चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असला दळभद्री इतिहास दाखवायचा आणि वर त्याची भलामण करायची हे फारच थोर आहे
आणि तुमच्याकडून दुसरं काही अपेक्षित ही नव्हतं म्हणा
>>>>>

@ आशूचॅम्प,
तुम्ही लोकं जेव्हा दारू कशी प्यावी या धाग्यावर दारूची भलामण करता, तिचे उदात्तीकरण करता ते मलाही फार फार खटकते.
मला तो धागाच मायबोलीवर नको वाटतो कारण तुम्ही लोकं स्वताही पिता आणि इतरांना प्यायला सुद्धा उद्युक्त करता.
त्यामुळे प्लीज आपल्या आवडी आणि इंटरेस्टनुसार सिलेक्तीव्ह गोष्टीत तत्वे पाळत जाऊ नका.

इतिहासाची आवड आणि ज्ञान तुम्हाला कोणापेक्षा जास्त आहे म्हणून इतरांना त्या बद्दल आदर नाही असा निष्कर्ष काढायचा तुम्हाला अधिकार नाही.

दारू धाग्यावर चर्चा तरी तुम्ही लोकं स्वतः तरी करता पण इथे हा चित्रपट मी बनवला नाहीये. मी काही त्यातून चुकीचा इतिहास पसरवत नाहीये. त्यामुळे उगाच मला टारगेट करू नका. चित्रपटालाच करा ही विनंती _/\_

सर टारगेट सिनेमलाच केलं होतं नेहमीच्या प्रमाणे बळच मध्ये घुसून तुम्ही स्वतःवर घेतलेत
त्यामुळे भोआकफ

धन्यवाद दारू धाग्याची आठवण करून दिल्याबद्दल
आम्हा कोणाहीपेक्षा जास्त तुम्हीच त्याचा प्रसार जास्त केलाय आजवर

छावा ट्रेलर पाहिले....
विकी कौशल चे मराठी वाक्य बोलतानाचे उच्चार आवडले... बाकी काहीच नाही आवडलं..... रश्मिका का का का?
संभाजी म्हणून अमोल कोल्हे डोळ्यासमोर आहेत त्यामुळे बाकी कोणीच आवडत नाही.. अर्थात बिग बजेट भव्य दिव्य सिनेमात ते शोभले नसते हेही तितकच खरं..
पण भव्य दिव्य सिनेमे सोज्वळ बनवता येत नाहीत का ? इथे सोज्वळ चा अर्थ गुळमुळीत नव्हे..... . .... पण ट्रेलर मधे दाखवलं तसं नक्कीच संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व नसेल... नसावं.... ते फक्त योद्धा नव्हते तर अत्यंत बुद्धीमान, अनेक भाषांचे अभ्यासक, अत्यंत धुरंदर राजकारणी होते.संस्कृत अभ्यासक आणि काही ग्रंथांचे लेखक होते. असा माणुस साधारण कसा असेल, दिसेल, वागेल ?
ट्रेलर मधे दिसलेल्या विकी कौशल सारखा नक्कीच नाही.
असो...

ते फक्त योद्धा नव्हते तर अत्यंत बुद्धीमान, अनेक भाषांचे अभ्यासक, अत्यंत धुरंदर राजकारणी होते.संस्कृत अभ्यासक आणि काही ग्रंथांचे लेखक होते.
>>>> १००++
संभाजी महाराज हे एक कॉम्प्लेक्स कॅरॅक्टर आहे. आईविना वाढलेला मुलगा (जरी जिजाऊंनी व काही काळ सोयराबाईंनी प्रेमाने वाढवले तरी) स्वराज्यकारणासाठी घरात नसलेले वडील, गैरसमजुतीतून काही काळ मुगलांना जाऊन मिळाल्यामुळे लागलेला बट्टा व काहींच्या मनात कायमस्वरूपी निर्माण झालेला संशय, जीवाला जीव देणारा मित्र व त्यावर इतरांनी सतत घेतलेली आशंका, पित्याच्या निधनावेळी भेट होऊ न शकणे, नंतरची कारस्थाने व त्यातून फिनिक्सप्रमाणे भरारी घेऊन स्वराज्याची धूरा खांद्यावर घेणे व पराक्रम गाजवणे, स्वकीयांनी केलेला घात हे सगळं दाखवलं असेल अशी अपेक्षाच नाही. पण निदान पराक्रमी पार्ट तरी योग्य दाखवावा.

रश्मिका का का का?
>>> कारण रश्मिका लकी आहे… एनिमल.. पुष्पा… ईटीसी

संभाजी म्हणून अमोल कोल्हे डोळ्यासमोर आहेत त्यामुळे बाकी कोणीच आवडत नाही. अर्थात बिग बजेट भव्य दिव्य सिनेमात ते शोभले नसते हेही तितकच खरं.
>>>>>

हो, ते छानच दिसतात या भूमिकेत.
पण पुढचे वाक्य सुद्धा प्रामाणिक आहे. बॉलीवूड बिग बजेट सिनेमात ते शोभले असते का हा प्रश्न पडतो.
याचाच अर्थ तिथे तसाच ग्लॅमर असलेला चेहरा लागतो.

धन्यवाद दारू धाग्याची आठवण करून दिल्याबद्दल
आम्हा कोणाहीपेक्षा जास्त तुम्हीच त्याचा प्रसार जास्त केलाय आजवर
>>>>

या न्यायाने तुम्ही या चित्रपटाचा प्रचार सर्वाधिक करणार असे म्हणू शकतो का?

मुळात मी दारूवर टीका करताना स्वतः तिच्या पासून दूर राहतो.

पण या चित्रपटावर ट्रेलर बघून टीका करणारे कित्येक जण हा चित्रपट बघतील असे वाटते.
आणि चित्रपट हा एक व्यवसाय आहे हा मुद्दा तिथेच सिद्ध होईल.

माझ्या डोक्यात अमोल कोल्हे म्हणजे राजा शिवछत्रपती. त्यांच्या इतर सीरिअल्स बघितल्या नाहीत. पण या सीरियलमध्ये ते एकेक एपिसोडबरोबर इव्हॉल्व होत गेले. शाईस्तेखानावर हल्ला व आग्र्याहून सुटका एपिसोड जबरदस्त आहेत.

चित्रपट हिंदीत आहे ना? हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकासाठी म्हणजे पुष्पा, पठाण, दबंग, सिंघम बघणार्‍यांसाठी आहे ना? मग तसाच असायला हवा ना? नायकाने तसेच डॅन्स करायला हवेत की नाही?
रश्मिका दिसली की लोक कसे वेडे होतात हे बघायचे असेल तर बीडच्या एका कार्यक्रमाचा व्हिडियो सध्या बराच गाजतोय तो बघा. हं, आता तान्हाजीत काजोल होती, तशी इथे कॅटसुद्धा चालली असती आणि तिच्यामुळे आणखी तिकिटं खपली असती.

पाण्यात लपून बसून गनिमाला सर्प्राइज द्यायचं हे बघून पावनखिंड आठवला. क्राउचिंग टायगर टायगर हिडन ड्रॅगन सदृश दृष्यही फिटच कारण हाही छावा आहे. वाघाचा काय आणि सिंहाचा काय. धनुष्यबाण दिसले. गदायुद्ध सुद्धा दिसलं. खुल्या मैदानातल्या लढाया दिसल्या. आणखी काय काय शस्त्रास्त्र वापरली आहेत, ते बघण्यासाठी तरी बघायलाच हवा. Wink

तान्हाजी, बाजीराव मस्तानी आणि हा छावा अशा चित्रपटांमुळे महाराष्ट्रातल्या हिरोंची माहिती अख्ख्या देशाला होते, त्याबद्दल कृतज्ञ राहायचं सोडून नावं कसली ठेवता?

मला हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असेच आठवत होते. तो माझ्या मनाचा आणि स्मरणशक्तीचा बायस असेल म्हणून शोधलं तर मायबोलीवरच हे मिळालं

इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा असे वाटते, म्हणुन काय सरसकट बेकार पिक्चर्स ना आपली पसंती द्यायची का? विकी १ चांगला अभिनेता आहे. रनवीर च्या तोडीस आहे. ते १ बरंय! पब्लिक ला आवडावा म्हणुन तो नाच्/लाऊड ओरडणे वगैरे.. Sad
पण रश्मिका (तिचे डोळे भकास्/भावहीन) वाटतात, अभिनय ही खास करत नाही.
इतिहास इतिहास म्हणुन बोनी कपूर ला सहन केले, पण त्याचं कौतुक बिउतुक नाही जमणार प्लि़ज.

च्रप्स- शी. करेक्ट. तुला प्लॅस्टिक सर्जरी वाली झान्वी आवडते, तीच तुझी चॉईस. Lol

ऋन्मेष, ह्या धाग्यात दारू कशाला आणलीस?
तुला अशी कास्ट /चित्रिकरण आवडते ठीक आहे. तुझी मर्जी.

तान्हाजी, बाजीराव मस्तानी आणि हा छावा अशा चित्रपटांमुळे महाराष्ट्रातल्या हिरोंची माहिती अख्ख्या देशाला होते, त्याबद्दल कृतज्ञ राहायचं सोडून नावं कसली ठेवता?
>> + 1

संभाजी राजे मोकळ्या मैदानात. शे दीडशे मावळ्यांसमोर नाचतायत हे पहायला फार विचित्र वाटले. रश्मिका अगदीच ऑड चॉइस. कोणी मराठमोळी अभिनेत्री मिळाली नाही का?
बाकी घशाच्या शिरा ताणून बोलणे पटले. वीरश्रीपूर्ण असे, व्हिज्युअली काय दाखविणे अपेक्षित आहे मग?
पण एकंदर बघावासा वाटत नाही. न जाणो काय इमोसनल अत्याचारात्मक प्रसंग पहावयाचे भोग नशीबी येतील म्हणुन.

राहता राहीले नव्या पीढीस चूकीचा संदेश जाणे ही भीती. नवीन पीढीला जर चित्रपट आणि खराखुरा इतिहास यात फरक असतो हे कळत नसेल तर आपली चूकी आहे. सिनेमा नेहमी ड्रामटायझेशन च असणार. सेलिंग (बिकाऊ) नाट्यमयता ठासून भरलेलीच असणार - लार्जर दॅन लाइफ. याउलट खर्‍या आयुष्यात कर्तुत्व आणि 'ह्युमेन' हेच पैलू असणार. आणि हे कधी ना कधी नवीन पीढीस सांगणार कोण - आपणच. आपलच कर्तव्य नाही का!

प्रिया बापट, प्राजक्ता, प्रार्थना बेहरे.. <<<
प्रिया बापट नकोच... प्राजक्ता, प्रार्थना बेहरे.. आई रोल मधे चालतील

तुला अशी कास्ट /चित्रिकरण आवडते ठीक आहे. तुझी मर्जी.
>>>>

आवडतो तर फक्त शाहरूख
तो मान इतर कोणाला नाही
पण आय am ओके विथ इट
विकी कौशल आणि रश्मिका चांगले कलाकार आहेत.
आणि लिहून घ्या पुन्हा.. इतिहासाची वाट लावली असे म्हणनारे सारे हा पिक्चर बघणार आहेत..
किंबहुना काहींनी आधीच्या चित्रपटातील जी उदाहरणे दिली त्यावरून असे लक्षात येते की त्यांनी ते पिक्चर सुद्धा बघितले आहेत..
चर्चा करायला मजा येते म्हणून आपण करतो असे झाले आहे आता..

किंबहुना काहींनी आधीच्या चित्रपटातील जी उदाहरणे दिली त्यावरून असे लक्षात येते की त्यांनी ते पिक्चर सुद्धा बघितले आहेत..>>> हे जर मला उद्देशून असेल तर मी एकही सिनेमा पाहिलेला नाही
ना बाजीराव मस्तानी, ना तानाजी ना कुठला
ट्रेलरच इतके भीषण, हिडीस, किळसवाणे असतात की सिनेमे बघण्याची इच्छा आणि धाडस दोन्ही नाही

काल युट्युबवर ‘छावा’ बघू नका म्हणून फतवा निघालेला पाहिला. असले आचरट पिक्चर वा वा म्हणत माना डोलावत बघून त्यांचा धंदा करुन देण्यात पॉईंट नाही. अर्थात अशीही भरपूर लोकं आहेत ज्यांना कंटेंट, इतिहासाशी काहीही देणंघेणं नाही. आला पिक्चर की बघा इतकंच महत्वाचं.

छावाच्या ट्रेलरमध्ये औरंग्यांची भूमिका केलेला अक्षय खन्नाच जेन्युईन वाटला
विकी कौशलने पण चांगला प्रयत्न केलाय . अर्थात दिग्दर्शकाची सूचना असेल तसा तो अभिनय करणार हे उघड आहे . रश्मिका ही येसूबाई कमी आणि रश्मिकाच जास्त वाटते .
आता चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये कशी आहेत ते चित्रपट बघितल्यावर कळेल

हे जर मला उद्देशून असेल तर ...
>>>
नाही तुम्हाला उद्देशून नव्हते. अन्यथा तुमचे नाव घेतले असते. किंबहुना तुम्हाला तर इतिहासाची कळकळ आहे असे मीच माझ्या मागच्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे.

मी इन जनरल चित्रपट प्रेमी बद्दल बोलत आहे. मला माहित आहे हल्लीचा हा पॅटर्न. लोक बघतात सगळे चित्रपट आणि नंतर नावे ठेवतात. नवा आला की पुन्हा बघतात. ओटीटी वर आल्यावर समजेल तुम्हाला सुद्धा हे. आता जे लोकं तुमच्या सोबत ट्रेलर बघून नावे ठेवत आहेत त्यातले किती जण चित्रपट बघून आमच्या गटात आले असतील बघा.
कारण सामान्य जनतेला इतिहासाचा गाभा तोच हवा इतकीच अपेक्षा असते. बारीक सारीक डिटेल इथे तिथे झालेले चालतात. सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली चालते

अर्थात पिक्चर चांगला जमलेला पाहिजे. मनोरंजन मूल्य पाहिजे.

आणि हो, हे मायबोली पुरते नाही बोलत आहे. एकूणच चित्रपट प्रेमीबद्दल बोलत आहे.

बाजीराव नाचताना दाखवला म्हणून नावे ठेवली असतील काही लोकांनी.. पण त्यातलेच काही त्याच गाण्यावर स्वतः डीजे मध्ये नाचले असतील..

रुबिकस् क्यूब म्हणून ७ वर्षांपूर्वी रिलीज होणारा चित्रपट बहुतेक आता एक राधा एक मीरा म्हणून रिलीज होणार आहे.

गाष्मिर आणि मृण्मयी मस्त दिसत आहेत.

https://youtu.be/DaqoXNc3HvQ?si=ZkE4dSKWzq3He-yn

मराठीतला डीडीएल्जे का हा ? Wink
मृण्मयीची हेअरस्ट॑इल नाही आवडली, गश्मीर चांगला दिसतोय, होपफुली अ‍ॅक्टिंग पण करेल !
या सिनेमाचं नाव नक्की किती वेळा बदललय ! रुबिक क्युब तर दिसलच, एके ठिकाणी 'स्पृहा' नाव पण आहे या सिनेमाचं Uhoh
https://youtu.be/PIWtkj4I12Y?si=9p52_55tuDirog3l

किती वेळा ते मी प्रेमात पडलोय ती प्रेमात पडलीय चालू होते. फार नाही आवडला ट्रेलर. गशमिर वेगळ्या लूक मध्ये दिसतोय हेच वेगळेपण असे वाटतेय.

मराठीतला डीडीएल्जे का हा >>> असं दिसतंय खरं Happy एकदम रमणीय आणि ग्लॉसी फ्रेम्स आहेत.

किती वेळा ते मी प्रेमात पडलोय ती प्रेमात पडलीय चालू होते >>> हो हो , हे खूप जाणवलं Lol

मला छावाचा ट्रेलर एवढा भावला नाही, मला काय दाखवत आहेत तेच समजत नव्हतं, परत एकदा बघेन. विकी आवडतो खूप पण यात ठीकठाक वाटला. अक्षयला ओळखलं नाही.

छावाचा ट्रेलर दहा सेकंदापेक्षा जास्त बघवला नाही. मराठे इतके मोठे चिलखते घालून लढत नसत. नाचाबद्दल तर बोलायलाच नको. कपडेपट विचित्र वाटतो. मावळ्यांचे आणि शिवबा- संभाजीराजांचे कर्तृत्व झाकोळून जाईल असा झगमगाट ट्रेलरमधून दिसतो. विकीचे मराठे उच्चार सदोषच वाटतात.

तान्हाजी, बाजीराव मस्तानी आणि हा छावा अशा चित्रपटांमुळे महाराष्ट्रातल्या हिरोंची माहिती अख्ख्या देशाला होते, त्याबद्दल कृतज्ञ राहायचं सोडून नावं कसली ठेवता? ->
हे उपरोधिक पणे लिहिलंय का काहींत नाही पण सहमत . बाजीराव मस्तानी नंतर कितीतरी उत्तर भारतीयांना बोलताना ऐकले कि बाजीराव एवढा भारी होता हे माहीत नव्हते . शनिवार वाड्याला भेट देणार्यांची संख्या वाढली होते ह्या सिनेमा नंतर असं म्हणतात.

आता हा सगळा बिझिनेस आहे मग सिनेमा चालण्या साठी अशी तडजोड कराविच लागणार असे वाटते.

मी लगेचच बाबासाहेब पुरंदर्यांचं शिव कल्याण राजा ऐकलं आणि ते पण "हे राज्य व्हाव हि तर श्रीं चीच इच्छा " असं म्हणालेत . अर्थात पुरंदरे बरोबर आहेत असं मला म्हणायचं नाहीये .

जर संभाजि महाराजांबद्दल अजून लोकांना माहिती होणार असेल तर मी हे सहन करायला तयार आहे

कोरावर श्रीराम करंबेळकर यांनी लिहिलेल्या एका उत्तरात खालील मजकूर व त्याचा संदर्भ म्हणून पत्राचे छायाचित्र दिले आहे.

"शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ मधील एक पत्र, पत्र शिवाजी महाराजांनी दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी यांस लिहिलेले असून त्यात 'हिंदवी स्वराज्य' आणि 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनांत फार आहे' असे दोन्ही उल्लेख सापडतात."

ह्यात हिंदवी स्वराज्य याचा उल्लेख "पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे" या वाक्यात येतो. त्यामुळे श्रींची इच्छावाले मूळ वाक्य "हे राज्य व्हावे" असेच हवे. त्यात हिंदवी स्वराज्य वापरायला हरकत नाही, कारण तो शब्द शिवराय वापरतच होते आणि ते तसे बोलले असण्याची शक्यता आहेच, पण तो वापरला नाही म्हणजे काही चूक नाही, उलट कागदोपत्री जास्त बरोबर आहे.

Pages