेत कारण कोणालाच माहीत नाहीये लॉन्ग टर्म मध्ये कसे प्ले आ ऊट होतील. पण एकंदर - वी हॅव्ह टु बाईट द बुलेट. त्यातून सुटका नाही.
किमल चा मी फॅन नाही, ट्रंप
किमल चा मी फॅन नाही, ट्रंप जिंकल्यावर तो अक्षरशः रडला. एखाद्या पक्षाला इतका बांधील असणारा माणून कॉमेडियन असू शकत नाही.
पण तरीही किमल च्या कोट मध्ये चुकीचे काय आहे ? हत्या झाल्यावर लगेच काहीही माहिती नसताना 'लेफ्टिस्ट ग्रूप' वर ट्रम्प ने खापर फोडले. केवळ या कोट वरून किमल ची नोकरी जात असेल तर ट्रम्प ने राजिनामा नाही निदान लेफ्टिस्ट लोकांची माफी तरी मागितली पाहिजे. हत्या झाल्या वर लगेच मागा लोकांच्या प्रतिक्रियाही अशाच होत्या. नंतर तो कोण गव्हर्नर त्याने तर हल्लेखोर 'आपल्यातला' नसेल अशी आशा होती हे अतिशय घातक विधान केले. आमच्या आख्ख्या कुटुंबात सारेच मागा आहेत असेही विधान (हल्लेखोराच्या आईने बहुदा) केले.
डिस्नीच्या माजी सीईओची पोस्ट:
डिस्नीच्या माजी सीईओची पोस्ट:
"Where has all the leadership gone? If not for university presidents, law firm managing partners, and corporate chief executives standing up against bullies, who then will step up for the first amendment?"
"The 'suspending indefinitely' of Jimmy Kimmel immediately after the Chairman of the FCC's aggressive yet hollow threatening of the Disney Company is yet another example of out-of-control intimidation,"
"Maybe the Constitution should have said, 'Congress shall make no law abridging the freedom of speech, or of the press, except in one's political or financial self-interest.' By-the-way, for the record, this ex-CEO finds Jimmy Kimmel very talented and funny."
सोमवार पर्यंत डिस्नीला ही सर्कस थांबवायची आहे. काय उत्तर मिळतंय समजेलच.
आज एक गजब अवतरण वाचनात आले.
आज एक गजब अवतरण वाचनात आले. लिआँ ट्रॉट्स्कीने १९३० सालच्या जर्मन समाजावर हे भाष्य केले होते. जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण, औद्योगिकीकरण होत लोकांना वैज्ञानिक क्रांतीची फळे चाखायला मिळू लागली होती. साधारण १०० वर्षांपुर्वी केलेले हे भाष्य आजच्या अमेरिकन समाजाला किती लागू होते ते तपासून पहा.
LEON TROTSKY ON THE CULTURE OF FASCISM
Fascism has opened up the depths of society for politics. Today, not only in peasant homes but also in city skyscrapers, there lives alongside of the twentieth century the tenth or the thirteenth. A hundred million people use electricity and still believe in the magic power of signs and exorcisms. The Pope of Rome broadcasts over the radio about the miraculous transformation of water into wine. Movie stars go to mediums. Aviators who pilot miraculous mechanisms created by man's genius wear amulets on their sweaters. What inexhaustible reserves they possess of darkness, ignorance, and savagery! Despair has raised them to their feet; fascism has given them a banner. Everything that should have been eliminated from the national organism in the form of cultural excrement in the course of the normal development of society has now come gushing out from the throat; capitalist society is puking up the undigested barbarism. Such is the physiology of National Socialism.
Pages