शशक १ - आंतरग्रहीय - मामी

Submitted by मामी on 29 August, 2025 - 02:28

आधी या कथेची पार्श्वभूमी इथे वाचावी म्हणजे संदर्भ जुळेल.

तर पुढे चालू ...
****************************************************************************************************

ज्योत्स्नाबाईं शुद्धीवर आल्या तेव्हा स्क्रीनसमोर बसून तो हिरवा प्राणी जांभळ्या रंगाचे पेय फुर्रफुर्र आवाज करत पीत होता. ज्योत्स्नाबाई घाबरल्याच. बेशुद्धीचा दुसरा घाणा काढण्याच्या बेतात असतानाच प्राण्याच्या अँटेना त्यांच्याकडे वळल्या आणि तो चटकन उठला.

एका हातातील पेय तिसर्‍या हातात घेत दुसर्‍या हातानं त्यानं ज्योत्स्नाबाईंना उभं केलं. वयापरत्वे आलेली सांधेदुखी, क्षीण नजर गायब झालेत याची जाणीव ज्योत्स्नाबाईंना झाली.

"ज्यो! डार्लिंग!! तुला असा धक्का दिल्याबद्दल माफ कर पण तुझ्याविना मी कसा राहणार? गेली दीड सेकंद .... सॉरी पृथ्वीनुसार पंचवीस वर्षं तुझ्यावर प्रेम करतोय. तुला माझ्याबरोबर माझ्या ग्रहावर रहायला आवडेल ना?" पंचविशीतली ज्यो भानावर आली आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले ...... मग ती झक्कास लाजली!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघूच्या ग्रहावर जाऊन ज्योत्स्नाबाई ज्यो झाल्या . रिव्हर्स एजिंग… भारी आहे शशक आयडीया
रॉम टेक शशक Biggrin

हाहाहाहा. पूर्ण कथा वाचत असताना वाक्यवाक्याला हसत होतो. बेशुद्धीचा दुसरा घाणा, एका हातातील पेय तिसर्‍या हातात घेत दुसर्‍या हातानं त्यानं ज्योत्स्नाबाईंना उभं केलं, ज्यो डार्लिंग!!!! हहपुवा Rofl