Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिंद्य खिचडी अगदी आवडती आहे.
अनिंद्य खिचडी अगदी आवडती आहे. पण खोबरे नसेल तर चालेल. नुसता भरपूर शेंगदाणे कूट पाहिजे
ट्युलिपचे ताट म्हणजे अगदी चौरस आहाराची जाहिरात वाटते आहे
अनिंद्य यांची खिचडी आणि
अनिंद्य यांची खिचडी आणि ट्युलिप यांचं चौरस आहार असलेलं ताट दोन्ही मस्तच.
हा आहे हात फोडणीचा भात. म्हणजे छोट्या पळी मध्ये तेल घालून त्यात नॉर्मल फोडणी केली नंतर त्यात पात्तळ स्लाइस केलेली लसूण परतली, गॅस बंद करून थोडं लाल तिखट आणि गोडा मसाला घातला, ती फोडणी भातावर घातली, मीठ घातलं आणि छान मिक्स केलं . वरून कोथिंबीर घातली. मायक्रो मध्ये गरम केला बरोबर ताक घेतलं आणि खाल्ला.

ममो कॅमेरा शहाणा आहे की
ममो कॅमेरा शहाणा आहे की पदार्थच आज्ञाधारक आहेत माहीत नाही पण तुमचा प्रत्येक पदार्थ असा मस्त दिसतो न.
सामो 😃
सामो 😃
ट्युलिपचे ताट म्हणजे अगदी
ट्युलिपचे ताट म्हणजे अगदी चौरस आहाराची जाहिरात वाटते आहे >>>>> अगदी अगदी. वाल पापडी भाजी आवडते.
ममो, काय मस्त दिसतोय भात....
सामो म्हणतायेत त्याला अगदी अनुमोदन.
ट्यूलिपची थाळी, ममोंचा
ट्यूलिपची थाळी, ममोंचा फोडणीचा भात सुरेख आहे. ममोंचे सगळेच करणे नीटस असते.
Fruit Custard
Fruit Custard
अरे वाह कस्टर्ड मस्त दिसत आहे
अरे वाह कस्टर्ड मस्त दिसत आहे..
काल आमच्याकडे सुद्धा केलेले.
पण मला फळेफुले जास्त आवडत नसल्याने माझ्यासाठी ब्रेडच्या तुकड्यांना क्रिस्पी करून त्याचे शाही तुकडा करून दिले..
बाकी फोडणीचा भात तर पहिले प्रेम !
ट्यूलिपची थाळी, ममोंचा
ट्यूलिपची थाळी, ममोंचा फोडणीचा भात सुरेख आहे. ममोंचे सगळेच करणे नीटस असते.>> +१ ममोंचे सगळे पदार्थ अगदी निगुतीने केलेले असतात.
अगदी आत्ताच आईशी फोनवर बोलताना फ्रुट कस्टर्डचा विषय निघाला. उद्या तिचे मित्र मैत्रिणी घरी येणार आहेत, त्यांच्यासाठी बनवेन म्हणत होती आणि हे पान उघडल्यावर त्यावरही लगेच फोटो दिसला.
आजचे ताजे बेक - सावरडो लादी पाव / डिनर रोल्स. रात्री पावभाजी करायची आहे. काल सकाळी फ्रिजमधून स्टार्टर काढून ब्रेड बनवावा या उद्देशाने फीड केलं होतं. दुपारी शाळेतून आल्यावर लेकाला पावभाजीची आठवण येत होती. मग ब्रेडचा बेत रद्द करून पावभाजीसाठी लादीपाव बनवायला घेतले. फक्त फीड केलेलं स्टार्टर पुरेसे नसल्याने कमी पाव बनवता आले.

वॉव.. या पावासोबत भाजीची गरज
वॉव.. या पावासोबत भाजीची गरज सुद्धा नाही
मायबोलीवर घरी पाव बनवायचा कुठला धागा आहे का बघायला हवे..
ट्युलिपचे ताट >>> बार बार
ट्युलिपचे ताट >>> बार बार श्रावण की याद दिला रही है ।
कस्टर्ड आणि ब्रेड दोन्ही भारी
कस्टर्ड आणि ब्रेड दोन्ही भारी दिसतय.
फो च्या भा साठी धन्यवाद.
काल आमच्या मुलाला ऑफिसातून घरी यायला खूप उशीर होणार होता. मी जागत राहिले तो येणार म्हणून तर त्याला अजिबात आवडत नाही. (जागी असले तरी झोपेच सोंग घ्यावं लागत. 😃 ) म्हणून करून फ्रीज मध्ये ठेवला , वाटलं तर खाता येईल म्हणून.
.. सध्या माबोवरचा सगळ्यात
.. सध्या माबोवरचा सगळ्यात आवडता धागा..
@ टयुलिप, अनुमोदन.
वर अधूनमधून ज्या शॉर्ट रेसिपीज् येतात त्या बहार आणतात.
खाऊगल्लीवर फोटो तर छान असतातच, आता काहींचे फूड फोटो खूप Improvise झालेले दिसतात आधीच्या भागांपेक्षा. Which is so good !
मेन्यू प्लानिंगला होणारी मदत = चेरी ऑन द केक
खूप दिवसांनी आले माबोवर. मस्त
खूप दिवसांनी आले माबोवर. मस्त वाटलं इथे.
हा घ्या आजचा नाश्ता.. पालक रवा आप्पे
एक्स्ट्रा स्पायसी पाव भाजी +
एक्स्ट्रा स्पायसी पाव भाजी + naturally fermented जिंजर लाईम सोडा. गेल्या आठवड्यात जिंजर बग स्टार्टर बनवले होते. त्यात आलं घातलेलं लिंबू सरबत घालून एक दीड दिवस ferment केलं.
छान मिरमिरणारी सोड्याची चव जाणवतेय त्यात.
नारळी पोहे
नारळी पोहे
मोक्षू, कस्टर्ड मस्त आहे.
मोक्षू, कस्टर्ड मस्त आहे.
अल्पना, लादीपाव घरी बनवता म्हणजे दंडवत घ्या.
मस्तच झालेत.
एक्स्ट्रा स्पायसी पाव भाजी + naturally fermented जिंजर लाईम सोडा. >>>> भारी दिसतेय.
नारळी पोहे >>>> मस्त. नारळी भातापेक्षा हे जास्त प्रिय आहेत.
पावभाजी पाव नारळी पोहे मस्तच.
पावभाजी पाव नारळी पोहे मस्तच.
नारळाच्या वड्या, पिस्त्याचा चुरा लावला आहे सजावटीसाठी.
मनीमोहोर यांचे हातच चोरावेसे
मनीमोहोर यांचे हातच चोरावेसे वाटतात. काय नजाकतभऱ्या वड्या आहेत.
कसल्या भारी वड्या आहेत. एकदम
कसल्या भारी वड्या आहेत. एकदम झकास.
वड्या अफाट बनतात ममोताई
वड्या अफाट बनतात ममोताई नेहमीच तुमच्या...
थँक्यु सगळ्यांना... मला घरचे
थँक्यु सगळ्यांना... मला घरचे म्हणतात ही "तू वड्यांचा बिझनेस सुरू कर ",भारी चालेल . पण आता सगळं फक्त स्वांत सुखाय
ममोताई, वड्या सुरेख दिसताहेत.
ममोताई, वड्या सुरेख दिसताहेत. मला एकदा तरी तुमच्या हातच्या वड्या खायच्या आहेत. तेवढ्यासाठी मुंबईला यावं लागेल.
एक्स्ट्रा स्पायसी पाव भाजी +
एक्स्ट्रा स्पायसी पाव भाजी + घरी केलेले पाव = 👌
नारळी पोहे - नको नको नक्को 😀
वड्यांचा बिझनेस = गुड आयडिया 👍
खरेच सुरु करा. Menial work चार दोन मदतनीसांना आउटसोर्स करून रेसिपीतल्या key steps / फक्त महत्वाच्या कृती तुमच्याकडेच ठेऊन हे करता येईल. कधी व्यवसाय बंद करावासा वाटला तर त्या मदतनीसांनाच पूर्ण शिकवून त्यांचे आयुष्य upgrade केल्याचे समाधान मिळेल.
काल रात्रीचे हलकं जेवण...
काल रात्रीचे हलकं जेवण... घरात असले नसलेले सगळे पदार्थ घातलेलं सलाड.


आणा तो डबा इकडे! कसल्या कातिल
आणा तो डबा इकडे! कसल्या कातिल वड्या आहेत!
श्रावणी पौर्णिमा, रक्षाबंधन
श्रावणी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्तानी बहिणीच्या विशेष पसंतीचे गोडधोड - घेवर.
यंदा दोन वेगवेगळ्या credible सोर्सेसकडून मागवले.
मोठ्या साइज़चे custom made केसरिया घेवर. 👆
आणि छोटे छोटे वाटीएवढे चांदनी घेवर 👆
दरवर्षी श्रावणात एकदा तरी लाभावे असा प्रयत्न असतो. आता पुढचा घेवरखाद्ययोग एकदम मकरसंक्रांतीलाच.
घेवर स्क्रॉल करतानाच समजले
घेवर स्क्रॉल करतानाच समजले कोणाची पोस्ट..
मागेही आलेले ते ओळखले
हो, वर्षातून फक्त दोनदा
हो, वर्षातून फक्त दोनदा येणारा चान्स 🤤
पावभाजी ,आप्पे, नारळाच्या
पावभाजी ,कस्टर्ड ,आप्पे, नारळाच्या वड्या, पोहे, सलाड ,घेवर सगळंच भारी...

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षाबंधन स्पेशल घरी केलेले गुलाबजाम
Pages