आहारशैली आणि अन्नसंवेदशीलता : काय, कसे, कधी, कशासोबत खावे?

Submitted by रानभुली on 15 April, 2025 - 21:29

परंपरेने आलेल्या अनेक गोष्टी आपण खाण्या पिण्याच्या बाबतीत पाळत असतो. हल्ली या गोष्टींचं विस्मरण पण होत चाललंय.
कुठले फळ, भाजी कुणी खावी, कधी खावी, कशाबरोबर खावी कशासोबत खाऊ नये, कुठल्या वेळेला खावे असे आजीबाई सांगायच्या. आता आपल्या पिढीला हे माहिती नाही. अशा काही पारंपारिक गोष्टींची जंत्री करण्यासाठी हा धागा. काही चुकीचे समज, धारणा असतील तर त्यावर चर्चा झाली तर उत्तमच. जे योग्य असेल ते टिकून रहावे आणि एकत्रित रित्या सापडावे म्हणून हा धागा.

सुरूवात सध्या उन्हाळा चालू असल्याने कलिंगडापासून.

कलिंगड खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?
दूध, दही, आईस्क्रीम, मांस , फ्रीजचं किंवा बर्फ घातलेलं थंड पाणी.

कलिंगड खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधाचे पदार्थ खाणे आरोग्याला हानीकारक ठरते ( नेमकं काय ते माहिती नाही, पण अ‍ॅसिडिटी, जळजळ असे सांगितले आहे).
मांस किंवा तत्सम आहार घेतल्यास पोटदुखी अपचन, उलट्या होऊ शकतात.
थंड पाणी , आइस्क्रीम दही यांच्या सेवनाने घसा धरणे आणि सर्दी अशा विकारांना आमंत्रण मिळते.

कलिंगड मधुमेहींनी खाऊ नये असा सल्ला दिला जातो कारण त्याची ग्लायसेमिक इंडेक्स ( जी आय) ७२ आहे जी खूपच जास्त आहे. पण कलिंगडाचा ग्यायसेमिक लोड खूप कमी (५) आहे. कारण त्यात ९०% पाणीच असते. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर साखर जरी पटकन वाढली तरी एकूण कार्बोहायड्रेटसची मात्रा खूप कमी असल्याने एकूण साखर वाढायला ती हातभार लावत नाही. मधुमेहींनी एखादी फोड खावी असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण खूप प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास जी एल वाढून साखर वाढू शकते.

कलिंगड खाण्याची योग्य वेळ
https://www.lokmat.com/sakhi/food/at-what-time-should-watermelon-not-be-...

कलिंगड आणि मीठ
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.
https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-why-harmful-to-...

इतर अन्नपदार्थ आणि फळांबद्दल अशी माहिती या धाग्यावर अशाच पद्धतीने संकलित करूयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी पुन्हा चहा चपाती वर आणुया का?
खूप जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
स्वतंत्र लेख लिहू शकतो यावर...
आजवरच्या आयुष्यात सकाळच्या नाश्यात सर्वाधिक वेळा खाल्लेला पदार्थ आहे हा..

इथुन सुरवात झाली. म्हणजे मीठ घातलेली चपाती आणि साखर घातलेला चहा हे एकत्र खाऊ नये - विरुद्धाशन आहे आयुर्वेदानुसार यावरून.

Submitted by मानव पृथ्वीकर on 21 April, 2025 - 13:55

चहा चपाती यातील विरुद्धाशन बहुधा चपातीतील मीठ व चहातील साखर असे नसून चपातीतील मीठ आणि चहातील दूध यामुळे असावे. मीठ आणि दूध हे शक्यतो एकत्र घेऊ नये असे ऐकत वाचत आलो आहे.
तसे केळीचे शिकरण हे देखील विरुद्धाशन समजले जाते पण आपल्याकडे भारतभर शतकानुशतके शिकरण खाल्ली जाते , कदाचित हे देखील स्लो पॉइझन असावे, मी स्वतः मागील १७/१८ वर्षे नाश्ता शिकरण पोळीच करतो आहे, याचे साईड इफेक्ट्स कदाचित अजून काही वर्षात दिसू शकतील.

माझी आज्जी रोज दूध ,केळे आणि चपाती खाते गेली कित्येक वर्षे सकाळच्या जेवणाला त्याबरोबर कुठलीही भाजी नाही. आणि तोंडी लावायला गोड लिंबाचे लोणचे.
खूपच विरुद्ध आहार आहे पण काही त्रास नाहीये

पॉडकास्ट चहा चपाती वाली पोस्ट माझी होती त्यावरून भांडू नका. धागा आयुर्वेदाच्या बाजूने की विरोधात असण्यापेक्षा आपल्याला योग्य माहिती मिळावी आणि फायदा व्हावा या हेतूने काढला असावा असं मला वाटतं व कशाबरोबर काय खावे काय खाऊ नये यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून .
मला ती नेमकी चहा चपाती वाली रील भेटत नाही कारण ती इंस्टा वर पाहिली असावी पण त्याच बरोबर युट्युब वर पाहिलेल्या हिस्ट्रीत मिळाल्या त्या ह्या.

https://youtube.com/shorts/2Ymn0udwTuA?si=xwwS4UnCMKtTNUIT

https://youtube.com/shorts/uxFDnhOA6cs?si=x5xEmzIHEgpCIqeG
चहा चपाती आतापर्यंत खातच होतो ,गंभीर काही झालं नाही पण खरोखरच त्याने काही न कळण्याजोगे आजार किंवा कंडिशन जर उद्भवत असेल तर बदल करणे किंवा नाश्त्याला पर्याय शोधणे गरजेचे आहे .

<<<चहा चपाती यातील विरुद्धाशन बहुधा चपातीतील मीठ व चहातील साखर असे नसून चपातीतील मीठ आणि चहातील दूध यामुळे असावे. मीठ आणि दूध हे शक्यतो एकत्र घेऊ नये असे ऐकत वाचत आलो आहे.>>> हो बरोबर आहे वरच्या रील मध्येही तेच म्हटले आहे .पण दूधचपाती आणि साखर एकत्र खाल्ल्याने वजन मात्र वाढते असंही मी ऐकलंय.

भांडण नाही. तुम्ही खरं खोटं माहीत नाही असे म्हटले म्हणुन एक मत मांडले.
दूधात निसर्गतःच थोडसं मीठ असतं. (सोडियम क्लोराईडच)
चपातीत आपण कितीसं मीठ घालतो?
दूधात बऱ्यापैकी मीठ घातले तर दूध फाटेल, गरम असल्यास.

मी चहात शेव फरसाण शंकरपाळी चकली सारे टाकून खातो. त्यात मीठ जास्त असावे. दूध आवडायचे तेव्हा दुधात सुद्धा हे सारे टाकून खायचो.
अर्थात त्याने मला काही नुकसान झाले नाही असा दावा करायचा नाहीये.. पण किमान त्याक्षणी मळमळ वगैरे कधी झाली नाही.

जुन्या म्हाताऱ्या लोकांना अमुक तमुक वर्षानुवर्षे खाऊन काही झाले नाही अशी तुलना करू शकत नाही. ती खोडं वेगळ्याच वातावरणात आणि जीवनशैलीत वाढली होती.

सिट्रस फळं आणि दूध हे विरुद्ध अन्न असल्याचं वाचलं होतं. पूर्ण पिकलेला आंबा/चिकू आणि केळ्यांसारखी कलमी (ज्यांत आता नुसती साखरच उरली आहे अशी) फळं दुधात घातलेली चालतात.
मिठाचंही प्रथमच ऐकते आहे - खिरीसारख्या गोड पदार्थांत सर्रास मिठाची चिमूट घालतात आणि क्रीम बेसच्या (पंजाबी) भाज्या आपण खातो त्यात मीठ असतंच की!

बाकी पदार्थांच्या उष्ण/शीत इत्यादी गुणधर्मांच्या संदर्भातला हा मायबोलीकर आयुर्वेद तज्ज्ञ ज्ञाती यांचा लेख आवर्जून वाचा असं सुचवेन.
तो वाचून असं लक्षात येईल की यातले कुठलेही गुणधर्म हे 'त्रिकालाबाधित' नसतात. स्थळ, काळ, हवामान, ऋतुमान, सेवन करणार्‍याची प्रकृती आणि सेवतेवेळीचं आरोग्य या सर्वांचा परिणाम पचनक्रियेवर आणि चयापचयावर होत असतो.

चहा चपाती एकत्र खाल्ल्याने मीठाचा अपाय होतो हे माहिती नाही. पण चहा कोणत्याही जेवणाबरोबर घेऊ नये असे ऐकलेले आहे.
चहा पिल्याने भूक मंदावते. जेवणाबरोबर चहा घेतला तर पचन होत नाही.असे साधे कारण ऐकलेले आहे.
https://www.wavelets.in/magzinedetails.aspx?id=40

https://www.lokmat.com/sakhi/health/lifestyle-diseases/why-chai-chapati-...

https://www.lokmat.com/sakhi/food/chai-chapati-in-breakfast-is-it-good-f...

https://www.tv9marathi.com/health/do-you-know-chaha-chapati-combination-...

आयुर्वेदात फक्त आंबा दुध हे चालणारे कॉम्बो आहे. पण सर्रास सर्व फळांचे, लिंबुवर्गीय सोडुन, मिल्क शेक मिळतात. रोज रोज कोण पित नाही त्यामुळे चालुन जात असावे. सिताफळ बासुंदी, रबडी व आइसक्रिम मस्तच लागते.

चहा-चपाती यात चहामध्ये दूध थोडसंच असतं. चपाती म्हणजे मुख्य कार्ब्स आणि थोडे प्रोटीन आणि त्यात संपूर्ण १० अमायनो ऍसिड्स नसतात. कडधान्यातही दहाही नसतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते एकाच खाण्यात ही दहा अमायनो ऍसिड्स मिळाली तर प्रोटिन्स अंगी लागतात नाहीतर तर नाही. धान्ये + कडधान्ये एकत्र खाल्ली (उदा.: वरण-पोळी/भात) तर दहाही घटक मिळतात. सोय दूध अंडी मांसाहार यात दहाही घटक असतात. (त्यात परत त्यांची क्वालिटी वगैरे वेगळा मुद्दा)
या एकाच कारणासाठी सुद्धा (इतर कारणे असतील/नसतील) चहा-चपाती नाश्ता म्हणुन खाणे अपुरा आहार आहे.
दूध-चपातीत दूधाचे प्रमाण जास्त असल्याने ठीक आहार वाटतो (प्रथिनांच्या दृष्टीने.)

मासे आणि दूध याबद्दल.
आपल्याकडे मासे खाऱ्या पाण्यातले असतात, अर्थात मीठाचे प्रमाण जास्त. हे दुधाबरोबर खाल्ले तर विरुद्ध अन्न होणार.
बंगालकडे मासे गोड्या पाण्यातले असतात, मीठाचे प्रमाण कमी. ते दुधाबरोबर नाही तर दह्याबरोबर शिजवतात, तरी सर्रास नाही.
तिथे त्वचारोगाचे प्रमाण जास्त आहे हे माहितीत नाही.
एकूण योग्य/अयोग्य आहार हा हवामान, तिथे मिळणारे पदार्थ यावर बराच बदलतो.
अजून एक उदाहरण म्हणजे हिरवी मिरची आणि लाल तिखट.
जिथे ऊन जास्त आहे तिथे लाल तिखटाचा वापर जास्त आहे. लाल तिखट पचून घाम येण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चांगले.
पण जिथे थंडी जास्त आहे तिथे हिरवी मिरचीचा वापर वाढतो. लाल तिखटाने तिथे पोटाचे त्रास होतात. बंगालमध्ये लाल तिखटाचा स्वयंपाकात वापर नाही. जास्तीत जास्त आख्खी लाल मिरची तीपण वरून फोडणी द्यायला.

छान पोस्ट, चिऊ.

तिथे त्वचारोगाचे प्रमाण जास्त आहे हे माहितीत नाही. >> मी इथे पुण्यात पाहिले आहे.

पुण्यामध्ये मिळणारे खाऱ्या पाण्यातले मासे दह्यात केले तर परिणाम होणार. Slow poisoning.

एखाद्या भागात मिळणाऱ्या कच्च्या मालावर आणि हवामानावर डोलारा ऊभा आहे.

>>> जिथे ऊन जास्त आहे तिथे लाल तिखटाचा वापर जास्त आहे. लाल तिखट पचून घाम येण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चांगले. पण जिथे थंडी जास्त आहे तिथे हिरवी मिरचीचा वापर वाढतो.

याबद्दल मी जरा साशंक आहे.
म्हणजे काश्मिरी लाल तिखट असतं ना! आणि उपलब्धतेनुसार सगळ्या भारतीय कुझीन्समध्ये वापरतात की लाल तिखट किंवा मिरच्या.
शिवाय बंगालचं हवामान थंड आहे?

पुण्यामध्ये मिळणारे खाऱ्या पाण्यातले मासे दह्यात केले तर परिणाम होणार. Slow poisoning. >> पुण्यातल्या नदीचे मासे खाऊ नयेत असे लेख यायचे पूर्वी. https://punemirror.com/pune/others/pune-news-thousands-of-dead-fish-in-m...

पुण्याचं पाणी आता खडकवासल्यात पण शुद्ध नाही.

म्हणजे काश्मिरी लाल तिखट असतं>>>>

काश्मिरी मिरच्या कर्नाटकात पिकतात.

काश्मिरात वेगळ्यस मिरच्या पिकतात, फिकट रंग असतो.

>>> काश्मिरी मिरच्या कर्नाटकात पिकतात.
ओह, असं आहे का! धन्यवाद.

पण माझी शंका तरीही आहेच - म्हणजे मोगलाई/पंजाबी पदार्थांत लाल तिखट असतं ना - तिथे थंडी अधिक नाही का?

काश्मिरी मिरच्या कर्नाटकात पिकतात.

काश्मिरात वेगळ्यस मिरच्या पिकतात, फिकट रंग असतो. >>> साधना मस्त माहीती, खरोखर माहीती नव्हतं हे.

काश्मिरी पदार्थ म्हणून जे खाल्ले आहेत, त्याचा तिखटपणा कमी असतो. तेच पंजाबी पदार्थांचे. महाराष्ट्र आणि एकूणच south India मध्ये ज्या प्रकारचा तिखटपणा असतो तसा काश्मिरी किंवा पंजाबी पदार्थात नाही जाणवला. किंबहुना तिखट खात नाही म्हणून हे पदार्थ सुचवतात.
तिकडे जे लाल तिखट वापरतात ते रंगाला, तिखटपणाला मिरची.
अर्थात या दोन्ही ठिकाणी जाऊन authentic खाल्ले नाहीये.
तेव्हा वेगळे काही असेल तर वाचायला आवडेल.

बंगालमध्ये थंडी भरपूर असते. विशेषतः थंडीत उत्तरेकडून वारे येते तेव्हा. गंगा नदीकाठीपण पाण्याचा गारठा खूप असतो.
तिथे लाल तिखट पचत नाही आणि पोटाच्या तक्रारी वाढतात म्हणून पारंपरिक स्वयंपाकात वापर होत नाही, हे नक्की.

लाल तिखट आणि मिरची काही माहित नाही. पण उष्णकटिबंधात तिखट (स्पायसी... मग हिरवं असेल का लाल) खातात कारण घाम इ. ऐकलं आहे. शरीराला घाम यायला तोंडापासून सगळ्या पचनमार्गाची इतकी लाहीलाही करण्यापेक्षा जरा बरा इलाज असेल ना? असं आपलं मला वाटलं.
त्वचारोग म्हणजे नक्की कुठला रोग? अ‍ॅलर्जी रिलेटेड काही म्हणायचं आहे का? त्या त्वचारोगावर अन्न बदल न करता कुठलं औषध उपयोगी पडतं?

>>>>लाल मिर्ची जास्त प्रमाणात खाल्ली तर अल्सर, पोटाचा कॅन्सर असे आजार उद्भवतात.
होय माझे आजोबा व आई म्हणत - आतड्यांना क्षतं पडतात.
जेउन झोपले की अग्नीमांद्य होते. म्हणजे मला वाटतं मेटॅबोलिझम मंदावत असावे

उष्ण प्रदेशात घाम यायला सोपा उपाय म्हणजे पंखा बंद करणे. तिखट खाल्ले पाहिजे याची गरज नाही.
उलट थंड प्रदेश जिथे घाम येणे कठीण तिथे तिखट खाऊन घाम काढावा लागेल.

तिखट, मिरे, लसूण इत्यादि स्पायसेस अँटीबॅक्टेरीयल आहेत काही प्रमाणात. उष्ण प्रदेशात टिकवण्यासाठीच्या पदार्थात त्यांचा या गुणसाठी भरपूर वापरत होतो. तसेच शिजलेले अन्न दिवसभर, दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत टिकवायलाही होतो.
त्यामुळे तिखट व मसाले जास्त वापरतात. उष्णप्रदेशात उन्हाळ्यात हिरव्या भाज्या , हिरवी मिरची मिळणे कठीण. मग लाल तिखट वापरा हा उपाय.
एकदा सवय लागली की ऋतू बदलला तरी मग तेच खाणे होते.

Pages