
गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.
या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!
मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.
मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!
रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.
इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.
१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.
धनुडी तू पण हाबिल्ड जॉईन
धनुडी तू पण हाबिल्ड जॉईन केलयस का? कितीची बॅच करतेस? बुडला तर फार वाईट नको वाटून घेऊस पण आठवड्यातून बुडण्याची फ्रिक्वेन्सी कमी करता येते का बघ किंवा पाऊणतास न करता २०-२५ मिनिटे जमतायत का बघ सुरवातीला. माझेही बुडते अगं अधूनमधून. मग मी चालून भरुन काढते तो दिवस. एखादा दिवस ऑफीस आणि घर पुर्ण थकवून टाकतं सगळीकडे एकाच दिवशी एक्स्ट्राची कामे निघून. अशावेळी स्वतःला थोडे मागे पडायचे स्वातंत्र्य देऊन टाकायचे. नेक्स्ट डे पुन्हा स्केड्युल ट्रॅकवर न्यायचे. आपल्या सारख्यांच असे चार पावले पुढे दोन मागे होतच रहाणार गं. तरी टाकायची पावले परत परत
चपात्या केला. कप्पा आवरायला
चपात्या केला. कप्पा आवरायला वेळ नाही मिळाला.
दिवस सहावा
दिवस सहावा
जिम नाही मात्र दिवसभरात मिळून 10K plus स्टेप्स झाल्या.
नो मैदा नो शुगर 100 टक्के फॉलो.
व्यायाम नाही. आज २५ मिनिटे
व्यायाम नाही. आज २५ मिनिटे चालले पण ते एकदम संथ लयीत. नो मैदा पाळलं. म्हणजे आजचा स्कोअर ६०%
आज बुधवार. आठवड्याच्या
आज बुधवार. आठवड्याच्या अपडेटचा दिवस. तर गेले सात दिवस रोज अर्धा तास चालले आहे. रविवार सोडून बाकी सगळे दिवस Habuild योगा क्लास केला. त्यामुळे रविवारी extra चालले.
पहिल्या आठवड्यात तरी सातही दिवस संकल्प पूर्ण करता आला आहे.
खरं तर माझा संकल्प जानेवारीतच
खरं तर माझा संकल्प जानेवारीतच ठरला आणि सुरु झाला. आधी रोज चालण्यापासून सुरुवात झाली. नंतर त्यात स्ट्रेंग्थ ट्रेनिंग वाढवलं.
जून महिन्यात प्रसाद शिरगावकर च्या पोस्ट मुळे हॅबिल्ड योगाची ओळख झाली. त्यात 21 दिवस फ्री चॅलेंज पूर्ण केल्यावर वर्षाचं सदस्यत्व घेतलं. गेले 2 महिने रोज (सातही) दिवस सेशन पूर्ण करत आहे. गेल्या महिन्यात सूर्य नमस्कार सेशनमध्ये 20/40/60/80/108 असे 5 दिवसांत 308 सूर्य नमस्कार पूर्ण केले.
रोज फिटनेस रिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ते गोल्स आता वाढवून 720 ऍक्टिव कॅलरी / 75 मिनिटे व्यायाम / 15 तास स्टॅन्ड गोल असा 3 महिन्यापूर्वी केला आहे. गेले 2 महिने काही दिवस कुठलातरी गोल पूर्ण होत नसे. ऑगस्ट हा पहिलाच महिना ज्यात 3 हि गोल्स अख्खा महिनाभर पूर्ण झाले. तर आता संकल्प हाच आहे कि पुढचे 4 महिने तीनही गोल्स रोज पूर्ण करायचे.
तर हा व्यायामासंदर्भातला संकल्प.
इतर २ संकल्पः
१. रात्री ८ च्या आधी जेवण किंवा खाणं संपवायचं / सकाळी ११ नंतर जे काही खाणार ते. (यात फक्त सकाळी ८/८:३० वाजता ब्लॅक कॉफी होते).
२. रात्री १०:३० च्या आत झोपणे.
.असच न चुकवता रोज क्लास अटेंड
.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
संकल्प पूर्ण.
नाही कविन , माझी बहिण घेते
नाही कविन , माझी बहिण घेते ऑनलाईन तो क्लास बुडतोय माझा.
काल २० मि. योगासनं केली.
काल २० मि. योगासनं केली.
व्यायाम झाला. नो मैदा पाळलं.
व्यायाम झाला. नो मैदा पाळलं. आज १००% सफल
भाकऱ्या केल्या. जाम बिघडल्या
भाकऱ्या केल्या. जाम बिघडल्या आज….
कशाबशा संपवल्या….
कप्पा आवरला नाही.
१..असच न चुकवता रोज क्लास
१..असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
संकल्प पूर्ण.
काल गुरुवारी
काल गुरुवारी
व्यायाम केला
मैदायुक्त पदार्थ खाल्ले नाहीत
साखर आणि गोड नवाही5
बाप्पा कृपेने सगळे नीट जमले
काल व्यायाम झाला नाही किंवा
काल व्यायाम झाला नाही किंवा चालणं पण नाही. आज ४० मिनिट्स चालून झालं. संध्याकाळचा व्यायाम चुकू नये यासाठी प्रयत्न करणार. (गणपतीच्या कामांमुळे उशीर होतोय म्हणून कालचं आणि आजचं असं मिळून ४० मि चालले आहे, पण तरी योगासनं व्हावीत असं वाटतंय)
माझा संकल्प साधाच आहे पण सद्य
माझा संकल्प साधाच आहे पण सद्य स्थितीत आवश्यक आणि थोडा कठीण आहे तरीही बाप्पा पूर्ण करुन घेतोय.
माझा एकही संकल्प आज पूर्ण
माझा एकही संकल्प आज पूर्ण नाही झाला.
१.असच न चुकवता रोज क्लास
१.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
संकल्प पूर्ण.
१. रात्री ८ च्या आधी जेवण
१. रात्री ८ च्या आधी जेवण किंवा खाणं संपवायचं / सकाळी ११ नंतर जे काही खाणार ते. - झाले.
२. रात्री १०:३० च्या आत झोपणे - नाही. ११:०० ला झोपलो.
३. फिटनेस रींग (३ही) - झाल्या.
काल व्यायाम केला नाही.
काल व्यायाम केला नाही.
ऑफिसनंतर रस्त्यावर तुडुंब गर्दीत अडकू नये म्हणून जिमला गेलो नाही.
मैदा आणि साखर नाही खाल्ले.
गुड मॉर्निंग सर्वाना
गुड मॉर्निंग सर्वाना
आणि गणेश स्थापनेच्या शुभेच्छा.
काल ऑफिसची कामं, संध्याकाळी गणपती आणणे,आवराआवरी यात काहीही विशेष झालं नाही.गणपतीबाप्पा येऊन गेल्यावर जरा रुळावर यावं लागणार आहे.
धावपळ झाल्याने इंडिकेटर्स पूर्ण झाले.एक 6.4 किलोमीटर चालायचा 1 किलोमीटर उरला होता तो झोपताना घरात पूर्ण केला.
फारच मस्त उपक्रम आणि कन्सेप्ट
फारच मस्त उपक्रम आणि कन्सेप्ट.
मला सर्वसिद्धी कर प्रभो चा वापर फार आवडला. शीर्षक ज्याने निवडलं त्याला एक मोठी शाबासकी.>> +१
खरंच खूपच छान कल्पक. धन्यवाद मायबोली
काल ठरवल्या इतका व्यायाम झाला
काल ठरवल्या इतका व्यायाम झाला नाही. चालणेही २५ मिनिटे इतकेच झाले. मैद्याचे काहीही खाल्ले नाही. ६०% सफल संकल्प
कालचा ४०% राहिला होता म्हणून
कालचा ४०% राहिला होता म्हणून आज १४०% व्यायाम केला
'ऐसा बोले तो कैसे चलेगा, कल भी खाना पिना सोना किया ना तो व्यायाम भी करने का रे वैसेईच' अशी टप्पल पण मारली स्वतःलाच.
क्रिटीक याच देहात रहातो म्हणून बर चाल्लय
पण अशा रितीने आज व्यायाम आणि नो मैदा संकल्प पुर्ण झाला आहे
आज व्यायाम नाही
आज व्यायाम नाही
साखर घातलेला पेढा मोदक खाल्ला
मैदा आवरण असलेला तळणीचा मोदक खाल्ला
आज शून्य टक्के पूर्तता
असो एखादा दिवस असाही
कप्पा आवरला.
कप्पा आवरला.
चपात्या नाही केल्या.
आज शून्य व्यायाम झालाय, उलट
आज शून्य व्यायाम झालाय, उलट बेतालपणे मनसोक्त मोदक खाल्ले आहेत. आता प्रचंड निग्रह करून गाडी रुळावर आणायलाच हवी.
१..असच न चुकवता रोज क्लास
१..असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
संकल्प पूर्ण.
काल चपात्या केल्या (सकाळी व
काल चपात्या केल्या (सकाळी व संध्याकाळी)
कप्पा आवरला.
काल आणि आज सूर्यनमस्कार घातले
काल आणि आज सूर्यनमस्कार घातले.
.
आज जरा कठीण होतं. ओम पाठीवर येऊन बसतो, खेळायचं असतं त्याला. आज ऐकतच नव्हता. एरवी काहीतरी सांगून बाजूला करता येतं त्याला.
काल व्यायाम झाला, नो मैदा
काल व्यायाम झाला, नो मैदा पाळले
Pages