चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. बघणार होतेच फक्त थिएटर ला बघावा का इतकाच प्रश्न होता .
भरजरी कपडे , ओवर द टॉप ड्रामा हे डील ब्रेकर नाही माझ्यासाठी, भन्साळी चा बाजीराव मस्तानी मला आवडला होता. Happy पण उदा. गोवारीकर चा पानिपत भयाण होता. भन्साळी ला जमते ते सगळ्यांनाच जमेल असे नाही.
मराठी हिरोज , लार्जर दॅन लाइफ कॅरेक्टर्स ची नॉन मराठी ऑडियन्स ला ओळख होणे हा मेजर प्लस आहे याबद्दल अ‍ॅग्रीड.
इथे गाणी क्लियरन्स सेल मधली आहेत हे खरेच.
कन्नड बोल वापरलेले गाणे >>> Uhoh इथे पुन्हा चिंतेत पडले आहे !

ध - हो तसेच काहीसे माझ्या डोक्यात आले. बाकी पिक्चर भारी असेल तर बघावासा वाटेलच - आणि प्रतिक्रियांवरून तसेच वाटत आहे. मधे ते काही इतिहासपट आले त्यात हे गिमिक्स सोडले तर फार काही नव्हते. ओटीटीच्या मुद्द्याशी सहमत.

असामींचं परीक्षण आवडलं.

आमच्याकडे छावा एव्हढ्यातच संपला.
माझी प्रतिक्रिया नकारात्मक आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सिनेमा बनवताना त्या मधे दक्षिणेची मारामारी नको होती.
तसेच औरंगजेबाच्या दृश्यातला तोच तोच पणा प्रेडीक्टेबल आहे. अक्षय खन्नाने बेअरिंग पकडताना खर्जातला स्वर लावला आहे. बस्स. नंतर काहीच नाही. गब्बर, डॉनच्या अड्ड्यात व्हिलनची दहशत बसवण्यासाठी कुणाला तरी मारण्याचा प्रघात असतो तसा औरंगजेब स्वतःच्या हातांनी प्रत्येकाला (त्याच्याच अपयशी माणसांना) मारत असतो. बादशहाकडे या कामासाठी माणसं नसतील का ?

मारामारीच्या दृश्यात बाहुबली, लॉर्ड ऑफ द रिंग्जचा प्रभाव आहेच. पण अ‍ॅव्हेंजर्स, साऊथपट यांचाही प्रभाव आहे. डायलॉगबाजी सनी देओलच्या सिनेमातली वाटते. राजांचे वागणे असे नसेल असे वाटते. सिनेमॅटिक लिबर्टी ठीक आहे, पण मुघल ए आजम मधली युद्धाची दृश्ये खरी खुरी वाटली तशी यातली वाटत नाहीत. जुन्या शिवपटात ग्रॅण्ड स्केल वर सिनेमा नसायचा पण प्रभावी होते ते सिनेमे. स्वतः महाराज सैनिकांबरोबर चटणी भाकर खायचे. तो साधेपणा विचारात घेतलेला नाही. पब्लिकला काय आवडतं याचा विचार करूनच सिनेमा बनवला आहे. जुने सिनेमे कसे चालायचे मग ?

विकी कौशल भूमिका जगलाय असे ऐकले. पण तसे वाटत नाही. काही हलके फुलके सीन्स आहेत. त्यात सुसह्य वाटतो. रश्मिका मंदानाचा अजिबात प्रभाव पडत नाही. डायना पेंटीला का घेतले आहे ? कॅरेक्टर्स डिफाईन न झाल्याने इमोशनल टच जाणवत नाही.

सनी देओल सारखा आरडाओरडा नको होता असं वाटलं.

एडिटून एडिटून प्रेसिडेंट्स डे साजरा करतोय असामी. >> Lol

त्यावेळच्या मराठी इतिहासाची, स्वराज्य स्थापना, लढाया, युद्ध करतानाची नीतिमत्ता वगैरेची intrinsic value इतकी प्रचंड व युनिक आहे की ती दाखवायला त्यातला हीरो १५ फूट उंच उडी मारतोय हे दाखवायची गरज नसावी. >> पहिले वाक्य ज्यांना ह्याविषयामधे गोडी आहे , ह्यावर थोडी माहिती करून घ्यायची उत्सूकता आहे त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे. बाकीच्यांना त्यातल्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमेचा अधिक मोह पडतो. (बाहूबली किंवा कल्की मधली कॅरॅक्टर्स का हिट झाली पाहा). शेवटी कमर्शियल गणित प्रत्येकाला सोडवावेच लागणार ना. गर्दी खेचली जात असेल तर हे सगळे असणारच (प्रत्येक निर्माता - दिग्दर्शक मणिरत्नमच्या तोडीचा थोडाच असणार कि मोजक्या नॉर्मल प्रकारांमधे सर्व दाखवता येऊ शकेल असा - त्यालाही मर्यादा आहेतच आणी) . मह्त्वाचे हे आहे कि त्यापलीकडे जाऊन काही दाखवण्याची - मांडण्याची धमक आहे का ? मग ते त्याच सिनेमात असले तरी हरकत नसावी असे वाटते.

कन्नड बोल वापरलेले गाणे >> माझ्या मूळ वाक्यामूळॅ दिशाभूल झालेली दिसतेय Sad पूर्ण गाणे कन्नड नाहिये तर एका सीनमधे बेळगाव स्टाईलचे कन्नड बोल वापरून एक गाणे सुरू होतेय. तिथला प्रसंग असल्यामूळे असू शकेल कदाचित. पण अजिबात खटकणार नाहि सिनेम बघताना.

छावा पाहिला.
विकी कौशल दिग्दर्शकाने जी भुमिका दिलीय ती जगलाय. तो संभाजी वाटतो.
आशुतोष राणा - इतरवेळी त्याचे डोळे भीतीदायक वाटतात पण इथे हंबीरराव मोहित्यांच्या भुमिका तेच डोळे आश्वासक, आधार देणारे वाटतात. कलाकार तर तो उत्तम आहेच.
रश्मिका मंदाना येसूबाई म्हणून दिसते उत्तम. पण तिने तोंड उघडलं नसतं किंवा तिचं डबिंग इतर कुणाकडून करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. शेवटच्या प्रसंगात तिला मिनीमल संवाद आहेत हे उत्तम.
दिव्या दत्ता मात्र सोयराबाई न वाटता नववारी नेसलेली सदरेवर बसून पान खाणारी बडी बेगम वाटते. तिची निवड/बेअरींग/मेकप यापैकी काहीतरी नक्की चुकलंय. तिच्या जागी सौंदर्याचा व कुळाचा अभिमान असणारी करारी स्त्री म्हणून किशोरी शहाणे चालली असती.
अक्षय खन्नाचं बेअरींग उत्तम आहे, एखाद प्रसंग सोडल्यास संवादफेकही ठीक आहे. पण अभिनय दाखवण्याची त्याला फारशी संधी नाही. तो फक्त संभाजीच्या असण्याची, पराक्रमाची, हिंमतीची रिॲक्शन देत राहतो. काही प्रसंगात त्याचं पडद्यावरचं वय व बॉडी लॅंग्वेज मेळ खात नाहीत. पण तो उतरणीला लागलेला व पुढच्या पिढीकडून होप्स नसलेला बादशाह प्लस वय झालं तरी हिंदूस्तानवर हुकूमत असलेला बादशाह असं कॅरॅक्टर असल्याने ते चालून जावं.
मोजून दीड एक्स्प्रेशन देत डायना पेंटी झीनतच्या भुमिकेत का आहे आणि मुळात नीटशी न बांधता ही भुमिका इथे का आहे हे दिग्दर्शकालाच ठाऊक.
लढाया आजकालच्या ट्रेंडप्रमाणे गनिमी काव्याच्या न वाटता रोहित शेट्टी प्रोड्युस्ड एमएमए फाईट्स वाटतात. आणि मध्यंतरानंतर त्यांना लास्ट ऑफ मोहिकन्सची फोडणी दिलीय.
तरीही संभाजीराजांना पकडण्याचा प्रसंग व लढाई मला आवडली. त्यातही एक्झॅगरेशन असले तरी जीवाच्या कराराने लढणारी माणसं दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. माझ्या लेखी हा हाय पॉईंट होता. इथे नवरा उठून बाहेर गेला.
या पिक्चरमध्ये लढायातला किंवा औरंगजेबाने पकडल्यावर एखाददुसऱ्या प्रसंगातला आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा टाळला पाहिजे होता.
संभाजीराजेंच्या जीवनातले काही प्रसंग जसं की गोवा स्वारी, त्यांची विद्वत्ता, ग्रंथरचना वगैरे इथे नाहीत कारण औरंगजेब विरुद्ध संभाजी असा संघर्ष दिग्दर्शकाला दाखवायचा असावा. पण कवि कलशासोबत त्यांचे काव्यमय संवाद ठीक कॅटगरीत आहेत. हे ओरिजिनल संवाद नसावेत.
वेशभुषा ओव्हरॉल चकचकीत वाटली तरी साड्यांचे पोत, संभाजी राजांचे कपडे, मावळ्यांचे व मुगलांचे कपडे वगैरे नीट आहेत. सरसकट सगळ्या मावळ्यांनी चिलखतं घातलीत. पण एवढ्या लढाया करताहेत तर घालू दे बापडे म्हणून मी सोडून दिलं.
रहमानचं म्युझिक मात्र साफ निराश करतं. संभाजी राजांच्या प्रसंगात पार्श्वभुमीवर अतर्क्य ऑपेरासदृश शब्दरचना, मुगली प्रसंगाच्या पार्श्वभुमीवर उर्दू/फारसी किंवा तत्सम भाषेतली शब्दरचना, लढायांच्या वेळी तुफान आया वगैरे रहमानने गायलेली रचना टुकार आहेत. त्याने ढोल बिल वाजवून पाहिलेत. पण हा वीरा राजा वीरा किंवा जोधा अकबरचा रहमान नाही. इथे अजय अतूलच पाहिजे होते.
ओव्हरऑल नवरा म्हणाला की संभाजी राजे या विषयावर नॉन महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा स्टार्टर पॅक आहे. शिवाजी, पानिपत आणि नंतरचे मराठा साम्राज्य यातली काही गॅप हा पिक्चर थोडीशी भरून काढतो.
लक्ष्मण उतेकरने बाकी काहीही केलेलं असलं तरी संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला हे दाखवण्याचं धाडस केल्याबद्दल त्याचं अभिनंदन. धर्मांतराची अट पहिली होती व ती जरा लेट टाकलीय. पण त्या संवादाला टाळ्या पडल्या थिएटरमध्ये.
विकी कौशलप्रेमींनी पिक्चर बघायला हरकत नाही. आणि बघणार असाल तर मोठ्या पडद्यावरच बघा.

इतिहास जरा ओव्हरव्हेल्मिंगच वाटतो. >> हो अस्मिता. आपण शाळेत असताना एक बाजू शिकलो होतो (चूक कि बरोबर त्यात शिरूया नको). पुढे ऐतिहासिक कादंबर्‍यांमधून त्याच कॅर्‍अ‍ॅक्टरची एक वेगळीच बाजू समोर आली. (परत त्यात कपना विलास किती हा भाग बाजूला ठेवतो). नंतर कधी तरी मी डेनिस किंकेड चे ओउस्तक वाचले तेंव्हा जाणवले कि तिसर्‍या माणासाने ह्यावर घेतलेला टेक वाचणे इंटरेस्टींग असेल. ( त्यालाही तटस्थपणे लिहिताना महाराजांचा मोह पडला हा भाग जबरदस्त आहे). पण त्यातूनच मग मनु पिलाई, डॅरीलंपोर वगैरे वाचले तेंव्हा हे सगळं प्रकरण किती अचाट होते हे जाणवत गेले. कसलेही बॅकिंग नि बॅकग्राउंड नसलेली सर्वसामान्य माणसे अशा काळात जेंव्हा कम्युनिकेशन क्रांती नव्हती तेंव्हा धर्मापलीकडे एका समान ध्येयासाठी एकत्र आणून बांधणे - नुसती बांधणे नव्हे तर त्या ध्येयासाठी कसलिहि अपेक्षा न धरता आपलं सर्वस्व, आपला जीव देण्यापर्यंत मानसिक तयारी होणे - एकच पिढी नाही तर तीन तीन चार चार पिढ्या ह्यात आल्या - हा प्रकारच गारुड घालणारा आहे.

माफ करा पण
"तेंव्हा धर्मापलीकडे एका समान ध्येयासाठी एकत्र आणून बांधणे"
पण हे समान ध्येय काय होते? हे समजले नाही.

सुंदर पोस्ट असामी. इतिहास म्हणजे "चार आंधळे आणि हत्तीची" गोष्ट होते माझ्यासाठी बरेचदा. तू लिहिलेला "पण त्यातूनच" नंतरचा भाग फार भावला, खरंच त्या जाज्वल्याच्याच तर पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला होतं.

माझेमन, राभु वाचणार आहे. तुम्ही परिच्छेद सोडा जरा मुलामुलींनो. Happy

वरचे सगळे रिव्ह्यूज थोडे रिलेट झाले, (थोडे नाही). शेवटचा अर्धा तास इंटेन्स आहे. त्याआधीचा सिनेमा त्या अर्ध्या तासाकडे जाणारा बिल्ड-अप आहे. विकी कौशल, आणि अक्षय खन्ना - दोघांनी छान कामं केली आहेत. कदाचित इतिहासातल्या अत्यंत क्रूर हत्यांपैकी ही एक असेल - निदान सिनेमा बघून तरी असं नक्कीच वाटतं. मूळ कादंबरी वाचून खूप वर्षं झाली. खूप डिटेल्स आठवत नाहीत. पण वाचताना त्या शाळकरी वयात जे क्रौर्य इमॅजिन केलं होतं ते पडद्यावर पाहताना जाणवलं.

रहमान चं म्युझिक चांगलं आहे - पण 'मराठी' नाही वाटत. तिथे अजय-अतुलच्या ढोल-ताशा-संबळ प्रकाराने जरा जास्त कनेक्ट होता आलं असतं. म्युझिक त्या मातीतलं असलं तर जास्त इफेक्टीव्ह होतं असं मला वाटतं.

मला वाटतं संभाजी महाराजांच्या मृत्युच्या वेळी येसुबाई प्रेग्नंट होत्या (शाहू महराज). पण सिनेमात तो उल्लेख बर्यापैकी आधी आलाय. एक लहान मुलगा पण नंतर दाखवलाय. माझ्या माहितीप्रमाणे संभाजीराजांना एक मुलगी आणि एक मुलगा (शाहू) होते.

संभाजीराजांच्या आयुष्यात इतकं नाट्य असताना, वरून 'बाहूबली / सिंघम -तडका' दिला नसता तर मला चाललं असतं. पाण्यातून मारलेल्या अँटी-ग्रॅव्हिटी उड्या, झाडावरून दोर्या लावून खाली उतरल्यावर परत उलटं वर जाणं, त्रिशूल, गदा वगैरे आयुधं टोटली अनावश्यक वाटली. तकालीन भाषेत कवी कलश च्या कवितेत 'राजा हमारा भारी हैं' किंवा औरंगझेब 'मजा नहीं आया' वगैरे म्हटला असेल हे जरा गैर-दरबारी वाटलं (असेलही. शिवाजी महाराजही कधीतरी 'आज कंटाळा आलाय' वगैरे म्हटले असतील. पण 'माबदौलत, माय -भवानीच्या आशीर्वादाने' म्हणणार्या शिवाजी महाराजांच्या तोंडून मला ते ऐकायचं नाहीये. I want to 'look up to him' not 'look at him')

ही फोटोमध्ये रश्मिकाला का घेतलंय? ही का घेतलीय? मला समजत नाही की हा प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारला जातो. प्रत्येक वेळी! मी आधीच सांगितलंय ना…ती खूप लकी अभिनेत्री आहे.

चित्रपट यशस्वी हवा असेल तर ती लकी चार्मसारखी असते. हो, तिच्यापेक्षा चांगल्या अनेक अभिनेत्री आहेत. पण काही गोष्टी नशीब आणि आर्थिक गणितांसाठी केल्या जातात. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं थांबवा.

शाळकरी वयात जे क्रौर्य इमॅजिन केलं होतं ते पडद्यावर पाहताना जाणवलं. >>> १००++

कवी कलश च्या कवितेत 'राजा हमारा भारी हैं' किंवा औरंगझेब 'मजा नहीं आया' वगैरे म्हटला असेल हे जरा गैर-दरबारी वाटलं (असेलही. शिवाजी महाराजही कधीतरी 'आज कंटाळा आलाय' वगैरे म्हटले असतील)
>>>>
एक्झॅक्टली. इंद्र जिमी जंभपर ऐकल्यानंतर राजा हमारा भारी है अगदीच पार्टिसिपेशनरी अवॉर्ड दिल्यासारखं वाटतं.

संभाजीराजांच्या मृत्यूवेळी येसुबाई प्रेग्नंट होत्या नाही.
>>>> रायगडावरून येसुबाईंना मुगली फौजेने पकडलं तेव्हा शाहुराजेही पकडले गेले व दीर्घकाळ कैदेत राहिले.

विशेषतः नंतर त्यांच्या मुलाचं, शाहूचं धर्मांतर करणं सोपं असूनही ते केलं नाही त्यामुळे ती थिअरी काहीशी क्वेश्चनेबल आहे.>>>
राजाराम महाराज व ताराराणी पराक्रम गाजवत असताना कन्व्हर्टेड शाहुमहाराज लोकांनी स्वीकारले नसते आणि संभाजी महाराजांच्या क्रुर हत्येनंतरचा पुशबॅक ही कारणं आहेत, त्याहीपेक्षा महत्वाचा आहे तो महाराजांनी घालून दिलेला पायंडा. जबरदस्तीने धर्मांतरण केलेल्या निंबाळकरांना महाराजांनी विधीवत हिंदू धर्मात परत घेतलं. महाराजांच्या पुत्राला/नातवाला ही सोय तत्कालिन समाजाने नाकारली असती का? त्यामुळे धर्मांतर स्वेच्छेने व सरदारकीच्या आशेने करवणे हेच जास्त सोयीचे होते.
पिक्चरमध्ये इर्रिव्हर्सिबल फिजीकल डॅमेज केल्यानंतर ही ऑफर देणे गंडलेलं लॉजिक आहे. पण तो सिक्वेन्स अर्थपूर्ण आहे. सो माफ.

काहीच बघण्यासारखे दिसत नव्हते म्हणुन यामीला पाहुन धाम धुम की धुम धाम सुरु केला.. सुरबात प्रॉमिसिण्ग वाटली पण नंतर प्रचंड बोअर झाले. मध्येच एकदा फॉ फॉ केले तर ते बस की मेट्रोत होते.. मग हे शेवटपर्यंत असेच चालणार समजुन बंद केले. गाडी सुरु करताना नवरा गाडीत अ‍ॅडजस्टमेंत करताना यामी जशी व जितकी वैतागली तितकीच मी तिच्या त्या पायरीवरच्या फेमिनिस्ट डायलॉगला वैतागले. तोही अर्ध्यातुन फॉ फॉ केला.. i m done with feminism in cinema and overall now.. मला कंटाळा आला तेच ते ऐकुन…

छावा बद्दल इतके छान वाचुन छान वाटते. विकि कौशल मसानपासुन आवडतोच त्यामुळे प्रश्नच नाही. पण शेवट पडद्यावर पाहायला झेपणार नाही, इतके डिप्रेशन पेलायची ताकद सध्या नाहीय त्यामुळे ओटिटिवरच पाहेन.

ताराराणीने २५ वर्षे औरंग्याला झुंझवले, तो बलाढ्य मोगल सम्राट एक हरलेला थकलेला मराठ्यांनी गांजवलेला म्हातारा होऊन महाराष्ट्रातच मेला हेही आता येऊद्या पुर्ण भारतासमोर. त्याला त्याच्या अल्लाने ही अधोगती पाहायला जिवंत ठेवला
आणि जिवंत पणीच मरण यातना भोगवळ्या.

डिप्रेसिंग नाहीये. उलट वाचताना जास्त खोलवर जाणीव होते त्या मानाने दृश्य फार काही वाईट नाहीयेत. फक्त शरीर लाल रंगात न्हाऊन गेलेलं दाखवलंय. जा चित्रपटाला साधना

काल लगेच हॉलबाहेर आल्या आल्या लिहिले होते. टाईपायला वेळ नव्हता आणि बसायला जागाही नव्हती. तरी बरीच मोठी पोस्ट कशी लिहिली मी?

कालच जाणवलेली गोष्ट म्हणजे छावा कादंबरीचा एव्हढा मोठा पट असल्याने याचा सिक्वेल यायला हवा होता म्हणजे अन्य पात्रं ओळखीची झाली असती.

भालजींचे सिनेमे दोन अडीच तासाचे असायचे. पण त्यात सुरूवातीला स्वराज्यावर कोणतं संकट येणार याचं सूतोवाच असायचं. मग स्वराज्यात यायचा सिनेमा. इथे अगदी शेतकरी मावळा, गावातलं अस्सल वातावरण, घरातलं वातावरण, नोक झोक, हास्य विनोद, गाणी असं पार पडलं कि त्या मावळ्याला महाराज / सरसेनापती / बहिर्जी यांच्या समोर जावं लागे.

या टप्प्यात महाराजांचे दर्शन होई. मग सिनेमा महाराजांच्या भोवती फिरत असताना जे संकट येणार आहे ते थोपवायला एखादी लहानशी पण महत्वाची कामगिरी त्या मावळ्यावर येत असे. ती कामगिरी तो कसा पार पाडतो हा हाय पॉईंट असायचा. अशा छोट्या छोट्या वास्तव / काल्पनिक सिनेमांची मालिका भालजींना एक हाती सादर केली. वीस पंचवीस वर्षे वाहून घेतले. ते स्वतः विशिष्ट विचारसरणीचे होते पण सिनेमा बनवताना ती हावी होऊ दिली नाही. थोडा फार प्रभाव असेल तर तो इग्नोरण्याइतका आहे.

दादा कोंडके, वसंत शिंदे हे सिनेमाचे नायक असत.
नेताजी पालकर, बहिर्जी यांच्या वर सुद्धा सिनेमे आहेत. महाराज आणि युवराज संभाजी यांच्यातल्या संबंधांवर एक सिनेमा होता. यात नाट्य जास्त होतं ज्यात महाराजांच्या कर्तव्य कठोर प्रतिमेला हायलाईट केले आहे. हा इतिहास आहे कि नाही याबद्दलचे मतभेद बाजूला ठेवू.

दोन तीन तासात प्रेक्षकांना भावनिक दृष्ट्या गुंगवून गोळीबंद कथा पटकथा सादर करायची तर कॅनव्हास आटोपशीर हवा हे भालजींना समजलेले होते.

छावा मधे नेमके ते मिसिंग आहे. त्यातल्या त्यात सरलष्कर हंबीरराव यांना थोडा स्कोप आहे. महाराष्ट्राच्या बाहेरच्यांना त्यातून काय समजेल?
बुरहानपुरची लढाई हाच एक सिनेमा होईल. त्या हल्ल्या आधी माणसं कशी पेरली, त्यांनी माहिती कशी काढली आणि औरंगजेब पासून ते बुरहानपुरचे सैन्य गाफील कसे राहिले हे दाखवणे जास्त रोचक झाले असते.

बुरहानपुरचा हल्ला दिवसा नाही तर रात्री झाला. गनिमी काव्याचं गमक वेगात आहे. काही समजायच्या आत हल्ला करून निघून जाणे किंवा पराभूत करणे याबद्दल संवाद असते तर पाण्यातून वर येणे, उड्डाण करणे हे दाखवण्याची गरज पडली नसती.

गनिमी काव्याबद्दल रंजक माहिती मिळाली असती तर मला नाही वाटत सिंघम स्टाईल अ‍ॅण्टी फिजिक्स हाणामारी दाखवावी लागली असती.

बहिर्जी, संताजी, धनाजी, रायप्पा यांना काहीच संवाद नाहीत. राजे त्यांना हाक मारतात इतकाच उल्लेख.

म्हणूनच भालजींच्या सिनेमात प्रेक्षक गुंगतो तसे इथे होत नाही.
बाहुबली सारख्या काल्पनिक कथेचा आता तिसरा भाग येत आहे तर संभाजी महाराजांच्या नाट्यमय आयुष्यावर किमान दोन भाग तरी हवे होते. बरंच काही आहे पण आता भालजींना एखादा सिनेमा पहायला लागेल.

महाराणी येसूबाई आणि ताराराणी हे बघायचे आहेत. इथेही या पात्रांवर ते स्वतंत्र सिनेमा बनवतात. ताराराणीची गोष्ट आजीकडून अनेकदा ऐकली आहे. तुषार जोशी यांच्या धाग्यावर लिहिले नाही हे. तानाजी, बहिर्जी, येसाजी कंक, बाजीप्रभू, मुरारबाजी हे शाळेत जाण्याआधीच माहिती होते.
महाराष्ट्राच्या बाहेर तर खुद्द थोरल्या महाराजांबद्दल कमी माहिती आहे असे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहताना वाटते. त्यांना शाळेत पण थोडक्यात शिकवतात इतिहास.

रानभुली अगदी सहमत. भालबांचे चित्रपट अगदी रंगुन जाऊन पाहिले आहेत.

संभाजीवर अजुन चित्रपट यायला हवेत, पुढचा इतिहासही यायला, सगळ्यांचाच.. कारण पुढच्या पिढीला आता इतिहास समजायचे हे एकच माध्यम प्रभावी राहिलेले आहे. पुस्तके कोणी वाचेल असे वाटत नाही.

अजिंक्यराव धन्यवाद. मला एका तेजस्वी ओजस्वी व्यक्तिमत्वाचा असा कैदेत छळ सहन करुन मृत्यु झालेला पाहवणार नाही, तेही धर्मासाठी. लढाईत मृत्यु झाला असता तरी पाहवले असते. आपला इतिहास मला खुप डिप्रेस करतो. मला इतिहासातले काही बदलायला मिळाले असते तर यच्चयावत लोकांमधली थोड्यक्या लाभासाठी परकियांना फितुर व्हायची इच्छा मारली असती. बाकी आपापसातील भांडणे, जेलसी, हव्यास वगैरे ठिक आहेत.

साधना तै
धन्यवाद आणि सहमत वरच्या पोस्टशी.

गणोजी/राणोजी यांचे पुढे काय झाले? का काहीच नाही झाले?
ते त्यांचे मजेत जगले?
येसुबाई वा ईतर कोणी राजदरबारातले मंत्री त्यांना काहीच शिक्षा करू शकले नाहीत का मोगलांचा वरदहस्त असल्यामुळे?
जाबही विचारला नाही कोणी त्यांना?
फौज पाठवून महाराजांना सोडवता आलं असतं ना येसुबाईंना.

गणोजी शिर्क्यांची पत्नी राजकुंवरबाई ही शिवरायांची मुलगी व संभाजी राजांची बहीण. त्यामुळे गणोजी शिर्क्यांना इजा न करण्याचा मराठ्यांनी विचार केला असावा.
विविध लढायांमुळे फौज विस्कळीत झाली होती. राजाराम महाराजांना राज्याभिषेक केल्यावर सुरक्षेसाठी त्यांना रायगडावरून बाहेर काढण्यात आले. ते आधी कोल्हापूरला गेले. रायगड मात्र फितुरीमुळे मुघलांच्या हातात पडला व येसूबाई बाळराजांसहित मुघलांच्या कैदेत गेल्या. त्या वृद्ध होईपर्यंत कैदेत होत्या. राजाराम महाराजांनी जिंजीवरून व त्यांच्या पश्चात ताराराणीने कारभार केला.

फितुरी नाही, गड जिंकल्यावर लुटालूट आणि विटंबना होऊ नये यासाठी किल्लेदारामार्फत येसूबाई यांनीच तसा प्रस्ताव दिलेला होता की त्या स्वतः आणि युवराज शाहू मुघलांच्या कैदेत राहतील म्हणून

बाकी सिनेमाच्या आडून जोरदार नरेटिव्ह सेटिंग सुरू आहे
आजच एक पोस्ट आलीये की महाराजांना पकडून देण्यात गणोजी शिर्के नव्हे तर अण्णाजी दत्तो, रामदासी मंडळी आणि अन्य ब्राह्मण सहभागी होते म्हणून, शिर्केना विनाकारण बदनाम करण्यात आलंय म्हणे Happy

बाकी सिनेमाच्या आडून जोरदार नरेटिव्ह सेटिंग सुरू आहे >>>
अगदी. अनाजीपंत/शिर्के/पिसाळ/खोपडे/सीरिअल/औरंगजेबाची भलामण वगैरे इतक्या कमेंट्स वाचल्यात दोन दिवसात. लोक एखाद्या शूरवीराला जातीवर आणून ठेवतात ना त्या सगळ्यांना हत्तीच्या पायी किंवा तोफेच्या तोंडी दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सगळ्यांची ज्या ध्येयासाठी मोट बांधली त्याच्यावर बोळा फिरवतात हे लोक.

आसामी छान review लिहिला आहे
छावा आणि संभाजी दोन्ही पुस्तकं वाचली आहेत.
पुस्तकं वाचताना आपल्या मनात तयार झालेले चित्र आणि प्रत्यक्ष चित्रपट ह्यात फरक पडतोच.
हा फरक असणारच हे मनात ठेवून चित्रपट पाहायला पाहिजे.

>> शाळकरी वयात जे क्रौर्य इमॅजिन केलं होतं ते पडद्यावर पाहताना जाणवलं. <<

लोल. उपवासाने अंग पूर्ण खंगणे, मलमूत्राने बरबटणे, delusional तरीही विवेक शाबूत असणे आणि सरेंडर न करणे हे आम्ही इमॅजिन केले होते. इथे त्याचे सगळे मसल्स आहे तसे आहेत. इतके बेसिक सुद्धा समजत नाही काय लोकांना?

तरी छावा आणि संभाजी या कादंबरी आहेत
अन्य पुस्तके वाचल्यावर हा सिनेमा बघण्याचे धाडस नाही होणार
कितीही कोणी कौतुक करो

उपवासाने अंग पूर्ण खंगणे, मलमूत्राने बरबटणे >>> तुम्ही म्हणता ते टेक्निकली बरोबर असले तरी औरंगजेबाचे क्रौर्य दाखवणे हा उद्देश आहे. संभाजीराजांच्या मानवी शरीराच्या लिमिट्स दाखवणे हा नाही. आणि पडद्यावर ते पाहण्याची हिम्मत किती जणांत आहे?
कमर्शिअल पिक्चरमध्ये असं काहीतरी दाखवण्याचे धाडस स्पीलबर्ग करू शकतो.

ऐकीव माहितीनुसार
सिनेमात काय दाखवू नये याचे प्रत्येक इंडस्ट्रीचे अलिखित संकेत असतात.

विशेषतः नंतर त्यांच्या मुलाचं, शाहूचं धर्मांतर करणं सोपं असूनही ते केलं नाही>>
ह्यात काही धार्मिक उदारमतवाद वगैरे नसून स्ट्रॅटेजी आहे. मुगल राजवटीत खुनासारखा गंभीर गुन्हा केला असतासुद्धा मुसलमान झाल्यावर pardon मिळाल्याची उदाहरणे आहेत.
धर्मांतरित शाहूची किंमत मराठ्यांच्या दृष्टीने शून्य झाली असती. औरंगजेबाकडचा आणखी एक सरदार म्हणून तो राहिला असता. संभाजी विरुद्ध राजाराम (जरी स्वतः राजाराम त्यात ऍक्टिव्ह नसला तरी) अशी fault line मराठा सरदार/मुत्सद्द्यांमध्ये अगदी शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून होती. ह्या fault line चा फायदा घेण्याच्या दृष्टीने शाहूला धर्मांतरित केले नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने शाहूला मराठी मुलखात परत सोडले. त्यानंतर ताराबाई आणि शाहूच्या संघर्षात मराठ्यांची बरीच ऊर्जा खर्च झाली. जर तसे झाले नसते तर औरंगजेबाच्या मुलांमधल्या वारसायुद्धाचा फायदा घेत ताराबाईच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मराठ्यांनी बाजीरावाच्या आधीच उत्तर भारताच्या भागावर ताबा मिळवला असता. हा निव्वळ अंदाज नाही. औरंगजेब जिवंत असतानाच मराठ्यांचे कदमबांडे, नेमाजी शिंदे वगैरे सरदार स्वराज्याच्या सीमा ओलांडून औरंगजेबाच्या गुजरात, माळवा वगैरे भागांवर विजयी हल्ले करू लागले होते. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मुघल साम्राज्य कोसळून मराठ्यांना विस्तार करायला मोकळे रान मिळाले असे नसून, तो आणखी जगला असता तरीही त्याच्या राज्याचे भाग मराठ्यांच्या ताब्यात जाताना त्याला बघावे लागले असते. ताराबाई-शाहू संघर्षामुळे तापलेल्या लोखंडावर घाव पडण्याऐवजी मोक्याच्या वेळी त्यावर पाणी पडले.
कोल्हापूर आणि सातारा गाद्यांमधल्या संघर्षाची पाचर पार मराठेशाहीच्या शेवटापर्यंत राहिली. एका दृष्टीने शाहूचे धर्मांतर न करणे हा औरंगजेबाचा मास्टरस्ट्रोक ठरला.
तरीही एकदा शाहू कैदेत असताना त्याचे धर्मांतर करण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला होता. त्यावर अनेकांनी मध्यस्थी करून शेवटी शाहूच्या बदल्यात दोन मातब्बर मराठा सरदारांचे (कदाचित निंबाळकर, नक्की आठवत नाही) करून घ्यायला औरंगजेब राजी झाला.

ह्या संघर्षावर उतारा म्हणुन पेशवेपद निर्माण झाले असे वाचलेय. राज्य शाहुचे पण चालवणार पेशवे. पुढचा पेशवा कोण हे ठरवणार पेशवे असे ठरले जे पेशव्यांनी अखेरपर्यंत पाळले.

गणोजी शिर्क्यांची पत्नी राजकुंवरबाई ही शिवरायांची मुलगी व संभाजी राजांची बहीण...ओह
राजकुंवरबाईंनाही अवघड गेलं असणार ह्याला तोंड देणं..खुद्द नवर्याने गद्दारी केली..!!

Pages