
साद्यंत आणि सचित्र पाककृती अशी:
१. दीड कप रवा अर्धा कप तुपात खमंग परतून घेतला.
२. त्यात आधी दोन कप गरम पाणी आणि मग केशर खलून घातलेलं एक कप गरम दूध घालून झाकून फुलवून घेतला.
३. त्यात सव्वा कप साखर घातली आणि कडेने आणखी तूप सोडून छान दमदमीत वाफ आणली.
वेलचीपूड घालून तयार शिरा:

४. आता यातला अर्धा शिरा बाजूला काढला, आणि उरलेल्या अर्ध्यात कपभर आमरस आणि आणखी थोडं तूप घालून घट्ट होईपर्यंत परतून घेतला.

५. दोन्ही शिरे निवू दिले.
६. आता सजावटीची तयारी करून घेतली.

७. त्या कात्रीसारख्या दिसणाऱ्या बॉलरने शिऱ्याचे घट्ट गोळे करून लॉलीपॉपच्या काड्यांना टोचून घेतले.
८. व्हाइट चॉकलेट मेल्ट करून घेऊन त्याने हे गोळे (माझ्या मुलाने, आदित्यने) सजवले.

८. त्या कपात आधी शुगर इन द रॉ भरली होती, पण त्यात हे शिऱ्याचे पॉप्स वजनामुळे नीट उभे राहीनात, मग त्यात शिराच दाबून भरला आणि त्यात ते पॉप्स खोचले.

९. दुसरीकडे पांढऱ्या शिऱ्याची कोरडेपणासाठी चमचाभर मिल्क पावडर घालून वळकटी करून घेतली. आंब्याच्या शिऱ्याची ‘पोळी’ लाटून त्यात ही वळकटी गुंडाळली.

१०. वळकटी गार करून तिच्या वड्या कापून घेतल्या.


११. हा आदित्यने उरलेल्या वड्यांचा केलेला गणपती:

मोरया!
फारच सुंदर Pro मॅक्स level
फारच सुंदर
Pro मॅक्स level
सुंदर!
सुंदर!
कल्पनातीत. सुरेख सादरीकरण.
कल्पनातीत. सुरेख सादरीकरण.
किती सुंदर! डोळे तृप्त झाले..
किती सुंदर! डोळे तृप्त झाले...
भारी दिसतेय एकदम
भारी दिसतेय एकदम
शिर्यात खोचलेले पॉप्स,
शिर्यात खोचलेले पॉप्स, प्लेटचे डेकोरेशन, बदाम शेप कप, बाजूची फुले- सगळे अफलातून! कात्री सारखा दिसणारा बॉलर (इथेच वाचून असे काही असते हे कळाले) वगैरे मेजर लीग इक्विपमेण्ट आहे एकदम
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार.
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार.
भारी दिसतंय हे
भारी दिसतंय हे
सुरेख ! कायसजावट केली आहे,
सुरेख ! कायसजावट केली आहे, मस्तच !!
वॉव!!! कल्पना तर आहेच छान. पण
वॉव!!! कल्पना तर आहेच छान. पण ती प्रत्यक्षात आणणं फार काही सोपं नाहीये. दोन्ही शिर्याच्या वळकट्या करणं नक्कीच अवघड टास्क होते. तुम्हा दोघा मायलेकांचे कौतुक.
Clearly a winner !
Clearly a winner !
What a delightful twist to our humble “shira” !
Twin layered pops are dramatic and it’s surely not easy to shape them so. Spotted not one but two artists here. 👍
Bravo !
👏
मनःपूर्वक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद!
(No subject)
सजावट छान.
सजावट छान.
Pages