चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे ल्यूसिड ड्रीम्सचा माणूस टॉमला you create your own world हे समजावून सांगतो >>>व्वा. चला म्हणजे माझ्या एका कथेवर कधीतरी कुणीतरी एक सिनेमा बनवेल अशी अपेक्षा कारायला हरकत नाही.

हो, तुम्ही फिल्म कम्पॅनियनबरोबर सेटिंग करायला लागा आत्ताच. Proud Light 1

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

@व्हनिला स्काय चर्चा कंटिन्यूड-

च्रप्सनी 'ओपन युवर आईज' पाहिला आहे. व्वा.
तुम्ही फिल्म कम्पॅनियनबरोबर सेटिंग करायला लागा आत्ताच.
>>>>> Lol

व्वा. चला म्हणजे माझ्या एका कथेवर कधीतरी कुणीतरी एक सिनेमा बनवेल अशी अपेक्षा कारायला हरकत नाही.
>>>>>>>
केकू, नक्कीच. तुमच्या कथाही आगळ्यावेगळ्या असतात. Happy

स्वाती,

'ओपन युवर आईज' बद्द्ल वाचले होते. तुझ्याशी चर्चा करायची म्हणजे दोन रूपये खर्चात सरळ PhDच होऊन जातेय , काय सांगू. Happy

ल्युसिड ड्रीम्स मधला माणूस नुसतेच यू क्रिएट युवर ओन वर्ल्ड म्हणत नाही तर "you are (an) omnipotent." असा आत्मविश्वासचा भ्रमही देतो. वास्तवात नाही राम आणि स्वप्नांत सर्वशक्तिमान ( म्हणच झाली की ही Proud ), त्यामुळे ह्या स्खलनशील भ्रमाचा मोह न झाला तरच नवल.

सुरवातीला तो त्याच्या घरातील चित्रं तिला दाखवतो त्यात Claude Monet चे पेंटिंग असते. त्यातलं आकाश (/ का त्याचं नाव 'व्हनिला स्काय') असतं. हो, तो कॅटचा संवाद मलाही आवडला होता. कुठेतरी पुढच्या ताटातूटीची नांदीही वाटली होती. तुझी पोस्ट वाचली, आवडली. आपण आपल्या मेंदूत जग कार्व्ह करणं किंवा आकार देणं ही त्याची ताकदही होऊ शकते आणि विवशताही असंही वाटतं. जर मेंदू आणि मन याबाबत भिन्न नाही असे समजले तर यावर नियंत्रण आणणं किती कठीण होईल. मनातल्या वाटांचे नकाशे एकाचे दुसऱ्याला चालत नाहीत आणि समजावताही येत नाही हेही त्या कार्व्हिंग मुळेच. मन ही अशी गोष्ट आहे की एकाचवेळी हरवूनही टाकू शकते आणि उजळवूनही.

मला आवडला आहे की नाही कळत नाहीये. पहिल्या अर्ध्या बाबत खात्री आहे पुढच्या अर्ध्या बाबत नाही म्हणून तसं लिहिलं. पुढचा अर्धा म्हणजे आयकियाने एकाच पोत्यात लाकडाचा भुसा व खिळे देऊन 'बनवा काय बनवायचं ते' प्रकार झाला आहे. मला (सध्यातरी) कथानकावर थोडा तरी 'कंट्रोल' ठेवलेला आवडतो, हे हाताबाहेर गेलेय. पण मनाने फार वेगाने 'इवॉल्व' होतेय, त्यामुळे घाईघाईने मत लिहीत नाहीये. त्यामुळे तीन रुपये घे पण पुढचा रेको दे. Happy

-----
घ्या! आता मी सगळे रेकोज व्हाया अस्मिताच देणार आहे. तिचे दोन रुपये तिलाच कमिशन म्हणून द्यावे लागणार
>>>> Lol Such a win-win for me..!

व्हॅनिला चाय>>>> Lol
अरे पण आहे कोठे हा पिक्चर? आयपीटीव्ही सोडून काहीही सांगा>>> 'काहीही' , घे सांगितले. Wink

छावा कमर्शियल असेल नि ऑव्हर द टॉप असेल ह्याची कल्पना होती. पण तरीही भयंकरच इंप्रेसिव्ह वाटला. ह्यातला मराठी माणासाला संभाजी महाराजांबद्दल असलेला इमोशनल कंपोनंट बाजूला ठेवला तरी सिनेमाचे भव्यपण भारावून टाकणारे आहे. कपडेपट प्रत्यक्षात एव्हढा सुंदर असू शकत नाही हे समजूनही एकदमच नेत्रसुखद आहे हे नाकारू शकत नाही.
विकी कौशल, अक्षय हे दोघेही आपापल्या भूमिका जगले आहेत. विकी सिनेमा, बॉक्स ऑफिस ची डींमांड म्हणा कि जे काही असेल त्यासाठी नेहमीपेक्षा अतिशय लाऊड (शब्दशः) आहे पण त्याला ते जबरदस्त शोभतेय नि एकंदर कॅरॅक्टरला त्यामूळे लार्जर दॅन लाईफ उठाव येतोय (जो सिनेमाच्या एकंदर वीक पटकथा नि कॅरॅक्टर डेव्हलपमेंट कडे बघता संभाजी ठसवण्यासाठी अत्यंत जरुरी होते). विकी मधे एका संवादामधे अस्खलित मराठी बोलतो ते ऐकून उगाचच बरे वाटले. त्याने स्वतःहून थोडेसे शिवस्तुती मधेच म्हणणे ह्याला १००% मार्क्स - एकदम परफेक्ट अ‍ॅडीशन आहे ती. ह्याउलट अक्षय ईफेक्टिव्ह अंडरप्ले करतोय (फक्त तो दहा वर्षे युद्धात काढूनही तरातरा चालतो तो भाग वगळता) जो बघून सुरूवातीला कुठे तरी ह्या दोघांच्या आमनेसामने सीन्स मधे ह्या दोन परस्पर विरुद्ध स्टाईल मधे असलेल्या काँट्रास्टमूळे जे काही होईल ते असे वाटलेले तेव्हढे मात्र झाले नाही ( त्याचे एक मह्त्वाचे कारण म्हणजे शेवट काय नि कसा आहे ह्याची पूर्वकल्पना असणे हे असावे). बाकीची सपोर्ट कॅरॅक्टर्स काय कोणीही असती किंवा काही नसती तरीही फरक पडला नसता. (रश्मिका ऐवजी मृणाल ठाकूर किंवा शर्वरी हवी होती असे उगाच वाटून गेले )
संभाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर अजिबातच फोकस न ठेवता फक्त युद्ध एके युद्ध - तेही स्पेशल ईफेक्टस् स्टाईल नि आजकालच्या एकंदर ट्रेंडला धरून सुपरहिरो स्टंटस ने भरलेले आहे (तरीही त्या व्हिज्युअल्स मात्र अतिशयच प्रेक्षणीय आहेत) हे आधी खटकले पण पण माझ्या पाठी बसलेल्यांच्या ग्रूपमधल्यांच्या (साऊथ नि नॉर्थ मधला ग्रूप होता) कमेट्स ऐकल्यावर असे का ह्याचे उत्तर मिळाले.
मला व्यक्तिशः रेहमानचा बॅकग्राऊंड स्कोअर भारीच आवडला. लढाया नि छळ बटबटीत ब्लडी किंवा गोरी न होऊ देता - त्यांची परीसीमा दाखवणे ह्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. कन्नड बोल वापरलेले गाणे हा भाग जबरदस्त आहे. क्रेडीट्स च्या वेळचे संगीत उफ्फ वाटते एकदम ! बोलही एकदमच चपखल आहेत. आधीच सुन्न झालेल्या मनाला हलवून टाकणारे नि हळूवारपणे झिणझिण्या देणारे.
मला उतेकरांच्या ईतर कामाबद्दल माहित नाही पण शेवटचा छळ - हा वीस पंचवीस मिनिटांचा भाग कमालीचा सफाईने घेतलाय. त्यातला साहजिक भाग बाजूला ठेवूनही 'हिंदवी स्वराज्य वि मुघल सल्तनत नि त्या संघर्षाची भावी दिशा' हा सर्व पट छोट्या छोट्या दुव्यांमधून सफाईने उलगडत जातो.
एक खटकलेली गोष्ट म्हणजे - धर्मांतरचा मुद्दा अगदी शेवटी येतो - जी मूळात पहिली अट होती असे वाचलेले होते. ती पहिली होतेणे नि ती साफ झिडकारून लावून छळ नि पर्यायाने मरणाचा स्वीकार करणे हा संभाजी महाराजांच्या आयुष्याच्या - आपल्या मूल्यांसाठी जीव ओवाळून टाकेन - ह्या कळसबिंदूकडे सिनेमा न जाता फक्त एक ग्लोरीयस वॉरीयर ह्या दिशेने झुकतो. मराठ्यांचा पहिल्या तीन पिढ्यांचा संपूर्ण संघर्ष हा व्यक्तीकेंद्रित नसून हिंदवी स्वराज्या ह्या एका कॉमन मूल्यासाठी होता हा भाग ह्यात निसटून जातो हि खंत लागून राहिली.

बाजूच्या सीटवर बसलेल्या एका ने त्याच्या टीन एजर मुलाला हे सांगितलेले ऐकले - बाहुबली वॉज फिक्शन बट धिस ईज ट्र्यू स्टोरी. They may have shown few things over dramatic but events are based on facts. त्यावर पोराची स्वाभाविक प्रतिक्रिया होती - वॉव , वॉव, वॉव !!! - मी बसल्या बसल्या सिनेमाच्या खटकलेल्या प्रत्येक छोट्या पैलूंच्या चिंध्या करू शकतो (trust me there are enough) किंवा आवडलेल्या भागांच्या कौतुकासाठी एक एक स्वतंत्र बाफ उघडू शकतो पण त्या मूलाची स्वाभाविक प्रतिक्रिया ऐकल्यावर हा सिनेमा संभाजीचरित्र माहित नसणार्‍यांपर्यंत जाण्यात सफल झालाय हे दाखवतेय. गेस दॅट'स ऑल मॅटर्स !

पण त्या मूलाची प्रतिक्रिया सिनेमा संभाजी चरित्र माहित नसणार्‍यंआपर्यंत जाण्यात सफल झालाय हे दाखवतेय. गेस दॅट'स ऑल मॅटर्स !

.+७८६^७८६

एक्झॅक्टली माय पॉईंट ट्रेलर बघितल्यापासून....

मस्त परीक्षण असामी. आवडले. Happy
मृणाल ठाकूर शोभली असती खरं. एकतर ती महाराष्ट्रीयनच आहे आणि कमालीचा गोड चेहरा आहे.

'उतेकरांच्या कामातील सफाई' , शब्दशः लाऊड, ग्लोरीयस वॉरीयर, कन्नड बोल वापरलेले संगीत, नेत्रसुखद कपडेपट, अक्षयचे अंडरप्ले व
मुलाची प्रतिक्रिया हे मुद्दे विशेष आवडले.

मला व्यक्तिशः रेहमानचा बॅकग्राउअंड स्कोअर आवडला.
>>>
मी हा पहिला प्रतिसाद असा पाहिला आहे
सगळेच वाईट म्हणत आहेत आणि काहींनी तर ट्रॉल करणे सुरू केले..
मला तर रेहमानचे संगीत फसले म्हणजे काय याची उत्सुकता लागली आहे.
जर रेहमान आणि अजय अतुल त्या त्या सिच्युएशन नुसार मिक्स वापरले असते तर मजा आली असती..

स्वतंत्र धागा काढा ना असामी..
मला आता येत्या शनिवारीच बघणे शक्य होईल..

सगळेच वाईट म्हणत आहेत आणि काहींनी तर ट्रॉल करणे सुरू केले.. >> माझा मुख्य मुद्दा संगीताबद्दल नाहिये. बॅकग्राउंड स्कोअरबद्दल आहे. अजय - अतुल आवडते असले तरी पिरीयडसपटांसाठी जो नुआन्स लागतो तो पकडण्यामधे रेहमानचा हात धरणारे फारसे कोणी नाही असे माझे मत आहे. मराठमोळे संगीत आहे का असे म्हणशील तर उत्तर नाहि असे आहे. पण त्याने कुठे अडकत नाहिये. त्या प्रतिक्रिया मीही वाचलेल्या आहेत ज्या मुख्यत्वे संगीताबद्दल होत्या. ट्रेलरमधे तुफान "पाहून" मलाही शंका होती. पण एकंदर ईफेक्टमधे संगीतही खटकत नाही. The Crown अंगावर काटा आणते. नि शेवटच्या एंड केडीट्स्साठी माझ्याकडून तरी सगळे माफ आहे. (एकंदर रेहमानसाठी मी बायस्ड आहे असेही तू म्हणू शकतोस Wink )

थॅक्स अस्मिता ! म्रूणालबद्दल अनुमोदन. प्रामाणिकपणे रश्मिका पण छान दिसली आहे पण तरीही .....

मस्त लिहीले आहेस असामी! पिक्चर चांगला असल्याचे असेच अजून एक दोन जणांकडून कळाले आहे. त्यामुळे आता मीही पाहायचा विचार करतोय. गेल्या काही इतिहासपटातील अचाटपणा व याच्याही ट्रेलर मधे हवेत उडणारे लोक वगैरे बघून हा ही तसाच असेल असे वाटले होते. पण त्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगलेही आहे यात असे जे ऐकले त्यावरून वाटत आहे.

पिक्चरमधल्या काही फ्रेम्स अफलातून सुंदर आहेत!

इन्टरेस्टिंग टेक, असामी. मग मोठ्या पडद्यावर बघावा म्हणतोस?

रहमानचं जे ऐकलं ते म्यूझिक मराठी वाटलं नव्हतं.
धर्मांतराची अट - पहिलीच काय, पण अजिबातच - खरंच घातली होती का याबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. विशेषतः नंतर त्यांच्या मुलाचं, शाहूचं धर्मांतर करणं सोपं असूनही ते केलं नाही त्यामुळे ती थिअरी काहीशी क्वेश्चनेबल आहे.

तरी पिरीयडसपटांसाठी जो नुआन्स लागतो तो पकडण्यामधे रेहमानचा हात धरणारे फारसे कोणी नाही असे माझे मत आहे.
+७८६
माझेही हेच मत आहे. म्हणून म्हटले फसले ते काय कसे याची उत्सुकता लागली आहे.
आणि मी सुद्धा संगीत म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर हेच समजतो. त्याबद्दलच बोलत होतो. तोच चित्रपटाचा आत्मा असतो.
अजय अतुल हे रेहमान सोबत यासाठी म्हणत होतो की जिथे वीरश्री संचारणारे मराठमोळे संगीत अपेक्षित होते तिथे त्यांनी आपले योगदान दिले असते. जसे ते क्रिकेट मध्ये म्हणताता ना हॉर्सेस फॉर कोर्सेस..

एक्झॅक्टली माय पॉईंट ट्रेलर बघितल्यापासून >>> अगदी अगदी !! मी पण हेच म्हणालो होतो तिकडे. पण ट्रेलर पाहूनच गदारोळ सुरू

मग मोठ्या पडद्यावर बघावा म्हणतोस? >> हो मोठ्या पडद्यावर एंजॉयेबल आहे. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी एंजॉय करशील. बाकीचे सगळे मूलातच लार्जर दॅन लाईफ दाखवायचा प्रयत्न असल्यामूळे मोठ्या पडद्यावर ते अधिक ग्रँड वाटते नि म्हणून मजा येते. "रहमानचं जे ऐकलं ते म्यूझिक मराठी वाटलं नव्हतं." हे एकदम बरोबर आहे. जेव्हढे क्राऊन एकंदर प्रकाराला नुसते ऐकून सूट होईल असे वाटलेले तेव्हढे इतर वाटलेले नव्हते पण तरीही ते खटकत नाहीत. फ्लोमधे चपखल बसतात. ( अर्थात आपण बायस्ड आहोत रेहमानला तेंव्हा ... Happy )

धर्मांतराची अट - ह्याबद्दल मी उलटसुलट वाचलेले पण मनु पिलाईच्या पुस्तकामधे वाचलेले अधिक पटलत . एकंदर औरंगजेबाचा राजकिय शत्रूंशी वागण्याचा आलेख ज्याप्रमाणे बदलत गेला तो बघता धर्मांतराची अट अधिक योग्य वाटते. शाहूबद्दल मी असे वाचलेले कि संभाजीच्या नृशंस हत्येनंतर जो इंस्टंट पुश बॅक जाणवला त्यामूळे तो जास्त काळजीपूर्वक पावले उचलायला लागला. राजारामाच्या पाठी सगळे मराठे एकवटल्यामूळे धर्मांतरीत शाहू ह्या प्यादाला कमी किंवा अजिबातच किम्मत मिळेल असे लक्षात आले. इथेच धर्मांतराविरुद्ध संभाजीबलिदान झाले ह्याला नकळत पुष्टी मिळते. We can certainly argue on what was cause and what was effect though.

आणि मी सुद्धा संगीत म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर हेच समजतो. त्याबद्दलच बोलत होतो. >> अरे संगीत नि पार्श्वसंगीत हे शब्द जनरल पब्लिक वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरते. तू पार्श्वसंगीतालाच संगीत म्हणशील तर मला ती आईसक्रीमबद्दल म्हणतो आहेस कि जगबुडीबद्दल कि संगीताबद्दल कि अजून कशाबद्दल हे कसे कळणार ? Happy असो, मीही ते मराठ्मोळे नाही वाटते हे वर म्हटलेले आहे पण मूळात सिनेमा हिंदी भाषेत आहे तेंव्हा एकंदर फ्लो मधे ते (मला तरी) खटकले नाही. सिनेमा बघून मत नोंदव अस विनम्रपणे नि धैर्याने नमूद करू ईच्छितो.

छावा बद्दल मिक्स्ड प्रतिक्रिया वाचताना मजा येतेय , ट्रेलर वरून आणि गाणी बघून काहीच आवडले नसले तरी !
अजुन एक प्रश्नं पडलाय , विक्की , रश्मिका आणि लक्श्मण उतेकर हेच दिसत आहेत प्रमोशन्स मधे, अक्षय खन्ना कुठेच नाही .. असे का ?

विक्की , रश्मिका आणि लक्श्मण उतेकर हेच दिसत आहेत प्रमोशन्स मधे, अक्षय खन्ना कुठेच नाही .. असे का ? >> भारतातल्या आजच्या राजकीय वातावरणामधे तूला मुसलमान कॅरॅक्टर सिनेमा प्रमोट करायला हवेय DJ ? Happy

भारतातल्या आजच्या राजकीय वातावरणामधे तूला मुसलमान कॅरॅक्टर सिनेमा प्रमोट करायला हवेय >>> वेल सेड! Happy

असाम्या, छान पोस्ट्स आहेत तुझ्या. नेक्स्ट वीकेंडला बघेन हा पिक्चर.
फक्त ... ती वरची पोस्ट एकदाच काय ती एडिट करून पूर्ण कर Proud

Lol मग नवीन पोस्टी टाक. दरवेळी काय बदललंय्/अजून लिहिलंय ते वाचायला सुरूवातीपासून वाचायला लागतं ना राव!

मला आज सुट्टी आहे >>> Lol आणि आम्हालाही, होऊनच जाऊ दे. एडिटून, एडिटून प्रेसिडेंट्स डे साजरा करतोय असामी. वाचतेय, वाचतेय.... सगळ्याच पोस्टी. इतिहास जरा ओव्हरव्हेल्मिंगच वाटतो.

धर्मांतराची अट - तुम्ही दोघांनीही लिहिलेला 'टेक' इंट्रेस्टींग वाटत आहे. नेहमी त्यावरच फोकस असलेला पर्स्पेक्टिव्ह वाचनात आला आहे.

भारतातल्या आजच्या राजकीय वातावरणामधे तूला मुसलमान कॅरॅक्टर सिनेमा प्रमोट करायला हवेय DJ ?
<<<
Lol

एडिटून एडिटून प्रेसिडेंट्स डे साजरा करतोय असामी. >>>> Lol हे टोटली अ‍ॅप्ट आहे. सध्याही आपले प्रेसिडेण्ट तेच करत आहेत. बंदी घालून मग मुदतवाढ वगैरे Happy

ध - ट्रेलर बघून तशीच प्रतिक्रिया होणे साहजिक वाटते मला. पिक्चर अजून डीप आहे हे चांगले आहे. ट्रेलर मधे सुपरहीरो पिक्चर्स पाहणार्‍यांना आकर्षित करणे हा कमर्शियल हेतू असेल. इथे ट्रेलर मधला अचाटपणा आहे त्यपेक्षा पिक्चर मधे जास्त नाही असे असेल तर चांगले आहे Happy म्हणजे एरव्ही ट्रेलरपेक्षा पिक्चरमधे फार काही भारी नसते, ते इथे चांगल्या अर्थाने होईल.

रहमानच्या संगीतात काही इस्टर एग्ज असतील असे अजूनही वाटते. काही पीसेस, ज्याची माहिती होत जाईल तसे "सापडत" जातील.

पण माझ्या पाठी बसलेल्यांच्या ग्रूपमधल्यांच्या (साऊथ नि नॉर्थ मधला ग्रूप होता) कमेट्स ऐकल्यावर असे का ह्याचे उत्तर मिळाले. >>> असामी, याबद्दल लिही अजून Happy अमुकस्टार तमुकस्टार वाले तेलुगू पिक्चर फॅन्स व रोहित शेट्टी फॅन्स यांना आवडेल असे या पिक्चरमधे घालायची काही गरज नव्हती. पण पिक्चर कमर्शियली चालला तरच पिक्चरमधल्या बाकी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील, आणि इतकी उत्तम निर्मितीमूल्ये असलेल्या पिक्चरचा खर्चही भरून निघेल अशा हेतूने घातले असतील असे सीन्स तर समजू शकतो.

त्यावेळच्या मराठी इतिहासाची, स्वराज्य स्थापना, लढाया, युद्ध करतानाची नीतिमत्ता वगैरेची intrinsic value इतकी प्रचंड व युनिक आहे की ती दाखवायला त्यातला हीरो १५ फूट उंच उडी मारतोय हे दाखवायची गरज नसावी. पण सुपरहीरो क्राउडकरता ते गरजेचे असावे.

फा >> अरे सध्या Larger than life पिक्चर नसेल तर लोक लगेच ott वर पाहू असे म्हणतात. मार्व्हल च्या पिक्चरांचा हा सुद्धा एक साईड इफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा पुढे काढायला असे करावेच लागते. आणि तसेही संयत वगैरे पिक्चर पूर्वी समांतर पिक्चर म्हणून न चालणारे असायचे. त्यापेक्षा आपला पिक्चर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचणार याचा विचार निर्माता करणारच ना

Pages