एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.
आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.
तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.
बापरे खं बा, साधना.. औघड
बापरे खं बा, साधना.. औघड परिस्थिती होती ना..
आमच्याकडे उन्हाळ्यात पिण्याचे
आमच्याकडे उन्हाळ्यात पिण्याचे पांणी रोज येत नाही . त्यामुळे त्याची साठवण करावी लागते . याच वर्षी आम्ही असेच पाणि भरून ठेवले आणि अचानक नवऱ्याचाअकॅसिडेंट झाला . ऑपेरेशन होते म्हणून दोन दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागले . डिस्चार्ज घेऊन घरी आलो . दोन दिवस घर बंद म्हणून पाण्याचे पिप सरकवून झाडून घ्यावे म्हणून मी पिपापाशी गेले . काहीतरी हालचाल जाणवली . थोडे थांबून पिप सरकावावे म्हणून थांबले तर भरलेले पिप हलले. मग मात्र घाबरले. ओरडले तर नवरा घाबरले म्हणून तशीच बाहेर आले आणि शेजारील दोघांना बोलावले. धाडस करून त्यांनी पिप हलवले तर पिपाच्या मागे भली मोठी घोरपड मस्त बसली होती. तिला पाहूनच सगळ्याची बोबडी वळाली . काय करावे ते सुचेना, मग सर्प मित्र ला फोने केले पण कोणीही येण्यासाठी तयार होत नव्हते . जशी जशी रात्र होऊ लागली खूप भीती वाटू लागली. मग एकाने वन विभागला कळवले, पण त्यांची विशीष्ट टीम जी घोरपड पकडू शकले ते सध्या avilable नाहीत असे कळले. आत्ता काय करावे तो पर्यंत घरा समोर बघ्यांची गर्दी झालेली . शेवटी आमच्या घरा जवळ राहणाऱ्या दोघा सर्प मित्रांनी धाडस केले आणि तिच्या गळ्यात मोठा दोरखंड बांधला पण काही केल्या ती बाहेर येत नव्हती . थोडी गर्दी पांगवली वातावरण शांत केले मग जवळजवळ ३-४ तासाच्या प्रयत्न केल्यावर तिला बाहेर आणले. पुढचे ४-५ दिवस खूप दहशतीत गेले. अजून आठवले कि अंगावर काटा येतो
बापरे.घरात घोरपड. फारच भीती
बापरे.घरात घोरपड. फारच भीती वाटली असेल.फोटो व्हिडिओ काढला होता का?
निरूपद्रवी असते. पण भीती
निरूपद्रवी असते. पण भीती वाटणे साहजिक आहे.
घराचं नाव कोंढाणा आहे का?
बाप रे घोरपड ? कुठून आली
बाप रे घोरपड ? कुठून आली असेल कशी आली असेल ? घरात लपून बसली होती म्हणजे घाबरून जीव वाचवायलाच लपली असणार . बिचारीने काय खाल्लं असेल त्या दरम्यान ?
बापरे!
बापरे!
घरात लपून बसली होती म्हणजे
घरात लपून बसली होती म्हणजे घाबरून जीव वाचवायलाच लपली असणार .>>>>>> घोर(त) पड(ली) असेल
<< गुंडांनी होणाऱ्यी नवऱ्याला
<< गुंडांनी होणाऱ्यी नवऱ्याला नाव विचारलं व माडगुळकर नाव ऐकून ते गाणं लिहीणाऱ्या माडगुळकरांचे तुम्ही कोण म्हणून विचारलं. त्यांचा मुलगा असं समजल्यावर सोडलंही. >>
म्हणजे चोर एकंदरीत रसिक आणि सुसंस्कृत होते तर. Hनारार>>
नारायण सुर्वेन्च्या मुलीच्या घरी चोरी झाली. त्यान्च घर आहे कळल्यावर चोराने वस्तू परत आणून ठेवल्या असे वाचले नुकतेच
घोरपडी वरून एक प्रसंग आठवला.
घोरपडी वरून एक प्रसंग आठवला. माझ्या लग्नानंतर पहिल्या दिवाळीला आम्ही दोघे गावी गेलो होतो. घर जुन्या पद्धतीचे माळवद असलेले आहे. आतल्या खोलीतून आतमधूनच वरच्या माडीवर जायला कायमची शिडी बसवलेली आहे.
)
तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी जागी झाले तेवढ्यात त्या शिडीवरून एक भलीमोठी घोरपड सरसर खाली आली आणि पुढच्या दारातून थेट अंगणात जाऊन बदामाच्या झाडाखाली ऊन खात बसली..
घरातले बाकी सगळे एकदम निवांत पण माझी चांगलीच तंतरली होती. सासूबाई म्हणाल्या लक्ष्मी आहे ही.. घरातच माडीवर राहते. .. बापरे! नंतर कितीतरी वर्ष त्या रूम मध्ये मी एकटीने जायला घाबरायचे. आता आम्ही दोघींनी एकमेकींना accept केले आहे.. (आम्ही दोघी म्हणजे मी आणि घोरपड.. मी आणि सासूबाई न्हवे
मनिम्याऊ
मनिम्याऊ
) पाल किडे वगैरे खाते म्हणून असेल. या न्यायाने घोरपडीला महालक्ष्मी म्हणायला हरकत नाही 
आम्ही त्याचं आणि तो आमचं अस्तित्व स्वीकारून असतो, एवढंच.
घरात कायमस्वरूपी घोरपड हे फारच आश्चर्यकारक आहे. पालीला घरातली लक्ष्मी म्हणतात हे ऐकलंय. ( अनु हे वाचू नकोस
घोरपड नाही, पण सरड्यापेक्षा मोठा आणि घोरपडीपेक्षा लहान, असा एक 'सपकाळ' नावाचा प्राणी आमच्याही गावच्या घरात माडीवर (माळ्यावर) कायमस्वरूपी वस्तीला असतो. मात्र तो असा बिनधास्त ऊन वगैरे खायला खाली येत नाही
महालक्ष्मी
महालक्ष्मी
घोरपडीला महालक्ष्मी म्हणायला
घोरपडीला महालक्ष्मी म्हणायला हरकत नाही >>>
लोक वट्ट पैसे मोजून इग्वाना पाळतात मग घरी आयती घोरपड असली तर मजाच की
बापरे घरात घोरपड? तान्ह्या
बापरे घरात घोरपड? तान्ह्या मुलांचं वगैरे काय मग? कुत्रा/मांजर वगैरे असेल तर आपण त्यांना शिकवतो की लहान मुलाला हर्ट करायचं नाही. घोरपडीला कसं शिकवणार? मला तर झोपच येणार नाही.
तान्ह्या मुलांचं वगैरे काय मग
तान्ह्या मुलांचं वगैरे काय मग?>>>> . तान्ही बाळं तर असायचीच.. घरी किंवा आसपास. पण कधी काही अघटित घडल्याचं ऐकलं नाही.
कुत्रा/मांजर वगैरे असेल तर
कुत्रा/मांजर वगैरे असेल तर आपण त्यांना शिकवतो की लहान मुलाला हर्ट करायचं नाही. घोरपडीला कसं शिकवणार?>>>>
घोरपडीचा वावर घरात असा नसतो. माळ्यावरून डायरेक्ट बाहेर.
.
बापरे , घोरपड ... ती ही
बापरे , घोरपड ... ती ही घरात !
आणि खूप कॉमन असल्यासारखं दिसतंय की.
माझ्या लहानपणीच्या आठवणीत २-३
माझ्या लहानपणीच्या आठवणीत २-३ वेळा घोरपड आल्याचे आठवते. कौलारु घर होते. घोरपड खाली घरात उतरत नसे, छतावरुन आत - बाहेर करुन जात असे. आमच्याकडेही तिला लक्ष्मी म्हणत. साप-विंचू वगैरे निघत त्या मानाने घोरपड प्रकरण अगदीच सेफ प्रकरण वाटे.
कुठून आली , कशी आली हे सगळे
कुठून आली , कशी आली हे सगळे कोडंच आहे, कोणीच कशी पहिली नाही येताना काय माहित, पण ती जाम चिटकून बसली होती, तिला अजिबात बाहेर यायचे नव्हते. मुळात ती निरुपद्रवी असते हे उशिरा कळाले . चक्क दोन दिवसा नंतर वनविभाग चे लोक आले तेव्हा हि माहिती कळली .
घोरपड किस्से जबराट आहेत.
घोरपड किस्से जबराट आहेत.
आम्ही दोघी म्हणजे मी आणि घोरपड.. मी आणि सासूबाई न्हवे >>> मनिम्याऊ
घोरपडीला महालक्ष्मी >>> _/\_
मी इथे निवांत बसून हसते आहे खरी पण ही अशी घोरपड समोर आली असती तर प्रचंड भीती वाटली असती बरं!
मी घोरपड खातो. मस्त लगतं मटण.
मी घोरपड खातो. मस्त लगतं मटण.
घोरपड घरात येण्याची कारणे
घोरपड घरात येण्याची कारणे
१. टिव्ही / रेडीओ वर लागलेल्या थोडीसी जो पिली है गाण्याच्या शेवटचे शब्द हम तो गिरपडे ऐकून घोरपडीला ते घोरपड ये असे ऐकू येत असावे.
२. ज्या घरात घोरपड येते त्या घरातल्यांचे किंवा आजूबाजूच्यांचे आडनाव शेलार(मामा) असणे'
३. घराला कोंढाणा हे नाव दिलेले असणे
४. घरात अजय देवगणचा फोटो असणे
५. -- अन्य कारणे
घोरपड चर्चा बापरेवरुन हाहाहा
घोरपड चर्चा बापरेवरुन हाहाहा पर्यंत गेली.
घोरपडे किस्से महान आहेत.
घोरपड किस्से महान आहेत.
आम्ही दोघी म्हणजे मी आणि घोरपड.. मी आणि सासूबाई न्हवे >>>
घोरपडीला महालक्ष्मी >>>
मी लहान असताना डोंबिवलीला आमच्या घरामागे शेत होतं. मुंगूस, घोरपड अनेकदा दिसायचे. पावसाळ्यात खेकडे, साप घरात येण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मामी सेम घोरपड सोडून सगळे
मामी सेम घोरपड सोडून सगळे जवळपास नांदताना बघितलं आहे, घरात नाही पण दारात यायचे. मग कॉंक्रीट जंगल व्हायला लागल्यावर कमी झालं प्रमाण.
इथल्या घोरपडीच्या
इथल्या घोरपडीच्या किस्स्यावरून मला एक किस्सा आठवला.
बरेच वर्षांपूर्वी आम्ही चित्रकुटला सहलीसाठी गेलो असताना तिथे ज्या हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो त्यांच्या स्वयंपाकघरात एक मुंगूस पाळले होते. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही त्यांच्या डायनिंग हॉल मध्ये जेवायला बसलो तेव्हा हे मुंगूस अगदी आरामात एकदम तिकडे, टेबलाखाली फिरू लागले. आमच्यातल्या सगळ्याची भीतीने गाळण उडाली. पण मग त्या मालकाने ते आम्ही पाळले आहे, ते काही त्रास देणार नाही असे सांगितले. मग आम्हाला त्याची सवय झाली. नाव पण भारी त्याचे, नकुल. बायका रोज सकाळी बाहेर पडताना त्याला हाक मारायच्या, त्याच तोंड बघायला
नकुल - मुंगसाला संस्कृतमध्ये
नकुल - मुंगसाला संस्कृतमध्ये नकुल म्हणतात ना? त्यांनी नावच नकुल ठेवलं?
पाळीव मुंगूस, मस्तच.मला आवडेल
पाळीव मुंगूस, मस्तच.मला आवडेल मुंगूस पाळायला.सोसायटीमागच्या भिंतीवर कधीतरी दिसतात.
बघ हो…नंतर मुंगसाचे काय करावे
बघ हो…नंतर मुंगसाचे काय करावे असा धागा काढावा लागेल.

पुण्याहून मुंगूस गावी कसे
पुण्याहून मुंगूस गावी कसे न्यावे? - असा धागा काढता येईल.
प्रेरणा
मुंगूस शी कुठे करतात?(म्हणजे,
मुंगूस शी कुठे करतात?(म्हणजे, मातीत करतात का?की जमिनीवर, फरशीवर?)
जाऊदे धागा हायजॅक होतोय, विषयाकडे वळू.
Pages