सापडली, सापडली! बर्याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".
नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.
मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.
३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.
काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.
पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्या व किचन पॉलिटिक्स करणार्या बायका, व्हॉट्सअॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.
सर्व चेकमार्क्स चेक्ड.
कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.
रेमंड मला पण फोमो आला.
रमड मला पण फोमो आला. युट्यूबवर शोधल्यावर भुमी ला इंट्रोड्युस करणारा सीन दिसला.
एक बाई तिला घड्याळ दुरुस्त करायला देतात आणि सांगतात की त्यांच्या मुलीच लग्न झालं दोन वर्षांपूर्वी तेव्हा पासून तिने ह्यांच्याशी संबंध तोडले आणि त्या दिवसापासून हे घड्याळ पण बंद पडलं. त्यामुळे आता भुमी ने ते घड्याळ दुरुस्त केले की त्यांची मुलगी पण त्यांच्याशी बोलायला लागेल.
मग भुमी ताबडतोब ते घड्याळ दुरुस्त करते, आणि त्या बाईंना त्यांच्या मुलीला फोन करायला सांगते. मुलगी अमेरिकेत गेलेली दुष्ट इ. असल्याने ती हे घड्याळ लॉजिक जुमानत नाही आणि फोन उचलत नाही.
त्यामुळे उदास झालेल्या त्या बाईंना भुमी सांगते घड्याळ बिघडवणारी एक मुलगी तुम्हाला आहेच आजपासुन घड्याळ. दुरुस्त करणारी एक आणखी मुलगी तुम्हाला मिळाली. आणि त्या बाई आनंदाने हसु लागतात!
अरुंधती पाहिली तेव्हा ह्यापेक्षा अफाट लॉजिक असु शकत नाही असं मला वाटलं होतं. पण भुमी अफाट आहे.
अरे देवा! *कपाळ बडवणारी
अरे देवा! *कपाळ बडवणारी बाहुली* हे काय लॉजिक (!) आहे?
या मराठी शिरेलांमधल्या हिर्विणी इतक्या परोपकारी मोड मधे का असतात कायम?
सिरीयसली
सिरीयसली
ही सिरीज सुरूवातीपासून बघावी की काय! कृष्णा -
माझ्या "सोबत" असे वागू नका असे सांगेन त्या सिरीजवाल्यांना 
पोलिस तपासः एपि. ५३७ बहुधा.
कॉम्प्युटर सायन्स मधे एक "एसिंक्रोनस रिस्पॉन्स" म्हणून प्रकार आहे. तुम्ही प्रश्न विचारल्यावर ती सॉफ्टवेअर सर्विस जेव्हा उत्तर तयार होईल तेव्हा देते, लगेच नाही. यांचे गुन्हे व पोलिस तपास त्या पद्धतीने चालतात. घटनेनंतर सगळा इमोशनल ड्रामा, त्यावरची स्वगत-बकवास आधी होते व सवडीने नंतर पोलिस येतात. पूर्वीच्या हिंदी पिक्चर्समधे सुद्धा यामानाने पोलिस लौकर येत.
ज्या बोट स्फोटात आकाशचे आईवडिल गेले आहेत त्या स्फोटाबद्दल भूमीला आकाशला काहीतरी सांगायचे आहे. पण एकदा आत्याच्या गोळ्यांची वेळ होते म्हणून तो विषय राहून जातो. नंतर गणपतीचा पहिला दिवस आहे म्हणून आज नको असे म्हणून राहतो. यांच्या दृष्टीने जे सांगायला भूमी हॉस्पिटल मधे तडफडत होती, एका कागदावर अर्धवट लिहीलेही होते ते नंतर ती घरी आल्यावर "जमेल तेव्हा बोलू" कॅटेगरीत जाते. हॉस्पिटल बेडवर दोन शब्द लिहील्यावर बेशुद्ध पडणारी भूमी घरी आल्यावर मात्र साडी, दागिने ई. "मराठी सिरीज गणवेषात" येते व सगळी कामे सुरू करते.
पोलिस तपासाच्या नवीन पद्धती:
मात्र पोलिस गणपतीच्या दिवशीच येतात भूमीची चौकशी करायला. हा प्रॉपर्टीशी संबंधित मामला आहे याची शंका त्या इन्स्पेक्टरला ऑलरेडी आली आहे. आधीच्या एपिसोड मधे आहे. तरीही भूमीवरच्या हल्ल्याची चौकशी स्वतंत्रपणे न करता सगळ्या गोतावळ्यासमोर चालते. त्यात "मग याचा मास्टरमाइण्ड कोण आहे असे तुम्हाला वाटते" हा भूमीलाच विचारलेला प्रश्नही असतो. ती हॉस्पिटलमधे काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते, कागदावर काहीतरी लिहीत असते ते काय आहे असले प्रश्न त्या पोलिसाला पडत नाहीत, आणि कुटुंबातील इतरांनाही. ते सोडून इतर सगळी चौकशी चालते.
मात्र याहून गंमतशीर पुढे आहे हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच
भूमीला कोठेतरी कोल्ड स्टोरेज मधे ठेवलेले असते. पोलिस इन्स्पेक्टर विचारतो "ते कोठे आहे तुम्हाला आठवते का?"
भूमी: "गावाबाहेर एक रस्ता आहे. त्याच्या एका बाजूला डेड एण्ड आहे. तेथे"
इन्स्पेक्टर: "हवालदार, ताबडतोब जा व ते कोल्ड स्टोरेज शोधा. त्या मालकाला लगेच उचला"
आता यात कोल्ड स्टोरेजचा मालक चोवीस तास कोल्ड स्टोरेज मधेच बसलेला असतो का, नेहमी एकत्र काम करणार्या हवालदाराचे नाव न घेता त्याला हुद्द्याने का संबोधावे लागते वगैरे सोडून द्या. पण "गावाबाहेर एक रस्ता" आहे या माहितीवर तो हवालदार नक्की कसे शोधणार आहे ते कोल्ड स्टोरेज ते यांनाच माहीत.
फा..
फा..

मस्त छोट्या छोट्या कमेंट्स!!
हवालदार...!!
असे संबोधू शकतो ना पण तो...!!!
अगदी फॉर्मल असेल त्याचे वागणेबोलणे..
जिवंत माणसांना कोल्ड
जिवंत माणसांना कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात? लेखकाने बहुतेक मेंदूपण तिथेच ठेवला असेल. उगीच ओझं नको.
डेड एन्ड रस्त्याच्या एका बाजूला असतो? दुसऱ्या बाजूला काय असतं मग? ब्लॅक होल?
डेड एन्ड रस्त्याच्या एका
डेड एन्ड रस्त्याच्या एका बाजूला असतो? दुसऱ्या बाजूला काय असतं मग? ब्लॅक होल?>>>>>>>>>
मेणमुसका
म्हणजे काय?
डेड एन्ड रस्त्याच्या एका
डेड एन्ड रस्त्याच्या एका बाजूला असतो? दुसऱ्या बाजूला काय असतं मग? ब्लॅक होल? >>>
आणि गावाबाहेर म्हणजे कोठे? पूर्वेला, पश्चिमेला, इतर सहा दिशांपैकी कोठेतरी? "एक रस्ता"! कोणता? यापेक्षा म्हैस मधल्या पंचनाम्यातील माहिती जास्त अचूक होती.
मेणमुसका Rofl म्हणजे काय? >>>
ते विचारायचेच राहिले. पुण्यात ज्याला जनरली "फद्या" म्हणतात तसा आहे तो.
एसिंक्रोनस रिस्पॉन्स
एसिंक्रोनस रिस्पॉन्स
जमेल तेव्हा बोलू
मराठी सिरीज गणवेषात
चोवीस तास कोल्ड स्टोरेज मधेच >>>>
लेखकाने बहुतेक मेंदूपण तिथेच ठेवला असेल
ब्लॅक होल >>> माझेमन
मेणमुसका >>> मोस्टली हा शब्द आमच्याकडे मुखदुर्बळ या अर्थाने वापरला जातो. पण ओव्हरली बावळट्ट असणार्या माणसासाठी पण वापरतो
पुण्यात ज्याला जनरली "फद्या" म्हणतात तसा आहे तो >>> +१
एसिंक्रोनस रिस्पॉन्स
एसिंक्रोनस रिस्पॉन्स
यापेक्षा म्हैस मधल्या पंचनाम्यातील माहिती जास्त अचूक होती.
"मराठी सिरीज गणवेषात" -फार
"मराठी सिरीज गणवेषात" -फार आवडला हा शब्द
Long hair at all times
Long hair at all times straightened. Bindi . Kath padar Sadi. Never doing dishes. Artificial skin glow. Weird white skin across the board all languages. They just don't acknowledge sanwla normal Indian skin.
८ दिवस झाले कोणी पाहीली नाही
८ दिवस झाले कोणी पाहीली नाही का सिरियल?
पाहिली पण लिहीण्यासारखे फार
"..अरे या बायका गप्प दिसल्या तरी त्यांच्या डोक्यात कसलेतरी गहन विचार सुरू असतात. आणि त्यातले ९०% विचार हे आपल्याबद्दलच (नवर्यांबद्दल) असतात..." वगैरे मौक्तिके चालू आहेत. "नवर्याला खायला घालण्यासारखे सुख दुसरे नाही" वगैरे होतेच आधी, त्याच लाइनीवर हे.
त्या तांडेलची बायको आत्याला मारायला आली होती. पण अभिजितने तिला परस्पर नेले कोठेतरी. ती समोरासमोर आली असती तर नुसत्या ओव्हरअॅक्टिंगनेच तिने तिला मारले असते.
कंपनीच्या हिशेबातील २५ लाख गायब आहेत. नंतर घरातच एक पैशाची बॅग सापडते. तीच बॅग आधी आत्याकडे मोकळी दिसलेली असते तरी कोणालाही प्रश्न पडत नाही की ते पैसे त्या बॅगेत कसे आले. आणि २५ लाखांचा हिशेब लागत नाही म्हणजे नक्की काय त्याचा पत्ता नाही. उद्या म्हणे सर्व डिपार्टमेण्ट्सची मिटिंग बोलावून छडा लावणार. पण प्रत्यक्षात आकाश जायला निघतो व आत्याला विचारतो तर ती म्हणते आज मी येणार नाही. आज माझे वर्क फ्रॉम होम आहे! ही त्या कंपनीत काल परवापर्यंत ऑल्मोस्ट मालक असलेली जबाबदार वरिष्ठ अधिकारी आहे की त्यातल्या आयटीमधे काम करणार्यांपैकी एक आहे ते तिने एकदा ठरवावे. वर्क फ्रॉम होम म्हणे.
मुळात कंपनीच्या पैशांचा हिशेब लागत नाही म्हणजे अकाउंट मधे पैसे असायला हवे त्यापेक्षा कमी असतात. ते कोणी काढले किंवा भरलेच नाहीत हे शोधायचे असते. अशी "कॅश" गायब झालेली नसते. घरात ठेवलेले जनरल पैसे हरवणे/चोरले जाणे आणि कंपनीच्या हिशेबातील गडबड हे दोन्ही यांना सारखेच वाटते.
अरे या बायका गप्प दिसल्या तरी
अरे या बायका गप्प दिसल्या तरी त्यांच्या डोक्यात कसलेतरी गहन विचार सुरू असतात. आणि त्यातले ९०% विचार हे आपल्याबद्दलच (नवर्यांबद्दल) असतात >> कित्ती तो गोड गैरसमज….
नुसत्या ओव्हरअॅक्टिंगनेच तिने तिला मारले असते.>>>
आजकाल बॅगेत पैसे फक्त निवडणूकीच्या आदल्या दिवशी सापडतील किंवा मग रतन खत्री वगैरे लोकांकडे. यांचा नक्की कसला बिझनेस आहे?
अरे या बायका गप्प दिसल्या तरी
अरे या बायका गप्प दिसल्या तरी त्यांच्या डोक्यात कसलेतरी गहन विचार सुरू असतात.
>>>> गौप्यस्फोट करतेय, ते गहन विचार एखाद्याची पुढची फजिती कशी करावी याचे असतात. गप्प बायकांना बोलणाऱ्या बायकांपेक्षा जास्त घाबरलेले बरे. 'तुफान के पहले की गप्पता' असते.
तांडेलच्या बायकोचा आवाज बग्ज बनीचा गळा दाबल्यासारखा वाटला.
आजकाल बॅगेत पैसे फक्त
आजकाल बॅगेत पैसे फक्त निवडणूकीच्या आदल्या दिवशी सापडतील किंवा मग रतन खत्री वगैरे लोकांकडे. यांचा नक्की कसला बिझनेस आहे? >>> एक्झॅक्टली! यांचा गार्मेट्ण्सचा बिजिनेस असावा असे वाटते. आधीच्य माहितीवरून.
ते गहन विचार एखाद्याची पुढची फजिती कशी करावी याचे असतात. गप्प बायकांना बोलणाऱ्या बायकांपेक्षा जास्त घाबरलेले बरे. 'तुफान के पहले की गप्पता' असते >>>
आकाशच्या बाळबोध आकलनाला इतके झेपणार नाही
पण गौप्यस्फोट नोटेड.
बग्ज बनी ची कार्टून्स मी पाहिलेली नाहीत पण हिची संवादफेक ऐकली आहे. त्यामुळे अंदाज आला
आकाश तिच्याजवळ पोहोचताना तिला टेम्पोमधे मागच्या बाजूला ढकलून शटर बंद करतात. वास्तविक तिचा आवाज इतका पल्लेदार आहे की आकाशला सहज ऐकू गेला असता.
यांचे घर बर्यापैकी मोठे आहे. भूमी व रागिणी काय २४ तास एकमेकींवर पाळत ठेवत नसतील. मग भूमीला घरातीलच एखाद्या खोलीत जायला मोठे कुंभांड रचायची गरज असायला नको. ती काय प्रत्येक खोलीत रागिणीला सांगून जाणार आहे का? पण ती कोठीची खोली का काय असते तेथे तिला जाता यावे म्हणून आख्ख्या घराची साफसफाई काढते, बाहेरून लोक बोलावून. आणि मग साफ करायच्या निमित्ताने त्या खोलीत शिरते.
यांच्याकडे बाहेर जे वॉचमेन ई. असतात ते फक्त दिवसा असतात बहुधा. कारण आत्याच्या खोलीत कोणीतरी चोर शिरला होता. तेव्हा त्याला शोधताना वॉचमन ई चा उल्लेखच कोणी केला नाही. तो भूमीनेच रचलेला बनाव असला, तरी यांना ते माहीत नाही.
प्रत्येक व्यक्तिरेखा ही एखाद्या एपिसोडच्या एखाद्या सीनच्या गरजेपुरतीच असते. नंतर ४-५ भागांनंतर घडणार्या घटनेत त्या व्यक्तिरेखा/त्यांचे रोल्स यांचा मागमूस नसतो.
भूमीनेच रचलेला बनाव असला >>>
भूमीनेच रचलेला बनाव असला >>> आँ? ती तर हिरवीण आहे ना? मग बनाव, कुभांड हे शब्द तिच्यासाठी नॉट अलौड
समोरासमोर आली असती तर नुसत्या
समोरासमोर आली असती तर नुसत्या ओव्हरअॅक्टिंगनेच तिने तिला मारले असते>>>
अशी "कॅश" गायब झालेली नसते. घरात ठेवलेले जनरल पैसे हरवणे/चोरले जाणे आणि कंपनीच्या हिशेबातील गडबड हे दोन्ही यांना सारखेच वाटते.>>> ही अशीच मज्जा असते कॉर्पोरेट थीम वाल्या मराठी/हिंदी सिरेलीत
त्यांच्याच कडची मिटिंग मधे कुणीही उपटसुंभ येणं & त्या क्षेत्रातलं तज्ञ नसूनही २ गप्प ठोकून डीसिजन चा रोख बदलवणे - केजो ने ऱोकी रानी मधे कॉपी केलेय. एकता ला धन्यवाद द्यायला हवे त्यासाठी त्याने.
आजकाल बॅगेत पैसे फक्त निवडणूकीच्या आदल्या दिवशी सापडतील किंवा मग रतन खत्री वगैरे लोकांकडे. यांचा नक्की कसला बिझनेस आहे?>>> वा म्हणजे ३ आकडी एपिसोड्स होऊन ऑफिस ऑफिस कसले खेळत आहेत तेच माहीत नाही?????
३ आकडी एपिसोड्स होऊन ऑफिस
३ आकडी एपिसोड्स होऊन ऑफिस ऑफिस कसले खेळत आहेत तेच माहीत नाही?????
>>>> नाही. मी पिसं काढायला पण पाहत नाही. फक्त इथले अपडेट्स वाचून खवचट कमेंट्स करते
नंतरच्या एपिसोडच्या वर्णनात
नंतरच्या एपिसोडच्या वर्णनात आकाश व आत्यामधे "बिझिनेस पॉलिसीज" बद्दल चर्चा होणार असते. मी सगळी कामे आवरून, फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकून बसलो सरसावून.
प्रत्यक्षात एपिसोडमधे आधीच्या सीन्सचे थोडेफार रिवाइण्ड, आत्याने वैतागून भूमी कशी तिला कचाट्यात पकडत आहे वगैरेची अभिजित व पौर्णिमाबरोबर चर्चा असलेच बरेचसे होते. मग मधे एकदा आकाश एकदम आउट ऑफ द ब्लू आत्याला म्हणतो "आपण बिझिनेस पॉलिसीज बदलायला नको". बास. इतकेच.
कसल्या बिझिनेस पॉलिसीज? त्याच्या या एपिसोडमधल्या किंवा आधीच्या ३-४ एपिसोडस मधल्या चर्चांशी काय संबंध? काही पत्ता नाही. पण "सिक्युरिटी" शी संबंधित काहीतरी आले नंतर. त्यामुळे कंपनी सिक्युरिटी मधे काही बदल करण्याबद्दल असावे, ते २५ लाख गायब झालेत म्हणून. अजूनही २५ लाखांचा हिशेब लागत नाही म्हणजे कंपनीत कोणीतरी येउन २५ लाखांची कॅश घेऊन गेले असा यांचा समज दिसतो. आणि "पॉलिसी" काय करणार त्यात.
त्यांना ती इन्शुरन्स पॉलिसी
त्यांना ती इन्शुरन्स पॉलिसी वाटली असेल
याच्यावर "तुमचे २५ लाख वारले"
याच्यावर "तुमचे २५ लाख वारले" असं डेडली आत्या म्हणते असे मिम समोर आले एकदम
२५ लाख सापडत नाहीत तर लोक
२५ लाख सापडत नाहीत तर लोक accounts डिपार्टमेंटचा जीव खातील, मनी ट्रेल शोधतील का सिक्युरिटी डिस्कस करतील? अगदी पैशांची बॅग पळवली तरी cctv वगैरे नसतीलच यांच्याकडे.
अरे पण अफरातफर आहे ना? मग
अरे पण अफरातफर आहे ना? मग पॉलिसीज कसल्या करणार कप्पाळ? म्हणजे कोणीही १००००० पेक्षा जास्त रकमेची अफरातफर करू नये. केल्यास तशी नोट सोडावी आणि दंडाची रक्कम भरावी वगैरे टाइपच्या पॉलिसीज करणार की काय?
मला अशी "बिझिनेस पॉलिसीज" बद्दलची चर्चा करायला तरी एक कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणारा बिझिनेस करायचाय एकदा
तुमचे २५ लाख वारले >>>
माझेमन, पियु
माझेमन, पियु
अर्रे लोकांनो, हे शक्य आहे, आमच्या ऑफिसात अफरातफर झाली होती, ती १ प्रो. मॅनेजर ने १ परचेसींग पॉलिसी च्या ग्रे अरियाचा फायदा घेऊन केली होती, लोएस्ट कोट्स फर्जी कंपनीची असं काहितरी. त्यानंतर उघडकीस आले तेंव्हा खरेदी पॉलिसीज बदलवल्या होत्या. आत्या इज रियल डेडली, कमी समजू नका
Mid week update: Fadya CEO.
Mid week update: Fadya CEO. Mumbai meeting. Green and purple suits. Return urgently due to som atya fake emergency.
Atya bribes staff to insult her. The visits office and she is crying everywhere like a toddler.
Mag Fadya going to office and shouting at staff.
Atya parT CE O. Kids happy and bhoomi is fuming. In fancy sarees. All bahu in solid sarees good make up and paramparik jewellery only. All the time.
I find the toys and decor of AB bedroom very creepy.
Some older guruji comes and proposed one kunku karanda to be given by Fadya to some lady in the house and she will rule henceforth.
A. Fadu apologises to B sexy bai in a sabudana khichadi way. Is again fuming. Fadya gives kunku to atya but lo and behold. Ti dusri devi activate houn atya war zumbewr padte. He nakki bagha.
B secretly very happy. Fadya chi nadich pakdali!!!!
She takes Durga avtar and starts fighting immediately. Use whisper with wings for full night confidence. Atya back to toddler. First generation marathi kapde business madhye asa kiti Paisa kamavala asel pan to hi jadi la hava aahe.
Hi farend sorry for English. Bed ridden. So phone is easier. Not able to lift laptop. Good night.
अमा काहीच प्रॉब्लेम नाही.
अमा
काहीच प्रॉब्लेम नाही. लिहा जमेल तसे.
मी परवा बहुतेक याच्या आधीचा भाग पाहिला. मानसीला आख्खा एक पूर्ण संवाद व स्क्रीन प्रेझेन्स मिळाला. नाहीतर मी पाहिलेल्या बहुतांश भागात तिचा ९०% रोल माना डोलावण्यापुरता आहे. त्या पौर्णिमाचाही तसाच होता. पण गेले काही भाग आत्याकडून बोलणी खायला का होईना पण संवाद आहेत तिला.
त्यानंतर उघडकीस आले तेंव्हा खरेदी पॉलिसीज बदलवल्या होत्या >>
हो खर्या कंपनीत शक्य आहे. पण या लोकांनी इतके लॉजिक लावून तो संवाद म्हंटला असेल हे शक्य नाही. जनरल लेव्हल ऑफ बिनडोकपणा बघता
कारण एरव्ही हे लोक तेथून कॅश चोरीला गेल्यासारखे वागतात. "बिझिनेस पॉलिसीस" सुद्धा सिक्युरिटी बद्दल होत्या. अकाउंटिंग प्रॅक्टिसेस बद्दल नाही.
कालच लागलेला शोध म्हणजे या
कालच लागलेला शोध म्हणजे या डेडली आत्याच्या सिरिअल चे नाव शुभ विवाह आहे
कालच समजले. आता त्या भूमीला त्या आत्याला सी ई ओ च्या खुर्चीवर बसवावे लागले आणि त्या ऑफिसमधाल्या कोणाला तरी आत्या साठी रोज दरवाजा उघडण्याचा आदेश आकाश ने दिला. म्हणजे आत्याचे वर्क फ्रोम होम बंद करून ऑफिसमध्ये रग्गड काम द्यायचा भूमीचा प्लान आहे बहुतेक.
हो शुभविवाह नाव आहे
हो शुभविवाह नाव आहे
आकाशच्या रूम मधली खेळणी ई त्याच्या त्या मधल्या काळातील आहेत, त्यामुळे त्याला निदान तो संदर्भ आहे.
आत्याच त्याला मुंबईला मिटिंगला पाठवायचे कारस्थान करते. का, तर तिला एक दिवस ऑफिस मधे जाउन तिचे केबिन आवरायचे असते. ती ऑफिस सोडणार आहे असे ध्वनित केले गेले पण नक्की कळत नाही. हा सीईओ झाला म्हणजे आत्याने नोकरी का सोडायला हवी माहीत नाही. मुळात सीएओची निवड "हाजिर तो वजीर" या तत्त्वानुसार होत असावी. कारण आत्याचा चान्स केवळ ती आजारी असल्याने व त्यामुळे मिटिंगला जाउ न शकल्याने हुकला. एकूण चित्र असे होते की ती जर गेली तर तीच सीईओ होईल. मुळात ही सीईओची भानगड मधेच कोठून आली काही पत्ता नाही. इतके दिवस आकाश हा "मालक" होता आणि आत्याही एक वरिष्ठ अधिकारी टाइप होती. ते २५ लाख व आयकर खात्याची धाड सोडली तर सगळे सुरळीत चालले होते. आणि ती धाड काय किंवा २५ लाख काय, एकदा त एपिसोड संपला व भूमी-आत्याचे नवीन पॉलिटिक्स चालू झाले, की तो सगळा भाग रात गयी बात गयी प्रमाणे सगळे विसरून जातात. त्या धाडीमागे कोण होते, ते २५ लाख कोठे गेले यासंबंधी काहीच शोध लावणे वगैरे आता चालू नाही. त्यामुळे मधेच सीईओ ची नेमणूक कोठून उपटली माहीत नाही.
त्यात म्हणे आत्याला "तिच्या फाइल्स" ऑफिसमधून घरी घेउन जाऊ दे. लेको त्या ऑफिसच्या फाइल्स असतात. कर्मचारी लोक नोकरी सोडताना आपापल्या फाइल्स घेउन घरी जात नाहीत.
आत्याचे ब्लड रिपोर्ट्स घराबाहेर भूमी परस्पर स्वतःकडे घेते, आणि तो माणूसही ते सहज देतो काही ओळख बिळख न विचारता. मग तेथे भूमी व तिचा भाऊ खुसफुसत एक फेक रिपोर्ट बद्दल बोलतात. हे घराबाहेर किमान २०-३० फूट लांब उभे असताना व्हिस्परिंग करत बोलतात. एरव्ही खुद्द घरात, हॉलवे मधे, बेडरूम्स मधे सगळी कटकारस्थाने जाहीर आवाजात चालू असतात.
मुळात सीएओची निवड "हाजिर तो
मुळात सीएओची निवड "हाजिर तो वजीर" या तत्त्वानुसार होत असावी. >>>
Pages