Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दृश्यम 3 ट्रेलर >>> ??? मला
दृश्यम 3 ट्रेलर >>> ??? मला तो फॅनमेड वाटला . चित्रपट येतोय हे कुठे ऐकल नव्हत
फॅन मेड असेल तर माहिती नाही,
फॅन मेड असेल तर माहिती नाही, अजय देवगण तब्बू वर फोकस म्हणून मला थोडं विचित्र वाटलं पण वरचा मी लिहिलेला angle वाटला. नकोच यायला 3 .
द दिल्ली फाईल्सचा ट्रेलर -
द दिल्ली फाईल्सचा टीजर
https://www.youtube.com/watch?v=7yYm0cigQL0
द दिल्ली फाईल्सचा ऑफिशियल ट्रेलर - विवेक अग्निहोत्री
https://www.youtube.com/watch?v=PLtWEWL3ruk
मां ट्रेलरची लिंक द्यायची
मां ट्रेलरची लिंक द्यायची राहिलेली मागच्या पोस्ट मधे
https://www.youtube.com/watch?v=lVvMbXiJjko
धडक २https://www.youtube.com
धडक २
https://www.youtube.com/watch?v=2MFMwvJd12k
मूळ तमिळ चित्रपट सैराटसारखाच आहे. जातीभेदाचा मुद्दा अधिक ठळकपणे आला आहे. शेवट तसाच आहे का माहीत नाही.
के जो ने असा विषय निवडावा याचं नवल वाटतंय.
केजोने सैराट हिट झाल्या
केजोने सैराट हिट झाल्या झाल्या त्याचे हक्क विकत घेउन धडक १ बनवला होता. तेव्हा फार काही न करता १०० एक करोड मिळवले होते त्याही सिनेमाने. पण आता धडक २ मधे नाविन्य काहीच नसेल.
अवतार ३ ट्रेलर -https://youtu
अवतार ३ ट्रेलर -
https://youtu.be/nb_fFj_0rq8?si=h_MIufIAvgaRBaXM
हा ब्रह्मास्त्रचा सिक्वल आहे का?

यू गीव मी स्ट्रेंथ... सारखं
यू गीव मी स्ट्रेंथ... सारखं काहीतरी ढासू गाणं गिणं टाका वीकेंड चं.
दुसरा किती चक्रम शेवट केला असला तरी तिसरा बघायला आलोच आम्ही.
दुसरा किती चक्रम शेवट >>अरे
दुसरा किती चक्रम शेवट >>अरे हो ना. पहिला खूप आवडला म्हणून उत्साहाने दुसरा पाहायला गेलो तर किती पांचट पिक्चर केला होता तो. व्हिज्युअल मस्त होते पण बाकी सगळा आनंद. आता तिसऱ्यात पण तसेच काही तरी वाटते आहे. बहुतेक तरी बघणार नाही
संत तुकारामचा ट्रेलर आला का ?
संत तुकारामचा ट्रेलर आला का ?
सुबोध भावे परफेक्ट संत तुकाराम महाराज वाटलाय. हिंदीत आहे ना ?
हंड्रेड पर्सेंट तुकाराम - हे
हंड्रेड पर्सेंट तुकाराम - हे वाक्य आठवलं पेस्तन काकांचं
१२० बहादूर हा 'बॅटल ऑफ
१२० बहादूर हा 'बॅटल ऑफ रेझान्ग ला'वर आधारित चित्रपट येतो आहे. फरहान अख़्तर परमवीर चक्र विजेते मेजर शैतानसिंग भाटी यांची भूमिका साकारतो आहे. जरी काही गोष्टी स्टायलाइझ्ड वाटल्या तरी ट्रेलर इम्प्रेसिव्ह वाटतो आहे. मी हकीकत वगैरे १९६२ युद्धावरचे पिक्चर पाहिले नाहीत. पण बॅटल ऑफ रेझान्ग ला ही ६२च्या युद्धातील भारतीय सैनिकांच्या दुर्दम्य साहसाची एक महत्वाची कहाणी आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहायच्या लिस्टमध्ये टाकला.
छान दिसतोय १२० बहादूर
छान दिसतोय १२० बहादूर
साऊंड भारी आहे.
थिएटरमध्ये बघायला मजा येईल.
फरहान अख्तर जागी कोणीतरी दुसरा हवा होता. म्हणजे अभिनय छान करतो तो. पण पर्सनल चॉईस.
परत परत तेच सीन्स घालूओन
परत परत तेच सीन्स घालूओन धडक २ का बनवला ते केजोच जाणो!
कारण माझ्यासारख्यानी धडक १
कारण माझ्यासारख्यानी धडक १ सुद्धा पाहिला नव्हता. त्यामुळे आमच्यासाठी तो नवीनच आहे
पण बघणार तर आम्ही धडक २ सुद्धा नाही. कारण मुळात सैराट बघूनच विषय पोहोचला आहे.
बाकी सोशल मीडियावर सैयारा ऐवजी ही खरीखुरी समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी लव्हस्टोरी बघा असे मेसेज फिरत आहेत.
परत परत तेच सीन्स घालूओन धडक
परत परत तेच सीन्स घालूओन धडक २ का बनवला ते केजोच जाणो! >>>> कारण तेसुद्धा बघायला काही लोक येतात अन केजोला पैसे मिळतात. गंदा है पर धंदा है ये.
खालिद का शिवाजी
खालिद का शिवाजी
हा चित्रपट प्रदर्शित आज प्रदर्शित होणार होता. आता होईल का नाही, याबद्दल शंका आहे. ट्रेलर आहे तोवर बघून घ्या.
भरत>> ट्रेलर आवडले होते.
भरत>> ट्रेलर आवडले होते. प्रियदर्शन पहिल्यांदाच सिरियस भूमिकेत दिसला आहे.
आता होईल का नाही, याबद्दल
आता होईल का नाही, याबद्दल शंका आहे. >> अरेरे, काय झाले ? मी माझ्या लिस्टमधे टाकला होता, बघायचा म्हणून
सुबोध भावे परफेक्ट संत
सुबोध भावे परफेक्ट संत तुकाराम महाराज वाटलाय. हिंदीत आहे ना ?
----
रानभुली, तू हे मनापासून बोलत असशील तर आपण या जन्मात कधीही मित्र होऊ शकणार नाही.
तुकाराम महाराजांच्या काळात
तुकाराम महाराजांच्या काळात असलेले हे तंत्रज्ञान आता फिरून परतलेय. मध्यंतरीच्या काळात ब्रिटीशांनी आर्च असलेल्या दगडी पुलाचं गावठी तंत्रज्ञान आपल्या माथी मारलं.
https://www.youtube.com/watch?v=rtcMD7mN7z4
२:४७ ला पाहू शकता.
फ्रीकीअर फ्रायडे - गोंधळ
.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=QKHySfXqN0I ट्रेलर २
https://www.youtube.com/watch?v=OpThntO9ixc
"वेपन्स" horror movie.
सगळीकडून चांगले रिव्यू येत आहेत.
मुलीने पाहीला वेपन्स. तिला
मुलीने पाहीला वेपन्स. तिला भिती वाटलेली पण तिच्या मते, स्माईल मुव्ही वॉज क्रीपीअर.
याईक्स.
वेपन्स मध्ये एका पॉइन्टला कोणीतरी त्या इन्स्पेक्टरचा चेहरा असा बटाट्याची साल सोलल्यासारखा सोलतं
मुलीला हॉरर मुव्हीज आवडतात अम्हा दोघांनाही भिती वाटते
आत्ता आत्ता तर आमच्या कडे आला
आत्ता आत्ता तर आमच्या कडे आला. तुम्हा लोकांचा पाहून देखील झाला. प्लीज सविस्तर लिहा ना. माझ्या मते ओमेन आणि मग सिक्स्थ सेन्स ह्याना तोड नाही.
केकू आम्ही नाही पाहीला.
केकू आम्ही नाही पाहीला. मुलीने पाहीला काल. त्यामुळे मला माहीती नाही.
का कुणास ठाव मला "The Pied
का कुणास ठाव मला "The Pied Piper of Hamelin" ची आठवण झाली.
केकू सिक्स्थ सेन्स काय आठवण
केकू सिक्स्थ सेन्स काय आठवण काढलीत, खूप वर्षांपूर्वी tv वरच बघितलेला, परत बघायला हवा.
वेपन्स वगैरे नाही बघू शकणार.
वेपन्स आत्ताच आलाय.
वेपन्स आत्ताच आलाय. ट्रेलरवरुन ठीक वाटतोय. फार काही हाताला लागेल वाटत नाही. पण अपेक्षाभंग होतो का पहायला नक्की जाणार आहे. छान निघाला तर मस्तच होईल.
(No subject)
Pages