आधी या कथेची पार्श्वभूमी इथे वाचावी म्हणजे संदर्भ जुळेल.
तर पुढे चालू ...
****************************************************************************************************
ज्योत्स्नाबाईं शुद्धीवर आल्या तेव्हा स्क्रीनसमोर बसून तो हिरवा प्राणी जांभळ्या रंगाचे पेय फुर्रफुर्र आवाज करत पीत होता. ज्योत्स्नाबाई घाबरल्याच. बेशुद्धीचा दुसरा घाणा काढण्याच्या बेतात असतानाच प्राण्याच्या अँटेना त्यांच्याकडे वळल्या आणि तो चटकन उठला.
एका हातातील पेय तिसर्या हातात घेत दुसर्या हातानं त्यानं ज्योत्स्नाबाईंना उभं केलं. वयापरत्वे आलेली सांधेदुखी, क्षीण नजर गायब झालेत याची जाणीव ज्योत्स्नाबाईंना झाली.
"ज्यो! डार्लिंग!! तुला असा धक्का दिल्याबद्दल माफ कर पण तुझ्याविना मी कसा राहणार? गेली दीड सेकंद .... सॉरी पृथ्वीनुसार पंचवीस वर्षं तुझ्यावर प्रेम करतोय. तुला माझ्याबरोबर माझ्या ग्रहावर रहायला आवडेल ना?" पंचविशीतली ज्यो भानावर आली आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले ...... मग ती झक्कास लाजली!
आता हे हाय फंडा शशक.
आता हे हाय फंडा शशक.
समजलं आणि आवडलं.
हाहा, हे भारी झालं! रॉम कॉम
हाहा, हे भारी झालं! रॉम कॉम साय फाय ऑल इन वन!
रघूच्या ग्रहावर जाऊन
रघूच्या ग्रहावर जाऊन ज्योत्स्नाबाई ज्यो झाल्या . रिव्हर्स एजिंग… भारी आहे शशक आयडीया
रॉम टेक शशक
मामे मामे तू म्हणजे कहरेस.
मामे मामे तू म्हणजे कहरेस.
व्वा, ह्या निमित्ताने जुनं
व्वा, ह्या निमित्ताने जुनं शशक परत वाचलं आणि कंटिन्युईटी आवडली.
भारिये... दोन्ही शशक
भारिये... दोन्ही शशक जोडण्याची आयडिया मस्त.
>>> बेशुद्धीचा दुसरा घाणा
>>> बेशुद्धीचा दुसरा घाणा

मस्त.
भारी जमलीय ही सिक्वेल मामी.
भारी जमलीय ही सिक्वेल मामी.
बेशुद्धीचा दुसरा घाणा >>
बेशुद्धीचा दुसरा घाणा >>
जमली आहे.
बेशुद्धीचा दुसरा घाणा >
बेशुद्धीचा दुसरा घाणा >
झकास आहे मामी.
भारी आहे
भारी आहे
हा हा मस्त आहे.
हा हा मस्त आहे.
आवडलं.
आवडलं.
बेशुद्धीचा दुसरा घाणा >
बेशुद्धीचा दुसरा घाणा >
मस्त जमलेय
मस्त सिक्वेल. पुढच्या गणेश
मस्त सिक्वेल. पुढच्या गणेश चतुर्थीला काय असेल मग
अतुल, कदाचित जन्मतः १०० वर्ष
अतुल, कदाचित जन्मतः १०० वर्ष वयाची एलियन बाळं
हाहाहाहा. पूर्ण कथा वाचत
हाहाहाहा. पूर्ण कथा वाचत असताना वाक्यवाक्याला हसत होतो. बेशुद्धीचा दुसरा घाणा, एका हातातील पेय तिसर्या हातात घेत दुसर्या हातानं त्यानं ज्योत्स्नाबाईंना उभं केलं, ज्यो डार्लिंग!!!! हहपुवा