मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खानेमें क्या है'चा होस्ट स्वतःच कायम दुष्काळातून आल्यासारखा दिसतो, तृप्तता अशी नाहीच. 'याला आधी द्या खायला, मुलाखतीचे राहू द्या>>>>>>> Biggrin

>> 'खानेमें क्या है'चा होस्ट स्वतःच कायम दुष्काळातून आल्यासारखा दिसतो, तृप्तता अशी नाहीच. 'याला आधी द्या खायला, मुलाखतीचे राहू द्या' असे मनात येते.>> मला त्याचं चॅनल हिंदी आहे हे आवडत नाही. मामा काणे रेस्टॉरंटमध्ये जाऊन हा हिंदी झाडणार हे विचित्र वाटतं अगदी. म्हणून मला मराठी लोकांना भेटतो ते ही बघायला आवडत नाही.

सोहम शाह ची मुलाखत पहिली होती.मुलगा बापाला हस्तर ला खायला घालून स्वतः निसटतो असाही एक शेवट असू शकला असता.मुलावर जो फिजिकल अब्युज होतोय ते पाहता हा सुद्धा लॉजिकल शेवट ठरला असता.
राही अनिल बर्वे राज आणि डिके बरोबर 3 महत्वाच्या प्रोजेक्ट वर काम करत असल्याने तुंबाड2 ला नाहीत.(खरं 2 हा आजीची गोष्ट असायला हवा होता.)

तुंबाडचा दुसरा सिझन कशाला, योग्य शेवट केलेला की, मुलगा हाव न ठेवता निसटतो तिथून आणि आपला जीव वाचवतो.

अंजु, ती मुलाखत पहा. आजी ची बॅक स्टोरी/ विनायकचे पुढे काय/ हस्तर चा उगम अशा अनेक प्रकारे दोन आणि पुढचे भाग करता येतील असं तो सांगतोय.

मला आवडेल तुन्बाडचे आणखी भाग आले तर...भरपुर स्कोप आहे.
अमित ! तु परत कुठे पाहिलास? प्राइमने काढलाय (रिरिलिज मुळे असेल)

महागुरु इतक्या बाता मारतायत की काहिच्या काहिच...त्यावर ट्रोल झाल्यावर सुप्रियाही अजुन वरकडी करुन त्याची मेमरी कशी हत्तिची आहे वैगरे सान्गतायत...कठीण प्रकरण आहे.

>> 'खानेमें क्या है'चा होस्ट स्वतःच कायम दुष्काळातून आल्यासारखा दिसतो, तृप्तता अशी नाहीच. 'याला आधी द्या खायला, मुलाखतीचे राहू द्या' असे मनात येते.>> Lol

>>महागुरु इतक्या बाता मारतायत की काहिच्या काहिच...त्यावर ट्रोल झाल्यावर सुप्रियाही अजुन वरकडी करुन त्याची मेमरी कशी हत्तिची आहे वैगरे सान्गतायत...कठीण प्रकरण आहे.>>
सिनेमा प्रमोट करायला मुलाखती वगैरे ठीक पण इतके डेस्परेट का होतात ? some times less is more.

कुमार सर, लिंक बद्दल धन्यवाद. आज बघेन मुलाखत.

लोकमत फिल्मी युट्युबचॅनल वर प्रसाद आणि मंजिरी ओकची मुलाखत छान आहे. अगदी कॅज्युअल.
नवरा बायको रोजच्या जीवनात जसे बोलतील, वागतील तसेच. शब्दबंबाळ प्रश्न उत्तरे नाहीयेत. प्रसादचा स्ट्रगल अजिबात माहित नव्ह्ता आणि मंजिरीने पण त्याला खूप छान सपोर्ट केलाय. माझं आवडतं कपल आहे हे.

बीअर बायसेप्सचं चॅनेल हॅक झालं आणि सगळे व्हिडियो डिलीट झाले. >>> बापरे.

हृषीकेश जोशी यांची मुलाखत :>>> बघेन.

लोकमत फिल्मी युट्युबचॅनल वर प्रसाद आणि मंजिरी ओकची मुलाखत छान आहे. अगदी कॅज्युअल.
नवरा बायको रोजच्या जीवनात जसे बोलतील, वागतील तसेच. >>> +१ मलाही फार आवडली त्याची मुलाखत, साधी रिलेटेबल जोडी वाटली... कुठलाही आव न आणता बोलण,जस आहे तस..मुलाखत कर्तेही चान्गले होते.

आरपारवर वंदना गुप्तेची मुलाखत घेतली आहे मुग्धा रानडेने. छान कॅज्युअल आहे.>> हो ती पण छान आहे, वन्दना गुप्ते आवडतातच , बोलतात पण छान.

संदीप पाठक
https://m.youtube.com/watch?v=LnI5yaixpYs&t=2252s&pp=2AHMEZACAcoFE21pdHJ...

त्याच्या दातांवरून टीका व टिंगल झाली. परंतु त्याने ध्यास घेऊन त्याच्या अभिनयाची उंची वाढवली आणि हास्य अतिशय मोहक केले.
उत्तम कलाकार !

मी कालच बघितली....छान झालिये मुलाखत...याआधी प्रशान्त दामलेचे विक्रमी प्रयोग झालेत तेव्हा ब रेच कलाकार बोलले होते त्यात पण छान बोलला होता.

हो संदीप पाठक छान बोलला..कुठेही कंटाळवाणी नाही झाली मुलाखत...
मुग्धा गोडबोले नी घेतलेली सोनिया परचुरे ची मुलाखत पण आवडली..Women की बात मध्ये

Pages