
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
@ अंगलग
@ अंगलग
मला तर “अंगलग” पण आवडला, जिवलग सारखा.
फक्त आजच्या जगात मित्रासाठी वापरला तर भलताच अर्थ घेतील लोकं अशी एक शंका
मोरे अंग लग जा बालमा
मोरे अंग लग जा बालमा
* भलताच अर्थ घेतील लोकं >>>>
* भलताच अर्थ घेतील लोकं >>>> +१

अनिंद्य
अनिंद्य
मानव, उत्तम! रुच् चा हा अर्थ माहीत नव्हता.
>>>>>विरोचन चंद्राला तसेच
>>>>>विरोचन चंद्राला तसेच सूर्याला सुद्धा म्हणतात.
तसेच 'नभोदीप' दोघांना म्हणतात का? कारण मी चंद्राच्या स्तोत्रांत हा शब्द वाचलेला आहे . पण मागे कोणीतरी सूर्याकरता हा शब्द वापरला आहे ( याच धाग्यात)
"शाळू सोबती" हा शब्दप्रयोग
"शाळू सोबती" हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल. पण मी ऐकला आहे. माझा असा गैरसमज होता की
"शाळू सोबती" म्हणजे शाळेतला मित्र. पण असे नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की ज्याचा सहवास आपल्याला थोडेच दिवस लाभायचा आहे अशी व्यक्ति. शाळू ऐश्वर्य, शाळू आयुष्य म्हणजे क्षणभंगुर ऐश्वर्य किंवा आयुष्य.
शाळू ही जोंधळ्याची एक जात आहे. हा हिवाळयात तयार होतो आणि हिवाळ्याचे दिवस लहान असतात ह्यावरून शाळू म्हणजे थोड्या मुदतीचा अल्पकाळ टिकणारा असा अर्थ रूढ झाला.
'विरोचन'ची माहिती विरोचक आहे.
'विरोचन'ची माहिती विरोचक आहे.
त्रिया म्हणजे स्त्री असंच वाचलं आहे. ते सुप्रसिद्ध सुभाषित नाही का
नृपस्य चित्तं, कृपणस्य वित्तं | मनोरथः दुर्जनमानवानाम् |
त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यं | देवो न जानाति कुतो मनुष्यः।।
'शाळू'ही इन्टरेस्टिंग. मलाही वाटायचं शाळकरी वयातला मित्र.
The correct and original
The correct and original verse is this -
राष्ट्रस्य चित्तं कृपणस्य वित्तं मनोरथा: दुर्जनमानुषाणाम्। स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः॥
नंबर ८२९
It is from Subhaashita Ratna BhaanDaagaara which is a compilation of nearly 10,000 subhaashitaas (epigrams), originally credited to a kashinath Sharma -
https://hinduism.stackexchange.com/questions/57460/what-is-source-of-thi...
हो, मेक्स सेन्स. त्यावरून
हो, मेक्स सेन्स. त्यावरून त्रिया हे स्त्रीचं अपभ्रंशित रूप आहे असंच दिसतंय.
बाकी राष्ट्रस्य/नृपस्य हा पाठभेद इन्टरेस्टिंग आहे.
शाळू माहिती आणि सुभाषित रोचक
शाळू माहिती आणि सुभाषित रोचक.
केकूंनी दिलेल्या लिंकमध्ये वर त्रियाचा चूकीचा अर्थ दिलेला आहे.
त्रिया चरित्रं म्हणजे तीन चरित्रे असा. पण तीन चरित्रे असा अर्थ घ्यायला ते त्रीणि चरित्राणि असे हवे होते.
तसेच स्त्रीचे चरित्र या साठी त्रिया-चरित्रं असावे त्यातील - गळला असावा.
(किंवा त्रियायाश्र्चरित्रं (त्रियाया: चरित्रं))
विरोचन, त्रिया चर्चा छान.
विरोचन, त्रिया चर्चा छान.
शाळू सोबती माहिती रोचक आहे.
शाळू ही जोंधळ्याची एक जात आहे.>>>>> जोंधळ्याच्या/ ज्वारीच्या कोवळ्या ताटांनाच शाळू म्हणतात ना? वेगळी जात?
शाळू सोबती माहिती रोचक आहे.
शाळू सोबती माहिती रोचक आहे.
पिकला शाळू परोपरी, चढली कणसं
पिकला शाळू परोपरी, चढली कणसं माथ्यावरी
पाखरं आली भिरी भिरी, गोफण फिरवु माच्यावरी.
कविता होती आम्हाला शाळेत.
शाळू म्हणजे माझ्या
शाळू म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ज्वारीची लालसर रंगाची जात.
शाळू उत्तर कर्नाटकात खूप
शाळू उत्तर कर्नाटकात खूप पिकते आणि तिथे ते महत्त्वाचे धान्य आहे.
थोडे अवांतर . . .
एकदा तिथले एक शेतकरी मला म्हणाले होते, की फक्त दोन महिने उत्तम पाऊस जर झाला तर आम्ही संपूर्ण भारताला पुरेल एवढे शाळूचे पीक आरामात घेऊ शकतो
मालदांडी, दगडी ह्या गावरान
मालदांडी, दगडी ह्या गावरान जाती माहीत आहेत.
पण शाळू अशी जात माहीत नाही.
असो, विषयांतर झाले.
शाळू = जोंधळ्याची एक जात
शाळू = जोंधळ्याची एक जात
दाते शब्दकोश
शाळू सोबती = नवीन माहिती.
शाळू सोबती = नवीन माहिती.
जोंधळा —पु. एक धान्याचें रोप
जोंधळा —पु. एक धान्याचें रोप व त्याचा दाणा; ज्वारी (धान्य) किंवा त्याचें ताट. याच्या जातीः-उतावळी, निवळा, शाळू, रातडी, पिवळा जोंधळा, खुंडी, काळबोंडी, दुधमोगरा, याशिवाय केळी, अरगडी, डुकरी, बेंदरी, गडगूप इ॰ हलक्या जाती आहेत.
शाळू सोबती - रोचक आहे.
शाळू सोबती - रोचक आहे.
पण ते "सहवास आपल्याला थोडेच दिवस लाभायचा आहे अशी व्यक्ति" हा अर्थ हिवाळ्यावरून नसावा (ज्वारीच्या इतरही जाती खरीप हंगामात होतात मग फक्त शाळूलाच तो अर्थ लागू होत नाही.) शाळू ही एक गोडसर जात आहे आणि त्याचा हुरडा खूप गोड आणि चविष्ट असतो. इतर जाती घेणारे शेतकरीही खास हुरड्याकरता म्हणून थोडा शाळू लावतात. त्यावरून "पूर्ण पिकू न देता लवकर खुडला जाणारा" या अर्थाने तो शब्दप्रयोग आला असावा.
वाचनखूण
वाचनखूण
हा शब्द आपल्याला परिचित आहे (आणि आपल्या इथले वाखूसा हे लघुरुप देखील).
त्याला पर्यायी अन्य एक गोंडस शब्द वाचनात आला. तो आहे :
. .
. .
. .
स्मृतिपर्ण
हा शब्द राजेंद्र प्रकाशनाचे एकेकाळचे मालक राजेंद्र कुलकर्णी यांनी तयार केलेला आहे.
( भाषा : हरवलेल्या . . .’ या पुस्तकातून साभार !)
. .
लेखनात/ संवादात मी वाचनखूण हाच शब्द वापरणे पसंत करेन; वरील शब्द केवळ गोंडस वाटल्यामुळे त्याची ही नोंद.
स्मृतिपर्ण >> शब्द फारफार
स्मृतिपर्ण >> शब्द फारफार आवडला. लहानपणी पुस्तकात ठेवलेल्या पिंपळपानांची आठवण झाली. अजूनही जाळी झाली नाहीये; ये जाळीम दुनिया!
लेखनात/ संवादात मी वाचनखूण
लेखनात/ संवादात मी वाचनखूण हाच शब्द वापरणे पसंत करेन >> +१
वाचनखूण हा सोपा आणि सुटसुटीत शब्द उपलब्ध असताना, उगीचच क्लिष्ट शब्द शोधणे म्हणजे holier-than-thou attitude दाखवण्याचा प्रकार झाला.
जाताजाता: स्मृतिपर्ण या शब्दाचे भाषांतर memorable असे दिसत आहे.
हे म्हणजे बापाला पिताश्री
हे म्हणजे बापाला पिताश्री म्हणण्यासारखे झाले.
नाही, पिताश्री तरी कळायला
नाही, पिताश्री तरी कळायला सोपा आहे. बाप किंवा वडील म्हणण्याऐवजी उलट तीर्थरूप म्हणण्यासारखं झालं.
केकू, उबो
केकू, उबो
स्मृतिपर्ण शब्द ऐकायला छान वाटतो पण त्याचा अर्थ वाचनखूण ऐवजी कुणाच्या आठवणींबद्दल लिहिलेले एखादे पान असा वाटतो मला.
* १. "ये जाळीम दुनिया!>>> खास
* १. "ये जाळीम दुनिया!>>> खास
......
* २. स्मृतिपर्ण हे नाम असले पाहिजे परंतु memorable हे तर विशेषण आहे.
त्यामुळे असे गुगल भाषांतर कितपत बरोबर आहे? कोणी सांगावे
. . .
By the by बाप हा शब्द निखळ
By the by बाप हा शब्द निखळ मराठी आहे. म्हणजे तद्भव, तत्सम, देसी किंवा फारसी, अरबी, तुर्की, कन्नड वा आंग्ल भाषेतून आलेला नाहीये. हा आपले मराठी लोक आर्य भारतात येण्या आधी जी भाषा बोलत त्यातला आहे. असे वाचल्यावर मी बापाला बापच म्हणायला लागलो.
स्मृतिपर्ण
स्मृतिपर्ण
>>> याचा वेगळ्या संदर्भात वाक्यात वापर केलेला इथे सापडला :
"त्यांच्यापर्यंत पोहचविणारे माणूसप्रिय कृष्णा चौधरी अनंतात विलीन झाले. पण कालपरवा स्मृतिपर्ण सळसळली... एका नोंदीवर दृष्टी स्थिरावली".
(https://marathi.indiatimes.com/maharashtra/nagpur/nagpur-dr-manjusha-swa...)
मराठी बृहद्कोश मधील "अबा"
मराठी बृहद्कोश मधील "अबा" शब्द पहा. म्हणजे मराठी "आबा"
कुठून हिब्रू , खालडीअन इत्यादी भाषांतून प्रवास करून आपल्या माय मराठीत विसावला.
Pages