Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा सुरुवातीपासून चाळताना
धागा सुरुवातीपासून चाळताना हे सापडले
मध्ये अशी एक बातमी वाचली होती.
रात्री ची वेळ होती आणि गूगल map नी जो रस्ता दाखवला त्या वर एक गाडी धावत होती.पण तो रस्ता मध्येच संपत होता.
Driver च्या लक्षात नाही आले अचानक रस्ता संपला आणि ती गाडी नदीत पडली
अंधाऱ्या रात्री headlight ल पण मर्यादा असतात.
खूप दूरवरचे स्पष्ट दिसणे मुश्कील.
Submitted by Hemant 33 on 18 September, 2022 - 11:26
आणि नुकतीच अशीच एक घटना घडली , हा दोष गुगल मॅपचा म्हणायचं का सरकारी अनास्थेचा ?
असा रस्ता बॅरिकेड घालून बंद न
असा रस्ता बॅरिकेड घालून बंद न करणार्यांचा दोष. मॅपचा संबंधच नाही.
एखादे गाणे लाईव्ह ऐकताना (मग
एखादे गाणे लाईव्ह ऐकताना (मग ते किंचित भसाडे किंवा बेसूर झाले तरी) ऐकताना सुरेल रेकॉर्डेड गाण्यापेक्षा जास्त मजा का येते?
कारण लाइव्ह ऐकतोय हे चार
कारण लाइव्ह ऐकतोय हे चार लोकांना सांगता येते. लोकेशन टॅग करता येते, फोटो काढून स्टेटस ला टाकता येतात, ब्र्यागींग राईट्स मिळतात म्हणून.
थोडं भसाडं चालतं मलातरी पण
थोडं भसाडं चालतं मलातरी पण बेसुर झालेलं किंवा भलत्याच/अति हरकती वगैरे घेतल्या तर नाही आवडत.
कॉलेजला असताना रेमो आणि अन्य
कॉलेजला असताना रेमो आणि अन्य काही गायकांचे कार्यक्रम ऐकले / पाहिले होते.
रेमोच्या मैफिलीच्या वेळी (रेमोच्या बाबतीत हा शब्द खटकतो ना ?) तरूणाईच तरूणाई. मी शेवटच्या वर्षाला असल्याने स्वतःला मॅच्युअर्ड वगैरे समजत होतो. पण ते वातावरण धुंद करणारं होतं,
बी जे मेडीकलच्या ग्राउंडवर होता कॉन्सर्ट. पाठीमागे अंधारात जे काही चालू होतं ते कार्यक्रम संपल्यावर समजलं. इतका साधा होतो
उदीत नारायणच्या कार्यक्रमाचे पासेस मिळाले होते. पण गाडी लावण्यावरून पोलिसाशी वाद झाले. त्याने अशी अडवणूक केली कि कार्यक्रम संपेपर्यंत ना मागे ना पुढे जाता आले. अधून मधून गाणी ऐकू येत, मधेच शिट्ट्या टाळ्या ऐकू येत. खूप हळहळत होतो.
गुरूदास मानचा कार्यक्रम चंदीगढ जवळ मोहाली स्टेडीयम मधे ऐकला. पाच दहा मिनिटे ठीक वाटलं. नंतर खूप बोअर झालं.
सतत ते "विच्च विच्च" "मंगदा" "कुडा - कुडी " हे असे शब्द ऐकून कानात कुणीतरी खडे टाकून आपल्याला गदागदा हलवतंय असं वाटू लागलं. कुडा म्हणजे हिंदीत कचरा. त्या वेळी पंजाबी शब्द असेच खडाखडी चालू असल्यासारखे वाटायचे (अजूनही वाटतात).
आता नाही जावंसं वाटणार. मुलीसाठी जाणार होतो, पण तिच्या परीक्षा अचानक सुरू झाल्या.
पियू लता, आशा, सोनू, सुरेश
पियू लता, आशा, सोनू, सुरेश वाडकर ह्यांना लाईव्ह ऐकले आहे. आणि हे चौघे ही अत्यंत सुरेल कुठेही १९/२० न होता गायलेले. पैकी लता, आशा तर एकदम स्वर्गीय. लता माईक वर आली तेंव्हा एकदम धडधड वाढली होती, कॅसेट मध्ये आणि रेडिओ वर जीला इतके ऐकले ती समोर ..
सरस्वती श्लोक होता कोणता तरी, त्याने सुरुवात केली होती. आशा पण अफाट गायली होती. आशा चा कार्यक्रम रमणबागेत होता, लता चा निगडी प्राधिकरण मध्ये प्रबोधिनी ग्राऊंडवर होता.
लता चा निगडी प्राधिकरण मध्ये
लता चा निगडी प्राधिकरण मध्ये प्रबोधिनी ग्राऊंडवर होता.>>>> व्हॉट?? कोणत्या साली?
अंजली मदनलाल धिंग्रा ला झाला
अंजली मदनलाल धिंग्रा ला झाला होता ना. दीनानाथ साठी देणग्या गोळा करत होते त्यावेळीच. साल exact लक्षात नाही. पुण्यातला एकदम हिट गेला मग त्यांनी इकडे पण केला.
ओह अच्छा.
ओह अच्छा.
<< हा दोष गुगल मॅपचा म्हणायचं
<< हा दोष गुगल मॅपचा म्हणायचं का सरकारी अनास्थेचा ?
गुगल मॅप केवळ मदतीसाठी आहे त्यावर १०० % विसंबून रहायचे नाही. गाडी चालवतांना डोळ्याने रस्ता दिसत असेल, रस्ता मोकळा + सुरक्षित असेल तरच गाडी पुढे ( किंवा मागे रिव्हर्स मधे ) न्यावी. डोळ्याने दिसत नसलेल्या रस्त्याबद्दल कुठलाच अंदाज बांधू नये.
नमस्कार ,
नमस्कार ,
माझ्या मित्राला लेझीम (सोलापुरी पद्धतीची) शिकायची इच्छा आहे. अर्थात प्रत्यक्ष तिथे जाणे शक्य नसल्याने कुणी online शिकवू शकेल का ते शोधतोय. आपल्याकडे काही माहिती असल्यास सांगाल का ?
धन्यवाद !
प्रश्न :-पुण्याहून मुंबईला
प्रश्न :-पुण्याहून मुंबईला येताना माहीम परिसरात जाण्यासाठी मेट्रोचा सर्वात अलिकडचा (पुण्याकडे) थांबा कुठे आहे?
उपप्रश्न
अ) पार्किंग ची सोय आहे का?
ब) मुंबई मेट्रो पुण्याप्रमाणे सायकल नेता येईल का?
विक्षिप्त मुलगा नेमकं सांगू
विक्षिप्त मुलगा नेमकं सांगू शकतील. वांद्रे - कुलाबा मेट्रो फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होईल. दादरहून वांद्य्राच्या दिशेने पहिलेच स्टेशन शितलादेवी मंदिर मेट्रो स्टेशन आहे , जे माहीममध्ये आहे.
पुण्याहून रेल्वेने येत असाल तर दादरला उतरून पश्चिम रेल्वेवर लोकलने दादर = माटुंगा - माहीम अशी दोनच स्टेशन्स लागतील. हे जास्त सोयीचं होईल. जोशी बुढाकाकाकडे जायचं असेल तर दादरहून रस्त्याने अंतर फार नाही.
धन्यवाद.
धन्यवाद.
नवी मुंबईपर्यंत मेट्रो आली आहे का?
जोशी बुढाकाकाकडेच जायचे आहे हे अगदी बरोबर.
विक्षिप्त मुलगा नेमकं सांगू
विक्षिप्त मुलगा नेमकं सांगू शकतील....
भरत, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद!
बाकी तुम्ही दिलेले उत्तर बरोबर आहे. मेट्रो लाईन ३ (Aqua Line) (सिप्झ - कुलाबा) ही सध्या अर्धवटच चालू झाली आहे. आरे JVLR ते BKC याच टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे शितलादेवी मंदिर मेट्रो स्टेशन हे अजून कार्यान्वित झालेले नाही.
मुंबई मेट्रो पुण्याप्रमाणे सायकल नेता येईल का?
मुंबई मेट्रोच्या फक्त लाईन २अ (Yellow Line) (डी.एन. नगर ते दहिसर) आणि लाईन ७ (Red Line) (गुंदवली ते दहिसर) मध्येच सायकल नेण्याची परवानगी आहे, ती देखील फक्त अगदी सकाळी कमी गर्दीच्या वेळी. आणि या मेट्रोत सायकल उभी पार्क करण्यासाठी (ज्यात जागा कमी लागते) विशेष व्यवस्था आहे. लाईन १ (Blue Line) (वर्सोवा - घाटकोपर) आणि लाईन ३ (Aqua Line) (कुलाबा - सिप्झ) मध्ये सायकलला प्रतिबंध करणारे स्पष्ट आदेश नाहीत परंतु त्यात वर म्हटल्याप्रमाणे विशेष अशी व्यवस्थाही नाही. साधारण वर्षभरापूर्वी मी एकदा प्रोजेक्टरची स्क्रीन (गुंडाळलेली) (with tripod) नेता येईल का ते विचारले होते लाईन १ (Blue Line) मध्ये, तर त्यांनी बराच वेळ लावून, लांबी वगैरे मोजून आणि मग walkie-talkie वर त्यांच्या वरिष्ठांशी बोलून अखेर (माझा अर्धा तास घालवून) नाही म्हणून सांगितले! इतक्या वेळात मी रिक्षाने इच्छित स्थळी पोहोचलो असतो!!!
पुण्याहून रेल्वेने येत असल्यास लोकलने अवघ्या २ स्टेशनचा प्रवास आहे platform no. 1 वरुन कोणतीही स्लो लोकल पकडली तरी चालेल (फक्त गर्दीची वेळ असल्यास भाईंदर, वसई, विरार लोकल टाळावी). शिवनेरीने येत असल्यास शिवनेरी जिथे संपते तिथून टॅक्सीने माहीम गाठणे सोयीचे होईल. जर सोबत जास्त सामान नसेल तर तिथून १, ४०, ४४० क्रमांकाच्या बसनेही माहीमला येता येईल.
नवी मुंबईपर्यंत मेट्रो आली आहे का?> नवी मुंबईत मेट्रो आहे, पण ती स्वतंत्र आहे. सध्या तरी तिला थेट मुंबईशी connectivity नाही, भविष्यात पाहू जोडतात का ते! आणि हो, या नवी मुंबई मेट्रोला नुकतेच ISO मानांकन मिळाल्याची बातमी आहे!
(मुंबईत येणाऱ्या सर्वांनाच फुकाचा सल्ला - आपल्या मोबाईलमध्ये m-Indicator (for overall travel guide in Mumbai), UTS (for local train ticket booking), Chalo (for Best bus tracking & ticket booking) ही apps install करावीत. खूप फायदा होतो.)
btw हे जोशी बुढाकाका काय प्रकरण आहे? मुंबईकर असूनही मला खरंच माहीत नाही!
विक्षिप्त मुलगा नेमकं सांगू
दुहेरी प्रतिसाद काढून टाकला आहे
विक्षिप्त मुलगा, जोशी
विक्षिप्त मुलगा, जोशी बुढाकाका
विमु. माहितीसाठी धन्यवाद.
विमु. माहितीसाठी धन्यवाद.
युके ट्रान्झिट विसाबद्दल जरा
युके ट्रान्झिट विसाबद्दल जरा गोंधळ होतो आहे. भारतातुन अमेरिकेत येताना लंडनला विमान बदलायचे तर ट्रांझिट विसा लागेल असं दाखवतायेत व त्याचबरोबर अमेरिकेत शिरायचा विसा असेल तर लागणार नाही असंही. कोणाचे नातेवाईक बी१-२ विसावर हल्ली आले असल्यास त्यांना लागला का?
बंगलोरमध्ये कोरामंडल भागात
बंगलोरमध्ये कोरामंडल भागात कोणाला मराठी पद्धतीचा घरगुती जेवणाची टिफिन सर्विस देणारे माहिती आहेत का? डबा डिलिवरीही हवी. माझी भाची St. John Medical College च्या कँपसमध्ये रहाते. मेसचं जेवण जेऊन कंटाळलेय!
पुढील प्रवासाचे तिकीट आणि
पुढील प्रवासाचे तिकीट आणि जिथे जाणार आहात त्या देशाचा ( अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) व्हिसा आहे का?
पुढचा प्रवास त्याच दिवशी सुरु होत आहे का? ( तारिख बदलायला नको).
विमानतळ इमारती मधून बाहेर पडणार आहात का?
UK Govt ची लिंक देत आहे, तिथे खात्री करु शकता.
https://www.gov.uk/check-uk-visa
जानेवारी पासून युके चे नियम
जानेवारी पासून युके चे नियम बदलत आहेत असं हापिसच्या ट्रॅव्हल ऍडवायझरीत हल्लीच वाचलं. नक्की माहित नाही. पण कॅनडा पासपोर्ट असेल तरी काही तरी एक स्टेप करायची आहे.
सुनिधी,
सुनिधी,
मी आणी माझे यजमान २१ ऑक्टोबरला भारतातून ब्रिटिश एअरवेजने अमेरिकेत (Los Angeles)गेलो.लंडनला विमान बदलले. आमचा भारतीय पासपोर्ट आणी US B1 B2 व्हिसा आहे.कुठेच ट्रांझिट व्हिसा लागला नाही. मात्र एअरपोर्टच्या बाहेर गेलो नाही आणी तिकीट पण कन्फर्म होते. प्रवासाची तारीख पण बदलत नव्हती. माझ्या माहितीनुसार ट्रांझिट व्हिसा एअरपोर्टच्या बाहेर जाणार असाल तर लागतो.
बंगलोरमध्ये कोरामंडल भागात >>
बंगलोरमध्ये कोरामंडल भागात >> मला टिफीन सर्व्हिस माहीत नाही, पण तुम्हाला "कोरमंगला" भाग म्हणायचा असावा. इंदिरानगर, तिप्पसंद्रा भागात एक घर का खाना नावाची खानावळ होती. मी १०-१२ वर्षांपूर्वी जायचो, चांगली होती. पण ती कोरमंगलापासून किमान ४-५ किमी लांब आहे.
पण तुम्हाला "कोरमंगला" भाग
पण तुम्हाला "कोरमंगला" भाग म्हणायचा असावा. >>>> हो कोरामंगल.
यशवंत हो, aaoukshvant हो ह्या
यशवंत हो, aaoukshvant हो ह्या आशीर्वाद देण्यामध्ये
Aaoukshvant म्हणजे काय?
(Aaou टाईप करता येत नाहीये)
औक्षण = आयुष्य
औक्ष = आयुष्यचा अपभ्रंश
उदंड आयुष्य लाभो
युके ट्रान्झिट विसाबद्दल जरा
युके ट्रान्झिट विसाबद्दल जरा गोंधळ होतो आहे. भारतातुन अमेरिकेत येताना लंडनला विमान बदलायचे तर ट्रांझिट विसा लागेल असं दाखवतायेत >>
हो. इलेक्टॉनिक ट्रॅव्हल अथोरायझेशन लागेल. हे नवे नियम आहेत. कुणाच्या अनुभवाने फरक पडणार नाही कारण हे ८ जानेवारी पासून बदलणार आहेत.
युकेचा व्हिसा स्टॅप्ड असेल किंवा युके/ आयर्लंडचा पासपोर्ट असेल तर आणि तरच फक्त लागणार नाही. बाकी सर्वांना, ट्रांझिट करणार्यांनाही इटीए लागेल. जे १० पौंडाला ३ दिवसांत मिळेल. https://www.gov.uk/guidance/apply-for-an-electronic-travel-authorisation...
औक्ष = आयुष्यचा अपभ्रंश
औक्ष = आयुष्यचा अपभ्रंश
उदंड आयुष्य लाभो
>> +१२३
जो वळखितसे औक्ष मंजी मोठी लढाई
अन हत्याराचं घाव फुलावाणी बी खाई
गळ्यामध्ये पडलं तेच्या माळ विजयाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची.. परवा बी कुणाची !!
Pages