"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅकवॉटर युध्दात टिरीअनवर हल्ला कोण करतं? किंग्सगार्डचा वेष.. इंटरनेट वर मूर दिलंय, पण त्या हल्ल्यामागे कोण होतं?

मी ही सिरीज बहुधा 7 व्या वेळी बघतोय!
प्रत्येक वेळी नवीन कंगोरे, नवीन minute details.. जेव्हा इतर काही बघायला सापडत नाही, पुन्हा पुन्हा तेच पाहूनही आनंद होतो.

GoT is truely G.O.A.T.

सेम हियर पाटील. मी दुसर्‍यांदा बघतोय आणि ह्यावेळी बर्‍याच डिटेल्स लक्षात आल्या. तुम्ही म्हणालात तसं पुढे काय होणार हे माहित असून सुद्धा खुप उत्सुकता होती काही सीन्स, शॉट्स बघायची. परवाच मी द डोअर (होल्ड द डोअर) एपिसोड बघितला आणि तेवढ्यात तिव्रतेनी वाईट वाटलं बघताना.

हा कॉन्सेप्ट खरं नवा नाही आणि हॅरी पॉटर मध्ये जे के रोलिंग नी तर ह्या सगळ्याचा कळस केला आहे.

म्हणजे पहिल्या पिकचर/पुस्तका मध्ये काही डिटेल्स आपल्याला कळतात ज्याचे कनेक्शन आपल्याला पार शेवटी लागतं! प्रिझनर ऑफ आझकबान (माझा ऑल टाईम फेवरेट मुवी?) मध्ये टाईम टर्नर आणि पुढे हॅरीचा पट्रोनस हा कॉन्सेप्ट वाचकाला पार गार करुन टाकतो. Happy

मार्टिन लेखक म्हणून टाईट अशी कथानकं नाही लिहित. एक एक धागा आधी इस्टॅब्लिश करुन पुढे तो प्रचंड फुलवतो! स्टोरी टेलर म्हणून तो भारीच आहे फार पण कन्क्लूड करता करतातो स्वतःच कंटाळला. शो मध्ये फिनाले कंप्लिट लेट्डाऊन होती पण ते सुद्धा कदाचित सेमि फायनल एपिसोड प्रचंड भाव मारून गेला त्यामुळे असेल. माझ्या मते तर सेकंड लास्ट एपिसोड वॉज द फिटिंग फिनाले द शो डिझर्वड.

गॉट - पाचव्या सिझनच्या चौथ्या एपिसोडपर्यंत झाले आहे.

जॉफ्री आणि मार्जरीच्या लग्नात मनोरंजनासाठी मार्जरीचा भूतपूर्व नवरा रेन्ली व सान्साचा भाऊ रॉब यांच्यावर अपमानास्पद नाटक बसवून सर्सी व जॉफ्री खिदळत असतात. त्यावेळी टिरियन सहज काहीतरी कुरकुरीत बोलून जातो. मग जॉफ्री त्याचा अपमान करायला सासऱ्याने दिलेल्या नव्या चषकातून दारू आणायला सांगतो. त्यातूनच विषप्रयोग होऊन जांभळा पडून गतप्राण होतो. पीडा गेली.

मार्जरीचे लग्न टॉननशी ठरते व सर्सीचे लग्न तिच्या गे भावाशी सर लोरॅसशी ठरलेलं असतं. इकडे सान्सा जॉफ्री मेल्याच्या गोंधळात भर लग्नातून पळ काढते, तिकडे लॉर्ड बेलिश जहाज घेऊन तिची वाट बघत असतो. ती तिच्या आईसारखी दिसते पण आईपेक्षा सुंदर व तिची आई केटलिन स्टार्क लॉर्ड बेलिशचे एकमेव प्रेम म्हणून हा तिला सेक्शुअली ग्रूम करतोय असे वाटले. सान्साचा त्याच्यावर विश्वास बसलाय. तो तिला घेऊन वेल ला तिच्या मावशीकडे जातो. कारण इकडे लॉर्ड बोल्टन व त्यांच्या विकृत मुलाने रॉब, त्याची प्रेग्नंट बायको व लेडी स्टार्क यांना भर लग्नात मारून टाकले. भयंकर हताश करणारा भाग होता. पुरे झाले हे, सगळेच मेले तर कोणासाठी बघणार..! अन्याय आणि दुराचाराचा कडेलोट.

सान्सा आणि आर्याला सुरक्षित पोचवण्यासाठी घरच राहिले नाही. आर्या हाऊंड सोबत आहे. सान्सा आणि लॉर्ड बेलिश तिच्या मावशीकडे वेलला येतात. मावशी व बेलिशचे लग्न होते. आणि मावशी विकृत वाटायला लागते, तिनं आपल्या नवऱ्याला विष देऊन मारलेले आहे व बहिणीची दिशाभूल करून लॅनिस्टर वर आळ घातला होता. ( अगदी पहिल्या एपिसोड पैकी )

मावशी सान्साचा मत्सर करत असते. बेलिशपासून दूर राहा नाही तर (मून डोअर) मधून ढकलून देईन म्हणताना बेलिशच तिला ढकलून देतो. तिचं पोरगं लाडाने येडं त्याला काही येत नाही. तलवारबाजी शिकवूनही प्रगती नाही. सान्साला घेऊन बेलिश विंटरफेलला येतो. जेथे ग्रेजॉय थिऑनचा अनन्वित छळाने रोबोट झाला आहे. लॉर्ड बोल्टनचा बास्टर्ड रामसे विकृत आहे, त्याच्याशी सान्साचे लग्न होते. ती आपल्याच घरात तुरूंगात राहतेय.

धर्मगुरू आणि लेडी ओलेना यांचा संवाद. तिच्या नातवाला सर लोरॅसला गे असल्याने तुरूंगात टाकले आहे व राणी मार्जरीला आपल्या भावाची बाजू घेतली म्हणून तिलाही. लेडी ओलेना ही दोघांची आजी. खतरनाक आजी आहे, चुरचुरीत संवाद आहेत हिचे.

तिकडे स्टॅनिसने वॉल/ ब्लॅक कॅसल जिंकून जॉन स्नोला लॉर्ड कमांडर केले आहे. मेलिसान्द्रे जॉन स्नोचा विनयभंग करते. तो म्हणतो इग्रितवरच खरे प्रेम होते आणि ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली आहे. युद्धाची तयारी चालू आहे.

मस्त लिहिलं आहेस अस्मिता. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

जुन्या म्हणजे अगदी त्या काळातल्या नाही हो..... मी हा सीझन बघितला तेव्हाच्या आठवणी म्हणतोय. सीन्स डोळ्यासमोर आले.

अरे, थॅंक्यू थॅंक्यू. Happy
मला वाटले माझं एकटीचं वरातीमागून थ्रोन्स झालं आहे म्हणून पाच सीझन गप बसले व आज लिहिले. आता रोजच तुमच्या आठवणींना उजाळा देत जाईन. Lol तुम्ही सगळे ज्ये ना म्हणे आणि मी ज्यु ना ( गॉटच्या नॉस्टॅल्जियातले) !

ब्लॅकवॉटर युध्दात टिरीअनवर हल्ला कोण करतं? किंग्सगार्डचा वेष.. इंटरनेट वर मूर दिलंय, पण त्या हल्ल्यामागे कोण होतं?- अजिंक्य राव पाटील

>>>> सर्सीचाच डाव असतो टिरियनला मारण्याचा. तीन वर्षांपूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर आज दिले आहे. व्हॅलिड नसेल कदाचित. Happy

हे कधी बघितलं नाही. त्यामुळे रिलेट होता येत नाहीये, पण ते मार्जरी वाचून तुला जपणार आहे वाल्यांनी नाव ढापलेले दिसतंय असं वाटलं.

तीन वर्षांपूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर आज दिले आहे >> काय अभ्यास काय अभ्यास!

मी पण फार लवकर बघितलेली नाही ही. आठवा सीझन येणार होता तेव्हा बघायला सुरुवात केली S१E१ पासून. पण ठीके, ज्येना तर ज्येना. Lol

वरातीमागून थ्रोन्स >>> Happy

मला आता कोणत्या सीझनमधे काय होते काही लक्षात नाही. सलग एपिसोड २ वेळा तरी नक्कीच पाहून झाले. आता कधीकधी रॅण्डम क्लिप्स पाहतो. यातले सर्वात सॅटिस्फायिंग मृत्यू वगैरे (यूट्यूबवर). ही सिरीज पाहणार्‍यांना ही कॅटेगरीही रिलेट होईल Happy आर्याने मारलेले लोक किंवा टिरियनचे धमाल सीन्स वगैरेही.

आता यातील कलाकार इतरत्र - विशेषतः ब्रिटिश सिरीजमधे दिसले की लीओनार्डो डिकॅप्रिओच्या टीव्हीकडे बोट दाखवणार्‍या मीमसारखे करतो. डाउनटन अ‍ॅबी मधे इग्रिट किंवा सर जोरा दिसले - तसाच तो दोन्ही सिरीजमधे तितकाच खउट दिसणारा रॅण्डी टार्ली सुद्धा, दोज अबाउट टू डाय मधे रॅमसी बोल्टन दिसला, द लास्ट ऑफ अस मधे ती लियाना मोरमॉण्ट दिसली ई. ई.

बाय द वे तिचे लियाना मॉरमॉण्ट हे सिरीजमधले नाव तर गॉट मधले वाटतेच पण तिचे खरे नावही गॉटमधलेच वाटते - बेला रॅमसे. म्हणजे ती तिकडची सिद्धार्थ मल्होत्रा आहे.

अस्मिताला एक स्पॉयलर देतो. आठव्या सीझनमध्ये शेवटी शेवटी फेसलेस मॅन का कोणीतरी जो आहे ना, त्याचं काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचे आधीच्या सीझनमधले एपिसोड चुकवू नकोस. Wink

येस्, मी व्हाईट वॉकर्सची भुतावळ उठवली आहे. Lol
उद्या लिहिते हं सर्वांना. भेटूया उद्या नव्या एपिसोड सह. Wink

मला पण आता इतके डिटेल काही आठवत नाहीत.
पण सॅटिस्फायिंग मृत्यू आणि गोर सीन काळजात घर वगैरे करून आहेत. उदा. रेड वेडिंग, वॉक ऑफ शेम. आणि टीरियन ची वाक्ये, आणि व्हलेरियन भाषा आणि उच्चार तर गुदगुल्याच गुदगुल्या.
हपा, आठवा येऊ लागल्यावर चालू करण्यात ग्रेमा... आपलं लेमा. ( लेट माईंड) Proud

Haha. अमित, कंसाला झाली तशी आपल्याला आकाशवाणी व्हायला हवी होती... हा आठवा तुमचा घात करणार आहे.

Got बघण्याच्या काळात उगीचच RP इंग्रजी उच्चार करायचा प्रयत्न होत होता माझ्याकडून. ती भाषा डोक्यात घर करते.

पण ते मार्जरी वाचून तुला जपणार आहे वाल्यांनी नाव ढापलेले दिसतंय असं वाटलं.
>>> Lol दोघीही कुटील आहेत, एवढं सांगू शकते.

ती भाषा डोक्यात घर करते.
>>> मी तर 'युअर ग्रेस' आयडी घ्यावा म्हणतेय. मग मला तुम्ही 'थॅंक्यू, युअर ग्रेस' म्हणणार. गेला बाजार 'माय लेडी' तरी. Happy

म्हणजे ती तिकडची सिद्धार्थ मल्होत्रा आहे. >>> Lol
डाऊनटन ॲबी सुद्धा मी काही एपिसोड पाहिलेले आहे पण अंदाज आला. आता तेही बघेन.
मीम - Lol

कालचे गॉटलेले-

जॉफ्री मेल्याचा आळ टिरिअनवर येतो. जेमी शिवाय कुणालाही त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. ट्रायललाही काही फारसा अर्थ नसतो. मी "ड्वार्फ" असल्याने तसाही लहानपणापासून तुम्ही मला ट्रायलला उभेच केले आहे, त्यात मी आईला खाल्ले त्यामुळे कुणालाच माझ्याविषयी ममत्व नव्हतेच- वगैरे म्हणतो. ह्या ट्रायलचे खूप कौतुक झाले आहे. टिरियन माझे सर्वात आवडते पात्र आहे म्हटले तरी चालेल पण मला त्याचे 'वन ऑन वन' संवाद जास्त आवडलेत. एकांतात झालेले कोणत्याही दोनच कॅरेक्टरचे संवाद ही गॉटची सर्वात खणखणीत बाजू आहे. जास्त सखोल आणि कॅरेक्टरचे अंतरंग उलगडून दाखवणारे आहेत.

जेमी आणि टिरिअन लहानपणीच्या बिटलला धरून मारणाऱ्या कझिन विषयी बोलतात व कनेक्ट होतात. सगळेच लॅनिस्टर विकृत म्हणावे वाटते. पण जेमी चक्क चांगला वाटायला लागला आहे. टिरियन सर्वात प्रेमळ व तत्त्वनिष्ठ.

टिरियन साठी लग्नाला आलेला प्रिंस ओबेरिन युद्धासाठी तयार होतो, तिकडे सर्सी माऊंटन नावाच्या राक्षसाला तयार करते. आपसात युद्ध होऊन ओबेरिन त्याच्याकडून - मी तुझ्या बहिणीचा पाशवी बलात्कार केला व तिच्या मुलांना मारून तिचेही दोन तुकडे केले हे वदवून घेताना तो त्याचे मस्तक नारळ फोडल्यासारखे फोडतो, तिकडे इंदिरा वर्मा/ त्याची बायको किंचाळते.

आता टिरियनला गत्यंतर नाही असे बघून जेमी त्याला सोडवतो. तर तो तडक शे च्या भेटीला जातो व टायविन आणि शे ची सुहागरात झालेली बघून तडक चेंबर पॉट (कमोड) वर बसलेल्या अवस्थेत बाबांना मारून टाकतो.

लॉर्ड व्हॅलिस त्याला पेंटोसला आणतो. तेथे हा कुंटणखान्यात जातो आणि सर जोरा त्याला पकडून पुन्हा- ( वाटेत स्टोनमेनचा संसर्ग व यांचा गुलाम म्हणून लिलाव, त्यात गमती जमती आहेत) टिरियनला गप्प बसता येत नाही. तेथून कसेबसे जोरा त्याला डेनेरिससमोर उभे करतो. टिरिअन तेथेही याचे तुझ्यावर भक्तीवत प्रेम आहे, ह्याला सल्लागार म्हणून परत घे( तो हेर म्हणून आलेला असल्याने राज्याबाहेर हाकलून दिले होते) वगैरे म्हणतो.

इकडे मार्सेला डॉर्न नावाच्या राज्यात आहे तिकडे जेमी आणि ब्रॉन तिला सोडवायला आलेत. जेमीचा उजवा हात छाटला गेल्याने तो नीट लढू शकत नाहीये पण आता प्रिंस ओबेरिनला फोडून मारल्याने एरवीही हितसंबंध विषारी असल्याने मार्सेलाला परत आणलेले बरे म्हणून सर्सीने तिकडे धाडले होते.

किंग्ज लॅंडिंगमधे सेप्टचा गुरू मोठा पावरफुल होऊन बसला आहे. सुनेला तुरुंगात भेटायला आलेल्या सर्सीचे गुण कळाल्यानंतर त्याने तिला तुरुंगात टाकले आहे. तिला मार खाताना, रॅग्ज सदृश पोतेरी कपड्यात बघताना बरे वाटले नाही. ती कशी कायम दुष्ट होती बाकी लोक तरी ग्रे होते. म्हणून मला ती आवडते. तिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास टाकू शकता की ती निर्दयीपणेच वागणार, बाकीचे मधेच चांगले वागतात. छ्या! ग्रे वगैरे लाड नाही, विधिनिषेध नाही. नीच म्हणजे नीच.

आता धर्मगुरूची विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे. तिकडे हाऊंडला ब्रियानने मारले व आर्या लपून बसून कशीबशी व्हर्सोसला 'नोवन' होण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

सर्सीवर अजुन बरेच पाशवी अत्याचार बाकी आहेत. तिच्या विषयी वाईटही वाटते, तिला अद्दल घडावी पण अशी??? असं ही वाटते, इतक्या अमानुष वागणुकीतही ती पाठीचा कणा ताठ ठेवून वागते त्याचं अप्रुप ही वाटते, अमानुष तरी का म्हणावे तिने काय कमी पाताळयंत्रीपणा केला आहे? पण एकुणात सर्सी काय हाडामासाची बनलेली आहे! ती शेवट पर्यंत मान म्हणून तुवकव नाही, विजिगिषूच वागत रहाते.

हो, मान न तुकवता त्या त्या परिस्थितीत तिला जे योग्य वाटेल तेच करते सर्सी, स्ट्रॉंग फीमेल कॅरेक्टर आहे. दुष्ट असली तरी, गिल्ट फ्री कॉन्फिडन्स आहे. अजून काय काय पाशवी बघावे लागणार आहे असे झालेय.

फायनली मै Happy
सहाव्याला आलेच आहे. दोन एपिसोड राहिलेत पाचव्याचे.

सहावा आणि सातवा सीझन झाला.
सारांश-
अनसलिड आणि गुलाममालकांचा संघर्ष व त्यांनी क्रुसिफाय करणे व पुन्हापुन्हा होणारी बंडं आटोक्यात आणणे हे म्हिसा आणि ब्रेकर ऑफ चैन होण्यासाठी डेनेरिसने मरीन नावाच्या गावात केले. अनसलिड खच्चिकरण केलेले असूनही वेश्यांकडे जायचे व कोणीतरी लोक त्यांना मारायचे. त्याचा छडा लावताना बरेच बळी गेले. त्यांनी डेनेरिसवरच आक्रमण केले तेव्हा ती ड्रॅगनवर बसून पुन्हा डोथ्राकींच्या टोळीत पकडली गेली. सासरी आली. मी खलिसी आहे म्हटल्यावर तिला विधवाश्रमात कोंडले. तेथून सेकंड सन व सर जोरांनी सुटका केली व तिला आगीतून जिवंत निघालेले पाहून डोथ्राकींनी आपली राणी मानलं.टिरियन येथे सल्लागार होऊन बसला आहे.

जेमी लॅनिस्टर व ब्रॉन डॉर्नला गेले पण परत येताना मार्सेलाला विष देऊन मारले. किंग्ज लँडिंगला तिचे प्रेतच आले. सर्सीची धर्मगुरूने धिंड काढली, अतिशय प्रक्षोभक व अपमानास्पद पद्धतीची वागणूक मिळाली. मार्जरी व टॉनन पूर्ण आहारी जाऊन गुरूच्या मताप्रमाणे निर्णय घेऊ लागले. फेथ मिलिटन्ट शब्दप्रयोग चपखल वाटला, ह्या धर्मांधांची सेना प्रबळ होऊन बसली. तिकडे मार्जरीची आजी - लेडी ओलेना हायगार्डन राज्यातली सेना घेऊन आली. मला ह्या गुरूचा अंत पाहायची उत्सुकता लागून राहीली होती. बाकी सगळे किड्यामुंगीप्रमाणे मरत असताना ह्या गटाला भलतेच फुटेज मिळाले. शेवटी सर्सीलाच कानून हातात घेऊन ड्रॅगन फायरने पूर्ण बेलर उडवावे लागले. मूर्ख टॉनन मात्र लगोलग गवाक्षातून उडी घेतो, आईची मेहनत पाण्यात घातली. तिन्ही मुलांचे मृत्यू सोसून खंबीर राहिली सर्सी, हॅट्स ऑफ . पुन्हा जेमीपासूनच चौथ्यावेळेस प्रेग्नंट व हे झाकून ठेवण्यासाठी थिऑन ग्रेजॉयचा काका ईऑन ग्रेजॉय सोबत सुहागरात. तो तिच्यासाठी लूजर असूनही हे करावे लागल्याने रडारड.

महामूर्ख स्टॅनिस मेलिसान्द्रेचे ऐकून मुलीला जिवंत जाळतो, मग बायकोही आत्महत्या करते. रॅमसे बोल्टन सोबतच्या युद्धात सहज हरतो व तेथे लेडी ब्रिआन येऊन तलवार खूपसून रॅन्लीच्या वेळेचा बदला घेते. बॅटल ऑफ द बास्टर्ड्स सुरू होते. जॉन स्नो व रॅमसे बोल्टन , हे युद्ध फारच चांगलं दाखवलं आहे. सान्साच्या हुशारीने- लॉर्ड बेलिष वेल्सचे सैन्य घेऊन येतो व थोडक्यात जिंकतात. पण छोट्या रिकन स्टार्कला रॅमसे मारून टाकतो. नंतर सान्सा रॅमसेला कुत्र्यांना खायला घालते. सॅटिसफाईड रिव्हेंज, डेथ . गुरू, जॉफ्री आणि रॅमसे.

सॅम टार्ली, गिली आणि बेबी सॅम सतत इकडून तिकडे जीव वाचवत फिरत आहेत.

मला तर ती छोटीशी निर्वासित फॅमिलीच फार गोड वाटतेय. मोठ्या सॅमने सिटाडेलला सर जोराला स्टोन मॅन होण्याच्या असाध्य आजारातून खडखडीत बरे केले. तो तिकडे डेनेरिसच्या सेवेसाठी परत रूजू झाला.

आर्याचे नोवन होण्याचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. हालहाल झाले लेकराचे पण झाले एकदाचे. परत येऊन लॉर्ड फ्रेचा चेहरा लावून रेड वेडिंगचा- खानदानचा बदला घेते. सर्वांना विष देऊन मारते व त्याआधी एका पेडोफाईलला सुद्धा मारते. लॉर्ड फ्रे अत्यंत हलकट माणूस. मेला हे फार बरं झालं.

सर्सीचाच डाव असतो टिरियनला मारण्याचा. तीन वर्षांपूर्वीच्या प्रश्नाचे उत्तर आज दिले आहे. व्हॅलिड नसेल कदाचित. Happy

नवीन Submitted by अस्मिता. on 7 August, 2025 - 03:59>>
उत्तरासाठी धन्यवाद.. पण मला वाटतं जॉफ्रीने दिलेला हुकूम असावा.. कारण जॉफ्री मैदान सोडून पळाला असताना एकटा टिल्लू थांबून, सैन्याला एकत्र करून लढला हि गोष्ट टिल्लू साठी अभिमानास्पद पण जॉफ्री साठी अपमानकारक ठरली असावी.

सर्सीचं वागणं आपल्याला पटतं बुवा, ते कितीही पाताळयंत्री असलं तरी ती तशी का वागली, ह्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दारू पिऊन तिसऱ्याच नावाने हाक मारू लागल्यावर त्याच्याविषयी राग निर्माण होणे स्वाभाविक, जिचं नाव घेतलं तीच पूर्ण कुटुंब मग तिच्यासाठी तिरस्करणीय झालं, एका काळ्या केसाच्या मुलाला तिने जन्म दिलाही होता, आणि तो मेल्यावर तिला दुःख झालं होत. नन्तर आलेल्या जॉफ्रीसाठी ती एक फिअर्स आई झाली. मुलगा ज्यामुळे जायबंदी झाला त्या लांडग्याला तिने मारलं.. एक मातृसुलभ कृती हीच असणार ना? बहरख्याली नवरा दारू पाजून मारला, आपल्या इन्सेस्टला लपवण्यासाठी, आणि पोटच्या मुलाला (भलेही तो इन्सेस्टच फळ असला तरी) कायदेशीर वारस ठरवण्यासाठी एडर्डला अडवलं, अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा ती जॉफ्रीला रोखत होती स्टार्कला मारण्यापासून. तिच्या मातृत्वाच्या आड जे येईल ते तिने संपवलं. जॉफ्री नासका निघाला, आणि त्याच्या upbringing मध्ये ती कमी पडली हे नक्की. बाकी ज्या गोष्टी खासकरून एडी मेल्यावर घडत गेल्या त्यात तिचा say फारसा राहिलाच नाही. मार्जरी जेव्हा टोमेनला तिच्यापासून दूर नेऊ लागली तेव्हा तिने मार्जरीला बाजूला करण्यासाठी धर्मगुरूला वापरलं. धर्मगुरूंमुळे बरेच कंद झाले त्याची शिक्षा त्यालाही एकप्रकारे तिने दिलीच. आणि त्या walk of शेम नंतरचं तिचं सगळं वागणं जस्टिफाईड होत.. चूक असलं तरीही..

Pages