शशक २ - जय महाराष्ट्र - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 3 September, 2025 - 12:53

मुझे वाट्या नही था, कि तुम ऐसा वागोगे, प्लम्बर भैया. तुमको परवा आने को सांग्या था और तुम आज उगवे हो. मेरी बायको म्हणती है कि पक्या को काम दो, पक्या मराठी माणूस है. लेकिन पक्या अव्वा के सव्वा पैसे घेता है. म्हणून हमने तुमको काम दिया. परंतु तुम तो आळशी निकले. वो बेसिन का नळ बिघड गया है. उद्या मेरा सासरा आनेवाला है. वो म्हातारा पान खाके बेसिन मे थुंकता है. अगर पाणी नही होंगा तो उसकी थुंकी वाळ जायेगी. अब तुम लवकर नळ दुरुस्त करो, सूर्य मावळणे के अगोदर. कारण लाईट गई है. अंधार पड गया तो तुमको दिसेगा नही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुत चांगळा Lol

Lol
थोडकेमे बोलू तो मजा आ गया.

Lol

मतदान संपल्यावर माझी कथा व्हायरल होते आहे >>>> स्पर्धा चालू असताना कुणीच कुणाचे लेख वाचत नव्हते Lol
सगळे आपापला मतदारसंघ सांभाळणार. अपवाद वगळता Happy जो स्टार प्रचारक असतो त्याला सगळीकडे जावं लागतं.

मतं नाही मिळाली तर माझं निवडणुकीला उभे राहण्याचं इद्दीष्ट निवडून येणे हे नसून देशाच्या समस्यांकडे लक्ष वेधणे होतं असं म्हणतात तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण. Proud

यह सब मोहमाया है। >>> खरं आहे. Happy
तसं काहीतरी म्हणा तुम्ही पण >>>> स्पर्धेमध्ये नंबर मिळवणे हे माझे उद्दिष्ट कधीच नव्हते. मायबोलीकरांना मजेदार शशक वाचायला देऊन मायबोलीची मनापासून सेवा करणे हेच माझे पहिल्यापासून उद्दिष्ट होते. Lol (जम्या क्या?)

मजेदार शशक वाचायला देऊन मायबोलीची मनापासून सेवा करणे हेच माझे पहिल्यापासून उद्दिष्ट होते. Lol
फुल जम्या. Proud फिदीफिदी