
गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.
या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!
मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.
मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!
रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.
इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.
१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.
कालपासून वॉकला सुरूवात केलेली
कालपासून वॉकला सुरूवात केलेली आहे. सकाळी habuild क्लासमधे योगासनं आणि व्यायाम चालू आहेतच. केवळ २१ दिवसच नव्हे तर कायमसाठी हे करता यावं अशीच इच्छा आहे.
२१ दिवसांचा संकल्प आहे तर इथे रोज अपडेट देण्याऐवजी दर बुधवारी अपडेट्स देत जाईन.
पण आज निदान मुलापासून सुरुवात
पण आज निदान मुलापासून सुरुवात करतो.
>>>>
करून दाखवले... आणि जे काही केले त्याला अभ्यास नाव न दिल्याने तो रमला सुद्धा. तरी मुलीने त्याला तो जे करतोय ते अभ्यास आहे म्हणून त्याचे कान भरायचा प्रयत्न केला. पण त्याला मजा येऊ लागल्याने त्याने तिला भाव दिला नाही
१.असच न चुकवता रोज क्लास
१.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
आज सकाळीसकाळीच, कामानिमित्त,
आज सकाळीसकाळीच, कामानिमित्त, बाहेर जाणे झाल्याने. जिमला बुट्टी.
-----------
१०,००० स्टेप्स.
केवळ २१ दिवसच नव्हे तर
केवळ २१ दिवसच नव्हे तर कायमसाठी हे करता यावं अशीच इच्छा आहे.
२१ दिवसांचा संकल्प आहे>>>
असं म्हणतात २१ दिवस एखादी गोष्ट रोज केली तर तिची सवय होते..
कदाचित म्हणूनच "२१ दिवस" निवडले असावे
आज सकाळीच व्यायाम संकल्प
आज सकाळीच व्यायाम संकल्प पुर्ण झाला, ४० मिनिटे चालून आले (ब्रिस्क वॉक)
नो मैदा जमवेनच दिवसभरात
काल झाले नाहीत सूर्यनमस्कार.
काल झाले नाहीत सूर्यनमस्कार.
आज झाले.
एक तास व्यायाम केला.
एक तास व्यायाम केला.
पेटी: मेरा जुता है जापानी: सुरुवातीचा आणि मधले पीसेस पण बसवले. सोपं आहे गाणं.
मी जो सा धरतोय त्यात भैरवी आणि शुद्ध ग आणि ध चा वापर पण आहे. टिपेचं मानलं आणि पहिल्या पट्टीतला म हा सा मानला तर ग नि कोमल काफी थाटातील होईल.
मूळ गाणं आणि मग मध्ये मध्ये भरायला/ कनेक्ट करायला भरपूर बारीक बारीक पीसेस आहेत ज्यानी गाण्याला एक समृद्ध पोत मिळालाय. मजा आली.
काल कुठलाच व्यायाम प्रकार
काल कुठलाच व्यायाम प्रकार झाला नाही. सकाळी 8:15 ते रात्री 8:30 ड्यूटी झाली आणि तशीच दमून गेले. आता कामावर आलेय आणि मधे वेळ काढून 20 मि चालणार. मग संध्याकाळी योगासनं.
७ ५ ० ० स्टेप्स झाल्या .
७ ५ ० ० स्टेप्स झाल्या .
कप्पा आवरला.
डिजिटल कचरा - थोडेसे साफ केले
आजचा दिवस सफल, भाकर्या
आजचा दिवस सफल, भाकर्या केल्या, एक कप्पा आवरला.
दिवस १ : मी आज पाऊण तास (एक
दिवस १ : मी आज पाऊण तास (एक किलोमीटर) पोहून आले.
बिस्कीटं खाल्ली नाहीत.
रोज किमान अर्धा तास व्यायाम
रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
>> यातले काहीच आज झालेले नाहीये. मुलासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करेन.
कालचा राहून गेलेला आणि आजचा
कालचा राहून गेलेला आणि आजचा ठरलेला, दोन्ही व्यायाम मिळून 40 मि केला. 20 चालणं, 20 योगासनं.
सध्या तरी 20 मिळून पेक्षा जास्त वेळ काढता येत नाहीये, पण जमेल तसं वाढवणार.
आज cardio व्यायाम केला.
आज cardio व्यायाम केला.
साखर आणि गोड काही खाल्ले नाही
मैदा पदार्थ देखील नाही.
बाप्पा कृपेने आजचा तिसरा दिवस सफल संपूर्ण
भारी उपक्रम आहे संयोजक.
भारी उपक्रम आहे संयोजक.
सध्या पाय मोडलेला असल्याने व्यायाम , बागकाम आणि इतर छंद बंद आहेत. पण सर्व संकल्पटूंना शुभेच्छा!
कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, >> जे कोणी हे करणार असतील आणि धूम्रपान पूर्णपणे सोडतील त्यांना माझ्यातर्फे बक्षीस !
१.असच न चुकवता रोज क्लास
१.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले.
आजही जिम २० मिनिटेच झाले. आज
आजही जिम २० मिनिटेच झाले. आज संध्याकाळी बाहेर ड्राईव्हला जाउ तेव्हा वॉक होणार नाही.
२७, २८, २९ या तिन्ही दिवशी
२७, २८, २९ या तिन्ही दिवशी पुस्तक वाचन झालं.
काल मात्र हापिसात उशीर झाल्याने वाचन झालं नाही.
त्यामुळे आज तासभर वाचन करणार.
आजचे सूर्यनमस्कार झाले
आजचे सूर्यनमस्कार झाले
आजही २० च मिनिटे जिम. कॉफी न
आजही २० च मिनिटे जिम. कॉफी न घेता गेलेले.
चपात्या केल्या.
चपात्या केल्या.
आवराआवरीला वेळ नाही मिळाला…
व्यायाम झाला. नो मैदा पाळले.
व्यायाम झाला. नो मैदा पाळले. आजही संकल्प सफल झाला
१.असच न चुकवता रोज क्लास
१.असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. केला
२. रोज अर्धा तास चालणर. चालले
१०.५०० स्टेप्स झाल्या.
१०.८०० स्टेप्स झाल्या.
काल आणि आज दोन्ही दिवस
काल आणि आज दोन्ही दिवस व्यायाम केला.
हे पूर्वी बसवलेलं होत. का कोण जाणे काळी २ मध्ये चालू केलं. सगळे वरचे स्वर. वैताग आला, पण वाजवलं तसच.
पेटी पण वाजवली. आज 'तुला पाहते रे '... जुनं हो. आशाने गायलेले फडक्यांचे. तुपारे ऐकलं की माबोकर एक्साईट होतील नाहीतर.
आजचे सूर्यनमस्कार झाले
आजचे सूर्यनमस्कार झाले
दिवस २ आणि ३
दिवस २ आणि ३
दोन्ही दिवस पोहायला गेले. पाऊण तासात एक किलोमीटर पोहून आले. काल बिस्किटे खाल्ली नाहीत. मैत्रिणीकडे गेले होते, तिथे कॉफी बरोबर ऑफर केली. मी चातुर्मासात बिस्किटे सोडली आहेत, असं सांगून टाळली.
जिम सुट्टी शनिवार रविवार
जिम सुट्टी शनिवार रविवार
त्यामुळे व्यायाम नाही.
गोड खाणे साखर वै सगळे मात्र नीट फॉलो झाले
नो मैदा नीट सुरुय.
बाप्पा चरणी दिवस चौथा.
एक निरीक्षण नोंदवतो.

मैदा नको हे मला फार जड जात नाही.
कारण बाहेरचे खाणे कमी आहे. घरीच बिस्किटं खाल्ली जायची.
गोडाचं सांभाळणे मात्र कठीण असते.
घरी, ऑफिसात, बाहेर सगळीकडे साखरेने ताबा घेतलाय आपला.
घरी सणासुदीला गोडधोड, ऑफिसात कुणाचा बड्डे की गोडधोड अथवा चॉकलेट्स, कुणी गाडी घेतली की पेढे, कुणाला मुलं झाली की पेढे बर्फी वै, कुणाकडे गेलो की चहा बिस्किटं वै
समोरच्याला समजावून सांगणे कठीण असते.
मग काहीतरी वेगळं कारण सांगून कटवावे लागते.
चहा नको तर दूध तरी घ्या ( त्यात साखर घालणार ) , ग्रीन टी सुद्धा साखर घातलेला ऑफर झाला आहे.
जो कोणी गोड बिलकुल खात नाही बाहेर देखील, ते लोक उपाय शेअर करू शकता.
उद्या श्रावण शेवटचा सोमवार आहे.
उद्या कसोटी आहे.
आणि बाप्पा आल्यावर तर मजाच असणारे.
ते लोक उपाय शेअर करू शकता.>>>
ते लोक उपाय शेअर करू शकता.>>>>
१. डॅाक्टरांनी सांगितलंय गोड बंद म्हणजे बंद.साखरेचा एक दाणापण खायचा नाही.
२. नवस बोललो होतो. तो फेडतोय.
३. आमच्या गुरुजींनी सांगितलंय
४. अमुक तमुक वारले, त्यांना गोड आवडायचं. आमच्यात जवळचं कोणी गेलं की एक वर्ष त्यांच्या आवडीचा पदार्थ सोडायची रीत आहे….
Pages