परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी आपण खाण्या पिण्याच्या बाबतीत पाळत असतो. हल्ली या गोष्टींचं विस्मरण पण होत चाललंय.
कुठले फळ, भाजी कुणी खावी, कधी खावी, कशाबरोबर खावी कशासोबत खाऊ नये, कुठल्या वेळेला खावे असे आजीबाई सांगायच्या. आता आपल्या पिढीला हे माहिती नाही. अशा काही पारंपारिक गोष्टींची जंत्री करण्यासाठी हा धागा. काही चुकीचे समज, धारणा असतील तर त्यावर चर्चा झाली तर उत्तमच. जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.
सुरूवात सध्या उन्हाळा चालू असल्याने कलिंगडापासून.
कलिंगड खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?
दूध, दही, आईस्क्रीम, मांस , फ्रीजचं किंवा बर्फ घातलेलं थंड पाणी.
कलिंगड खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधाचे पदार्थ खाणे आरोग्याला हानीकारक ठरते ( नेमकं काय ते माहिती नाही, पण अॅसिडिटी, जळजळ असे सांगितले आहे).
मांस किंवा तत्सम आहार घेतल्यास पोटदुखी अपचन, उलट्या होऊ शकतात.
थंड पाणी , आइस्क्रीम दही यांच्या सेवनाने घसा धरणे आणि सर्दी अशा विकारांना आमंत्रण मिळते.
कलिंगड मधुमेहींनी खाऊ नये असा सल्ला दिला जातो कारण त्याची ग्लायसेमिक इंडेक्स ( जी आय) ७२ आहे जी खूपच जास्त आहे. पण कलिंगडाचा ग्यायसेमिक लोड खूप कमी (५) आहे. कारण त्यात ९०% पाणीच असते. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर साखर जरी पटकन वाढली तरी एकूण कार्बोहायड्रेटसची मात्रा खूप कमी असल्याने एकूण साखर वाढायला ती हातभार लावत नाही. मधुमेहींनी एखादी फोड खावी असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण खूप प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास जी एल वाढून साखर वाढू शकते.
कलिंगड खाण्याची योग्य वेळ
https://www.lokmat.com/sakhi/food/at-what-time-should-watermelon-not-be-...
कलिंगड आणि मीठ
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.
https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-why-harmful-to-...
इतर अन्नपदार्थ आणि फळांबद्दल अशी माहिती या धाग्यावर अशाच पद्धतीने संकलित करूयात.
हे अगदीच अनेक्डॉटल आहे, पण
हे अगदीच अनेक्डॉटल आहे, पण डोंबिवलीला आम्ही चाळीसगावहून येणारं दुध डेअरी मधून आणायचो. तर ते दूध टिकवायला ( का आणखी कशाला) त्यात मीठ घालायचे. जनरली चव जाणवायची नाही, पण कधी एखाददा जाणवलेली आठवते. आता हे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. हे सगळं खरं होतं का थोतांड काही कल्पना नाही.
सहज सर्च केला तर पिंच ऑफ सॉल्टने शेल्फ लाईफ वाढतं असं लिहिलंय.
तर ते दूध कधी फाटलेलं लक्षात नाही. त्यामुळे मीठ घालून दूध फाटत असेल... असं होईल का मला शंका आहे... पण होत असेल तर प्रमाण बरंच जास्त लागत असेल. पोळीतल्या मिठाने ते शक्य नसावे.
बाकी पोटात गेल्या गेल्या दूध फाटायला इतकी आम्ले असताना पदार्था बरोबर (इथे दुधाबरोबर) केलेल्या पेअरिंगची चिंता नको.
त्वचारोग म्हणजे नक्की कुठला
त्वचारोग म्हणजे नक्की कुठला रोग?>>>eczema, psoriasis,vitiligo
विरुध्द आहार खाऊन हे रोग होतीलच असे नाही पण हे आजार झालेल्यांच्या t विरुद्ध आहाराची history पहायला मिळतेच ..
माझ्या माहितीप्रमाणे उष्ण
माझ्या माहितीप्रमाणे उष्ण प्रदेशात घाम यायला म्हणून तिखट खाल्ले जाते असे नसून उष्ण आणि कोरड्या हवामानात तिखट पदार्थ पचवले जातात आणि शरीराला अपाय कमी होतो.
मुंबई हवामान उष्ण पण दमट आहे. घाम चिकचिक खूप होते. पण कोरडे हवामान नसल्याने इथे तिखट फार खाऊ नये असे ऐकले आहे.
विदर्भ आणि तिखट
विदर्भ आणि तिखट
उष्ण प्रदेशात मसाले आणि तिखट यांचा वापर होतो कारण त्यामुळे घाम येतो आणि शरीराला थंडावा मिळतो. दुसरं असं की भाज्यांची कमतरता. तिखटामुळे भाज्या कमी लागतात. राजस्थानातही म्हणून लाल मिरच्यांचा वापर अधिक. आणि म्हणूनच मुगवड्या, किंवा डाळढोकळी असे पदार्थ दोन्ही प्रांतांमध्ये होतात.
Submitted by चिनूक्स on 12 August, 2015 - 10:57
हे आंध्र प्रदेश व तेलंगणा मध्ये पण आहे. हैद्राबादेतही खानदेशी प्रभाव आहे. रायलसीमा
रुचुलू व तेलंगण स्पेशल जेवण तिखट व आंबट. आम्बाडी ची चटणी, गोंगुर मटन तिखट व आंबट असते विजयवाड्याकडेही जेवण तिखट जहाल.
Submitted by अश्विनीमामी on 12 August, 2015 - 11:44
>>>>vitiligo
>>>>vitiligo
हा रोग आहे की डिसॉर्डर? कोड ना?
Pages