पाककृती स्पर्धा क्रमांक १ - शिरा सजावट - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 29 August, 2025 - 19:50

साद्यंत आणि सचित्र पाककृती अशी:

१. दीड कप रवा अर्धा कप तुपात खमंग परतून घेतला.
२. त्यात आधी दोन कप गरम पाणी आणि मग केशर खलून घातलेलं एक कप गरम दूध घालून झाकून फुलवून घेतला.
३. त्यात सव्वा कप साखर घातली आणि कडेने आणखी तूप सोडून छान दमदमीत वाफ आणली.

वेलचीपूड घालून तयार शिरा:

d6a30b65-a32e-4b2f-825c-0ccc205a9965.jpeg

४. आता यातला अर्धा शिरा बाजूला काढला, आणि उरलेल्या अर्ध्यात कपभर आमरस आणि आणखी थोडं तूप घालून घट्ट होईपर्यंत परतून घेतला.

7a8f5c2a-032a-4f49-b435-9cdbd26733b1.jpeg

५. दोन्ही शिरे निवू दिले.
६. आता सजावटीची तयारी करून घेतली.

a0ee64ac-e379-4ee5-ac44-0aff44ea7f79_0.jpeg

७. त्या कात्रीसारख्या दिसणाऱ्या बॉलरने शिऱ्याचे घट्ट गोळे करून लॉलीपॉपच्या काड्यांना टोचून घेतले.
८. व्हाइट चॉकलेट मेल्ट करून घेऊन त्याने हे गोळे (माझ्या मुलाने, आदित्यने) सजवले.

11cf6f63-5145-4714-8501-89096fb25942.jpeg

८. त्या कपात आधी शुगर इन द रॉ भरली होती, पण त्यात हे शिऱ्याचे पॉप्स वजनामुळे नीट उभे राहीनात, मग त्यात शिराच दाबून भरला आणि त्यात ते पॉप्स खोचले.

eebc2ed5-b827-4d71-bab1-ab3283cebb52.jpeg

९. दुसरीकडे पांढऱ्या शिऱ्याची कोरडेपणासाठी चमचाभर मिल्क पावडर घालून वळकटी करून घेतली. आंब्याच्या शिऱ्याची ‘पोळी’ लाटून त्यात ही वळकटी गुंडाळली.

899e033a-d93a-449a-a775-bafc065a4b64.jpeg

१०. वळकटी गार करून तिच्या वड्या कापून घेतल्या.

d68c85c2-ef87-4917-a348-11edb88b605d.jpegd057e1ae-97e8-462b-9a7a-7757870b5c8a.jpeg

११. हा आदित्यने उरलेल्या वड्यांचा केलेला गणपती:

ea29c24e-df75-4224-90d6-eb3ece837999.jpeg

मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी सावकाश वाचते.

फोटो सजावट सर्वच अप्रतिम. एकदम आहाहा. फार मेहनत, फार नजाकत.

गणपतीबाप्पा साठी शब्द कमी पडतील, एवढा कल्पक.

Happy जबरदस्त झाले आहे. एकदम तोंपासू. मी हे ओरिओजचे केलेले आहे पण शिऱ्याचे भन्नाट आहेत.

व्वा, मस्त कल्पना.
शिऱ्याचे लॉलीपॉप भारीच दिसतायेत.
गणपती पण मस्त.
केशराच्या काडीने डोळा करायची आयडिया भारी आहे.

छानच दिसतंय. कल्पकता, execution सगळंच मस्त. एक लॉलीपॉप पटकन उचलून खावसा वाटतोय.

उरलेल्या वड्यांचा गणोबा पण मस्त.

फार सुंदर!
किती कल्पक आहात मायलेक!!
सृजनाचा असाच आनंद तुम्हाला सदैव मिळू दे.

पहिल्याच फोटोत जे काही आहे ते digitally created वाटावं इतकं सुंदर आहे.
मला डार्क चॉकलेट वापरून गोडाची चव थोडी ब्रेक करावी असं वाटेल.

कल्पना, सादरीकरण आणि पहिला फोटो - अप्रतिम.

लेकाचा गणपती पण सुरेख झालाय. उंदीरमामाची शेपटी तर सुपर-क्यूट आहे.

कहर!!! कहर!!
न्युनगंड येउन फार चिडचिड झाली माझी. Sad

Pages