आहारशैली आणि अन्नसंवेदशीलता : काय, कसे, कधी, कशासोबत खावे?

Submitted by रानभुली on 15 April, 2025 - 21:29

परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी आपण खाण्या पिण्याच्या बाबतीत पाळत असतो. हल्ली या गोष्टींचं विस्मरण पण होत चाललंय.
कुठले फळ, भाजी कुणी खावी, कधी खावी, कशाबरोबर खावी कशासोबत खाऊ नये, कुठल्या वेळेला खावे असे आजीबाई सांगायच्या. आता आपल्या पिढीला हे माहिती नाही. अशा काही पारंपारिक गोष्टींची जंत्री करण्यासाठी हा धागा. काही चुकीचे समज, धारणा असतील तर त्यावर चर्चा झाली तर उत्तमच. जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.

सुरूवात सध्या उन्हाळा चालू असल्याने कलिंगडापासून.

कलिंगड खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?
दूध, दही, आईस्क्रीम, मांस , फ्रीजचं किंवा बर्फ घातलेलं थंड पाणी.

कलिंगड खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधाचे पदार्थ खाणे आरोग्याला हानीकारक ठरते ( नेमकं काय ते माहिती नाही, पण अ‍ॅसिडिटी, जळजळ असे सांगितले आहे).
मांस किंवा तत्सम आहार घेतल्यास पोटदुखी अपचन, उलट्या होऊ शकतात.
थंड पाणी , आइस्क्रीम दही यांच्या सेवनाने घसा धरणे आणि सर्दी अशा विकारांना आमंत्रण मिळते.

कलिंगड मधुमेहींनी खाऊ नये असा सल्ला दिला जातो कारण त्याची ग्लायसेमिक इंडेक्स ( जी आय) ७२ आहे जी खूपच जास्त आहे. पण कलिंगडाचा ग्यायसेमिक लोड खूप कमी (५) आहे. कारण त्यात ९०% पाणीच असते. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर साखर जरी पटकन वाढली तरी एकूण कार्बोहायड्रेटसची मात्रा खूप कमी असल्याने एकूण साखर वाढायला ती हातभार लावत नाही. मधुमेहींनी एखादी फोड खावी असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण खूप प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास जी एल वाढून साखर वाढू शकते.

कलिंगड खाण्याची योग्य वेळ
https://www.lokmat.com/sakhi/food/at-what-time-should-watermelon-not-be-...

कलिंगड आणि मीठ
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.
https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-why-harmful-to-...

इतर अन्नपदार्थ आणि फळांबद्दल अशी माहिती या धाग्यावर अशाच पद्धतीने संकलित करूयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी कुठल्यातरी पॉडकास्ट मध्ये, मीठ घातलेली चपाती आणि साखर घातलेला चहा ,हा आयुर्वेदानुसार अयोग्य आहार आहे त्यामुळे दोन्ही एकत्र खाऊ नये ,असं त्या बाई सांगत होत्या . आता हे कितपत खरं आहे माहीत नाही ,पणआम्ही लहानपणापासून चहा चपाती खात आलोय, त्यामुळे काही त्रास झाल्याचे लक्षात नाही.उलट बिनामीठाची चपाती चहाबरोबर अजिबात चांगली लागत नाही.

भजी खाल्ली की जास्त पाणी पिऊ नये,त्याने पोट दुखतं असं माझी आजी सांगायची, यातही किती तथ्य आहे माहीत नाही.

माश्या वर दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत हे मात्र पाळतो अंगावर पांढरे डाग येतात किंवा ऍलर्जी असं ऐकलंय आणि पोटही बिघडू शकतं.

दही पचायला जड? बाबौ.. ऐकावे ते नवल. दही भात हल्का पचायला असे ऐकले होते.
चहात चपाती, बिस्किटे, टोस्ट बुडवल्याने काहीच अपाय होत नाही. आम्ही, आमचे शेजारी, नातेवाईक गेली अनेक वर्षे हे करत आहेत, निरोगी आहेत.

आशु, अमुकतमुक पचायला हलके असे चुकीचे समज कित्येक पदार्थांबाबत झाले आहे. कित्येक लहान हॉस्पिटल्/नर्सिंग होम मध्ये सकाळी चहा व मारी बिस्किट नाश्त्यात असते. पोटाला आराम हवाय म्हणुन एखाद दिवस फक्त दुध ब्रेड खा हा सल्ला दिला जातो. मैदा व साखर आरोग्याला वाईट तरी आजारी/आजारातुन उठणार्‍या माणसाला असे सल्ले देणे, खायला देणे किती चुकीचे आहे.

चहात चपाती, बिस्किटे, टोस्ट बुडवल्याने काहीच अपाय होत नाही. आम्ही, आमचे शेजारी, नातेवाईक गेली अनेक वर्षे हे करत आहेत, निरोगी आहेत>>>>

हे सगळे हौले हौले असर करणारे जहर आहेत. यांचे सेवन करत राहिले की कालांतराने डायबेटिस होतो, हार्ट ट्रबल सुरु होतो…

पण काल टोस्ट बुडवुन खाल्ला आणि आज हार्ट अ‍ॅटॅक आला असे होत नाही. आणि जे हे पदार्थ खात नाहीत त्यांना
हार्ट अ‍ॅटेक येणार नाही, डायवेटिस होणार नाही याची हमीही देता येत नाही. त्यामु़ळे आज दिवस तुमचा समजुन हवे ते खाऊन पिऊन घ्यायचे. स्वस्थ बसणाराही फसणार आहेच. Happy

बेकरी प्रॉडक्ट्स बेसिकली मैद्यापासून बनलेले असतात. ज्या काळात शरीराला कार्बोहायड्रेट्सची गरज असते ( अ‍ॅक्टीव्ह असताना) त्या काळात ते चालून जातात. पण जेव्हां आपले काम बैठे होते, अ‍ॅक्टिव्हिटीज कमी होतात तेव्हां या जास्तीच्या कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर चरबीत होते. चहातही साखर असतेच. साखरेचा कुठलाही अ‍ॅडेड सोर्स हा घातकच. तितकी अंगमेहनत नसेल तर या कॅलरीज बर्न होत नाहीत. ज्या बर्न होत नाहीत त्याचे रूपांतर चरबीत होत जाते. रक्तात कोलेस्टरॉल वाढण्यात होते. एक दिवसात होत नाही.
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/30525325/

आपली बसून राहण्याची चिकाटी, जिद्द, सातत्य, अथक प्रयत्न यामुळे आपण डायबेटीस, हार्ट अ‍ॅटॅक यांना सहज खेचून आणू शकतो. विजयश्री बद्दल मिळालेले मेडलच आहेत ते.

दोन चमचे साखर ठीक आहे. त्यासोबत एखादा टोस्ट पण ठीक आहे. पण दिवसभर बसून असणे घातकच. चहा, बेकरी प्रॉडक्ट्स , आईसक्रीम, अ‍ॅक्टिव्हिटीज हा तर वजन कमी करण्याच्या कोर्समधला विषय आहे. आपण कशाबरोबर काय खावे किंवा खाऊ नये यावरच फोकस ठेवूयात.

दही रात्री खाऊ नये कारण रात्री मेटाबोलिझम सर्वात कमी असतो. ते शीत असल्याने कफकारक होते एव्हढेच माहिती आहे. वरती दिलेल्या लिंक मधे डॉक्टर तेच सांगताहेत. या लिंक्स वरून शंका समाधान व्हावे ही अपेक्षा.

आयुर्वेद सांगतं कि दही जड आहे. पण मॉडर्न मेडीसीनच्या म्हणण्यानुसार दही हे दूधापेक्षा तुलनेने हलके आहे कारण त्यात असलेले बॅक्टेरिया पचनाला मदत करतात. पण ज्या व्यक्तीं डेअरी प्रॉड्क्ट्स सेन्सिटिव्ह आहेत त्यांना दह्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
https://www.starhealth.in/blog/side-effects-of-eating-curd/

दिवसा दही खाल्ल्याचे फायदे फायदे आहेत. पण ते कलिंगडासारख्या फळाबरोबर किंवा माश्याबरोबर खाऊ नये.

नवीन माहिती मिळत आहे.
मैदा जास्त प्रमाणात किंवा असाही खाऊ नये हे ठाऊक आहे. पण चहा चपाती मधे काय वाईट आहे? नॉर्थ साईड ला लोक चपाती भाजी, चहा, दही हे सर्व नास्त्याला खातात. दिवसभर काम करायला उर्जा राहते त्यामुळे.
मला ही चांगली सवय वाटते. मला इतकं सर्व सकाळी जात नाही, म्हणुन चहा, पोहे/ उपमा/ डोसा/थालिपीठ वगैरे..

भारतात काही भागात चहाच्या पानांचा औषधी साठी वापरत जुना (किमान १२व्या शतकापासून) आहे असे दिसते. त्या औषधी काढ्यासोबत सोबत कुणी चपाती खात असेल असे वाटत नाही.
परंतु पेय म्हणुन जसा आताचा दूध साखर घालुन चहा करतो तसा चहाचा वापर एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. त्यासोबत चपाती खाणे शक्य आहे. तेव्हा आयुर्वेदात किंवा कुठल्याही आहारशास्त्रात चहा पेय +चपाती वाईट याचा अभ्यास केव्हा झाला?

तेव्हा आयुर्वेदात किंवा कुठल्याही आहारशास्त्रात चहा पेय +चपाती वाईट याचा अभ्यास केव्हा झाला? >> कुणासाठी आहे हा प्रश्न ?

जे चहात चपाती बुडवून खाऊ नये, त्याने अपाय होतो/हळुहळु होतो / होतो का? म्हणतात त्यांना.
त्यात प्रश्न कमी आणि विचार करा असे सुचवणे जास्त आहे.

ओके सापडली ती कमेंट. साधनाताईंची कमेंट आहे.
त्यांनी पण असा अभ्यास झाला असल्याचा दावा केलेला नाही. खूप चहा हा प्रकृतीला अपायकारक असतो हे आता अ‍ॅलोपॅथीने पण सांगितलेले आहे. तरीही कुमार सर, ऋतुराज सर, संजय भावे सर यांचा खुलासा आला तर स्वागत आहेच. इथे चहा म्हणजे शुगरफ्रीचा किंवा आयुर्वेदीक चहा असे आपण गृहीत धरत नाही. भारतात कुठेही मिळणारा साखर टाकलेला चहा हेच अपेक्षित आहे.

प्रत्येक घरातले अनुभव असतात. एखाद्याला त्रास झाला कि कधी तरी त्या घरातली आजी सांगतेच कि अमूक एक देऊ नको, अमक्याला असा असा त्रास झाला होता. मग हा सल्ला +अनुभव यामुळे ती परंपरा बनते. ते आयुर्वेदात असलेच पाहीजे असे काही नाही. आयुर्वेदात असेल तर या समजांना पुष्टी मिळते. पण आयुर्वेदावर सुद्धा शंका आहेत. मग अ‍ॅलोपॅथीचा दाखला लागतो.
म्हणून या धाग्यावर असे जे समज आहे त्याची जंत्री आणि निराकरण असावे असे म्हटले आहे.

काही काही गोष्टी या आता उपलब्ध असलेल्या माहितीने व्हॅलिडेट होतात किंवा खोडून काढता येतात.

उदा. गहू किंवा तांदूळ पॉलक्श केले असतील तर ते घातकच. ग्लायसेमिक इंडेक्स नुसार त्याचे जास्त सेवन मधुमेहाला आमंत्रण देऊ शकते. देतेच असे नाही. देणारच नाही असे नाही. या शक्यता बळावतात. यात अनेक गोष्टी पण आहेत. जसे कि जीवनशैली. साधारण पणे श्रमजीवी लोकांमधे असे आजार आढळत नाहीत असे निरीक्षण आहे. पण होणारच नाही अशी गॅरन्टी नाही.

हा धागा मेडीकल रीसर्च पेपर नाही. धोके समजून यावेत, शक्यतांचा विचार व्हावा आणि ते आहार होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी हा माफक उद्देश आहे. पण रीसर्च झाला असेल तर थेट त्याचा दाखला दिला तर स्वागतच आहे. उलट शंका फिटतील. रीसर्च पेपर वगैरे आपल्यासारख्ञा सामान्य युजर्सला शक्य नाही.

चहा + चपाती
चहा = साखर + चपाती = मैदा. हे काँबो तुम्हाला मधुमेहाचा पुरस्कार मिळवून देईल. फक्त तुमचे प्रयत्न कमी पडता कामा नयेत. तरूण असताना तुमचा मेटाबोलिझम चांगला असताना ,सर्व ऑर्गन्स व्यवस्थित असताना तुम्हाला पुरस्कार मिळायला वेळ लागेल. पण मधुमेह हा पुरस्कार तुम्ही एका जागी बसून राहण्याची तपस्या करून मिळवू शकता. तरीही काही कमी पडलेच तर भात वाढवू शकता किंवा चहाचे कप वाढवू शकता.

मैदा गव्हापासूनच बनतो. मैद्याचं पीठ असतं. त्यापासून बेकरी प्रॉडक्ट्स बनतात.
हा विषय पूर्ण पणे वेगळा आहे. आणि यावर बोललं कि फक्त प्रश्न विचारणारे प्रश्न विचारणार हे माहिती होतं. ते माहिती देत नसतात. Happy
https://www.youtube.com/watch?v=nTng-eV_sZA

मैद्याच्या चपात्या सुद्धा असतात. अशा रेसिपीज आहेत. मैद्यामधे फायबर नसल्याने ते धोकादायक आहे. पण याचा अर्थ गहू कमी धोकादायक नाही. ग्लायसेमिक इंडेक्स हायच आहे. फायबर मुळे पचन चांगलं होतं इतकाच फायदा आहे. पण गव्हात सोयाबीन मिसळा असा सल्ला डॉक्टर देत असतात. फायबरचे प्रमाण वाढले तर कदाचित धोका कमी होत असावा.

हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. फक्त यात काँबो आलं आणि असा अभ्यास झाला असल्याचा दावा कुणीच करत नसल्याने तसा प्रश्न अस्थानी वाटतो.

घरगुती गप्पांसारख्या गप्पा असे स्वरूप चालणेबल नसेल तर ठीक आहे. सतत सिद्ध का करायचे कळत नाही.

<<मध्यंतरी कुठल्यातरी पॉडकास्ट मध्ये, मीठ घातलेली चपाती आणि साखर घातलेला चहा ,हा आयुर्वेदानुसार अयोग्य आहार आहे त्यामुळे दोन्ही एकत्र खाऊ नये ,असं त्या बाई सांगत होत्या . आता हे कितपत खरं आहे माहीत नाही >>

इथुन सुरवात झाली. म्हणजे मीठ घातलेली चपाती आणि साखर घातलेला चहा हे एकत्र खाऊ नये - विरुद्धाशन आहे आयुर्वेदानुसार यावरून.
त्यात ते आयुर्वेदानुसार असणे शक्य वाटत नाही कारण तसा पेय म्हणुन चहा आपण एकोणीसाव्या शतका पासुन पिऊ लागलो आणि त्यानंतर चहा सोबत चपाती खाणे सुरू झाले. असे मी म्हटले. आयुर्वेदानुसार म्हणायला त्यात किंवा त्यावर आधारीत आहारशास्त्रानुसार अभ्यास व्हायला हवा.
थोडक्यात आयुर्वेदानुसार चहा आणि चपाती विरुद्धाशन याबद्दल माझी वरील पोस्ट आहे.

एक नम्र निवेदन आहे. एखादी माहिती चुकीची आहे असे वाटले तर अचूक माहिती देऊन खोडून काढावी. स्वागत असेल.

मानव सर, त्या पॉडकास्ट बद्दल काहीच कल्पना नाही.

>>>>चहा आणि चपाती विरुद्धाशन याबद्दल माझी वरील पोस्ट आहे.
तुमच्या हातून आता पोस्ट सुटलेली आहे आता तिचा स्वतःचा 'कटी पतंग' प्रवास होणार. उगी रहावे Wink

<< सतत सिद्ध का करायचे कळत नाही. >>
प्रश्न विचारून सतत चाचणी करणे हे आवश्यक असते. त्यातूनच माहितीची शहानिशा होते. नाहीतर हा धागा एकदम ज्योतिष्य आणि पत्रिका बघणे, या मार्गावर जाईल. आमचा तर बुवा असा अनुभव आहे, तुमचा विश्वास असो वा नसो अशी विधाने मग येत राहतात. आयुर्वेदात किंवा ज्योतिष्य"शास्त्रात" असे सांगितले आहे, असे म्हटले की बरेच लोक अंधपणे विश्वास ठेवतात. मग कुणी आयुर्वेदाचे ग्रंथ वाचलेले असोत वा नसोत. दुसऱ्या एका धाग्यावर पण बेधडक विधान आहे की भारतीय शास्त्रीय रागदारीत विशिष्ट राग विशिष्ट वेळी गावा. मग इतर लोक माना डोलावणार. पण का?, हे कुणी तपासून सिद्ध केले आहे का? असे विचारले की उत्तर मिळत नाही.
म्हणूनच उलट तपासणी करणारे प्रश्न (Why, How) विचारणे फारच गरजेचे आहे.

आता प्रश्न उरला की डॉ. कुमार यांना या धाग्यावर बोलते करण्याचा. माझ्या मते तरी ते इथे लिहितील का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण एक तर ते मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर आहेत, त्यांचा आयुर्वेदात कितपत सखोल अभ्यास आहेत याबद्दल शंका आहे. शिवाय ते अभ्यास करून, खात्रीदायक प्रतिसाद देतात त्यामुळे दही पचायला जड की हलके, यावर ते मदत करू शकतील का? याबद्दल खात्री नाही. डॉ. इब्लिस, आ. रा. रा. यांची उणीव मात्र जाणवली मला. Happy

उबो Lol
धागा वाचा कि. हा धागा उपयुक्त माहीतीचा आहे. प्रश्न विचारण्यापेक्षा खोडून काढा कि सरळ,
म्हणजे ती माहिती उपयुक्त नाही हे सिद्ध होईल. धाग्याच्या विषयातच तसे आवाहन केलेले आहे.

अशा धाग्याला फडणवीस असे कधी म्हटले ? लिंक द्या, समितीचा अहवाल काय ? लिंक द्या असे स्वरूप येऊ नये म्हणून वेळेत आवाहन केले.
अर्थात उबोंकडून वेगळी अपेक्षा नव्हती. Lol
तर धाग्याला खीळ घालायची तर घाला.

आपल्या मताला अनुकूल मतं असली तर मग असे शेकडो प्रोफाईल्स स्त्री कि पुरूष याच्या फंदात पडायचे नाही, पण उघड उघड अन्याय झाला हे दिसले कि शंका उत्पन्न करण्यासाठी प्रोफाईलच्या माहितीवर चर्चा सुरू करायची या प्रवृत्ती ठाऊक असल्याने उद्देश काय हे पण महत्वाचे आहे.
चला धाग्याच्या विषयावर बोलूयात.

माहिती देणाऱ्यावर ती अचूक आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी नाही का? >> माहिती अचूक आहे हा दावा केला नसेल तरी?? धाग्याच्या हेडरमधे काय म्हटलेय ?
याच न्यायाने प्रश्न विचारणार्‍याने शंका असेल तर सरळ सिद्ध केले तर काय बिघडते ? त्याला कुठे बंदी आहे ? कि तसा आत्मविश्वास नाही म्हणून प्रश्न विचारत रहायचे. मुलाखतीचं स्वरूप येईल ओ अशाने. भर घालायला हरकत काय ?

प्रश्न विचारण्यापेक्षा खोडून काढा कि सरळ, म्हणजे ती माहिती उपयुक्त नाही हे सिद्ध होईल. >>
नाय नाय. विधान करणाऱ्याने ते सिद्ध करावे. तुम्ही म्हणालात पत्रिका बघून भविष्य सांगतो, मल्हार राग गाऊन पाऊस पाडतो तर ते तुम्ही सिद्ध करायचे. आम्ही नाही म्हणणार दिवे लागले ते बटण ऑन केल्याने, दीप राग गायल्याने न्हवे.

अर्थात उबोंकडून वेगळी अपेक्षा नव्हती. Lol >>
हे मी माझ्या चौकसपणाचे प्रशस्तीपत्रक समजतो. धन्यवाद. Happy खात्री पटेपर्यंत आणि माझ्या मनाचे समाधान होईपर्यंत मी प्रश्न विचारतच राहतो. पुरावा दिलात तर ते लवकर होते, हाच काय तो दिलासा.

तुमच्याकडे लवकर उठा त्याचे फायदे असतात असे सांगत असतील ना ? Lol
इथे थांबणे मला योग्य वाटते. तुम्ही विचारत रहा. इग्नोर करू.

असंही नाही कि उत्तरं दिलेली नाहीत. मैदा आणि कणिक हे वेगवेगळे नाहीत (गव्हाचेच आहेत) याची माहिती प्रश्नकर्त्याला नसेल तर मग काय करायचं ?
जी माहिती इथे दिलेली नाही त्यावर ती विचारलेली आहे असे गृहीत धरून प्रश्न विचारले तर काय करायचं ?
जो दावा कुणी केलेलाच नाही तो दावा तसा केलेला आहे असा भ्रम करून घेऊन किंवा करून देऊन "हं, द्या आता उत्तर" अशा थाटात प्रश्न विचारले तर काय करायचं ?

एखाद्या युझरने आयुष्यभर पेपर सेटरच व्हायचं का ? त्याला पण कधी कधी परीक्षार्थी होऊ द्यायची समान संधी मिळू द्यावी हा शुद्ध हेतू आहे.

शंका उपस्थित केली तर तुम्ही (व्यक्तिशः तुम्ही नाही, मायबोलीकर) इतके हमरीतुमरीवर का येता? फक्त माना डोलावणारे तुम्हाला आजूबाजूला हवे आहेत का?

ता. क. मी मैदा, कणिक, दही वगैरे बद्दल काहीही शंका घेणारे बोललो नाहीये.

इतिहास पण असतो कि. हमरातुमरीवर आले हा तुमचा भ्रम आहे किंवा करून देत आहात.
माना डोलावणारे हवे आहेत असा कुठलाही विषय इथे चालू नाही. असा तुम्ही समज करून देत आहात.
उबो आले आणि त्यांना उत्तर दिले कि धागा भरकटतो हा इतिहास माहिती असेल तर चूक आहे का ?

नम्रपणे सांगू इच्छितो की धागा भरकटवणे हा माझा उद्देश कधीच नसतो. मी शंका व्यक्त करतो, या मताशी सहमत आहे. पण मी बऱ्याचदा सहमती देणारे प्रतिसादसुद्धा देत असतो. तसेही माझे ज्ञान आणि आवड फार तोकडे असल्याने खूप कमी विषयावर चर्चा करतो, हे तुम्ही लक्षात घेतले असेलच. त्यामुळे धागा भरकटवणे याला सर्वस्वी मी जबाबदार नसतो.

नम्रपणे सांगू इच्छितो की धागा भरकटवणे हा माझा उद्देश कधीच नसतो. >>> खूप हसवता तुम्ही. Lol
आता हेच बघा ना, धाग्याच्या हेडर मधे आयुर्वेद प्रमाण मानले आहे असे कुठेच म्हटलेले नाही, तरी तुमचा प्रतिसाद तुम्हीच वाचा.

हा धागा आयुर्वेदाची भलावण करण्यासाठी काढलेला आहे असा समज का करून घेताय ? भलावण पण नाही आणि त्याला नाकारायचेही नाही. काहींना आयुर्वेदाचा गुण येतोच की. जर आयुर्वेद थोतांड असेल तर मेडीकल कौन्सिल ने त्यावर बंदी का नाही आणली ? न्यायालयात का नाहीत गेले ? शिवाय दोन्ही पैकी कुठले योग्य हे त्या दोन शाखांचे लोक ठरवू देत. आपण आपसात कसे काय वाद घालायचे ?

आता प्रश्न उरला की डॉ. कुमार यांना या धाग्यावर बोलते करण्याचा. माझ्या मते तरी ते इथे लिहितील का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण एक तर ते मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर आहेत, त्यांचा आयुर्वेदात कितपत सखोल अभ्यास आहेत याबद्दल शंका आहे. शिवाय ते अभ्यास करून, खात्रीदायक प्रतिसाद देतात त्यामुळे दही पचायला जड की हलके, यावर ते मदत करू शकतील का? याबद्दल खात्री नाही. डॉ. इब्लिस, आ. रा. रा. यांची उणीव मात्र जाणवली मला. >>> कुमार सर इथे लिहीतील कि न लिहीतील हे ते ठरवतील. ते मॉडर्न मेडीसीनचे डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना इथे लिहीता येणार नाही अशी कुठली कंडीशन तुम्हाला दिसली ? हे न वाचताच ठोकून दिलंय. मघाशी स्ट्रॉ मॅन ऑर्गुमेण्ट ही कमेण्ट करायचा मोह आवरला. कारण तशी परिस्थिती इथे नाही. तुम्ही काहीही न वाचता ठोकून दिलेय. आधी नीट वाचा तरी.

जर आयुर्वेद हा विषय नाही तर मग ज्योतिषाच्या मार्गाने का जाईल धागा ? तुम्हाला मी सुचवले कि तुमच्या लहानपणापासून लवकर उठण्याचे फायदे सांगितले असतील. तेव्हां तुम्ही याचे शास्त्रीय प्रमाण द्या तरच उठतो असे म्हणालात का ?
आईच्या हातचे जेवताना या पदार्थांची रेसिपी संशोधकांकडून तपासून घेतली आहेस का हे विचारलेत का ? अजून तरी तुमच्या घरी तुम्ही जे काही खात असाल ते तुम्ही तपासून घेतले असेल तर इथे द्या. म्हणजे सर्वांनाच फायदा होईल.

जर तसे न करता तुम्ही जेवण करत असाल तर तसे का करता याचेही कारण द्या. कारण तुमचाच आग्रह आहे.
व्यायाम करत जा असे कुणी सांगितले असेल तेव्हां तुम्ही व्यायामाने फायदा होतो याचे शास्त्रीय कारण विचारलेत का ?

किमान मी तरी लिंक्स दिलेल्या आहेत त्या अ‍ॅलोपथीच्या डॉक्टरांच्या आहेत. तुम्ही धागा नीट वाचला असता तर तुम्हाला समजले असते. नाहीतर आयुर्वेदाचे स्टेटमेण्ट का केले असते ? न वाचताच शंका उपस्थित करणार असाल तर माफ करा. हे धागा भरकटवणे या प्रकारात मोडते. ते मान्य नसेल तर ज्या लिंका मी दिलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत हे सिद्ध करा. हॉस्पिटलचे एच ओ डी असलेल्या डॉक्टरांचेही पटत नसेल तर मग सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची नाही का ?

मी तर डॉक्टर नाही. मी या डॉक्टरांवर विश्वास ठेवेन. याशिवाय National Centre for Biotechnology Information, Nationala Libraray of Medicine या सरकारी संस्थांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या सुद्धा आयुर्वेदीक आहेत का ?

इथे लिहीणारे सगळे डॉक्टर असले पाहीजेत किंवा अभ्यास करून आले पाहीजेत हा कुठला आग्रह?
लिहू द्या कि जे माहिती आहे ते. तुम्हाला चुकीचे वाटले तर योग्य माहिती देऊन खोडून काढा. हेडर मधे सांगितलेय. तरी तुमचं एकच तुणतुणं आहे. या भीतीने कुणी लिहीतं होत नाही अशा विषयांवर. उद्या पाककला या धाग्यावर जाऊन त्याची केमिकल रिअ‍ॅक्शन सांगा म्हणाल. कला आणि शास्त्रात फरक आहे कि नाही ? जोपर्यंत त्यामागचे सायन्स कळत नाही तोपर्यंत बोलायचे नाही, जेवण बनवायचे नाही, जेवायचे नाही असा नियम आहे का ? हे पटत नसेल तर प्लीजच आवरा. सामान्य ज्ञान, विवेक पण असतं कि काही तरी.

शंका विचारा, पण आधीचे रामायण वाचा कि. जेन्युईन शंका असतील तर त्या विचार करायला भाग पाडतात.

Pages