Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल एक मैत्रीण भेट म्हणून
काल एका मैत्रिणीने भेट म्हणून गावावरून आणलेले केळफूल दिले आहे. आज ते सोलल्यावर आतील पाकळ्या (?) काळपट रंगाच्या दिसल्या. तर ते खाणे योग्य आहे का?
काल मार्केट मध्ये हादग्याची
काल मार्केट मध्ये हादग्याची लाल फुले पाहिली. ह्याच्या भाजीची कृती कुणाकडे आहे का? चव कशी लागते?
केकु... हादग्याच्या फुलांची
केकु... हादग्याच्या फुलांची भजी करतात. चव किंचित कडसर पण छान असते
आभार. नेटवर फुलातील केशर
आभार. नेटवर फुलातील केशर काढून टाका ते कडू असते असे लिहिले आहे.
दुर्मिळ भाजी बद्दल खुद्द
दुर्मिळ भाजी बद्दल खुद्द मनीम्याउ यांनींच प्रश्न विचारला आहे, हे पाहुन मला "उसे कौन सुझाए?" असा प्रश्न पडला.
जागु-प्राजक्ता , आणि कोण?
केळफूलाच्या वरवरच्या पाकळ्या
केळफूलाच्या वरवरच्या पाकळ्या उष्णतेने काळ्या पडतातच. आतल्या पाकळ्या चांगल्या असतात. वरच्या काढून टाका आणि आतली चांगली दिसणारी फुले भाजीसाठी वापरा.
Thanks Nidhii
Thanks Nidhii
सावरक्रॉट, किमची, मिसो, किफर
सावरक्रॉट, किमची, मिसो, किफर/केफिर, कोंबूचा /काम्बुचा वगैरे
मनीम्याऊ त्या पाकळ्या काळपट च
मनीम्याऊ त्या पाकळ्या काळपट च असतात.. केळफूल सोलताना त्या काढायच्या असतात... यात दाखवले आहे तसे
https://youtu.be/ycdfMhcav-o?si=N0e027eOOKtpUKM9
ह्याच्या भाजीची कृती कुणाकडे
ह्याच्या भाजीची कृती कुणाकडे आहे का? चव कशी लागते?>> वर लिहलय तस भजीच करा, चान्गली लागतात..
भाजी करायची असेल आतल केसर-थोड देठ पण काढुन टाका आणी पाण्याने दोन तिनदा धुवुन घ्या..मग बारिक कोबिसारख चिरुन घ्या, शिजल्यावर आळते भाजी.
साधी जिर,तिखट्,हळद,हिन्गाचि फोडणी करुन त्यात कान्दा परतुन हादग्याची फुल चिरुन घाला किवा दुसरा प्रकार म्हणजे लसूणाची फोडणी करुन त्यावरुन फुल चिरुन घाला एकदा परतुन त्यात थोडस भाजलेले डा.पिठ पेरुन पण करतात.
राजक्ता आभार!
राजक्ता
आभार!
केशवकुल माझ्या माहेरी झाड
केशवकुल माझ्या माहेरी झाड होते हादग्याचे बिल्डिगच्या आवारात, थोडिच फुल यायची पण आवारात म्हणजे सगल्याच मग एक तिळ सात जणात वाटून तसे प्रत्येकाला ३-४ फुल यायची मग चविला भजिच जमायची...ही फुल बाजारात विकायला येतात हे माझ्यासाठी नवलाच आहे , आम्ही लहान असताना तरी कधि विकायला आलेली बघितली नाही...आता येत असतिल.
हादग्याच्या फुलाच्या भजी छान
हादग्याच्या फुलाच्या भजी छान होतात.
अगदी क्वचित कधीतरी येतात.
अगदी क्वचित कधीतरी येतात. गम्मत म्हणजे ही लाल होती. पांढरी बघितली होती. पण लाल? सोचते सोचते फुल हो गायी गायब! आता पुन्हा दिसली की झडप घालेन.
व्हिडिओ लिंक साठी धन्यवाद jui
व्हिडिओ लिंक साठी धन्यवाद jui.k
तांब्याच्या भांड्यांना ठोके
तांब्याच्या भांड्यांना ठोके का मारतात?
फक्त डिझाईन म्हणून की काही उपयुक्तता वाढते भांड्यांची?
शंतनु नायडू इतकं छान मराठी
शंतनु नायडू इतकं छान मराठी कसं काय बोलतो?
https://www.instagram.com/reel/DCivIFPCCV6/?utm_source=ig_web_copy_link
आमच्याकडे ठोके मारलेला
आमच्याकडे ठोके मारलेला स्टीलचा एक टोप आहे. आईने हौसेने घेतलेला.
स्टील/ पितळेची भांडी
स्टील/ पितळेची भांडी पत्र्याला दाबून बनवली जातात. ह्या प्रक्रियेत भांड्यावर स्ट्रेस येतो. तो काढण्यासाठी भांडे ठोकले जाते. तुम्ही कदाचित कडेला क्रॅक झालेली स्टीलची भांडी पाहिली असतील.
Peening
In metallurgy, peening is the process of working a metal's surface to improve its material properties, usually by mechanical means, such as hammer blows, by blasting with shot, focusing light, or in recent years, with water column impacts and cavitation jets.
हा आपला माझा कॉमन सेन्स बरका. कुणी पुष्टी करेल का?
कॉमन सेन्स मेक्स सेन्स.इथे पण
कॉमन सेन्स मेक्स सेन्स.
इथे पण याच अर्थाचं लिहिलं आहे.
केकु मस्त! असा शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे.
केकु, भारीच!
केकु, भारीच!
ओके. आभार. आता माझा प्रॉब्लेम
ओके. आभार. आता माझा प्रॉब्लेम सोडवा.
माझ्याकडे Samsungचे top loading वाशिंग मशीन आहे. बरेच वर्षे झाली. काहीही पेन्टेनंस केला नाहीये. पण मधेच कधीतरी विशिष्ट प्रकारच्या कपड्यांवर - विशेषतः बनिअन टाइप -स्प्रे पेंटिंग केल्यासारखे काळे धब्बे येतात. फिल्टर साफ केलेला आहे.
कुणाला काही अनुभव असेल तर प्लीज हेल्प.
माझ्याकडे Samsungचे top
माझ्याकडे Samsungचे top loading वाशिंग मशीन आहे......
टब मधील खालचे फिरणारे चाक काढून त्याच्याखाली गाळ साचला आहे का ते पहा आणि असल्यास साफ करा. Descaling tablet / powder टाकून Tub Clean चा program run करा.
ओके. बघतो ट्राय करून. आभार.
ओके. बघतो ट्राय करून.
आभार.
काळे धब्बे फिल्टर/ गाळाचे
काळे धब्बे फिल्टर/ गाळाचे नसावेत. मशीन ऑईल/ वंगण कुठे लीक होतंय का?
फिरणारे चाक काढून बघा ला +१
मशीन ऑईल/ वंगण कुठे लीक होतंय
मशीन ऑईल/ वंगण कुठे लीक होतंय का?....
मग त्यासाठी gear box खोलावा लागेल, म्हणजे mechanic ची मदत घ्यावी लागेल. सामान्य वापरकर्त्याचे ते काम नव्हे.
गेअर्बोक्स मधून ड्रम मध्ये
गेअर्बोक्स मधून ड्रम मध्ये कसे लीक होणार?
+ पाण्यत दिसून येईल की.
आधी मी डीस्केलिंग करून बघतो.
मग त्यासाठी gear box खोलावा
मग त्यासाठी gear box खोलावा लागेल, म्हणजे mechanic ची मदत घ्यावी लागेल. >> वॉशिंग मशीन मध्ये इतके क्लिष्ट डिजाईन नसते. एक मोटर असते आणि पुली/बेल्ट वापरून ड्रम फिरवला जातो.
माझा प्रश्न अगदीच दैनंदिन
माझा प्रश्न अगदीच दैनंदिन जीवनाशी संबंधित नाही, पण माहिती हवी आहे पण योग्य धागा सापडला नाही म्हणून इथेच विचारतो.
मुंबई, पुणे अशा शहरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (death certificate) संबंधित महानगरपालिका देते. पण लहान लहान खेडेगावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र त्या गावाची ग्रामपंचायत देते की जिल्हा परिषद???
ग्राम पंचायत.
ग्राम पंचायत.
Pages