Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
मायबोलीवरच कुठेतरी टोस्काना
मायबोलीवरच कुठेतरी टोस्काना चित्रपटाबद्दल वाचले होते (नेफ्लि) आणि नाव लिहुन ठेवले होते. आज लिखित नोंदी पाहताना ती नोंद पाहिली आणि लगेच बघायला घेतला.
कथा तीच आपल्या परिचयाची. मनापासुन नको असलेली गोष्ट करावी लागतेय आणि ती करता करता त्या गोष्टीच्या प्रेमातच पडायला होतेय. but the movie is a visual treat. it’s sad that i am watching it on a small mobile screen. will watch it again on computer screen.
अजुन पुर्ण पाहिला नाहीय पण जे पाहतेय ते आवडतेय.
"माउण्टनहेड" अमेरिकेत एचबीओ
"माउण्टनहेड" अमेरिकेत एचबीओ वर - थोडा पाहिला. इंटरेस्टिंग आहे पण खिळवून ठेवले नाही. मधेच थांबवून इतर शोधले.
जगातील जनमताच्या नाड्या कंट्रोल करणार्या सोशल मिडिया कंपन्या व एकूणच टेक जायण्ट्स चे सीईओज एका रिसोर्टवर एकत्र भेटतात व त्यांची नेट वर्थ, त्यांच्या कंपन्या, त्याचे जगावर होणारे परिणाम याबद्दल बोलतात. त्यांचे स्वतःचे काही प्लॅन्सही आहेत. पहिल्या अर्धा पाऊण तासात इतकेच झाले आहे. पुढे जरा नेटाने बघावे लागेल.
हे म्हणजे जेकल आयलंडवरच्या
हे म्हणजे जेकल आयलंडवरच्या सिक्रेट मीटींगसारखं झालं. तिथे बेट इथे रिसॉर्ट. इंटरेस्टींग वाटते आहे.
टॉम हँक्सचा अ मॅन नेम्ड ऑटो
टॉम हँक्सचा अ मॅन कॉल्ड ऑटो (नेफ्लि) बघितला. फिलगुड मुवी, एकदा बघण्याजोगा आहे. अजुन दहा वर्षांनी आमिर ह्याला नक्कीच हिंदीत आणेल.
स्विडीश सेमलार आणि ग्वाटेमालन सालपोरांझ हे दोन पदार्थ ह्या चित्रपटात पाहिले. सेम्ला खुपच रोचक वाटला, पाहुन खावासा वाटला . दोन्ही पाकृ पाहुन ठेवल्यात. बघु कधी मुहुर्त लागतोय.
but the movie is a visual
but the movie is a visual treat. ….
Indeed !
@ स्विडीश सेमला … त्यांच्याकडे फेब्रुवारीत एक दिवस Semla डे असतो. दिवसभर वाइन प्या सेमला खा
जुरासिक वर्ल्ड रिबर्थ बघून
जुरासिक वर्ल्ड रिबर्थ बघून आलो
मला माहिती होतं फालतू असणारे पण तरीही अपेक्षाभंग केला इतक्या पटीत फालतू निघावा का
सात डायनो मुव्हीज मध्ये सर्वात भिकार आणि याच्या आधी आलेले खूप बरे वाटावे इतक्या लेव्हलचा भंगार सिनेमा
मला वाटतंय की स्कारलेत जोसन्सन ला घेण्यात यांचे पैसे संपले असावेत, उरलेले व्हिएफक्स आणि मग एआय कडून फुकटात कथा पटकथा संवाद वगैरे लिहून घेतले असावेत
सर्वस्वी अनाकलनीय कथा, अनाकलनीय प्रसंग आणि क्लिशे चा भडिमार
इतका की पुढचा डायलॉग काय असू शकेल हे पब्लिकच सांगत होतं
टी रेक्स ची तर अगदीच रया घालवली आहे, या सिनेमात तो अगदी फक्त हजेरी लावून पळून जाणाऱ्या कामागारासारखा आहे
त्याही वेळेत तो इतका सुस्त, अतिरिक्त मद्यपान करून लोद्या झालेला आणि संधिवात झालेला असा वाटला
या सिनेमाचा त्यालाही इतका कंटाळा आला असेल की बरं झालं मला इतकंच काम होतं म्हणून तो पळून गेला असेल
एक मौल्यवान औषध करायला म्हणून जगातल्या सगळ्यात मोठ्या 3 डायनो चे जिवंतपणी रक्त काढून आणण्यासाठी एक टीम करतात
त्यात स्कारलेत जॉन्सन्स का असते हे कुणीही विचारत नाहीत, इतके लाखो डॉलर तिला द्यायला कंपनी का तयार होते हेही नाही
मग एक अॅलन ग्रांट चा विद्यार्थी असं एक ओझरता उल्लेख केलेला एक तथाकथित शास्त्रज्ञ, एक कॅप्टन आणि एक दोन डायनो कडून खायला म्हणून आणलेले लोकं अशी टीम पेशवे पार्क मध्ये भेळ खायला जावं इतक्या सहजपणे बेटावर जातात
त्यांना यासाठी हायर करणारा माणूस पैसेवाला आहे हे सिद्ध करायला या प्रवासात आणि बेटावरच्या जंगलात फॉर्मल्स घालून फिरत असतो
मग एक अनाकलनीय फॅमिली त्यांना भेटते जी 101 टक्के journey to mysterious island वरून कॉपी केलेली आहे
यातल्या सगळ्यात मिळून एक छोटे पिस्तुल असतं आणि त्यावर ते डायनो चे रक्त आणायला निघतात
मला तर त्यावेळी उभे राहून टाळ्या वाजवाव्या असे वाटलेलं
त्यानंतर अनेक चमत्कारिक डायनो भेटतात जे म्युटेशन केल्यामुळे असे झालेत असं आपण समजून घ्यायचं
यातला एकही अजिबात भीती निर्माण करत नही, उलट दया येते
आणि कुणीतरी त्याला खायला मिळावं असं आपल्याला वाटू लागतं
पण कुठलं काय एक दोन निरपराध आणि एक दुष्ट माणूस सोडला तर सगळेच्या सगळे कोडगे जिवंतच
त्यातही 3डी पहिला आणि सिनेमा संपल्यावर आम्हाला कळलं यात फक्त सब टायटल्स 3डी मध्ये होते

मला आधी वाटलं मला चष्मा असल्याने असं दिसताय म्हणून मी इंटर्व्हलला हळूच पोराला हे सांगितलं म्हणलं मला फक्त सबटायल्स क्लिअर दिसत आहे अशी पुढे आलेली
मला म्हणाला तेवढीच आहेत बाकी काहीच 3डी नाहीये
क्या बात है आशूचॅंप. अगदी
क्या बात है आशूचॅंप. अगदी पिसं काढलीत तुम्ही.
टोस्काना मध्ये जबरदस्त पदार्थ
टोस्काना मध्ये जबरदस्त पदार्थ बनवलेत एकेक. ५०% चित्रपट किचनमध्ये आहे
उरलेला ५०% निसर्ग.
हल्ली सगळीकडे बॉलिवुड दिसते. टोस्कानात हिरोईन लग्नात i do म्हणायला इतका वेळ घेते की मला वाटले आता नाहीच म्हणतेय. तिला नाहीच म्हणायचे असते पण इतके छान जेवण बनलेय ते गेस्ट लोकांना खाल्ले नाही तर फुकट जाईल ह्या भितीने बहुतेक हो म्हणते. अर्थात नवर्याला लगेच सोडतेच. बॉलीवुड असते तर लग्नमंडपात i don’t do केले असते
डायरेक्टरने माधवन साधा, बावळट
डायरेक्टरने माधवन साधा, बावळट, व्हर्जिन, बुळा आणि संस्कृत शिक्षक आहे हे परत परत परत परत इतक्यांदा सांगितलंय की आपण मंदच आहोत.
>> एक्झॅक्टली. यामुळे कळत नाही, जर परिस्थिती उलट असती तर माधवन परत आला असता का? शेवटी कॅरॅक्टर हे खराब होत नाही म्हणुन जपण्याचा विषय आहे का?
शिवाय प्रेमाला फक्त प्रेमाची गरज असते हा संदेश थोडा चुकीचा वाटला. प्रेमाला एन्जुरन्सची गरज जास्त असते असा वैयक्तिक अनुभव !
कारण प्रत्यकात काही पॉझिटीव्ह आणि काही निगेटीव्ह असतात, यामुळे कोणाची सीमा कुठे आहे हा खुप
वैयक्तिक निर्णय सामाजिक स्टेटमेण्ट कसे असेल?
पट्कथा सोडुन मात्र चित्रपट प्रेक्ष्णीय आहे. २ तास आरामात जातात.
^^^टॉम हँक्सचा अ मॅन कॉल्ड
^^^टॉम हँक्सचा अ मॅन कॉल्ड ऑटो (नेफ्लि) बघितला. फिलगुड मुवी, एकदा बघण्याजोगा आहे^^^
एकदा ??????
मी दोन दिवसात ६ वेळा पहिला हा..
टॉम हँक्स पासून ते मांजरापर्यंत प्रत्येक पात्र परफेक्ट फिट आहे...
जितका जास्त बघेन तितका जास्त आवडत गेला..
हे फारच थोड्या वेळा होतं असं, जसे की जो जिता वही, टायटॅनिक....
चांगलाच आहे.
चांगलाच आहे.
पण सहा वेळा???? तितक्या वेळा मी सेम्ला बघेन आणि खावेसे वाटेल
ऑगस्टमध्ये जातोय बहुतेक नेफ्लिवरुन.
जुरासिक वर्ल्ड रिबर्थ-> नाही
जुरासिक वर्ल्ड रिबर्थ-> नाही आवडला. पण एकदा बघायला हरकत नाही.
आशुचॅम्प, धमाल पोस्ट.
आशुचॅम्प, धमाल पोस्ट.
मलाही हा बंडल असणार आहे ही शंका आलीच होती म्हणून सुपरमॅनला गेलो पण तोही बंडलच वाटला. भरपूर मीम्स येत आहेत मला याचे, तेवढीच करमणूक.
आशुचँप . धमाल पोस्ट एकदम.
आशुचँप . धमाल पोस्ट एकदम.
टॉम हँक्स बद्दल मागच्या वेळी मायबोलीवर चर्चा झाली आणि आमीर खानला ४०० कोटींचा फटका बसला.
आता चर्चा करायची असेल तर वर्गणी काढा.
माझं तुणतुणं पुन्हा वाजवते -
माझं तुणतुणं पुन्हा वाजवते -
'अ मॅन कॉल्ड ऊवे' या पुस्तकावरून टॉम हॅन्क्सचा सिनेमा घेतलेला आहे.
सिनेमा पुस्तकाशी मोस्टली प्रामाणिक आहे.
तरी पुस्तकात आणखी बर्याच बारीकसारीक गमतीजमती आहेत.
पुस्तकातला मॅन सिनेमातल्या मॅनपेक्षा किंचित अधिक खडूस, किरकिर्या आणि ग्रम्पी आहे. त्यामानाने टॉम हॅन्क्स किंचित लवेबल अंकल वाटतो.
तेव्हा पुस्तक वाचा. मजा आहे त्यात.
ते शाळकरी जोक्स असतात- एक इंग्रज, एक अमेरिकन, एक भारतीय बोलत असतात.... "हे तर काहीच नाही".... वगैरे, तशी पोस्ट आहे ही
काल The Mn Who Knew Too Much
काल The Mn Who Knew Too Much
आवडला.
आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शक, माझा आवडतीचा अभिनेता जेम्स स्टिवर्ट आणि डोरिस डे
अजून काय पाहिजे.
आणि हो "के सरा सरा" ओरिजिनल डोरिस डे च्या आवाजात!
"के सरा सरा" ओरिजिनल डोरिस डे
"के सरा सरा" ओरिजिनल डोरिस डे च्या आवाजात!
>>>
पिक्चर नाही पाहिला पण गाणं ऐकलंय. भन्नाट आहे.
तिच्या आवाजातलं ‘समव्हेअर ओवर द रेनबो’ तर जबरी कॅटेगरीतलं आहे.
how to train your dragon
how to train your dragon पाहीला. ठीक आहे. लहान मुलांना नक्की आवडेल.
त्यातही 3डी पहिला आणि सिनेमा
त्यातही 3डी पहिला आणि सिनेमा संपल्यावर आम्हाला कळलं यात फक्त सब टायटल्स 3डी मध्ये होते >> नाहि रे आशू , प्रॉपर थ्री डी आहे इथे. भारतात काय प्रकार आहे माहित नाही.
समव्हेअर ओवर द रेनबो >>>
समव्हेअर ओवर द रेनबो >>> प्रचंड आवडतं हे.
जुरासिक वर्ल्ड रिबर्थ >>> प्रोमो पाहूनच पहायचा नाही असं ठरवलं होतं. ते योग्यच केलं म्हणायचं. भन्नाट लिहिलंय, चँप!

हजेरी लावून पळून जाणाऱ्या कामागारासारखा आहे
त्याही वेळेत तो इतका सुस्त, अतिरिक्त मद्यपान करून लोद्या झालेला आणि संधिवात झालेला
>>> याला खूप हसले
how to train your dragon >>
how to train your dragon >> मूळ पिक्चर मध्ये काही बदल केले आहेत का? मूळ कार्टून खूप आवडलेला.
हे डिस्नी आणि आता ड्रीमवर्क्स यांचे जुने चित्रपट परत लाईव्ह ॲक्शन करणे मला काही आवडलेले नाही. कार्टून आहेत ते तसेच चांगले वाटतात तसेच बघा
धनि कार्टून नाही पाहीलेले. ते
धनि कार्टून नाही पाहीलेले. ते डिस्नीवरती पहायचे आहे.
पैकी मुलीने दोन्ही पाहीलेत. त्या अजस्त्र ड्रॅगनचा छळ कार्टुनमध्ये नीट मांडलेला आहे. जो की या लाइव्ह अॅक्शन पटात थोड्क्यात अति- थोडक्यात आटपलेला आहे.
हे डिस्नी आणि आता ड्रीमवर्क्स
हे डिस्नी आणि आता ड्रीमवर्क्स यांचे जुने चित्रपट परत लाईव्ह ॲक्शन करणे मला काही आवडलेले नाही.
>>>
पेट पीव्हमध्ये जाण्याचं पोटेन्शियल आहे.
हे डिस्नी आणि आता ड्रीमवर्क्स
हे डिस्नी आणि आता ड्रीमवर्क्स यांचे जुने चित्रपट परत लाईव्ह ॲक्शन करणे मला काही आवडलेले नाही. >>> +१००
Following the July 18 release
Following the July 18 release of Ahaan Panday and Aneet Padda-starrer musical romance drama Saiyaara, videos of young fans fainting mid-scene, breaking into dance in theatres, dropping on one knee to propose mid-climax, and tearing off their clothes in excitement (we are not making this up) have gone viral.
छावाच्या वरच्या लेव्हलचं मार्केटिंग
मला कुठेही ओळखीच्या लोकांत
मला कुठेही ओळखीच्या लोकांत त्या सैयारा मूव्ही ची चर्चा दिसली नाही. तो कुणी बघितल्याचेही माहित नाही. पण अशा प्रमोशन पोस्ट्स बर्याच दिसल्या. बळंच हा सिनेमा हिट गेल्याचे रील्स करत आहेत पीआर चे लोक असे दिसते.
पेट पीव्हमध्ये जाण्याचं
पेट पीव्हमध्ये जाण्याचं पोटेन्शियल आहे>>
तिकडे पण टाकू का ? 
मला कुठेही ओळखीच्या लोकांत
मला कुठेही ओळखीच्या लोकांत त्या सैयारा मूव्ही ची चर्चा दिसली नाही. तो कुणी बघितल्याचेही माहित नाही. >> माझ्या ओळखितल्यांनी बघितला नि बघू नका असे सांगितले. पण आता त्यांनी बघितला म्हणजे त्यांनी पीआरला अनायासे हातभार लावला हे सांगू का ?
काल A Canterbury Tale बघितला.
काल A Canterbury Tale बघितला.
Michael Powell आणि Emeric Pressburger या दुकलीने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अगदी वेगळी कहाणी सांगतो.
मायकेल पॉवेलने दिग्दर्शित केलेला The Edge of the World हा सिनेमा बघितला होता. त्यामुळे उत्सुकता होती.
दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे चॉसर च्या काव्यातून त्याला ह्या सिनेमाची कल्पना सुचली. कथा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे.
सिनेमात मुख्य व्यक्तिरेखा चार आहेत. अलीसन, बॉब , पीटर आणि कोलपेपर. पैकी कोलापेपारला आपण बाजूला ठेवू, कारण माझ्या मते त्याची उपकथा थोडी निराळी आहे. तर हे पहिले तिघेजण चीलबर्न ह्या इंग्लंड मधल्या खेड्यात नशिबाने एकत्र येतात. बॉब हा अमेरीकन सैन्यात आणि पीटर हा ब्रिटीश सैन्यातले सैनिक असतात तर अलीसन ही आता खेड्यात शेतावर काम करायला आलेली असते. मुळची लंडन मधली. पीटर हा जवळच्या सैनिक छावणीत असतो. तर बॉबला Canterbury च्या सुप्रसिद्ध चर्चला भेट द्यायची असते. तो चुकून ह्या खेड्यात पोचतो.
ह्या चर्चची यात्रा केल्यावर देवाचे ब्लेसिंग्स मिळतात अशी कल्पना आहे.
हे तिघे त्या चर्चला भेट देतात आणि त्यांच्या मनात काही अतृप्त इच्छा असतात. त्या शेवटी कश्या परिपूर्ण होत्तात त्यांना ब्लेसिंग्स कशी मिळतात त्याची ही कथा आहे.
ह्या सिनेमात काम करणारे अभिनेते हे काही रुधार्थाने अभिनेते नाहीत. त्यामुळे अभिनय वगैरे असा काही मुद्दा नाही. रोजच्या आयुष्यात आपण जसे वागतो बोलतो चालतो तसेच ते पूर्ण सिनेमात असेच वावरतात. म्हणूनच मला हा सिनेमा अत्यंत आवडला. तुम्हालाही आवडावा.
आहान व अनीत ह्या जोडीत
आहान व अनीत ह्या जोडीत पोराचे नाव काय व पोरीचे काय हेही कळत नाही.
Pages