सापडली, सापडली! बर्याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".
नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.
मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.
३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.
काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.
पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्या व किचन पॉलिटिक्स करणार्या बायका, व्हॉट्सअॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.
सर्व चेकमार्क्स चेक्ड.
कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.
काल रमड स्मृतीविव्हल होऊन
काल रमड स्मृतीविव्हल होऊन आत्यांची ख्यालीखुशाली विचारीत होती. आत्यांच्या विरहाने शोकाकूल असणाऱ्या फॅन्ससाठी -
तर मी उत्सुकतेने काल पाहिली मालिका, ६९६ वा एपिसोड. आत्याचे कारनामे सगळ्यांना कळूनही त्यांना आकाशने मोठ्या मनाने का रिकाम्या डोक्याने माफ केले व पुन्हा तेच धंदे सुरू झाले. म्हणजे जे पहिल्या एपिसोड मधे होते तेच, फक्त भारी साड्या जाऊन एकदम कॉटनच्या, रुंद काठाच्या साड्या आत्याने व स्लीवलेस ब्लाऊज जाऊन कोपरापर्यंत बाह्या असलेले ब्लाऊज त्यांच्या कुरापतखोर सूनबाईने घातले होते.
आत्या अजूनही आकाश आणि भूमीला उध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही म्हणाल्या. मी मनात म्हटलं, अहो, सहाशे शहाण्णव एपिसोड झाले, प्रेक्षक उध्वस्त होऊन जमाना झाला पण तुमचं अजून तेच. नंतर त्यांनी गुपचूप हापिसात जाऊन कामगारांच्या दिवाळी बोनसचे (दिवाळी कशी आता तर शिमगा हवा.) पैसे चोरून बॅगेत भरले ते कुणीतरी काका होते , त्यांनी फोन करून भूमीला सांगितले की 'तुम्ही यांच्यावर एवढा विश्वास टाकला पण ह्या अजूनही सुधारल्या नाहीत', duh.. !
मग त्यांना भूमीने म्हटले , आपण पुन्हा रेड हॅन्ड - रेड हॅन्ड खेळूया, तुम्ही व्हिडिओ कॉल करा व आत्या तुरूतुरू जातानाच व्हिडिओ कॉल करा, ते पाहून आकाशच्या डोक्यात प्रकाश पडेल. बल्ब उडालाय याचा, प्रकाशाची वाट बघणं हा स्वतंत्र मूर्खपणा आहे. तर त्यांनी हा तमाशा दाखवायला फोन केला तर आत्या म्हणे , "मी खरोखरच सुधारले आहे, बॅगेत कामाच्या फाईल आहेत. अहो आश्चर्यम्, तेवीस किलोची चेक ईन बॅग होईल अशा बॅगेतून दोन-दोन ग्रामच्या तीन फाईली निघाल्या तरीही आकाशला संशय आला नाही. समाप्त.
विरह सहन न झाल्याने तात्काळ
विरह सहन न झाल्याने तात्काळ इकडे आले बघ
वाहत्या धाग्यावरची पोस्ट इकडे डकवते आहे.
रिकाम्या डोक्याने माफ केले
बल्ब उडालाय याचा, प्रकाशाची वाट बघणं हा स्वतंत्र मूर्खपणा
>>>
सध्या स्लीव्हलेस ब्लाऊजची जागा कोपरापर्यंत बाह्या असलेल्या ब्लाऊजने घेतलेली दिसते. कॉलिंग फारेण्ड
आत्यांच्या विरहाने शोकाकूल
आत्यांच्या विरहाने शोकाकूल असणाऱ्या फॅन्ससाठी >>>
आकाशने मोठ्या मनाने का रिकाम्या डोक्याने माफ केले >>>
तेवीस किलोची चेक ईन बॅग होईल अशा बॅगेतून दोन-दोन ग्रामच्या तीन फाईली निघाल्या तरीही आकाशला संशय आला नाही >>>
जबरी पोस्ट आहे. तोच बिनडोकपणा परत परत सुरू आहे असे दिसते. त्या आत्याच्या रूमच्या बाहेर पाच मिनीटे ऐकत उभा राहिला तरी आकाशला सर्व कळेल लगेच. किंवा इतकी दिवस आपली बायको आरोप करत आहे तर या दोघीच फक्त असताना त्यांचा संवाद आपण ऐकू वगैरे काहीही त्याला सुचत नाही. त्याच्या आईबापांना मारलेले जर तो माफ करत असेल, तर ऑफिसमधले पैसे चोरल्याबद्दल करेलच. इतकेच नव्हे, तर मधे तो आत्यालाच आई म्हणायला लागला आहे. आता डब्बा कार्टेलसारखा तिला बा ही म्हणेल
बल्ब उडालाय याचा, प्रकाशाची
बल्ब उडालाय याचा, प्रकाशाची वाट बघणं हा स्वतंत्र मूर्खपणा>>>
इतकेच नव्हे, तर मधे तो
आता डब्बा कार्टेलसारखा तिला बा ही म्हणेल >>>
हो, सिंहासनावर बसवून आत्यांची पाद्यपूजा केली होती आणि सावत्र आई दत्तक घेतली. 
इतकेच नव्हे, तर मधे तो आत्यालाच आई म्हणायला लागला आहे.
>>>
त्याच एपिसोड मधे काही तरी 'बाळ-बाळ' आपली मुलगी म्हणून रडत होते. आकाश बेडरूममधे जाऊन रूसून बसला होता व भूमी दरवाजाबाहेर खाली बसली होती. एकदम 'घोस्ट' सिनेमातले पॅट्रिक स्वेझी आणि डेमी मूर आठवले. प्रेक्षकांना मात्र व्हूपी गोल्डबर्ग केले आहे.
ह्यांचं बाळ बहुतेक हरवलं आहे किंवा आत्यांनी किडनॅप करून लपवलं आहे. 'तू जर असा रडू-बोंबलू लागलास तर आपल्या बाळालाही दुःख होईल' असे भूमी म्हणत होती. त्याला मरायला कशाला दुःख होईल, तान्हं बाळ ते. पण हा स्वतःच कायम बाळलेणी, सॉफ्ट टॉयज व बाहुल्या यांच्या अवतीभवती रमतो. किती क्रीपी रूम आहे. आकाश हा 'असा' असताना बाळाला वावच उरत नाही म्हणून त्याला गायब केले असेल.
आकाश हा 'असा' असताना बाळाला
आकाश हा 'असा' असताना बाळाला वावच उरत नाही म्हणून त्याला गायब केले असेल. >>>
किंवा बाळानेच चिडून वॉक आऊट केलं असेल.
हो, बाळ सुटकेस घेवून 'बॉस
तिची डिलीव्हरी झालेली आहे का
तिची डिलीव्हरी झालेली आहे का मुळात? मला शंका आहे. आणि बाळाला दु:ख होईल वगैरे वाक्यांनी तसेच वाटते. एरव्ही प्रत्यक्षातील काही महिने किंवा वर्षे लागणार्या गोष्टी सिनेमात्/सिरीज मधे ५ मिनिटांत होतात. पण प्रत्यक्षात साधारण नऊ महिने लागणारी गोष्ट सिरीज मधे त्याहून जास्त काळ चालू आहे हे मराठी सिरीज मधेच होऊ शकते.
मिसकॅरेज असू शकेल.
मिसकॅरेज असू शकेल.
आकाश हा 'असा' असताना बाळाला वावच उरत नाही>>>
हा स्वतःच कायम बाळलेणी, सॉफ्ट टॉयज व बाहुल्या यांच्या अवतीभवती रमतो.>>> लॉल सिरियल न बघताही इतकं हसू येतय
बाळा गाऊ कशी अंगाई पासून मला
बाळा गाऊ कशी अंगाई पासून मला एक शंका आहे की स्वतःच्या बाळाला कोण त्रयस्थासारखं बाळ म्हणतं? अगदी ऑफिशिअल नाव दिलेलं नसेल तरी त्याला/तिला पहिल्या दिवसापासून सोनु,मोनू, बंडू,बबडी, राणी अशी काहीतरी हाक मारतात ना?
प्रेक्षकांना मात्र व्हूपी
प्रेक्षकांना मात्र व्हूपी गोल्डबर्ग केले आहे >>>
स्वतःच्या बाळाला कोण त्रयस्थासारखं बाळ म्हणतं? >>> पॉइंट आहे
म्हणतात की स्वतःच्या मुलांना
म्हणतात की स्वतःच्या मुलांना .. 'बाळ'!
त्यात काय? मीही म्हणते..बाळा, लवकर ये.
बाळ, फोनवर जास्त टाईमपास करु नकोस!
अगदी छोटं असलं तरी.."झोप ना, आता बाळा. किती रडशील?"
बाळ हेच मुळ नाव असेल तर?
बाळ हेच मुळ नाव असेल तर?
रिकॅप करायल थोडे भाग पाहिले.
रिकॅप करायल थोडे भाग पाहिले. पण या वरच्या वर्णनाच्या आधीचे पाहिलेत. भूमी फायनली आत्याचे सगळे सिक्रेट्स उघड करते तो भाग. आधीच्या मानाने हे भाग जरातरी एंगेजिंग होते. पण तरीही मजा होतीच. आपण केलेल्या कृत्यांची पहिल्यापासून सर्व माहिती या लोकांना अधूनमधून कोणाला तरी सांगायची हुक्की येत असते, त्यामुळे आत्या हे कोणालातरी सांगत असताना भूमीने ते रेकॉर्ड केलेले असते. ते शोधून काढायचा भाग अफलातून अचाट आहे. पण ते सापडते.
मग आत्याला का कोणास ठाउक पण "इण्डियन बिझिनेस असोसिएशन" तर्फे "बिझिनेस वूमन" हा सन्मान देण्यात येणार असतो. इथे "बिझिनेस वूमन" असे दोन स्वतंत्र शब्द लिहीले आहेत, तसेच त्या बॅनरवर आहेत. दुसरे म्हणजे तिलाच ते अॅवॉर्ड देण्याचा समारंभ असतो, तरी स्वागतवाली बाई "यांनी येथे येउन या समारंभाची शोभा वाढवली" वगैरे म्हणत असते.
महाजनांपैकी कोणालाही देश लेव्हलला सोडाच, पण अगदी राहतात त्या भागातील पातळीवर सुद्धा अॅवॉर्ड देण्याइतके काम त्यांनी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड अॅड केले तरी केलेले नाही. त्यामुळे हे अॅवॉर्ड कशाबद्दल ते समजले नाही.
इतके दिवस हे लक्षात आले नव्हते पण महाजन कुटुंबिय सुद्धा महाजन चा उच्चार हिंदीसारखा करतात. म्हणजे त्यातला ज हा "जागतिक" मधल्या ज प्रमाणे उच्चारतात. ही मालिका मूळ हिंदीतील असावी अशी शंका येणारे बरेच संवाद आता ऐकले. काही तर लिटरल भाषांतर आहेत. "रघूकाकांची मुलगी आज आपल्यामधे आली आहे" असे भूमी आकाशला म्हणते. मला तर भूमी व आकाश यांच्या मधे कोणी दिसले नाही व ती मुलगीच अजून न दिसल्याने ती मेटॅफोरिकली सुद्धा कशाच्या मधे आली कळाले नाही. मग तिची एण्ट्री दिसल्यावर लक्षात आले की "वोह आज हमारे बीच है" चे ते लिटरल भाषांतर होते.
या सर्वांच्या त्या सीन मधल्या एण्ट्र्या हा एक वेगळाच अफलातून प्रकार आहे. आपल्या नावाचा पुकारा होईपर्यंत पोलिसांपासून ते साक्षीदारांपर्यंत सगळे बाहेर कोठेतरी दबा धरून बसलेले आहेत. भूमी एकेक रहस्य उघड करत आहे व ज्यांचे नाव घेतले जाईल त्यांना पोलिस बाहेरून आणून हजर करत आहेत. हे सगळे त्या "बिझिनेस वूमन" समारंभाच्या मंडपात सुरू आहे. आणि येणारी प्रत्येक व्यक्ती आधी सीनकडे आपली पाठ करत नाचत येत नाही हा भाग (थँकफुली) सोड्ला, तर बाकी सीन साधारण केजोच्या किंवा तसल्या पिक्चर मधे गाण्यांत गेस्ट अॅक्टर्स येतात तसाच आहे.
डिलीव्हरी काही एपिसोड्सनंतर
डिलीव्हरी काही एपिसोड्सनंतर झालेली दिसते. पण तो "बाळ' संदर्भ ओके असेल कारण इथे दिग्दर्शक मनमोहन देसाई मोड मधे आहेत. भूमीचे बाळ आत्या बहुतेक दवाखान्यातूनच गायब करते. नंतर ते कोणालातरी सापडते. हे भाग अजून पाहायचे आहेत. चालू भागांपर्यंत तरी ते भूमीकडे परत आलेले नाही.
त्यामुळे भूमी व आकाश त्याला बाळच म्हणत असतील.
मात्र बिझिनेसवूमन (सॉरी, बिझिनेस वूमन) समारंभात आत्याचे किमान दहा खून व एक दोन बॉम्बस्फोट उघडकीस आले आहेत. हा तपास प्रामुख्याने भूमी व परितोष करतात व पोलिस त्यांना अधूनमधून लागेल तसे सहकार्य करतात. म्हणजे उदाहरणार्थ - ती आत्याच्या वल्गनांची क्लिप, जिच्यामुळे तिचे गुन्हे उघड होतात - ती तपासात महत्त्वाची असेल तर मोबाईल कंपनीतून मिळवणे हे खरे म्हणजे पोलिसांचे काम. पण इथे तपासात पोलिसांचा केवळ साइड रोल असल्याने तो भूमीलाच करावे लागते. ती क्लिप मागितल्यावर मोबाईल कंपनीचा माणूस म्हणतो "हे खरे म्हणजे बेकायदेशीर आहे पण तुमच्या कडे पोलिसांचे कायदेशीर पत्र असल्याने तुम्हाला देत आहे"! मग कसले बेकायदेशीर?
साइड रोलचे अजून एक उदाहरण म्हणजे भूमीला जेव्हा किडनॅप करून जंगलात बांधले होते त्यानंतर या लोकांनी पोलिस कंप्लेण्ट वगैरे काही केली नव्हती. तेव्हा तपास आकाश करत होता. नंतर पुढे इतर कारणांनी पोलिसांना जेव्हा तपासात शिरकाव करून दिला तेव्हा त्या किडनॅपिंगचा संदर्भ दिला गेला - की अहो से काही झाले होते. पोलिसही मग असे होय मग ठीक आहे म्हणून "मूव्ह ऑन" करतात.
पण एकूणच लीड इन्वेस्टिगेटर भूमी व ती नाव पुकारेल तसे मंडपाबाहेरून आरोपी आणणे हे इन्स्पेक्टर गायकवाडांसकट इतरांचे काम. त्यात अटक करायला तितका संशय असणे हे खरे म्हणजे बास असायला हवे. पण तेथे आख्खा खटला चालतो त्याच मंडपात. पोलिस, वकील व न्यायाधीश हे सगळे रोल भूमी, आत्या व उपस्थित लोक करतात. आकाश व आजी हे कोर्टातील प्रेक्षकांचे रोल करतात. म्हणजे तेथेच आत्या भूमीला क्रॉस क्वेश्चन करते की तुझ्याकडे काय पुरावा आहे. मग भूमी ज्याने तिला पूर्वी किडनॅप केले होते त्याचे नाव घेते. तेव्हा पोलिस त्याला घेउन येतात मंडपाबाहेरून. (इथे आत्याला धक्का इतका बसला आहे की तो माणूस दिसायच्या आतच तो बसतो. अरे त्याला निदान फ्रेम मधे येउ दे.). त्या वरच्या रघूकाकांच्या मुलीचा ना फिर्यादी म्हणून ना आरोपी म्हणून काहीही संबंध तोपर्यंत नसताना उगाचच दोन महिला पोलिस तिला घेऊन येतात.
किमान दहा खून केलेल्या बाईला कोर्टातून जामीन कसा मिळतो व तिला पुन्हा फिर्यादींच्याच घरी कसे राहायला मिळते हा भाग अजून पाहायचा आहे. मराठी सिरीयल्सचे पीनल कोड हे स्वतंत्र आहे हे "आई कोठे काय करते" व इतर अशाच सिरीज मधे दिसले आहे. तसेच काहीतरी असेल.
अधूनमधून कोणाला तरी सांगायची
अधूनमधून कोणाला तरी सांगायची हुक्की
असे दोन स्वतंत्र शब्द लिहीले आहेत,
अगदी राहतात त्या भागातील पातळीवर सुद्धा अॅवॉर्ड
अजून न दिसल्याने ती मेटॅफोरिकली सुद्धा कशाच्या मधे आली कळाले
आपली पाठ करत नाचत येत नाही हा भाग (थँकफुली) सोड्ला
>>>
मनमोहन देसाई मोड मधे आहेत.

पोलिस त्यांना अधूनमधून लागेल तसे
मग कसले बेकायदेशीर?
मूव्ह ऑन" करतात.
तसे मंडपाबाहेरून आरोपी आणणे
अरे त्याला निदान फ्रेम मधे येउ दे
आरोपी म्हणून काहीही संबंध तोपर्यंत नसताना
मराठी सिरीयल्सचे पीनल कोड हे स्वतंत्र आहे
>>>>
महाजन शब्दाचा 'ज' चा हिंदी उच्चार मीही सुरवातीला नोटीस केला होता. मला वाटलेच होते ते 'दिवानगी, दिवानगी' गाणं असेल. 'बिझनेस वूमन' असे दोन स्वतंत्र शब्द लिहिण्यावरून आत्याचे जरासंधासारखे (मेटॅफॉरिकली) दोन तुकडे करण्याचा प्रयत्न व ते तुकडे पुन्हा जोडले जाऊन त्या काड्या करणार- याचे प्रतीक असेल असे वाटत आहे. शोधल्या शिवाय प्रतीकं सापडत नाहीत.
फारएण्ड मस्त पोस्ट
फारएण्ड मस्त पोस्ट
महाजनमधल्या 'ज'चा उच्चार आम्हीपण 'ज जनतेतला' करतो.
धमाल गोषवारा!
मी पाहत नाही सिरीज, पण त्या लोकांच्या केजो टाईप एन्ट्री चा भाग पाह्यला आवडेल..नक्की कोणत्या एपिसोड मधे आहे?
महाजन आम्ही तरी जहाजातला ज म्हणतो..पण मला आता विचार केल्यावर जनतेतला ज जास्ती योग्य वाटतो आहे..
जन शब्दावरून महाजन आलेला आहे ना!
जन शब्दावरून महाजन आलेला आहे
जन शब्दावरून महाजन आलेला आहे ना!
खरंच, छल्ला. 'राजन' शब्दातला 'ज' ही तसाच उच्चारला जातो.
>>>
फा दोन्ही पोस्टी भन्नाट.
फा
दोन्ही पोस्टी भन्नाट. प्रचंड हसतेय वाचून.
' आपल्यामध्ये ' ला विशेष हसू आलं. हे सर्रास होतंय आता सीरिअल्स मध्ये.
अरे काय! मालिकांचा पीनल कोड
अरे काय!
मालिकांचा पीनल कोड 
महाजनचा उच्चार नाशिक/नासिकसारखा दोन्ही प्रकारे ऐकला आहे.
जन शब्दावरून महाजन आलेला आहे ना >>> हो, नुकतंच 'इति-आदि' पुस्तक वाचलं, त्यात टिकेकरांनी जुन्या चालीरीती सांगताना अभिजन, महाजन, जन - अशा श्रेणी वापरल्या आहेत. ते वाचायला खूप छान वाटतं. आणखी एक चौथी श्रेणीही आहे 'जन' असणारी, तो नेमका शब्द आत्ता आठवत नाही.
पुण्यात तरी आम्ही महाजनचा
पुण्यात तरी आम्ही महाजनचा उच्चार कर्जत मधल्या ज ने करतो. कोकणातही तसाच करत असावेत. ही कथा अलिबाग मधली आहे. हिंदी उच्चार वेगळा - जन आणि महाजन मधला ज सेम - आहे हे माहीत आहे.
एनीवे, तर लोकहो या अभूतपूर्व खटल्यात १०-१२ खून केलेल्या, बोटीवर बॉम्बस्फोट घडवलेल्या, सुनेचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणार्या व वेळोवेळो विविध कटांत सामील असलेल्या साथीदारांचेही खून केलेल्या आत्याची सुटका केवळ "आकाश ने तक्रार मागे घेतली" म्हणून झालेली आहे! इतकेच नव्हे तर ज्या घरातील लोकांचा तिने खून केला आहे त्याच घरी पुन्हा परत जाण्याचीही मुभा तिला आहे.
ही सुटका आहे की जामीन आहे क्लिअर नाही. तो इन्स्पेक्टर परवा म्हणत होता की आकाश ने तक्रार मागे घेतली तर जामीन मिळू शकतो. पण आत्या तर तिला सोडून दिले म्हणत होती. हा एखादा पैशांच्या फसवणुकीचा किरकोळ सिव्हिल खटला आहे अशा थाटात सगळे चालले आहे. सरकारला यात काही इंटरेस्ट दिसत नाही.
आणि आकाशने तक्रार मागे घेण्याचे कारण तितकेच महान आहे. "अलिबाग वार्ता" हे एकाच वेळेस किरकोळ लाचेवर पाहिजे तशी बातमी देणारे, पण शहर-राज्य लेव्हलचे टॉप चॅनेल आहे. त्यात महाजन कुटुंबाच्या बातम्या त्यात एखाद्या मालिकेतील गप्पांसारख्या सांगितल्या जातात. नुसता "आकाश, टीव्ही लाव" म्हंटल्यावर टीव्ही लावला, की यांचीच बातमी सुरू असते. (आधीही त्यांच्या पेपर मधे आत्याला बिझिनेस वूमन मिळाले ही फ्रंट पेजवर मेन हेडलाइन होती). तर त्या बातमीदार व्यक्तीने यातून काय महाजन गार्मेण्ट्स ही कंपनी टिकत नाही वगैरे "बातमी" दिलेली असते. मग यातून महाजनांची बदनामी, कुटुंब चर्चेत राहणे ई नको म्हणून आकाश "तक्रार मागे घेतो".
अशा गंभीर गुन्ह्यात अशी तक्रार वगैरे मुळात महत्त्वाची नसते. हे खटले सरकार विरूद्ध आरोपी असे असतात. फिर्यादी वि आरोपी असे नव्हे. एखाद्याचा खून केला व त्याच्या मुलाने अहो जाउ द्या म्हंटले तर त्याने काही फरक पडत नाही.
आणि अभिजीत व पौर्णिमा हे आत्याच्या सगळ्या गुन्ह्यांत सामील होते. अभिजितचा अनेक गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग होता व त्या साक्षीदारांच्या जबानीत ते सगळे ऑलरेडी आलेले असणार. प्रमुख साक्षीदाराने त्याला गोळी लागल्यावर तेथे अभिजितला पाहिलेलेही असते. तरीही ते दोघे मोकळे फिरत आहेत. बहुधा ते सिरीज मधले साइड रोल्स असल्याने त्यांच्या गुन्ह्यांना कोणी विचारत नाही असे दिसते.
आत्या परत घरी आल्यावर मग भूमी व आकाश तिला "बेदखल" करतात. म्हणजे घरातून हाकलून देतात. पुन्हा बहुधा तीच केसरी ट्रॅव्हल्सची रिकामी बॅग दिसते फेकलेली. भूमी अॅपरण्टली वरती जाउन ती भरून आणते. पण भूमी व आत्या ज्या सहजतेने ती हॅण्डल करत होत्या त्यावरून ती पूर्ण रिकामी होती हे नक्की. नाहीतर इतके लोक तेथे असताना हे महान लोक ६-७ महिने प्रेग्नंट असलेल्या स्त्रीला कपड्यांनी भरलेली बॅग उचलून जिन्यारून खाली यायला व ती उचलून फेकायला लावत होते असा अर्थ होईल.
अजून काही दिव्य भाषांतरे ऐकली. "याची चर्चा शहरभर चालू आहे" हे एक. दुसरे म्हणजे "अजून तुझे दुधाचे दात तुटले नाहीत...". एकूण याच नव्हे तर इतर बर्याच मराठी सिरीजमधले मराठीचे वय हे अजून दुधाचे दात न
पडलेलेतुटलेले आहे.पूरे शहर में यही चर्चा !
ललिता-प्रीति, बुधजन का?
एकूण याच नव्हे तर इतर बर्याच
एकूण याच नव्हे तर इतर बर्याच मराठी सिरीजमधले मराठीचे वय हे अजून दुधाचे दात न पडलेले तुटलेले आहे.
>>>
ललिता-प्रीति, बुधजन का?
ललिता-प्रीति, बुधजन का?
>>> 'विजन' (मी त्या पुस्तकात पुन्हा शोधलं)
फा या मालिकांची पटकथा वगैरे
फा
या मालिकांची पटकथा वगैरे जे कोणी लिहितात त्यांना बर्याच बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नसतात असंच पाहिलेलं आहे एकूण. त्यामुळे दुधाचे दात तुटणं इज करेक्ट. आयुष्यभर तेच कंटिन्यू होत असतील 
Pages