Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
अमित, ग्वेनेथचा ‘बाऊन्स’पण बघ
अमित, ग्वेनेथचा ‘बाऊन्स’पण बघ मग बेन ॲफ्लेकबरोबरचा.
आणि तू आणि अस्मिता ‘साइड इफेक्ट्स’पण बघा आता. रूनी मारा आणि ज्यूड लॉ.
नोटेड स्वाती.
नोटेड स्वाती.

थॅंक्यू फा आणि सिमरन.
प्राईम प्रिमियम वर दिसतो आहे.
ग्वेनेथ मार्व्हल्सच्या सिनेमात आयर्न मॅनची गर्लफ्रेंड किंवा बायको (पेपर पॉट्स नाव) म्हणून अजिबात आवडली नव्हती.
>>>>>केअरगिव्हर व पेशंटच्या
>>>>>केअरगिव्हर व पेशंटच्या नात्यावर प्रचंड तणाव येत असतो तोही चांगला दाखवला आहे.
होय _/\_ उत्तम नीरीक्षण.
अस्मिता, छान लिहीला आहेस
अस्मिता, छान लिहीला आहेस रिव्ह्यू. कुठे उपलब्ध आहे हा पिक्चर?
स्पॉयलर
स्पॉयलर
सुक्ष्मदर्शीनी: ती सगळ्यांसमोर एअरपोर्ट ला जाते, पण त्याच वेळी विमान सुटण्याआधी म्हातारी तिला फोन करून परत बोलावते, आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिचा घरात आल्यावर खून करतात. तो खून होत असतानाच म्हातारी खिडकीत जाते आणि आपल्या ह्या नायिकेला खिडकीत उभी दिसते. बाकी समान सुमान आणताना पण दाखवलं आहे की चित्रपटात
साईड इफेक्ट्स बघितला. आवडला.
साईड इफेक्ट्स बघितला. आवडला.
आधी फार्मा कंपन्या/ हलगर्जी इत्यादी प्रेडि़क्टेबल काही असेल वाटून मग कलाटणी मिळालेला धक्का जबरदस्त होता. धक्क्या नंतरचा शेवटचा धक्का आणि शेवट ही चांगला होता.
सिनेमा संपल्यावर विचार करता खूप प्रश्न पडले आणि हे असं आणि इतकं करायची गरज होती का? यापेक्षा सोप्या पद्धतीने करता आलंच असतं वाटून गेलं. अर्थात ते मागावुन आलेलं शहाणपण ही असेलच. (हाईंड साईट).. पण बघताना जितका खिळवून ठेवलं होतं, अर्ध्यात स्नॅक ब्रेकला हा त्रास देणारा सिनेमा आहे असं वाटलं होतं तसा त्रास देणारा नाही. उकल आणि तोवरचा प्रवास मात्र खिळवुन ठेवणारा होता. थोड्यावेळाने विचार केला तर इंजिनिअर्ड आहे वाटू लागलं पण क्राईम थ्रिलर आहे, तसं वाटणारच.
ज्युड लॉ आवडतोच वॉटसन आणि डंबलडोर आठवला फँटास्टिक बीस्ट मधला. रुनी माराने पण चांगलं काम केलंय.
काल नेटफ्लिक्स वर Conjuring
काल नेटफ्लिक्स वर Conjuring Kannappan नावाचा तमिळ पिक्चर पाहिला. पिक्चरमधे लॉजिक वगैरे शोधणार नसाल तर अगदी मनोरंजक कॉमेडी हॉरर आहे. त्यात एक कन्नप्पन नावाचा तरूण आहे जो आपल्या आई, वडिल आणि मामासह राहतो आहे. त्याला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसते. एकदा त्याला त्यांच्या घरामागच्या विहिरीत एक जुनाट ड्रीमकॅचर सापडतं. ते हाताळण्याच्या नादात त्याच्याकडून त्यातलं एक पीस तुटतं. त्या रात्री त्याला एक भयानक स्वप्न पडतं ज्यात तो अश्या एका महालात असतो जो त्याने कधीच नाही पाहिला. तिथे त्याला भुतांचा आभास होतो आणि त्याच झटापटीत त्याला जखम होते. सकाळी उठून पाहतो तर त्याला ती जखम खरंच झालेली असते. या स्वप्नांचा प्रवास असाच चालू राहतो आणि तो अजूनच भितीदायक होत जातो. त्यातून सुटण्याकरता तो काय काय करतो, या प्रवासात त्याच्या बरोबर अजून कोणी माणसं पण जोडली जातात का, त्या महालाचं आणि ड्रीमकॅचरचं रहस्य काय आहे हे सगळं पिक्चरमधे हळुहळू उलगडत जातं.
बिनडोक करमणूक आहे. टाइमपास म्हणून काहीतरी पहायचं असेल तर जरूर पहा.
रमड, मी हा अर्धवट पाहिलाय.
अगं मग पूर्ण कर. खरंच लै
अगं मग पूर्ण कर. खरंच लै टाईमपास आहे
करते, करते. आता ह्या रेकोमुळे
करते, करते. आता ह्या रेकोमुळे नक्कीच.
अमितव कुठं पाहिला side effect
अमितव कुठं पाहिला side effect?
कृपया सगळ्यांनीच आपापल्या पोस्टीत प्लॅटफॉर्म पण टाका, आमच्यासारखे आळशी लोक पण आपले reco वाचून चित्रपट बघतात
प्राईमवर पैसे भरुन आहे. मी
प्राईमवर पैसे भरुन आहे. मी आयपी टीव्ही वर बघितला.
सूक्ष्मदर्शिनी-- स्पॉयलर
सूक्ष्मदर्शिनी-- स्पॉयलर
>>पण त्याच वेळी विमान सुटण्याआधी म्हातारी तिला फोन करून परत बोलावते, आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिचा घरात आल्यावर खून करतात.
अजिंक्य, धन्यवाद. हे कधी दाखवले लक्षात नाही, मिस केले गेले बहुतेक.
मस्त आहे सूक्ष्मदर्शिनी!
मस्त आहे सूक्ष्मदर्शिनी! शेवटपर्यंत उत्सुकता, उत्कंठा कायम राहिली. अर्धा सोडून झोपावेसे वाटले नाही.
कोणाच्या अध्यातमध्यात न पडणारी आळशी लोकं ईथे राहतात तर आपला प्लान इथे सहज साध्य होईल समजून त्या गावात जातात आणि सूक्ष्मदर्शिनीशी गाठ पडते.
किंबहुना सूक्ष्मदर्शिनीशी अश्या कैक गृहिणींचे प्रतीक आहे ज्यांना दिवसभर काही विशेष काम नसते, किंवा तेच ते रूटीन आवडीचे नसते, कंटाळलेल्या असतात, आणि म्हणून त्या वेळ जावा, मन रमावे म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकावत राहतात, लोकांच्या भानगडीतला नाक खुपसत राहतात.
आता या वृत्तीला भले कितीही नावे ठेवा,
पण अश्याच बायकांमुळे एखादी सोसायटी सुरक्षित असते
बीवी निकली डॉन
बीवी निकली डॉन
अशा नावाचा साउथचा डब्ड (मोबाइल साथीचा डब्बा टाईप करतोय) मूवी पाहिला. अ आणि अ + बालिश कॉमेडी असा सगळा मसाला आहे. खरं टायटल माहिती नाही. पण बायको डॉन आहे हे नवऱ्याला माहिती नसतं. ती घरात बसल्या बसल्या त्याचा प्लॉट गुंडांच्या तावडीतून सोडवत असे अनेक कारनामे आहेत.
अक्षयकुमार आणि मिथुन चक्रवर्ती चा असलाच कुठला तरी मूवी आहे. त्याचं फिमेल वर्शन असेल.
हिरो कोण आहे ते लक्षात नाही. सडन स्टार असं टायटल आहे त्याला. याचा अर्थ काय असेल?
फॉस्टर नावाचा मूवी रेको मुळं
फॉस्टर नावाचा मूवी रेको मुळं पाहिला. डेली मोशन वर फक्तं फ्रेंच मधे आहे. तितकंसं येत नाही पण समजला पिक्चर. तरी पण इंग्रजी सबटायटल्स सहीत कुठे आहे का हे चेक केलं तर ते दोन्ही ऑप्शनस आपल्या कडे नाहीत दिसत.(एंजल इन द हाऊस या नावाने इंग्रजीत आहे).
मला आवडला पण रेको नाही हा. कारण दवणीय किंवा काकाफॉ वाटू शकतो.
All We Imagine As Light
All We Imagine As Light पाहिला.
चांगला आहे. पण खूप काही ग्रेट वाटला नाही.
या प्रकारचे आणि या पद्धतीने आपल्याकडे इतरही सिनेमे बनत आलेले आहेत.
Frontal nudity दाखवली आहे एका सीनमध्ये... त्याची का-ही-ही गरज नव्हती
सूक्ष्मदर्शिनी
सूक्ष्मदर्शिनी म्हणजे
Miss Marple! का?
Miss Jane Marple is a fictional character in Agatha Christie's crime novels and short stories. Miss Marple lives in the village of St Mary Mead and acts as an amateur consulting detective.
Miss Marple!चा बंगाली अवतार "शुभ मुहूर्त " ह्याची लिंक मी इथे एकदा दिली होती.
Badass RaviKumar
Badass RaviKumar
फर्स्ट डे फर्स्ट शो बघतोय
सुरवातीलाच वॉर्निंग दिली आहे की 'लॉजिक ऑप्शनल' अन् 80s स्टाईल अन् 80s VFX आहेत...
पण इट्स सो बॅड की इट्स गुड
Badass RaviKumar >> _/\_
Badass RaviKumar >> _/\_ दंडवत
पूर्ण संत्री सोलायला नक्की परत या
सूक्ष्मदर्शिनी कुठे आहे?
सूक्ष्मदर्शिनी कुठे आहे? म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर?
Awe या नावाचा नेफ्लि वरचा
Awe या नावाचा नेफ्लि वरचा तेलगु मूवी पाहिला आहे का कुणी?
कसा आहे? हिंदी डब्ड किंवा English Subtitles सहीत कुठे असेल तर कळवाल का?
सूक्ष्मदर्शिनी कुठे आहे?
सूक्ष्मदर्शिनी कुठे आहे? Hotstar
गूगल सर्च मध्ये कुठल्याही चित्रपटाचे नाव लिहून OTT लिहिले की मिळून जातो साधारणपणे..
हॉटस्टार- धन्यवाद ऋन्मेष!
हॉटस्टार- धन्यवाद ऋन्मेष!
गूगल सर्च- बरं बरं
sankranthiki vasthunam
sankranthiki vasthunam थिएटरमध्ये पाहिलाय तेलूगू वीथ सबटायटल्स..
व्यंकटेश चा..फुल पैसे वसूल.. फैमिली सोबत बघता येईल असा मनोरंजन पर विनोदी सिनेमा..सबटायटल्स वाचून पण मजा आली मला.ओटिटिवर आल्यावर बघा..
गूगल सर्च- बरं बरं >>
गूगल सर्च- बरं बरं >>
Spoiler
Spoiler
मी sukshmdarshini पूर्ण पाहिला, पण त्यांनी तिचा खून का केला त्याचा उद्देश कुठे दाखवलाच नाही. ती म्हातारीची मुलगी असते ना खरी? का मारतात तिला? आणि ते सगळे रसायन आणि मोठं सामान कशासाठी असतं? फक्त तिला मारण्यासाठी एव्हढा उद्योग का करतात? खूप प्रश्न पडलेत बुवा!
@ सान्वीSpoiler
@ सान्वी
Spoiler
मी sukshmdarshini पूर्ण पाहिला, पण त्यांनी तिचा खून का केला त्याचा उद्देश कुठे दाखवलाच नाही -- Honour killing. ती lesbian असते.
Honour killing. ती lesbian
Honour killing. ती lesbian असते. >> पण असा कुठे उल्लेख नाही त्या माय लेकाचा की ती लेस्बिअन आहे म्हणून तिला मारलं वगैरे.
बॉय इन्टरप्टेड - एच बी ओ
बॉय इन्टरप्टेड - एच बी ओ मॅक्स
१५ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केई त्याबद्दल डॉक्युमेन्टरी आहे. ५ व्या वर्षापासून, ऑबसेस्ट विथ डेथ. सतत मरण्/खून याचे विचार. तेच बोलणं. डॉक्टरांचे निदान बायपोलर पण पेंड्युलम/कल जास्त डिप्रेशन कडे. बायपोलरमध्ये, डिप्रेशनकडे कल जास्त धोकादायक असतो असे वाक्य आहे या चित्रपटात.
लिथिअम एकदाचं सूट झालेले. पण अवदसा आठवली व थांबवले ( डॉक्टरांच्या मदतीने, वीन ऑफ करत). काही महीन्यात आत्महत्या.
फार वाईट वाटतं. १५?? रिअली!!
Pages