Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिमरन,
सिमरन,
गुलाबजाम लाळ गाळू एकदम.
सजावट पण मस्तच
या धाग्यावर येणे गुन्हा आहे..
या धाग्यावर येणे गुन्हा आहे...
काय त्या एकेक डिशेस...
नारळी वड्या, गुलाबजाम, पोहे, घेवर.. सगळंच एक नंबर....
पेरू घ्या..
पेरू घ्या..
खाऊ चे फोटो नाहीत.. काहीही स्पेशल बनवणं होत नाही....
मृणाली, स्पेशल नसले तरी
मृणाली, स्पेशल नसले तरी चालतेय इथे
ही घ्या, वांगे बटाटा भाजी.
वांगे कोणासाठी असेलही स्पेशल पण मी खात नाही. त्यामुळे ते बाजूला काढून..
बाकी वांग्याची चटणी आणि ती चव उतरलेले बटाटे अफलातून लागतात. बटाटे मला सर्वात जास्त वांग्याच्या भाजीतीलच आवडतात
घेवर आणि गुलाबजाम, दोन्ही
घेवर आणि गुलाबजाम, दोन्ही मस्त. आम्हाला पण काल रक्षाबंधन स्पेशल घेंवर मिळाले. जावेच्या माहेरून बुलंदशहरहून आले होते. वर्षातून एकदाच फक्त रक्षाबंधनाला खायला मिळतात. युपीकडच्या मिठाया मस्त असतात आणि माहेरून आलेल्या तर अजून स्पेशल असतात.
वांगं - बटाटा रस्सा छान दिसतोय. आवडता पदार्थ, पण इथे पाणचट वांगी मिळतात. काटे नसतात अजिबात आणी चव पण नसते.
मृ चा पेरू बघून तोंडाला पाणी सुटलं.
.. माहेरून आलेल्या तर अजून
.. माहेरून आलेल्या तर अजून स्पेशल …
True that 😀
वांग्यांची नावड आमच्याकडे “पिढीजात वारसा” प्रकारात मोडते 😀
पेरू मात्र बेहद्द पसंत, आता येतीलच काही दिवसात
अनिंद्य, शेतावरचे पेरू येऊ
अनिंद्य, शेतावरचे पेरू येऊ लागले आहेत. पाठवू का?
उद्या शेतावर जाणार आहे, ताजा फोटो काढून इथे पोस्ट करते.
पेरूची फोड चटकदार आहे.
पेरूची फोड चटकदार आहे.
वांगी बटाटा भाजी भारीच.
फार आधी लग्नात वांगी बटाटा हरभऱ्याची भाजी असायची. काय अवीट चव असायची त्याला.
नाचणी मिनी उताप्पा आणि टोमॅटो
नाचणी मिनी उताप्पा आणि टोमॅटो चटणी
<
<
Sorry दोनदा पोस्ट झाले होते पण आता एडिट केले आहे
… अनिंद्य, शेतावरचे पेरू येऊ
… अनिंद्य, शेतावरचे पेरू येऊ लागले आहेत. पाठवू का?..
So nice of you अनया !
पेरू येतील तेव्हां येतील, तोवर फोटो शेयर करायला नका विसरू 🙂
हिरवे-थोडे कच्चे पेरू फार आवडतात. मागचा जन्म पोपटाचा असावा बहुतेक 😀
शेतावर पक्षी पेरूंचा फराळ करत
शेतावर पक्षी पेरूंचा फराळ करत असतात. पूर्वी मुद्दाम पोपटानी खाल्लेला पेरू खायचे. आता कोविडनंतर जरा भिती वाटते. पेरूंचा सिझन असला की शेतावर जेवताना तोंडी लावणं म्हणून पेरू खातोच दरवेळी.
पावसाच्या दिवसात थोडी कीड असते. नैसर्गिक शेती करत असल्यामुळे ते अपेक्षित असतं. तेवढा भाग वगळून खातो.
पावसाच्या दिवसात थोडी कीड
पावसाच्या दिवसात थोडी कीड असते…
होय. म्हणूनच थोडी वाट पाहतोय. पेरू + सीताफळ सीझन नीट सेट इन व्हायची. मग मजाच मजा
(No subject)
नाचणी मिनी उताप्पा आणि टोमॅटो
नाचणी मिनी उताप्पा आणि टोमॅटो चटणी मस्त दिसत आहेत.
पेरूच्या बाबतीत मी फार चोखंदळ... कच्चा, हिरवट पेरूच लागतो. जरा जरी पोपटी दिसायला लागला की आपण हात लावत नसतो त्याला.
लहानपणी आमची प्रीती बाग होती. पाखरांनी खाल्लेला पेरू आजोबा आवर्जून आम्हाला द्यायचे. गोड असायचा.
हादग्याच्या फुलांची भजी.
हादग्याच्या फुलांची भजी.
सुरती पनीर घोटाळा...
सुरती पनीर घोटाळा...
अप्रतिम झाला होता.
लंपन यांच्या रेसिपीने..
घरात होत्या नव्हत्या तेवढ्या
घरात होत्या नव्हत्या तेवढ्या भाज्या घालून केलेला भात
सुंदर
सुंदर
सगळे पदार्थ उत्तम
सगळे पदार्थ उत्तम
हादग्याची भजी किति दिवसानी बघितली..मस्त.
हादग्याच्या फुलांची भजी.. >>
हादग्याच्या फुलांची भजी.. >> इंटरेस्टिंग.. आणि मस्त!
काय सुन्दर फोटो आहेत सगळे
काय सुन्दर फोटो आहेत सगळे
धन्यवाद . हादग्याच्या फुलांची
धन्यवाद . हादग्याच्या फुलांची भजी.. वाह मलाही खुप आवडते. पनिरं घोटाळा tempting दिसत आहे
वड्यांसाठी धन्यवाद सर्वांना..
वड्यांसाठी धन्यवाद सर्वांना...
अल्पना खरंच मुंबई दौरा काढ एकदा मस्त गटग करू या , आणते वड्या करून. अल्पना, सलाड मस्तच दिसतय.
अनिंद्य, तुमचं बिझनेस मॉडेल मस्तच..
ऋ, ताट भारी दिसतय. साध्या ही विषयात गोडी अफाट.
नाचणी उत्तप्पा छानच.. कालच मी नाचणीच्या पीठाचे घावन केले होते. छानच लागतात. पिठात थोड दही, मीठ, तेल मिरची कोथिंबीर घालुन एकदम पातळ भिजवल आणि लगेच घावन केले . छान जाळी पडते. सुनबाईचे फेवरेट म्हणून तिच्यासाठी केले होते
गुलाबजाम मस्त दिसतायत. पेरू बघून तोंपासू.
ऋतुराजच्या सगळ्या डिश ए वन.. हादग्याच्या फुलांची भाजी भारीच.
अनया, तुला पुण्याला येताना नेहमी वाटत असेल ना , का चालले आहे मी पुण्यात हे सगळं वैभव इथे सोडून ? मी कोकणातून येताना मला ही हेच वाटत पण नाईलाज असतो दुसरं काय ? असो.
पोस्ट मोठी झालीय खूप.
तिथली मोकळी हवा आणि शांतता
तिथली मोकळी हवा आणि शांतता ह्या गोष्टींचा फार फार मोह पडतो. पण पुण्यातही पाय अडकले आहेत.
^^^सुनबाईचे फेवरेट म्हणून
^^^सुनबाईचे फेवरेट म्हणून तिच्यासाठी केले होते^^
मनीमोहोर, तुमचे खास कौतिक यासाठी..
तिथली मोकळी हवा आणि शांतता
तिथली मोकळी हवा आणि शांतता ह्या गोष्टींचा फार फार मोह पडतो. पण पुण्यातही पाय अडकले आहेत. >> दोन्ही पटलं.
मनीमोहोर, तुमचे खास कौतिक यासाठी.. >> धनवंती
मनीमोहोर, तुमचे खास कौतिक
मनीमोहोर, तुमचे खास कौतिक यासाठी..>>> +१
धन्यवाद ममो ताई. तुमच्या
धन्यवाद ममो ताई. तुमच्या सारख्या नारळ वड्या मला कधी जमतील माहीत नाही. फारच छान झाल्या आहेत.
रवा नारळ dryfruit cake
Pages