खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे मन इस हात दे उस हात ले Happy

बाई दवे,
डोसा उत्तप्पा गटाला एक झब्बू

रव्याचे पीठ उपम्यासारखे घट्ट करून त्याच्या गोलाकार पुरी थापल्या आणि तसल्या दोन पुऱ्यामध्ये बटाटा भाजी भरून सँडविच/बर्गर करून मग फ्राय केले

घरात पिवळी लाईट चालू असल्याने अशी गडद पिवळी शेड आली आहे. पण पांढरा रंग फ्राय केल्यावर दिसतो तितपत पिवळा होता.

IMG-20250819-WA0034.jpg
.
IMG-20250819-WA0035.jpg

कॉर्न पकोडे Aka मक्याची भजी कितीतरी दिवसात नाही खाल्ले. लवकरच घडणार !

बेसन लाडू आवडतात, डीप गोल्डन रंगाचे. रवा घातलेले तितकेसे नाही, पण हे दिसतात छान.

घरचे डोसे तर उत्तमच झाले असणार, कमी बटर/तेल आणि हवे तसे कुरकुरीत किंवा मऊ.

मस्त ! मी आज रात्री भूक लागली की मिसळ च खाणार आहे.
पण लालू रेसिपी म्हणजे कुठली
........
अच्छा पाहिला धागा आता Happy

उकाडा मसुरी तांदूळ आणि हिरव्या सालीची मुगाची डाळ वापरून केलेला ढोकळा आणि नंतर डोसेIMG_20250824_101526.jpg<

Dose IMG_20250824_142645.jpg

रवा बर्गर भारी दिसतोय.
माझेमन, मिसळ १ नंबर. जबरी.
मेघ, ढोकळा अन् डोसा अत्यंत आवडीचे.
मस्तच....

@ मेघ,
मला गोड अजिबात आवडत नाही.
गोडात मी फक्त जिलबी आणि म्हैसूर पाक (जाळीवाला) खातो.
तुम्ही माझ्या आवडीचे पदार्थ टाकून छळताय.
Happy
जिलब्या अगदी सुरेख वळल्या आहेत.
अगदी तोंडाला पाणी सुटलं......

व्हेज आप्पे Happy

IMG-20250823-WA0012.jpg
.
IMG-20250823-WA0013.jpg
.
IMG-20250823-WA0019.jpg

नॉनव्हेज आप्पे कधी पाहिले नाहीत Wink Lol
म्हणजे भाज्या घालून केलेले Proud
मुलांना डब्यात दिलेले त्यांनी संपवले हे त्यांचे यश Happy

मी घरी चटणी चहा सोबत खाल्ले, छान लागले.

20250902_202331.jpg

हे भरीत कसले आहे ? दोन क्लू देते खास कोकणी इंग्रेडियंट आहे आणि भरीत असलं की अमक्याच भरीत असं म्हणत नाहीत. त्यासाठी एक स्पेशल शब्द आहे.
ओळखतीलच कोणीतरी पण नाहीतर थोड्या वेळाने इथेच लिहिते.

Pages